Oct 16, 2021
भयपट

शापित

Read Later
शापित
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

 

 

" शापित"          भाग 1
डिसेंबर महिन्यातील अमावस्येची ती रात्र होती. साडे अकरा वाजून गेले होते .रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून मी एकटाच प्रवास करीत होतो .मला झोप येत नव्हती. किंचित अस्वस्थपणे मी बाहेर पाहिले,बाहेर मिट्ट काळोख पडला होता .सारे काही काळ्या शाईत बुडवून काढल्या  सारखे झालेले .झाडांचे,दगडांचे,डोंगरांचे आकारच मुळी त्या काळ्या शाईत हरवून गेलेले.फक्त गाडीच्या शेजारून प्रकाशाचे पट्टे गाडीच्या सोबतीने चाललेले.डब्यातून पडलेल्या प्रकाशाचे चौकोनी तुकडे आणि त्याच्या साथ करणाऱ्या करड्या सावल्या.,सगळे की र्र र्र वाटेल इतकी शांत. फक्त गाडीचा धडाडधड धडाडधड असा एकच तालातला आवाज... गाडीभर उठणारी त्या तालाची सपन्दने आणि पुन्हा तो धापापणारा आवाज उसासत धडधडत ध किंकाळत काळोखातून जीव घेऊन धावणारी गाडी.
गाडी शेजारून धावणारे प्रकाशाचे असंख्य तुकडे,असंख्य वस्तू आपल्या कवेत घेत होते,वस्तूचे डोके,हातपाय छाटून टाकून मधेच कबंधे समोर आणून दचकवीत होते...झाडांची अर्धी रंगलेली खोडे,गारगोट्या सारखी दिसणारी रुळा जवळची सफेद खडी.....
माझी नजर दूरवर गेली,मोकळी माळराने,कुठेतरी क्वचित लुकलूकणारा एखादा दिवा,मध्येच पेटणारा जाळ. बाहेरून एकाएकी वाऱ्याचा एक थंडगार झोत आत शिरला. माझ्या अंगावर शहारा आला.आत नजर वळवताच छातीत धस्स झालं .सबंध डबा रिकामा.पण डब्यात कुणीतरी असेल तर?लपून बसलेले असेल तर?दारामागे,सीटखाली ,टॉयलेट मध्ये,कुणी पुढे येऊन आपला गळा धरला तर? मनात क्षणभर भीतीचा विचार आला.
या विचाराने माझ्या काळजाने ठाव सोडला.पण त्याच वेळी दुसरे मन धीर देऊ लागले.कुणीच नसतांना उगाचच घाबणाऱ्या मनाचं हसू आले. इतके लोक प्रवास करतात निरनिराळ्या परिस्थितीत. दुपारपर्यंत कॉलेजमध्ये काम होतं, या गाडीशिवाय दुसरी सोयीची गाडी नव्हती.मन समजूत घालू लागले
मी समोर बसून पाहत राहिलो. गाडीचा एकसुरी नाद कानात साठवित राहिलो.
सबंध डबा रिकामा होता,भीती वाटण्यासारखं काही नव्हते.
एवढ्यात कोणीतरी चालून गेल्याचा भास झाला.पण कोणी दिसलं नाही.
आपण एक प्राध्यापक आहोत,उगाच पोरकट भीतीच्या आहारी आपण जाणार नाही.याची मी स्वतःला आठवण करून दिली.आणि बॅग मधून पुस्तक वाचायला सुरुवात केली,कारण झोप येत नव्हती.
' द सुपर नॅचरल फोर्स' या पुस्तकातील पहिले वाक्य,' अ फोर्स काल्ड सुपर नॅचरल इज नो डाउट इन एग्झिस्टन्स....'पहिले वाक्य वाचल्याबरोबरच मी पुस्तक फाटदिशी बंद केलं.साहजिकच गाडीत वाचायला मी हे पुस्तक सोबत आणले होते.मात्र आपण ते बरोबर आणले आता मला त्याचा पश्चात्ताप होऊ लागला.
पण या वेळेस भेदरलेल्या मनाची समजूत चटकन पटेना.उलट सुलट विचार करून डोकं थकून गेलं होतं.भीती कसली?कुणाला डब्यांत येऊ द्यायचे नाही.कुणी असेल तर ते संशयास्पद तर नाही ना अशी खात्री करून घ्यायची.मुख्य म्हणजे झोपायचे नाही ,वाचत बसायचे आणि  एकाएकी......
माझ्या ध्यानात आले की,डब्यात कोणी तरी येऊन बसले आहे.ती वयक्ती पलीकडच्या सीटवरून माझ्याकडे रोखून पाहत होती.तिला पाहताच मी दचकलो कारण........
ती एक बावीस - तेविशी ची एक तरुण मुलगी होती.पांढरे शुभ्र कपडे घातलेली सुंदर तरुण मुलगी!आपला नाजूक हात हलकेच हलवीत ती समोर येऊन उभी राहिली.ती सुंदर तर होतीच पण त्या सौन्दर्यात काहीतरी वेगळेपणा  होता .काहीतरी विलक्षण चटका लावणारे होते.
रंग गुलाबी,भुवया कोरीव आधुनिक केशरचना ,रुपयाच्या नाण्याच्या सारखा गोल चेहरा.
माझ्या मनातले समजल्यासारखे ती हसली. हसताना एखाद्या गाण्याचा लकेरी सारखी तिचे मोत्यासारखे दात चमकले.
ती एकटीच होती.सोबत कोणीही नव्हते .मी सहज रिस्ट वॉच कडे पाहिले. बरोबर बारा वाजले होते.
एवढ्या थंडीत मला घाम सुटला.डोक्यात शंकेच शेवाळ पसरायला लागलं.छाती धडधडू लागली.कारण गाडी कुठेही थांबली नव्हती.संपूर्ण डबा रिकामा होता.पलीकडच्या डब्यातून येणारा रस्ता बंद करण्यात आला होता. मग ही आत आली कशी?

