निरहार एकादशी भाग दोन

What We Do On The Day Of Fast


मीरा -" बरं मग मिहीर ने काय खाल्लं की, उपाशीच राहिला?"

रमा - " अग त्याने काय खाल्लं नाही ते विचार!"

मीरा -" म्हणजे एवढा काय खाल्लं त्याने?"

रमा -" साबुदाणा वडे , खवा जिलेबी, आलू चिप्स, आलू पापड, फराळी चिवडा, सिंगडा शेव ……. "

मीरा - "अग्गो बाई एवढं!"

रमा -" आणि अहो, नाना - माई, यांनी त्याला प्रत्येक पदार्थाची दोन घास चव घेत साथ दिली ! "

मीरा - " काय सांगतेस काय? "

रमा - "हो ग बाई. "

मीरा - " अग पण माई तर फक्त भागच खाणार होत्या ना? आणि नाना त्यांनी तर फक्त धीरडे च खाणार असं म्हंटलं होतं ना?? आणि त्या दोघांच्या दातांच्या कवळी ने त्यांना साथ दिली त्यांना??? "

रमा - "ते तर खाल्लंच अहो, नाना - माई नी. अगं मग मीहीरने फराळी चिवडा, चिप्स, बटाटा पापड, भगरीच्या तळलेल्या चकल्या, सगळ एकत्र केलं. आणि त्यावर मस्त मलाईचं घट्ट दही टाकलं. त्या चमचमीत भेळेवर सगळ्यांनीच ताव मारला. आणि विशेष म्हणजे मलाईच्या दह्याने त्या भेळेतले सगळे कडक जिन्नस अगदी निमूटपणे माना टाकून, मऊ झाले. मग नाना माईंना तर दातांच्या कवळी ची सुद्धा गरज भासली नाही. "

मीरा - " चला बरं झालं बाई! एकादशीचा उपवास भेळेवर थोडक्यात निभावला. "

रमा - " अगं कसलं थोडक्यात ! तेवढ्यात शेजारच्या देशपांडे काकूंच्या राधेने उपवासाचे डोसे आणले . खास मिहीर साठी !

मीरा - " मग. "

रमा -" अग मग काय? माईंच सुरू झालं देशपांडे काकू आणि राधा पुराण…देशपांडे काकू किती पदार्थ बनवतात उपवासा करिता, त्यांच्या हाताला किती चव आहे, कामाचा उरक पण किती आहे, काही न बोलता माईंनी मला सगळंच बोलून घेतलं !"

मीरा - "अरे देवा!"

रमा - "अगं एवढं सगळं करेपर्यंत दुपारचे दोन वाजले म्हटलं जरा पाठ टेकाऊ, तर आमच्या रेणू सरकार हजर!"

मीरा -" आता रेणू च आणखी काय? "

रमा - " रेणु मात्र हुशार , तिने स्वतः काहीच केलं नाही, पण नाना माई आणि मीहीरला कामाला लावलं! "

मीरा - " बरंच झालं ! पण त्यांनी ऐकलं का रेणू च ? "

रमा -"न ऐकून करणार तरी काय?

उपवासाचं कस्टड करायचं म्हणून रेणू ने नानांना सगळी फळ कापायला लावली, माईंना मलईचे दही घोटायला लावलं, धने-जिरेपूड, काचेचे बाउल , मिहीरला काढायला लावले.



©® राखी भावसार भांडेकर.



फोटो साभार गूगल 

🎭 Series Post

View all