द एंड...!३

Kay hoil pudhe?shwan Pathak tapasala navi disha Deol ka ki tyatunahi kahi nishpann honar nahi?

अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी रहस्य कथा
शीर्षक- द एंड...!३

         एव्हाना श्रीरंगच्या घरी बातमी पोहोचलीच होती. श्रीधर ची सुद्धा फॅमिली घरी पोहोचली होती. नातेवाईकांना निरोप गेले होते .सगळे नातेवाईकही गोळा झाले होते.


आई गेल्यानंतर बाबांनीच लेकरांना आई-वडील दोघांचीही माया दोन वाढवले होते. आणि त्याच बाबांचा आज अशा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला होता. एकतर एवढ्या कमी वयात पोरके होण्याचे दुःख आणि घडलेला प्रसंग या गोष्टींमुळे सारे नातेवाईक आणि गावांमध्ये फार हळहळ व्यक्त केली जात होती.


संध्याकाळपर्यंत बॉडी पोस्टमार्टम होऊन परत आली . सारा गाव त्यांच्या अशा मृत्यू साठी हळहळ व्यक्त करत होता. श्रीरंग आणि श्रीधर चे दुःख,त्यांचे फारसे नसलेले वय आणि आई वडिलांचे हरपलेले छत्र साऱ्यांसाठी  आता चर्चात्मक हळहळीचा विषय झाला होता.जो तो आपल्या परी त्या दोघांचे सांत्वन करत होता. दुःखद वातावरणात सदाशिवरावांची अंत्यक्रिया पार पडली. घटनेचा विचार करता दहनक्रिया न करता त्यांना फक्त माती देण्यात आली.


श्रीधर आणि श्रीरंग चे दुःख मोठे होते च पण तिकडे इन्स्पेक्टर विराज  पाटील यांची सुद्धा एक प्रकारे कसोटीच होती . झालेला अपघात अथवा घातपात हा त्यांच्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने हे प्रकरण त्यांच्याकडे आले होते.

इन्स्पेक्टर विराज पाटील यांच्या डोक्यात आता फक्त हेच प्रकरण घुमत होते. एकंदरीत पंचनामा आणि त्या जागेची स्थिती पाहिल्यानंतर तो अपघात नसून घातपात च जास्त वाटत होता. दिखाव्यासाठी बॉडीचे डोके चेंदले आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला असला तरी बॉडीला डोकेच नाही हे सहजच लक्षात येत होते. पोस्टमार्टम चे रिपोर्ट सुद्धा तसेच दर्शवत होते.


कुणी केला असेल हा खून? व्यवस्थित प्लॅन करून केला असेल की बाचाबाची तून घडला असेल? या प्रकरणात एकच व्यक्ती सामील असेल की अजून काही लोकं सुद्धा सामील असू शकतात? कुणाचे हितसंबंध तर या प्रकरणाशी जुळले नाहीत ना? या सगळ्यांची शहानिशा करणे गरजेचे होते. त्यासाठी इन्स्पेक्टर विराज पाटील आता कसून कामाला लागले होते.


ड्रायव्हर  महेश साळुंखे ला अजूनही फोन लागला नव्हता. त्याची सदाशिवरावांशी भेट झाली होती का? अपघाताच्या वेळी तो त्यांच्यासोबत होता का? या सर्व गोष्टींचा उलगडा झाला तर त्याच्याकडून होऊ शकत होता. त्यातही कॉल हिस्टरी मध्ये शेवटचा कॉल सदाशिवरावांनी त्याला केल्यामुळे त्याची शहानिशा करणे जरुरीचे होते.


तपासाचा पुढचा भाग म्हणून आता घरी जाऊनच महेश साळुंखे ला भेटणे भाग होते. त्यामुळे इन्स्पेक्टर विराजने दोन शिपायांना महेश साळुंखे च्या घरी पाठवले.

" कोण आहे घरी?"शिपाई


आतून एक मध्यम  वयीन बाई बाहेर आली. समोर पोलीस शिपायाला पाहून जरा बिचकलीच ती.
तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव बघून शिपाई पुढे बोलला
"महेश साळुंखे आहे का घरी?"

"नाही  जी ,घरी नाहीत ते."

"कुठे गेले मग?" शिपाई


"माहित नाही पण दोन दिवसाआधी दुपारी हे घरीच असताना सदाशिवराव विभुतेंचा फोन आला होता. त्यांनी विचारलं याईले  कामासाठी.ह्येनी त्यांना नाही येत असे सांगितले होते पण त्यांनी जास्तच आग्रह केल्यामुळे आणि जास्तीचे पैसे देण्याचे कबूल केल्यामुळे ते जायला राजी झाले होते."


त्यानंतर गेलेले ते अजूनही घरी परत आलेले नाही. त्यादिवशी रात्री ते परत आले नाही म्हणून फोन केला तेव्हाही त्यांचा फोन लागला नाही आणि तेव्हापासून त्याचा फोन किंवा माहिती काहीच नाही. "तिने शिपायाला सांगितले.


