Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

फायर वुमन - हर्षींनी कान्हेकर

Read Later
फायर वुमन - हर्षींनी कान्हेकर


#फायर_वुमन

ब्रम्हाचा दुसरा अर्थ आहे तप आणि तप करण्यासाठी करावा लागतो त्याग,संपूर्ण श्रद्धा आणि समर्पण.. या रुपात देवी पार्वतीला मनापासून जे हवे होते ते मिळवण्यासाठी ती वाट्टेल ते करायला तयार होती पण कमी होती मार्गदर्शनाची आणि तिला साथ लाभली स्वतः नारायणाची ..देवीने या रुपात खूप वर्ष तपश्चर्या केली, आपल्या अतूट समर्पणानी तिने स्वतःला महादेवासाठी अर्पण केलं आणि नेहमी बनून राहिली महादेवाची दर्पण... माता पार्वतीने ब्रम्हचारी या रुपात शिवाला तपश्चर्या करून मिळवलं.. देवीचे हे रूप आपल्याला एक शिकवण देते की, स्वतःच्या ईच्छा, आकांक्षा ,ध्येय गाठण्यासाठी जर पूर्ण प्रयत्न करून स्वतःला झोकून दिलं तर देवाला सुद्धा मिळवता येतं .❤️

संकटांच्या अग्निदिव्यातून होरपळून निघावं लागतं
म्हणूनच आगीशी खेळायला वाघिणीचं काळीज लागतं
आज जाणून घेऊया अशाच एका वाघिणीची गोष्ट...

साधारण वीस एक वर्षांपूर्वीची घटना... तिला कळत्या वयात आल्यापासून अंगावर वर्दी असायला हवी याचं वेड लागलं होतं.. कॉलेजला असताना तिच्या मित्रांनी तिला चिडवलं की,
"जा तुला वर्दी हवी आहे ना तर या समोरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून दाखव आणि खुशाल परिधान कर वर्दी"... साधारण पाच दहा सेकंद तिने त्या कॉलेजकडे बघितलं आणि ठरवलं की या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दाखवणार... घरी गेली आणि तिने तिच्या आईच्या कानावर गोष्ट घातली. आईने सुरुवातीला नकार घंटा दर्शवली पण तिचा बाबा तिच्या पाठीशी नेहमी सोबत होता, बाबांचा सपोर्ट आहे म्हंटल्यावर तिने दुसऱ्याच दिवशी त्या कॉलेजमध्ये हजेरी लावली... आज पहिल्यांदा या कॉलेजमध्ये फॉर्म भरून घेयला एक मुलगी आली होती त्यामुळे प्राध्यापकांनी तिला विरोध केला आणि बोलले " हे फक्त मुलांचं कॉलेज आहे इथे मुलींना ऍडमिशन मिळत नाही ,इंडिया हॅव ओन्ली 30 परसेन्ट रिझर्व्हेशन " त्यावर ती बोलली " सर इथे कुठेही लिहलं नाही की मुलींना इथे ऍडमिशन मिळू शकत नाही आणि सर आय डोन्ट बिलिव्ह इन 30 परसेन्ट आय बिलिव्ह इन 50-50 परसेन्ट " तेव्हापासून सुरू झाली एक तपश्चर्या .. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की नक्की कोणतं क्षेत्र असेल ज्यामध्ये हिला सहजासहजी ऍडमिशन मिळत नव्हतं.. ते क्षेत्र होतं अग्निशमन दल.. हो ऐकून आश्चर्य वाटलं ना ? अहो अजूनही प्रगतशील भारतात लवकर मुली या क्षेत्राकडे वळत नाही तिथे २० वर्षांपासून हर्षींनी कान्हेकर हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खुपसाऱ्या स्वप्नांना जळताना वाचवलं आहे ...नॅशनल फायर सर्विस कॉलेजमध्ये तिने ऍडमिशन घेतलं आणि त्याच क्षणी नांदी झाली एका धगधगत्या अग्निपर्वाची ?

अग्निशमन दल मुलींसाठी कधीच खुलं नव्हतं ,सुरुवातीला या क्षेत्राच्या अभ्यासक्रमात एकूण सात सेमिस्टर होते .तेव्हा नागपूरला सर्व मुलांना एका होस्टेलला राहणे बंधनकारक होतं, पण हर्षींनीसाठी हा नियम बदलण्यात आला तिला घरून येऊन जाऊन कॉलेज अटेंड करण्याची परवानगी मिळाली... जेवढं जास्त शिक्षण संकटांनी भरलेलं त्याहून जास्त शिक्षणानंतरचा काळ कठीण होता.. पहिलीच केस मिळाली ती शिर्डीमध्ये सिलेंडरचा स्फोट.. अहो ज्या क्षेत्रांत चांगले दणकट, बळकट पुरुष जायला कचरतात तिथे या पोरींने सगळ्या स्त्रीवर्गाला अभिमान वाटावा असं कार्य केलं..जिथे पूर्ण पुरुषांनी भरलेल्या गर्दीत आजही एकटी महिला थोडं घाबरतेच तिथे दिवस असो किंवा रात्र हर्षींनी सतत कार्यशील होती ,मग तिचा मासिक पाळीचा काळही तिला रोखू नाही शकला.. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जणू एक तप पूर्ण करून हर्षींनी यांना पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी याचा मान मिळाला.. माझा सलाम या स्त्रीशक्तीला...तिने आतील आग प्रबळ इच्छाशक्तीने धगधगत ठेवली होती म्हणून तर बाहेरील आग सहज विझवता आली ?

आजची दुसरी माळ तिच्या स्वतःची,
समाजातील स्वतःच्या अस्तित्वाची
जणू महादेवाच्या मानेला विळखा
घातलेल्या नाग स्वरूप स्वप्नांची

?जागर नवरात्रीचा देवीच्या नऊ रुपांचा⚜️
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मित्र रिषभ

Writer

Like to write fictional stories

//