"कुठे चाललात तुम्ही...?"

मी विचारतंद्रीतून जागा झालो.
"नाशिक ला" मी एवढेच बोलू शकलो.
पुन्हा डब्यात शांतता निर्माण झाली.
"तुम्ही एकट्याच आहेत?कमाल आहे तुमची?यावेळी एकटीने प्रवास करायचा म्हणजे...,तुम्हाला भीती नाही वाटत?  मी माझ्या मनातले भाव लपवत काहीतरी विचारायचे या उद्देशाने विचारले.
 "मला माणसांची भीती वाटत नाही." ती खिन्न स्वरात म्हणाली.
एवढ्यात तिचे लक्ष माझ्या हातातल्या पुस्तकावर गेले.
"सुपर नॅचरल फोर्स,तुमचा विश्वास आहे भुताटकी वर?"
"डिपेंडस, तसा माझा  या गोष्टीवर ,विश्वास नाही .कधी प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही,मात्र तुमचा विश्वास आहे यावर?"
" होय " ती म्हणाली.
प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक मला जाणवत होती.
काही क्षण शांततेत गेले,नुसताच गाडीचा धडाडधड....
मग शांतता असह्य होऊन ती पुढे म्हणाली ,"भूत पिशाच्च असतात.
मात्र आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप वेगळ्या स्वरूपात असतात".
"एखाद्यालाअगदी अमावस्येला    शमशानात जाऊन देखील भूत दिसणार नाही,तो लोकांना येऊन सांगेल की,भूत - बीत सब झूठ है,पण गम्मत म्हणजे त्याच माणसाला कल्पनासुद्धा येणार नाही अशा एखाद्या स्वरूपात पिशाच्च भेटेल.सगळं काही एरवी सारखंच. अगदी संशय देखील येणार नाही की आपल्यासमोर पिशाच्च बसलंय कारण बोलून चालून देहहीन आत्माच ती! कोणाच्याही शरीरात वास्तवय करतील.."
बोलता बोलता ती मध्येच थांबली.माझ्याकडे रोखून पाहू लागली.मला थोडे संकोचल्यासारखे झाले.
"तुम्ही काय कॉलेजमध्ये आहे वाटतं?"काही तरी पुढे बोलायचे आणि गोष्ट वळवायची या हेतूने मी विचारले.
"हो,एम .ए. करतेय,सायकॉलॉजी मध्ये".
एकाएकी गाडीतले दिवे मंद होऊ लागले.स्पीड कमी होऊ लागला.
"स्टेशन आलं वाटतं एखादं?"
मी फक्त हसलो .तिच्या चेहऱ्यावर चे भाव एकसारखे बदलत होते.निळसर डोळे चकाकत होते.भुवयांच्या कमानी खेचल्या जात होत्या.
गाडीचा स्पीड आता अगदीच कमी झाला होता.एवढ्यात ती स्टेशनच्या आवारात शिरली. आमचा डबा प्लॅटफॉर्मवर खूप पुढे जाऊन थांबला.
"इथे कॉफी खूप छान मिळते,एक एक कप कॉफी घेऊ या " ती म्हणाली
