Login

*ध्येयवेडा संघर्ष...(Biopic Of Queen )*भाग 2

शेवटी बापाच काळीज ते..!!काळजी वाटणारच ना.



रात्री पप्पा घरी आल्यानंतर चहा वगेरे घेउन मयुरी च्या खोलीत गेले तेव्हा त्यानी पाहील तर ती अभ्यास करत होती..त्यानी आवाज दिल्यावर तिच लक्ष गेल..


काय ग गुड्डु बर वाटत नाहिये का तुला काय होतय?

मायेने डोक्यावर हात फिरवत विचारताच तिच्या डोळ्यातून पानी वाहू लागले.

बरी आहे आता पप्पा मी..त्यांच्या कडे बघत हसत तिने उत्तर दिले.

ठिक आहे..
यादव सर आले होते सकाळी घरी. तू शाळेत गेली नाहीस 4 5 दिवस अस त्यानी सांगितल मला आज..
तेव्हा तुला बर नाही आईने सांगितल म्हणून तुझ्या कडे आलो होतो.

काय?यादव सर घरी आले होते?
मला कोणीच कस सांगितल नाही या बद्दल?
मला उदया शाळेत गेलच पाहिजे नाहितर सर्वाना वाटेल की मला जास्तच बर नाहिये.

हो उदया नक्की जा.आणी तब्येतीची काळजी घे.बर नसेल तर सांगत जा आपण डॉक्टर कडे जाऊया.

नाही पप्पा आता बरी आहे मी.पन तुम्ही आईला सांगा ना मला अस घरी रहायला नको सांगत जाऊ अस..

हो बाळा सांगतो मी तिला.काळजी नको करू.
थोडफार बोलून ते निघुन गेले.

मनात विचार करतच ते त्यांच्या रुम मध्ये गेले तेव्हा तिची आई तिथेच कपडे घडी करुन ठेवत असते.
आईच्या स्वभावाचा अंदाज घेत ते सुरुवात करतात बोलायला.

गुड्डु ला जर जास्तच बर वाटत नव्हत तर मला का नाही सांगितल तू 2 3 दिवस आधी..मला आज कळत आहे की तिला बर वाटत नाहिये..

अहो तुम्हाला वेळ तरी होता का ?
गेले 3 दिवस तुम्ही उशिरा घरी येताय मग कोणत्या वेळेत सांगायच.?

मी नसताना तू किमान तिला डॉक्टर कडे तरी नेऊ शकली असती ना.


अहो बर वाटत नाही याचा अर्थ तिची तब्येत बिघडली आहे अस नाहिये.
आपली गुड्डु आता मोठी झालीये....!
दर महिन्याला हे अस होणारच आता.तुम्ही तिची जास्त काळजी करु नका..

हे ऐकूण पप्पा जरा शांत झाले..
वेगळ काही दुखण नाही या विचाराने त्याना जरा समाधान वाटले.
पण मुलगी मोठी झाली म्हणजे ते जरा काळजीतच पडले.

शेवटी बापाच काळीज ते..!!काळजी वाटणारच ना.


कारण पप्पाना माहित होत की त्यांची मुलगी हिरा आहे पुढे जाऊन चमकणारच.पन बायको च्या स्वभावा पुढे काहिच बोलू शकत नव्हते..
ती किती महत्वकांक्षी आहे हे त्याना माहित होत.
माधव रावांची सावलीच होती ती त्या मुळे तिला ते चांगलेच ओळखून होते.


असेच दिवस पुढे ढकलत होती मयुरी..पप्पां सोबत तिची गट्टी छान असल्यामूळे ती त्यांच्या सोबत बिनधास्त बोलायची..

पण इकडे आईची वेगळी तयारी चालू झाली होती.
मयुरी ला अभ्यास कसा करता नाही येणार यावर जास्त त्यांचा कल असायचा..अभ्यास करायला बसली की काहीना काही काम काढून सतत अडथळा आणत असे..
पन मयुरी कधी उलट बोलली नाही कारण तिचा तो स्वभाव नव्हताच मुळी..

अस करतच ति सातवी कशीबशी 50-60% च्या दरम्यान पास झाली..नंतर आठवी मध्ये असताना सुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती.तिच अभ्यासाला बसन आणी आईच ओरडण चालूच होत.फरक इतकाच झाला की मयुरी जरा कळती झाली होती म्हणजे अभ्यास किती वेळेत पुर्ण करायचा किवा डिस्टर्ब झाल तर पुढे कसा कंटिन्यू करायचा हे तिच्या लक्षात येत होत..आणी त्या मुळेच तिने आठवी मध्ये वर्गात दुसरा क्रमांक पटकवला होता...ही गोष्ट खुप म्हणजे खुप आनंदाची होती तिच्या साठी...
पप्पा पण खुपच खुष झाले तिच्या गुणांने..पन.....आई!तिला मात्र जास्त त्रास झाला या गोष्टीचा....मयुरी साठी तिचे मार्क इतके महागात पडतील अस वाटलच नव्हत तिला....

कारण,तिथून पुढे आईने मात्र जरा जास्त त्रास द्यायला सुरुवात केली मयुरी ला...पप्पा ना तर या गोष्टिंचा कधी थांगपत्ता लागलाच नाही..पप्पा घरात असताना आई कधी बोलत नसे तिला.पन त्यांच्या माघारी सतत तिला काम सांगणे रात्री 2 3 वाजे पर्यंत जागवुन मुलीना अभ्यासाची गरज नसते,तिला चूल मुल बघाव लागत त्या मुळे अभ्यास जास्त करु नको त्याची गरज नसते हे सतत सांगून तिला खुप जास्त मानसिक त्रास देत होती तिची आई....

पण या सगळ्यातून साध्य तर काही झालच नाही...घडली तर 1 गोष्ट..मयुरी ने घरात बोलन कमी केल.एकटं रहायला सुरु केल.म्हणजे हे कस झाल हे तिच तिलाच नाही समजलं.आणी ती तिच्या स्वप्नाचा ध्यास घेऊ लागली....

आठवी ते दहावी तिला खुप जास्त मानसिक त्रास सहन करावा लागला.पन त्यातच ती ईतकी खंबीर राहुन अभ्यास करत होती की दहावी मध्ये तिला उत्तम गुण मिळाले आणी तिने बोर्डात 60% (first Class)ने पास झाली....

पण तिथून पुढे खरा संघर्ष चालू झाला मयुरिच्या आयुष्याचा....नकळत एक टर्नींग पॉईंट तिच्या आयुष्यात आला आणी तिच आयुष्य बदलून गेला...!!!



हा भाग यायला जरा जास्तच उशीर झाला.त्या साठी मनापासून सॉरी..पन दोन दोन बेबी असल्यामूळे जरा टाईम कमी भेटत आहे.त्या मुळे समजून घ्या ही विनंती....3 रा भाग 3 4 दिवसात येइल.....

ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत लिहिली गेली आहे काल्पनिक नाही....

राधा सुमित इंगवले 

Thank You ?