कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपले जवळचे नातलग आणि जिवलग गमावले ,त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात औदासिन्य आणि नैराश्य आले आहे त्यासाठी हा खास आरोग्यवर्धक काढा........
हा काढा बनवण्यासाठी सर्वात प्रथम "आशेचा गॅस" पेटवा, त्यावर "आत्मविश्वासाचे पातेले" ठेवा. त्या पातेल्यात "उत्साहाचे पाणी" टाका. या पाण्यात "आई-वडिलांच्या आशीर्वादाची" आणि "आप्तेष्टांच्या शुभेच्छांची" सुंठ पावडर घाला. गळ्यात हात टाकून बिलगणाऱ्या "शेंडे फळाचे लडिवाळ प्रेम" आणि "खेळणी , चॉकलेट साठी हट्ट करणाऱ्या लेकीच्या स्नेहाची साखर" घाला. बायकोशी झालेल्या "फुटकळ वादाची" थोडी "मिरे पावडर" आणि तारुण्यात व्यक्त न झालेल्या "पहिल्या प्रेमाचा थोडासा गूळ" टाका. सोबतच मित्रांच्या केलेल्या "खोड्यांची दालचिनी पावडर" टाका. या काळात तुम्ही ऑफिसमधल्या सहकार्यांचे मिळणारे "सहकार्य आणि मदतीचा मनुका" घाला. आणि कधीतरी बॉसने पाठीवर "शाबासकीची थाप" दिली होती ना! त्याचा "गवतीचहा" टाका, याशिवाय तुम्ही जर "भविष्याच्या स्वप्नांची विलायची" या काढ्यात घातली ना , तर त्याचा स्वाद काही औरच होईल.
आता तुमचा आरोग्यवर्धक काढा तयार आहे. हा काढा रोज ताजा -ताजा बनवा आणि सहकुटुंब आनंदाने एकत्र बसून त्याचा घोट-घोट आस्वाद घ्या.
(वाचक मित्रांनो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर माझ्या लिखाणावर आपली मतं आणि अभिप्राय नक्की कळवा आणि मला फॉलो करा)
(सदर लेखन हे मोबाईल मधून केले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व))