ती जणू मला नजरेने शोषित होती,पीत होती,मला स्वतः मध्ये सामावून घेऊ पाहत होती.एक विलक्षण आकर्षण आम्हा दोघात तयार होऊ लागले.एक दाहक आकर्षण, धगधगत्या ज्वालासारखं पण तरीही त्या ज्वालांमध्ये विलक्षण सुखद असे काहीतरी होते.त्या सुखाच्या गुंगीत माझे मन खेचले जात होते.
मी तिला 'नाही' म्हणू शकलो नाही.
आम्ही डब्यातून खाली उतरलो.
टिचभर रुंदीचे ते स्टेशन,त्यातून रात्रीचे जवळपास दीड वाजले होते.स्टेशन अगदी निर्मनुष्य होते.तिकीट चेकर चा देखील पत्ता नव्हता.एक मळकट खरुजलेले कुत्रं मात्र आरामात पहुडले होते.बाकी चिटपाखरू सुद्धा जवळपास नव्हते .
एकाएकी त्या कुत्र्याला काय झाले कोणास ठाऊक,ते उठलं आणि अंगावर काटा येईल अश्या स्वरात विव्हळलं .
माझ्या छातीत धडकी भरली.
मात्र तिने त्या कुत्र्याकडे बघितले. डोळे मोठे केले आणि काय चमत्कार!
ते कुत्रं शेपटी दाबून क्याव क्याव करत पळून गेलं. मी डोक्यावरील घाम पुसला.
"इथे कॉफी मिळेल?" मी शंका काढली.
खरं तर या अश्या स्टेशनवर गाडी थांबलीच कशी, मला हेच समजत नव्हते.कदाचित सिग्नल क्लियर नसेल.
इतक्या रात्री बहुतेक सगळे आपापल्या बर्थ वर गाढ झोपेत होते आणि थंडीमुळे कोणी बाहेर देखील डोकावले  नाही.
"तिथे कॉफी मिळेल,एक स्टॉल आहे तिथे" ती पुढे बोट दाखवित म्हणाली.
आम्ही दोघे त्या दिशेने चालू लागलो.त्या छोट्याश्या हॉटेलात कोणीही दिसत नव्हते .एक कोपऱ्यात एक माणूस बसल्याजागी झोपत होता.मी त्याला उठवलं.
अर्धवट झोपेतून उठवल्यामुळे तो चिडला होता पण आम्हा दोघांना पाहून थोडा नरमला.
त्याने दोन कप कॉफी तयार करून दिली.मी अधून मधून तिला तिच्या बद्दल विचारत होतो पण ती गोष्ट वळवून द्यायची.मला तिच्या बद्दल काहीच जास्त माहिती मिळविता आली नाही.
आम्ही परत आमच्या डब्याकडे वळलो. मी समोर झालो.डब्यात पाय ठेवताच गाडी सुरू झाली.पण ती प्लॅटफॉर्मवरच उभी होती,आत येत नव्हती.मी आश्चर्याने तिच्याकडे बघितलं.   हाताने खूण केली.
"आपला प्रवास इथपर्यंतच "! तिने टा टा करीत हात हलविला.
मी काहीच समजू शकलो नाही.गाडीने वेग धरला होता.तिची एकदम अशी ताटातूट होईल हे माझ्या अगदी जीवावर आलं होतं.
"मी लवकरच भेटेन तुम्हाला...."मला एवढेच ऐकू आलं. पाहता पाहता तिचे शरीर विरळ होत गेले.ती पूर्ण दिसेनाशी झाल्या नंतरही काही वेळ तिचे शब्द ऐकू येत राहिले.
मी असहाय, अनामिक भीतीने डोळे सताड उघडे ठेवून बघत होतो.एकटक बघत होतो.