"दोन दिवसापासून नवरा घरी नाही आणि ते तुम्ही आम्हाला आता सांगता होय?, पोलिसात तक्रार नोंदवायची ना अशा वेळी."शिपाई


"हो जी चुकलं साहेब. खरं सांगू का? आम्ही नोंदवणार होतो तक्रार पण ते विभूते साहेब गेले आणि हिम्मतच नाही झाली बघा रिपोर्ट द्यायची."तिने प्रांजळपणे सांगून दिले.


"साहेब ,महेश साळुंखे दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याची बायको सांगत होती सदाशिव विभुतेंचा फोन आला आणि त्यानंतरच महेश जो घरातून बाहेर गेला तो परत आलाच नाही म्हणून."पोलीस शिपायाने इन्स्पेक्टर विराजला सांगितले.

"म्हणजे नक्कीच या महेश साळुंखेचा या प्रकरणाशी काहीतरी निकट संबंध नक्कीच आहे. एकतर जे काही घडले त्याबद्दल त्याला काहीतरी माहिती आहे किंवा जे घडले त्याच्या मागे त्याचाही हात असण्याची दाट शक्यता आहे."इन्स्पेक्टर


"हे बघा जाधव तुम्ही महेश साळुंखे च्या घरावर नजर ठेवून राहा. त्याच्या घरी कोण येते, कोण जाते ,त्याचे नातेवाईक कुठे कुठे आहेत ,महेश साळुंखे कुठे कुठे जाऊ शकतो? या सगळ्यांचा छडा लावायचा तुम्ही प्रयत्न करा महेश कुठेही असला तरी आपल्या घरच्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न नक्की करेल."इन्स्पेक्टर विराजने त्यांना सूचना दिल्या


"आणि मोरे तुम्ही सदाशिवराव विभुते यांच्या घरी काय सुरू आहे? त्याच्यावर पण नजर ठेवायची, त्यांच्या दोन्ही मुलांच्या हालचालींकडे आणि कुणाचे काही हितसंबंध यात गुंतले आहेत का या सगळ्या गोष्टीचा छडा तुम्हाला लावायचा आहे."इन्स्पेक्टर विराज ने दुसऱ्या पण शिपायाला सूचना दिल्या.


कुठूनच काही आक्षेपार्ह असे आढळून आले नव्हते.


डॉग स्क्वाड चा सुद्धा काही उपयोग होऊ शकतो का हे पडताळण्यासाठी  डॉग स्क्वाड ला सुद्धा  बोलावून घेतले होते इन्स्पेक्टर विराज यांनी.

"सर महेश साळुंखे च्या घरी सुद्धा त्याचा त्याचा काहीच पत्ता नाही. सगळे नातेवाईक संबंधित सगळीकडे त्यांनी चौकशी केली कुणालाच काहीच माहित नाही. त्याच्या घरच्या नंबर चे कॉल टॅप केल्यानंतरही त्यांनाच अजून काहीच माहित नाही त्याच्याबद्दल असेच दिसून येते."शिपाई इन्स्पेक्टर विराजला सांगत होते

कुठून ना कुठून महेशचा सुगावा लागेल असे इन्स्पेक्टर विराजला वाटत होते पण ती आशा मात्र फोल ठरली. शेवटी शहरातून डॉग स्क्वाड बोलवून त्याच्या साहाय्याने काही शोधता येते का यावर विचार करायचे ठरले.


मिळणारी सगळी माहिती बघता कुठल्याच निष्कर्षापर्यंत इन्स्पेक्टर विराज पोहोचू शकत नव्हते.


महेश ने स्वतःच्या फोनवरून नाहीतर इतर कुठूनही घरच्यांशी संपर्क साधायला हवा होता असे त्याला वाटत होते. पण असे काही घडले नव्हते हे फारच चकित करणारे होते त्याच्यासाठी.


महेशच्या घरचे सांगत आहेत तसे खरेच महेश सदाशिवराव विभुते यांच्यासोबत गेला होता का हेही पडताळून बघणे गरजेचे होते. त्यामुळे श्वान पथक आल्यानंतर शोधाची सुरुवात महेशच्या घरापासूनच करावी असे त्याने ठरवले.

काही वेळातच लगबगीने एक शिपाई इन्स्पेक्टर विराज कडे आला.
"सर ,श्वानपथक आले आहे. सर, पुढे काय करायचे?"

शिपायाच्या सांगण्याने इन्स्पेक्टर विराजची  विचारांची तंद्री बंगली.

"ओके, बस आलोच मी." म्हणत आपली कॅप डोक्यावर चढवत विराज तिथून बाहेर पडला.


काय होईल पुढे, श्वान पथक तपासाला नवी दिशा देईल का की त्यातूनही काही निष्पन्न होणार नाही? हे प्रकरण नेमके कोणते वळण घेईल हे जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.


© मुक्तमैफल
डॉ .मुक्ता बोरकर आगाशी

🎭 Series Post

View all