कर्तव्य भाग दोन

Story Of A Housewife


मागच्या भागात आपण पाहिलं की सुधा सुमाला भेटल्यावर तिचं यथायोग्य स्वागत करते आणि उरलेल्या कामासाठी स्वयंपाक घरात निघून जाते. या भागात बघूया की या दोन्ही नंणदा-भावजया निवांतपणे बोलू शकतात की नाही, की आणखीन एक नवा पेच सुमा समोर उभा राहतो.

*************************************************


सुधा मंदस्मित करून निघून जाते.


सुमती आपल्या खोलीत आराम करता करता विचार करते..... वहिनी लग्न होऊन आली तेव्हापासून तिने घरातली सगळी जबाबदारी सांभाळली ! सगळ्यांच्या आवडीनिवडी, अण्णा आणि दादाच पथ्यपाणी , मुलांचा अभ्यास, घरातले सणवार ,सगळं सगळं एकहाती सांभाळलं सुधा वहिनींनं.



लग्नाच्या आधी आपण कॉलेजमधुन आल्यावर एखादी भाजी आवडीची नसेल तर , किंवा काही चटक-मटक खायचं असेल तर वहिनी आपल्याला स्वतः लगेच करून द्यायची. अण्णांच्या शेवटच्या काळात अण्णांची सगळी सेवा - सुश्रुषा सुधा वहिनीनच केली. रवीचा खाण्याच्या लहरी स्वभाव, तोही वहिनीने संयमाने सांभाळला. असा विचार करता करता सुमतीला केव्हा झोप लागली ते तिलाच कळलं नाही!


दुपारी दोन वाजता दादासाहेब त्यांच्या महत्त्वाच्या मिटिंगहुन परत आल्यावर , जेवणाच्या टेबलावर दोघा भावा-बहिणीच्या गप्पा सुरू होतात.


दादासाहेब - "सुमती किती दिवस झाले तू एक फोन सुद्धा केला नाही! अग आठवड्यातून एखादा फोन करत जा !!"


सुमा - "दादा पी.एचडी. चं काम आता शेवटच्या टप्प्यात आल आहे . थिसीस पण लिहायचे आहेत, शिवाय कॉलेज ही असतं, त्यामुळे वेळच मिळत नाही.तुम्ही पण फोन करत नाही ना !"


दादासाहेब - "हो गं ! जेव्हापासून विरोधी पक्षनेता झालोय ना तेव्हापासून वेळच मिळत नाही !!"


दादासाहेब "रती आता मॅट्रिकला आहे भरपूर मेहनत घेते आहे. राहुल ही आता सातवीत गेला आहे , पण अभ्यासात जरा मागे पडतो आहे."

जेवण झाल्यावर दादासाहेब आणि सुमती हॉलमध्ये गप्पा मारत बसले

सुमा - "दादा , रवी कुठे दिसत नाही?"


दादासाहेब - "त्या करताच तुला बोलावलं आहे ना ! मला रवीचं काही कळतच नाही!! हा करतो काय ? बोलतो काय?? त्याचं वागणं काय??? एक धड नाही ! आज हे तर उद्या ते !! अगं नाही काही तर आपल्या घराण्याचा तरी विचार करायचा ना!"


सुमा - "आता काय झालं दादा? रवीचा परत काही प्रॉब्लेम झालाय का?"


दादासाहेब - "तुला माहिती आहे ना ! मागच्या वेळी आपण मीराला नाही म्हटलं , मग रवी राधीका साठी तयार झाला. पण आता तो राधिके सोबत झालेला साखरपुडा तोडून, मीराशी लग्न करायचं म्हणतोय, याला काहीच कळत नाही का? आता इतका मोठा झाला हा!मी तरी काय समजावणार त्याला ? तू जरा त्याच्याशी बोल ना."


सुमती मनात विचार करत होती…. \"आपला भाऊ - रवी किती हुशार आणि समजूतदार, यावर्षी एम. एस. ची तयारी करतो आहे , पण एमबीबीएसला असतानाच त्याला डॉक्टर देशपांडेची मीरा आवडली..........मीरा होती पण छानच ! पण डॉक्टर देशपांडे यांचा भूतकाळ मध्ये आला .......खरंतर डॉक्टर देशपांडे यांची मीरा ही अनौरस संतती.... ............... डॉक्टर देशपांडे विद्यार्थीदशेत असताना एका विधवे पासून झालेली.......


पण तरीही डॉक्टर देशपांडे यांनी मीराचा स्वीकार केला......... डॉक्टर देशपांडे त्या विधवेशिही विवाह करणार होते............पण समाजाला घाबरून त्या विधवेने आत्महत्या केली.........

मागल्यावेळी पण आपण रवीला खूप समजावून सांगितले होते....... अण्णा गेल्यावर दादानेच आपल्या सगळ्यांचा, त्यांच्या मुलांप्रमाणे सांभाळ केलेला आहे ! तुझं आणि माझं शिक्षण!!.......... माझं आणि मीनाताई चं धडाक्यात केलेलं लग्न !!!.......... दादांनी कधीच कुठली कमतरता पडू दिली नाही आपल्याला !!"


सुमती मनाशीच विचार करत होती ........ \"प्रत्येक वेळी रवी असं विचित्र का वागतो ? समजून सांगितले की , त्याला कळतं ! पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या.\"


रात्री उशिरा घरी आल्यावर सुधा वहिनीने रवीला, सुमती आल्याचे सांगितले, रोज रात्री सुधा वहिनी रवी साठी जाग्या असायच्या. रवी सुमती ला भेटायला तिच्या खोलीत गेला.....


रवी -"काय सुमा दी? किती दिवसानंतर आलीस ??फोन पण नाही करत !! खूप बिझी असतेस का ग?"


सुमा -" तू तरी कुठे मला फोन करतोस ? तुलाच वेळ नाही आहे ! पण तरीही तुला चार गोष्टी समजवायला मी आली आहे !!"


रवी - "अग तुम्ही सगळेजण मला काय कुक्कल बाळ समजता का ? प्रत्येक वेळी मी माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा म्हटलं की , तुम्ही मला समजावत राहता, अरे माझा, माझ्या आयुष्याचा ,माझ्या मनाचा जरा तरी विचार करा ना !!! रवी चिडून बोलतो. माझ्या स्वतःच्या आयुष्यावर माझा काहीच हक्क नाही आहे का??"



********************************************************

पुढल्या भागात बघूया रवी काय निर्णय घेतो तो मीराशी लग्न करतो की राधिकाशी.


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.



🎭 Series Post

View all