 

 

 

प्रवासा वरून परत आल्यानंतर, मी माझ्या कामावर रुजू झालो.एक दिवशी संध्याकाळी मी कॉलेज हून परत आलो,तेव्हा माझ्या प्रॉपर्टी डीलरचा मला फोन आला.त्याने माझ्यासाठी एक घर बघून ठेवलं होतं.
दुसऱ्या दिवशी जेव्हा ते घर मी प्रथम पाहिले तेव्हा मी देखील बेहद खुश झालो.जरा शांत भागात असे एखादे छोटेसे घर स्वतःच्या मालकीचे असावे.आणि तिथे आपण मोकळा वेल वाचन,लेखन किंवा आराम करीत घालवावा असे माझे फार जुने स्वप्न होते.ते घर पाहताच माझे स्वप्न साकार झाल्यासारखे वाटलें.
घर छोटेसे पण सुबक बांधले होते.आजूबाजूला जागा ही भरपूर सोडली होती.शिवाय मला ते स्वस्तात मिळाले होते कारण त्याचा मालक सगळा गाशा गुंडाळून परदेशी चालला होता.
इतके छान आणि सुबक घर स्वस्तात मिळतंय म्हणून मी इतर गोष्टींची चौकशीसुद्धा केली नाही.
स्वतःच्या मालकीचे बंगलीवजा घरात राहण्याची कल्पना जरी मला सुखद वाटत होती तरीसुध्दा त्या घरात प्रवेश करताच मला अस्वस्थ वाटू लागले.मी एकटाच होतो आणि सारे घर रिकामे म्हणून असेल कदाचित.
सर्वत्र सारे निवांत अगदी भयाण शांत होते.रात्री गार वारे सुटले होते.मी झोपायच्या तयारीत होतो,पण झोप येत नव्हती,ट्रेन मध्ये भेटलेल्या त्या मुलीचा चेहरा राहून राहून माझ्या पुढे येत होता.
मी उठलो आणि बिछान्या - जवळची खिडकी बंद केली.तिची तावदाने काचेची होती.पण खिडकी लावल्यामुळे मला थोडे सुरक्षित वाटू लागले.थोड्या वेळातच मला झोप लागली.
आणि मध्यरात्री खडबडून मी जागा झालो.खिडकीच्या तावदानापलिकडून एक चेहरा माझ्याकडे टक लावून पाहत होता.
मी जागा आहे की स्वप्नात हे कळून यायला मला थोडा वेळ लागला.मी भानावर येईपर्यत तो चेहरा नाहीस झाला,काही क्षण तावदानावर ठेवलेले हात दिसत राहिले.मग हळूहळू ते देखील नाहीसे झाले.
माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला.मी कसाबसा दिवा लावला ,घड्याळ कडे पाहिलं,रात्रीचे दोन वाजले होते.ग्लासभर पाणी प्यायलो आणि पुन्हा अंथरुणावर अंग टाकले.पहाटे केव्हातरी माझा डोळा लागला.
सकाळी जरा उशिराच जागा झालो.तेव्हा खोली प्रकाशाने भरून गेली होती.मी फ्रेश झालो.बिछाना अवरायचा मला कंटाळा आला होता.कुठेतरी बाहेर चहा घ्यावा आणि थोडे भटकून यावे या विचाराने बाहेर पडलो.मोलकरीण अकरा वाजेपर्यंत येणार नव्हती.मला भटकायला भरपूर वेळ होता.
साधारण अकराच्या सुमारास मी घरी परतलो.वेळ जावा याकरिता एखादं पुस्तक वाचीत बसावे याकरिता बेडरूम मध्ये गेलो.
-- आणि एकाएकी मी दचकलो.
गोष्ट क्षुल्लक होती तरी चमत्कारिक होती.
माझा बिछाना कुणीतरी उचलून नीट लावून ठेवला होता,मला चांगले आठवत होते की,मी बिछाना न आवरता गेलो होतो आणि आता पहावे तर गाद्या  व्यवस्थित लावलेल्या,उश्या जागच्या जागी ठेवलेल्या पलंगावर चादर पसरलेली.
बारकाईने पाहिल्यावर आणखीही काही माझ्या लक्षात येऊ लागले.केवल बिछानाच नव्हे,तर खोलीतील इतर वस्तू जागेच्या जागी ठेवलेल्या दिसत होत्या.हे कोणी आवरून ठेवले असेल?नक्कीच कोणी तरी आले असले पाहिजे,पण ते कसं शक्य आहे,दाराला कुलूप होते,खिडक्याही बंद होत्या,मोलकरीण अजून आलेली नव्हती.मला काही कळेनासे झाले.
