रथसप्तमी माहिती आणि महत्त्व

How Ratha Saptami Is Celebrated In Different States Of India
रथसप्तमी चे महत्व




                    माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सुर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथसप्तमी पर्यंत उपवास धरला जातो. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावन जवळ रांगोळी काढतात. त्यामध्ये एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यावर सूर्याची प्रतिमा काढून, पूजा करतात. सूर्याला तांबडे गंध ,तांबडी फुले अर्पित केले जातात. नैवेद्यासाठी खीर केली जाते. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत ते उकळण्यात येतं.


             रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणूनही महत्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी आहे असे मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये रथसप्तमी साजरी केली जाते. 
               दक्षिण भारतात हा सण खूप उत्साहाने साजरा करण्यात येतो. वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची पूजा, उपासना या दिवशी करण्याचे फारच महत्त्व आहे.
                  दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन, 'ब्रम्होत्सव' साजरा केला जातो. 
                दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो. या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धती अनेक शतके सुरू आहे असे मानले जाते. भारताचे विविध प्रांत जसे की बिहार,झारखंड,ओरिसा येथेही हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.  
                    

              कोणार्क येथील सूर्य मंदिरात या दिवशी सूर्यनारायणाच्या जन्मोत्सव साजरा होतो मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात.
      

         मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केले जाते विविध वाहने तयार केली जातात आणि त्यातून देवांची मिरवणुक काढली जाते या पुण्य पर्वासाठी तीर्थक्षेत्री भावीक गोळा होतात.
       


     याच दिवशी नर्मदा जयंती असते यानिमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.



          रथसप्तमी हा सण यंदा भारतीय कालदर्शिका नुसार सोमवारी सात फेब्रुवारी २०२२ ला आहे रथसप्तमी शुभमुहूर्त सात फेब्रुवारी सायंकाळी ४: ३५ मिनिटांनी पासून आठ फेब्रुवारी सायंकाळी ६ : २० मिनिटांनी पर्यंत आहे. शहर मुहूर्ताच्या काळात रथसप्तमीची पूजा करणे लाभदायक ठरत असल्याने रथसप्तमीला सूर्यदेवाचे उपासना केली जाते .त्यामुळे सर्व पूजापाठ पहाटे लवकर उठून सूर्योदयाच्यावेळी करण्याची प्रथा आहे. तसं केल्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन दीर्घायुष्य आरोग्य संतती समृद्धी आणि यशाची वर्षात भक्तांवर करतात अशी मान्यता आहे.



          रथा सप्तमी पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. वैज्ञानिक दृष्टीने पृथ्वीची स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असताना ज्यावेळी पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा त्याला 'उत्तरायण' किंवा दक्षिण ध्रुवाकडील बाजू जास्तीत जास्त दक्षिणेकडे असते तेव्हा त्याला 'दक्षिणायण' असे म्हणतात. साधारणपणे उतरायण हे 21 मार्च ते 21 जून पर्यंत असते तर दक्षिणायण हे 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत असते.




       पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तर आणायला सुरूवात होते हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवाचे स्थान असून सूर्यदेवाला प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस भारतात साजरा केला जात असतो. सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा असून तो स्वयंप्रकाशित आहे. शिवाय सर्व ग्रह आणि ताऱ्यां सोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःच्या प्रकाश आणि उष्णतेने उजळून टाकतो साहजिकच ज्याच्या सत्तेने सर्व निसर्ग चक्र सुरू आहे अशा सूर्य देवाची मनोभावे पूजा करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते.



        भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो , ज्याला सात घोडे असून त्याचे सारथ्य अर्जुनाकडे असते. रथसप्तमी पासून सूर्यदेवाच्या उत्तराणायला सुरुवात होते. साहजिकच सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते. शिवाय सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी असं पडले असण्याची शक्यता आहे. हा सण हिंदू धर्मातील एक शुभ सण असून तो महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रम्हांड उजळून निघालं. सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीत आहेच पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो . हिंदू पुराणकथेनुसार एका महान राजाकडे त्याचे राज्य चालविण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली , प्रार्थनेनुसार त्यांना पुत्रप्राप्ती झाली, मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजा पाठ करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले . पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने संतानप्राप्ती होते म्हणूनच या सणाला आरोग्य सप्तमी अथवा पुत्र सप्तमी असंही म्हटलं जातं.


पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीची पूजा कशी करावी याची थोडक्यात माहिती….
१. सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सूर्योपासना करणे लाभदायक असते.

२. पहाटे उठून नदी तलाव अथवा विहिरीवर स्नान करावे.

३.त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यावे.

४. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे. त्यामध्ये हळदीकुंकू ,अक्षता ,आणि फुले समर्पित करावी . सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून सूर्याला अर्घ्य देत नमन करावे.

५. तुमचे घर जर लहान असेल आणि इमारतीतून असे अर्घ्य देणे शक्य नसेल तर ताम्हणात पळीने पाणी हातावर सोडता तुम्ही सुर्याकडे पहात असे अर्घ्य देऊ शकता त्यानंतर राहिलेलं पाणी एखाद्या वनस्पती अथवा तुळशीला वहावे.


६. अर्घ्य देताना गायत्री मंत्र अथवा सूर्याची उपासना करावी.


७. रथसप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथसप्तमी ची रांगोळी काढावी आणि तुळशीपुढे दिवा लावावा.



८. रथसप्तमीच्या दिवशी गरिबांना आणि ब्राह्मणांना दान दिल्याने पुण्य मिळते.

९. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दूध भात अथवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.

        या दिवशी पहाटे स्नान करून सूर्य देवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे शिवाय पुत्रप्राप्तीसाठी निरामय आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि सौभाग्य मिळण्यासाठी सूर्य देवाची आराधना केली जाते.

     रथसप्तमीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे रांगोळी…….. कारण भारतात प्रत्येक क्षणाला अथवा धार्मिक शुभकार्याला घरासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी ही भारतीय सण समारंभाचा एक महत्त्वाचा घटक आहे. दसरा-दिवाळी प्रमाणेच रथसप्तमीला देखील अंगणात रांगोळी काढली जाते. मात्र रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या रथाच्या आकाराची सुर्याची अथवा सात रंग असलेली रांगोळी काढली जाते. रांगोळी भोवती दिवा लावून सूर्यदेवाचे स्वागत केले जाते. महाराष्ट्रात यासाठी ठिपक्यांची रांगोळी काढली जाते तर दक्षिण भारतात मुग्गुळू, कोलम रांगोळी काढली जाते. रांगोळीचा प्रकार वेगवेगळा असला तरी या रांगोळीपासून सूर्य, सूर्यदेवाचा रथ,निसर्ग यांची प्रतीके रेखाटली जातात.

           महाराष्ट्रात मकर संक्रांती पासून सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळ, हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ आणि वाण देण्याचा जो कार्यक्रम असतो त्याचं समापन रथसप्तमीच्या दिवशी केले जाते. या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते. रथसप्तमी ही वसंत पंचमी नंतर दोन-तीन दिवसांनी येते.




फोटो आणि माहिती -साभार गुगल

🎭 Series Post

View all