जाळं आंतरजालाचं (भाग-१)

This story is related to need of cyber security...

(कथा जरी काल्पनिक असली तरी आजच्या या technology च्या युगात डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकते... फक्त मोबाईल हवा म्हणून केलेला हट्ट आणि त्याचे झालेले परिणाम यातून पाहायला मिळतील... मनोरंजनाबरोबर थोडं सिरियसली सुद्धा काही गोष्टींकडे पाहावे.)

        मागच्या एका आठवड्याच्या कालावधीत प्रसन्न च वागणं पार बदललं होतं! ७ वीत शिकणारा प्रसन्न फार चिडचिड करायला लागला होता, खोटं बोलणं सुरु झालेलं, सारखे आई - बाबांकडे पैसे मागायचा, नेहमी हसत खेळत बोलणारा मुलगा अचानक गप्प गप्प राहायला लागला होता. अरुंधती आणि नचिकेत (त्याचे आई - बाबा) दोघे कामाला जाणारे! कदाचित आपण याला वेळ देऊ शकत नाही म्हणून प्रसन्नचं वागणं बदलत चाललंय असं दोघांना वाटत होतं, म्हणूनच दोघांनी ठरवून आजच ऑफिस मध्ये अर्ज करून मुद्दाम चार दिवसांची सुट्टी काढली होती... एकमेकांशी फोन वर बोलून सुट्टी मिळाली की नाही हे कनफॉर्म केलं! संध्याकाळी प्रसन्न ला surprise द्यायचं असं ठरवून दोघे लवकर ऑफिस मधून निघाले.... 
         घरी पोहोचल्यावर दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली..... घरात सगळं अस्ता व्यस्त सामान पडलं होतं! प्रसन्न एका कोपऱ्यात पायात डोकं खुपसून रडत बसला होता... हातावर काहीतरी खरचटल्या सारखे दिसत होते त्यातून रक्त येत होतं.... हातावर काहीतरी कोरून घ्यायचा प्रयत्न तो करत होता... बाजूलाच कर्कटक पडले होते त्याला रक्त लागलेलं....  हे सगळं पाहून अरुंधती रडायलाच लागली.... नचिकेत नी तिला कसंबसं सावरलं आणि दोघं प्रसन्न च्या जवळ गेले... त्याच्याशी खूप बोलायचा प्रयत्न केला पण हा काही बोलायला तयारच नाही.... समजावून बघितलं, तुला कोणी ओरडणार नाही, मारणार नाही बोल ना बाळा काय झालंय?? अरुंधती समजावत होती... प्रसन्न ने फक्त मोबाईल कडे बोट दाखवलं पण बाकी काही बोलायला तयारच नव्हता... नचिकेत ने प्रसंगावधान दाखवत अरुंधती ला म्हणाला; "अरु! आपण तुझ्या मैत्रिणीकडे सई कडे जाऊया याला घेऊन... ती मानसोपचार तज्ञ आहे ना... तीच याला बोलतं करेल! हा काहीतरी भयानक प्रकार दिसतोय... उगाच आपण अजून गुंता नको वाढवायला."
मध्यंतरी सई त्यांच्या घरी आली होती तेव्हा म्हणाली होती; लोकांना असं वाटत कि मानसोपचार तज्ञाकडे फक्त डोक्यावर परिणाम झालेले जातात... पण असं काही नसतं गं! आजच्या या धावपळीच्या युगात काऊन्सिलर ची गरज पडू शकते! सहसा लहान मुलांना बोलतं करणं अवघड असतं! ते भीती मुळे व्यक्त नाही होत... मग गुंता अजून वाढू शकतो त्यामुळे काऊन्सिलर चा सल्ला घेणं कधीही चांगलं! हेच नचिकेत ला आठवतं आणि अरुंधतीला हा पर्याय सुचवतो! आता अरुंधतीला एक आशेचा किरण दिसू लागतो.. तिघे सई च्या क्लिनिक मध्ये येतात.... रस्त्यात जाता जाताच अरुंधतीने सईला फोन वर थोडी कल्पना दिली होती. 
          प्रसन्न शी बोलायच्या आधी सई अरुंधतीशी बोलू लागली.... सई म्हणाली; "तू फोन वर सांगितलंस कि हा मोबाईल कडे बोट दाखवून गप्प बसला... आणि हातावर जखम करून घेतली आहे.... तो मोबाईल तुमच्या दोघांपैकी कोणाचा आहे की, यालाच घेऊन दिलाय?"
अरुंधती:- दोन महिन्या आधी प्रसन्नच्या हट्टामुळे त्याला एक स्मार्ट फोन घेऊन दिला होता... मोबाईल आल्या पासून त्याची अभ्यासातली प्रगती सुद्धा वाढत चालली होती. तो कधी मोबाईल चा दुरुपयोग करत नव्हता! शाळेत कधी मोबाईल घेऊनही जात नव्हता. त्यामुळे मला आणि नचिकेतला कसलीच काळजी न करता कामाला जाता येत होतं. शाळेत पालक सभेला सुद्धा प्रसन्नच्या वर्गशिक्षिका त्याचं कौतुक करायच्या! सोसायटी मध्ये त्याच्या मित्रांचे पालक प्रसन्नचं उदाहरण द्यायचे.... बघा प्रसन्न मोबाईल वरून कसा अभ्यास करतो, तूम्ही पण करत जा.... नुसता फोन फक्त खेळायला पाहिजे तुम्हा सगळ्यांना.... शिका त्याच्या कडून काहीतरी! पण आज अचानक हा असा का वागला कळत नाहीये... आठवडाभरा पासून वागणं बदलत चाललंय याचं!
सई:- बरं! मी बोलून बघते त्याच्याशी....
        असं म्हणून सईने प्रसन्न ला जवळ घेतलं!  प्रसन्न हळूहळू सावरला... सई ने आधी त्याच्या हातावर मलम पट्टी केली... गोडी गोडीत तिने तिच्या पद्धतीने त्याला बोलतं केलं.... सगळा प्रकार ऐकून अरुंधती आणि नचिकेतला आपण किती मोठी चूक केली हे समजलं.....  जे काही प्रसन्न सांगत होता त्यावरून तो किती त्रास सहन करत होता हे लक्षात येत होतं! एवढं होऊनही इतके दिवस या मुलाने एकही शब्द तोंडातून काढला नव्हता.... पण असं काय घडलं होत?? प्रसन्नने असं काय सांगितलं होतं?? पाहूया पुढच्या भागात... 
       

🎭 Series Post

View all