 आणि मग एकदम मला रात्री खिडकीत दिसलेल्या चेहऱ्याची आठवण झाली.
माझ्या अंगावर काटा उभा राहिला.
पुन्हा एकदा रात्रीच्या अस्वस्थतेने मला पछाडले.माझा सारा उत्साह ओसरला आणि त्याची जागा एकटेपणाचा जाणिवेने घेतली.आपल्याला माहीत नसलेले असे कुणी आपल्या जवळपास वावरते आहे.असे मला वाटत होते.
एवढ्यात पाठीमागे पावलाची चाहूल लागली.मी वळलो.मोलकरीण आली होती.
मी तिला विचारले.
"तू यापूर्वी आली होती का?"
"नाही " ती म्हणाली.
घरात एक झोपाळा टांगलेला होता.मला घरात झोपाळा आवडत नाही म्हणून मी त्याचा पाट काढून ठेवला होता.
पण संध्याकाळी येऊन पाहतो तर पाट जागच्या जागी होता म्हणून मी मोलकरीण ला विचारले,"झोपाळा तू परत लावून ठेवलास?".
ती माझ्याकडे चकित होऊन पाहू लागली.तिला गैरसमज होऊ नये म्हणून मी तिला म्हटले,"हे बघ,गेल्या दोन -चार दिवसात असला प्रकार वारंवार होत आहे.वस्तू जागच्या जागी
 ठेवलेल्या दिसतात.आपल्या दोघांशिवाय तर इथे तिसरं कुणी येत नाही ना?"
ती काही बोलली नाही.तिचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला.
दुसऱ्या दिवसापासून ती कामावर येईनाशी झाली.मी त्या घरात अधिकच एकटा पडलो.
रात्री बाराचा सुमार होता.पुस्तक बंद करून मी नुकताच दिवा घालवला होता.हळूहळू डोळ्यावर झापड येऊ लागली होती.
इतक्यात कसल्यातरी आवाजाने मी खाड्दिशी जागा झालो. 
'कु S ई कुईक खळ...'असा काहीसा आवाज होता.पडल्या पडल्या मी कां देऊन आवाज ऐकत राहिलो.त्या आवाजाला एक गती होती.संथ लय होती.माझ्या लक्षात आले की तो आवाज झोपाळयाच्या कडीचा आहे.कुणीतरी बाहेर झोपल्यावर बसून झोके घेत आहे.
मी उठून बसलो,आणि पावलांचा आवाज न करता दरवाज्यापाशी गेलो, काय नजरेला पडेल काय नाही या विचाराने मी धास्तावून गेलो.
झोपाळयाचा आवाज येतच होता.अखेरीस मी धीर करून दरवाजा उघडला.बाहेर येऊन झोपाळयावर नजर टाकली,तो रिकामा होता ,अजून ही तो हलत होताच पण त्याची लय कमी होत होती.त्यावर जे कोणी बसले होते ते उठून गेले होते.
मी कपाळावरचा घाम टिपला.झोपाळा हळूहळू झोके घ्यायचा थांबला.मी क्षणभर तसाच उभा राहिलो.त्या झोपाळयाला स्पर्श करण्याची देखील भीती वाटत होती.
कसाबसा मी बेडरूममध्ये परतलो.दार लोटले.पाहतो तर काय......
एक खडूसारखी सफेद आकृती आत उभी होती.पाहता पाहता ती धूसर होऊ लागली.पुसट होता होता ती नाहीशी होणार,एवढ्यात मी ओरडलो,"थांब!जाऊ नकोस,मला तुझ्याशी बोलायचे आहे.'
आता ती आकृती पुन्हा घन होऊ लागली.जेव्हा ती पूर्णपणे स्पष्ट झाली.तिच्यात अमानुष असे वाटेनासे झाले तेव्हा मी कमालीचा दचकलो कारण ती तीच  होती.
मला प्रवासात भेटलेली तरुण मुलगी.

 

 

   
 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujjawal Kotharkar

Govt. Service

Working under ministry of skill development &enterpreneurship formerly known as Deptt of vocational education and trainingsince lasts 25 years,make today's youth self dependent.