त्या जागे भोवती असलेली दिव्य पुंज प्रकाश पाहून ते आश्चर्य चकित झाले. या अश्या ठिकाणी कोणतीही दिव्य आत्मा येईल असे वाटले नव्हते त्यांना.
"मुलांनो घाबरू नका मी तुझ्या स्वप्नात आलेला तोच महंत आहे हर्षित पण आता संकट जाग झालं आहे, तो शैतानी आत्मा जागृत झाला आहे. तर तुमच्या सारख्या पुण्यवान आत्म्याची गरज आहे. ही वेळ त्या जागृत झालेल्या शैतानी शक्तीच्या अंताची आहे आणि त्या करताच हे उध्वस्त केलेल्या मंदिरातील मूर्ती काढून पन्नास वेळा हनुमान रक्षा मंत्र अर्थात हनुमान चालीसा म्हणावी लागेल आणि शेवट भगवान शंकराच्या ओम नमः शिवाय या मंत्राने करावा लागेल. भगवान शंकराचा अंश हनुमान आहेत आणि म्हणूनच या दोन देवांच्या प्रार्थनेने त्यांचा अंत होईल एवढं बोलून महंत थांबले."
"मुलांनो घाबरू नका मी तुझ्या स्वप्नात आलेला तोच महंत आहे हर्षित पण आता संकट जाग झालं आहे, तो शैतानी आत्मा जागृत झाला आहे. तर तुमच्या सारख्या पुण्यवान आत्म्याची गरज आहे. ही वेळ त्या जागृत झालेल्या शैतानी शक्तीच्या अंताची आहे आणि त्या करताच हे उध्वस्त केलेल्या मंदिरातील मूर्ती काढून पन्नास वेळा हनुमान रक्षा मंत्र अर्थात हनुमान चालीसा म्हणावी लागेल आणि शेवट भगवान शंकराच्या ओम नमः शिवाय या मंत्राने करावा लागेल. भगवान शंकराचा अंश हनुमान आहेत आणि म्हणूनच या दोन देवांच्या प्रार्थनेने त्यांचा अंत होईल एवढं बोलून महंत थांबले."
"पण हे मंदिर कोणाचं आहे आणि कोणी उद्ध्वस्त केले? देवज म्हणाला."
"हे मंदिर त्या जोकरच आहे आणि त्याला मुक्त करताच त्यानें ते मंदिर पूर्णपणे उध्वस्त केले. त्याला परत इथे बंदिस्त करतील म्हणूनच त्याने हे सर्व केले तरीही आता त्याला माहित नाही त्यांचा अंत जवळ जवळ आला आहे आणि त्यासाठी हर्षित मला तुझीच फक्त गरज लागणार आहे व बाकी सर्वांनी फक्त प्रार्थना करायची आहे महंत म्हणाले."
तेवढ्यात त्या दाट झाडीतून ओजस, साळवी तिथे जख्मी अवस्थेत पोहचले. हर्षित, देवज आणि भूषण यांना आश्चर्याचा धक्का बसला. हे कोण आहेत त्यांना समजत नव्हते. महंत मात्र त्यांना पाहून स्मित करत होते.
"तुम्ही कोण आहात? हर्षित म्हणाला."
"तुम्ही कोण आहात? हर्षित म्हणाला."
यावर आपल्या हातातून निघणाऱ्या वेदनांना दुर्लक्ष करत ओजस म्हणाला, "मी इथला इन्चार्ज, इन्स्पेक्टर ओजस आणि हे हवालदार साळवी आम्ही राजकांग येथे गेलो होतो तिथे एक विचित्र असा जोकर भेटला पुढे त्यानेच आम्हाला सर्कस पाहायला आमंत्रण दिले. माहिती नाही कसं पण तिथली सर्व सर्कस पाहायला आलेली लोक एकमेकांच्या जीवावर उठली आणि क्षणार्धात तिथे सगळीकडे मृतदेहाचा रक्ताच्या थारोळ्यात खच पडला आम्ही आमच्या सुटका करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला त्या लोकांनी भुके असल्याप्रमाणे चावायला सुरुवात केली पण आम्ही कसेतरी प्राण वाचवून पळालो पण यात मात्र आमचा एक ड्रायव्हर आणि हवालदार मात्र त्या लोकांच्या पुढे हारले आणि बळी पडले."
"पण मग ते गाव, तिथली लोकं? हर्षित चिंतेत म्हणाला."
"ते गाव पूर्ण पणे मृत आत्माची सैन्य मध्ये बदलून गेले आहे मुला पण यांची सुरूवात जिथून झाली त्या याच गावात ते संकटं झपाट्याने वाढत येणार आणि इथली पण तीच दुर्दशा होईल जी त्या गावाची झाली आहे तर यासाठी आपल्याला इथल्या मानवतेला वाचवण्यासाठी सर्वांना लढाव लागेल महंत म्हणाले."
"पण महंत या दोघांना ही संसर्ग झाला आहे तर हे वाचण्याची शक्यता कमीच आहे आणि ते पण मृत लोकांत बदलू शकतात भूषण घाबरत म्हणाला."
"ही शक्यता आहेच पण याकरता त्यांनी भगवान शंकराचे स्मरण केले तर माझ्या कडे थोड्या उरलेल्या शक्तीच्या साहाय्याने यांना वाचवेल पण यांचा आत्मविश्वास आणि पूर्ण श्रद्धा हवी महंत म्हणाले."
