तुझ्या आठवणीतील ते दिवस

The days in memories

ऋतु प्रत्येक नकोसा वाटतो तुमच्याविना

 सुख ही वाटते अधुरे तुमच्याविना

तुमची साथ हविशी वाटते माझीया मना

जगणही अवघड वाटतं आता तुमच्याविना

दिवसभर फिरून पाखरू येते जसे आपल्या घरा

 तसं तुम्ही यावे रोज रोज असे वाट माझ्या मना

दुरावा आता सोससत नाही

झाली मनाला तुमच्या मिठीत येण्याची घाई.

कोरड्या मातीस जशी सर पावसाची जाणवते

आठवण होई जेव्हा तुमची मन माझे बावरते

जोडले नाते हे असे हे आपले प्रितीचे

गुंतले हे जिव आपुल्या दोघांचे

रहावेना तुमच्याविना क्षणभर ही मजला

आठवेना तुमच्याविना दुसरे काही मजला

मन गुंतले आफुले एकमेकांत असे

नाते चंद्र आणि चांदणीचे जसे