Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

हा खेळ भास-आभासाचा भाग चार

Read Later
हा खेळ भास-आभासाचा भाग चार


रमा -"जय दिवाणजींचा फोन आला होता. आपल्याला दिवाळसणा साठी वाड्यावर बोलावलं आहे."

जय -"चला म्हणजे यावर्षी आपली दिवाळी दणक्यात होणार! शेवटी जावयाची आठवण आली म्हणायची इनामदारांना!!"

रमा -"ऐक ना !तीन-चार महिन्यांपूर्वी नानासाहेब गेले तेव्हा तू इथे नव्हतास, मलाही एकटीला तिथे जाण्याची हिंमत नव्हती. पण आता नानासाहेबांच्या मृत्युपत्राचे वाचन होणार आहे, त्याकरिता मी तिथे असणे महत्त्वाचं आहे, मांसाहेबांचा तसा निरोपच आहे."

जय -"मग जाऊन ये ना! प्रॉब्लेम काय आहे?"

रमा -"तुला माहिती आहे माझा प्रॉब्लेम. इतकी वर्ष मी वाड्यापासून दूर होते, पण आता वाड्यावर परत गेल्यावर तोच आजार परत सुरु झाला तर?"

जय -"तर डॉक्टर आहेतच आणि मी पण! बोल केव्हा निघायचं?"

रमा -"मांसाहेब गाडी पाठवणार आहे. मला वाटतं पुढच्या आठवड्यात जावं लागेल."

जय (थोडासा विचार करून) -"पुढच्या आठवड्यात? मग कठीण आहे. अग कंपनीचे नवीन प्रोजेक्ट सुरू होते आहे, त्यामुळे मला तेव्हा ऑफिसमध्ये हजर असणे भाग आहे. तू एक काम कर, गाडी आली की निघून जा. प्रोजेक्टच्या जबाबदाऱ्या वाटून दोन-तीन दिवसात मीही येतोच देवासला."

रमा -"नक्की येशील ना? मला फार भीती वाटते रे!"

जय -"अग असं काय करतेस? येणार म्हणजे येणार! वचन देतो मी. आता तर विश्वास बसेल राजकन्येचा या गरीब माणसावर?"

रमा -"विश्वास आहे रे, पण भूतकाळ जरा वर्तमानात आला तर……

जय -"तर मी हा लाईट बंद करणार आणि तुला माझ्या कुशीत घेणार. बर ऐकना जाताना तुझी औषधं सोबत न्यायला विसरू नको."

आणि रामाच्या खोलीतला दिवा बंद झाला

*************************************************
राज -"सानूरीता, ये सानुरीता कुठे आहेस ग?"

सीमा -"आज गाडी अगदी खुशीत आहे एका माणसाची!"

राज -"हो मग आहेच!"

सीमा -"काही खास?"

राज -"दोन-तीन दिवसात मला देवासला जावं लागणार, नानासाहेबांच्या म्हणजे माझ्या बाबांच्या मृत्युपत्राचे वाचन होणार आहे, मग मी, तू अन वर्ल्ड टूर कस काय वाटलं? सकाळी उठून ऑफिसची धावपळ नाही, बॉसची मर्जी सांभाळण्याची कटकट नाही, दर महिन्याला नकोसे असलेले ऑफिस टूरही नाही. फक्त तू आणि मी! राजा राणी."

सीमा -" परत केव्हा?"

राज -"पंधरा-वीस दिवसात, फार फार तर महिना लागेल मला तिथे."

सीमा -"मी पण येते ना!"

राज -"अग तुला न्यायला काही हरकत नाही पण मांसाहेबांचा अजून अंदाज आला नाही मला. बरं मी एक काम करतो, पंधरा दिवसात सगळं आटोपलं तर ठीक नाहीतर, तुलाच तिकडे बोलवतो. बरच चल आता लवकर माझ्या मिठीत ये."

सीमा -"आता चार दिवस सक्त रजा घ्या, कारण…"

राज -"ओह! अरे यार तुझे पिरेडस पण आत्ता जायचे होते? आता हा गरीब माणूस पंधरा-वीस दिवस उपाशी राहणार."
**********************************************

ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवशी रमासाठी आणि राजसाठी घ्यायला गाड्या गेल्या. रमाने जयचा निरोप घेतला. ठरल्या वेळेत वीस-बावीस तासाचा प्रवास करून रमा वाड्यावर पोहोचली.

बकुळांन उंबरठ्यावर रमाच्या डोक्यावरून भाकर तुकडा आणि तांब्याचा गडवा ओवाळला,दाराच्या उजव्या कोपऱ्यात तो भाकर तुकडा टाकून तांब्यातलं पाणी खाली ओतून दिलं. रमाच्या डोक्यावरून दोन्ही हात फिरवून बकुळेन स्वतःच्या कानाजवळ बोट दुमडून रमाची नजर काढली.

दरवाज्यात मागे पांढऱ्या साडीतील मां साहेब हे सारं शांतपणे बघत होत्या. रमाने उंबरठा ओलांडला आणि ती मासाहेबांना सामोरे आली.

रमा -"नमस्कार करते." (रमाने वाकून नमस्कार केला).

मांसाहेब-"कशी आहेस ग? शहरात गेली आणि तिकडची झालीस! आमचा, नानासाहेबांचा एवढा राग आला?"

रमा -"नाही मां पण या वाड्याच्या आठवणी फार काही सुखद नाही, म्हणून म्हटलं आपण इथून दूरच राहिलेलं बरं!"

दिवाणजी -"भूतकाळ सावली सारखा असतो ताईसाहेब कितीही पळा त्यापासून पण तो मात्र आपली पाठ सोडत नाही."

मांसाहेब -"दिवाणजी पुरे! ताई साहेबांच सामान आत नेण्याची व्यवस्था करा."

"रमा हातपाय धुवून हॉलमध्ये ये आपण गप्पा करूया. खूप बोलायचं आहे तुझ्याशी, खूप सांगायचं आहे तुला."

रमा तिच्या खोलीत ओला चेहरा पुसत होती, तेवढ्यात खिडकीतून ती केस पिंजार्लेली,डोळे लाल झालेली बाई ओरडत किंचाळात रमाकडे बघुन म्हणत होती

"आलीस बरं झालं तू आलीस. मी तुला आता सोडणार नाही. दे माझा नारू! दे माझ बाळ!! सांग कुठे लपवलं आहेस त्याला?"©® राखी भावसार भांडेकर.सदर कथानक हे संपूर्णतः काल्पनिक असून, त्याचा वास्तवात कुणाशीही कसलाही संबंध नाही, तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//