"हे कोण बोलत आहे आणि याचं अस्तित्व दिसत नसताना हा आवाज कसा येत आहे व ते आम्हाला बरे कसे करणार आहेत? ओजस म्हणाला."
"इन्स्पेक्टर ओजस, तुम्ही फक्त ते बोलत आहेत ते करा नाहीतर तुम्हाला तुमच्या प्राणांना गमवावे लागेल हर्षित म्हणाला."
"ठीक आहे, आम्ही करतो असे ओजस आणि साळवी दोघे म्हणाले."
एक दिव्य सुगंधाचा परिमळ तिथे दरवळू लागला व ओजस आणि साळवी यांच्या जख्मा हळूहळू भरू लागल्या व फाटलेली त्वचा पूर्ववत होऊ लागली. रक्ताच्या डागासहित सर्वकाही तिथून गायब झाले. हा चमत्कार की काय होता त्या दोघांना ही कळालं नाही पण ते आश्चर्य चकित खूप झाले.
हर्षित म्हणाला, "ओजस सर ही एक दिव्यात्मा आहे आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठीच इथे आली त्यामुळेच तुम्ही बरे झालात आणि मृत्यूच्या द्वारातून परत आलात तर ते आता सांगितील तसे आपण नाही केले तर आपण सर्वजण मृत्यूच्या दारात नसणार त्यापेक्षाही भयंकर अशा त्या शैतानी शक्तीचे गुलाम आपले आत्मे होतील अनंत काळासाठी."
"खरच हा एक चमत्कार आणि आश्चर्य आहे पण मी करायला तयार आहे पूर्ण श्रद्धेने ओजस म्हणाला."
"तुम्हा सर्वांना आधी इथली मूर्ती बाहेर काढायची आहे आणि तरच पुढे सर्व काही शक्य आहे महंत म्हणाले."
"पण ही मूर्ती बाहेर काढायची कशी हे मंदिर भोवती काही शैतानी शक्तीचा प्रभाव किंवा ती मूर्तीच नष्ट झाली असेल तर महंत हर्षित म्हणाला."
"नाही ती मूर्तीही सुरक्षित आणि तिला बाहेर काढण्याचं साधन आहे इथले दगड यामुळेच ते मंदिर वेगळ होऊन ती मूर्ती बाहेर येईल आणि पुढचा क्रम मी सुरू करेल महंत म्हणाले."
मग सर्वांनी जोमाने मिळून कामाला सुरुवात केली आणि काही तासांतच ती मूर्ती बाहेर आली. हे सर्व त्या जोकरला कळाले व तो प्रचंड संतापला, त्याला त्याच्या अस्तित्वाला क्षती पोहचणार यांची जाणीव झाली. त्याने आपल्या सर्व मृत प्रेत्मांना आदेश दिला आणि ते सर्व कालबरीआ इथे जायला निघाले.
सध्यातरी इथल्या लोकांना धोका नव्हता, धोका निर्माण होणार होता फक्त या पाच जणांना म्हणूनच महंत नी आपली शक्ती वापरून हा पूर्ण भाग मंत्र भारित केला आणि या परिसरातून कोणी आत किंवा बाहेर पडू शकणार नाही अशी व्यवस्था केली.
"हर्षित, तुम्हा सर्वांच्या जीवाला धोका नाही पण ते कदाचित पराभव झाला म्हणून एक आभास निर्माण करतील इथल्या लोकांवर हल्ला केल्याचा, तुम्हाला किंकाळ्या ऐकू येतील तरीही तुमचं लक्ष विचलित होता कामा नये नाहीतर माझी ही शेवटची शक्ती जी मी वापरणार आहे ती नष्ट होईल आणि मग पुढे होणारा विनाश अटळ आहे महंत म्हणाले."
"नाही होणार! असं काही महंत तुम्ही निश्चिंत व्हा हर्षित म्हणाला."
"त्यासाठी मला तुझ्या शरीराची आवश्यकता आहे हर्षित तु खुप पुण्यवंत आत्मा आहे आणि त्या शैतानी शक्तीस रोखण्यासाठी मी तुझ्या शरीराचा उपयोग करेन महंत म्हणाले."
"मला मान्य आहे हर्षित म्हणाला."
"आम्ही ही आमच योगदान पूर्ण देऊ महंत देवज, भूषण, ओजस व साळवी एकसाथ म्हणाले."
सर्वांनी भगवान हनुमंत व भगवान शिवाचे स्मरण केले आणि हनुमान चालीसा चे पठण सुरू केले तर इकडे महंत चा आत्मा हर्षित च्या शरीरात सामावला काही काळासाठी. हर्षित च्या शरीरातील महंतांनी मंत्रपठण सुरू केले. ते दिव्य स्वर संपूर्ण आसमंतात गुंजले आणि त्या परिसरातील काळी गडद छाया दुर झाली. तिथल्या दिव्यतेने सर्व पशू पक्ष्यांचे आगमन झाले आणि ते ही जणू आपल्या स्वरातून त्यांना साथ देऊ लागले.
या सर्वांमुळे जोकरला काही करता येण शक्य होत कारण त्याने बंदिस्त केलेल्या आत्म्याची संख्या अपूर्ण होती आणि म्हणूनच तो कमजोर होता अजूनही पण ते मृत आत्मे शक्तीशाली होते आणि ते वेगाच्या सर्व सीमा ओलांडून कालबरीआ च्या त्या भागात आले जिथे ते सर्वजण मानवतेच्या रक्षणासाठी लढत होते. महंतानी आखलेल्या रेषांच्या पुढे ते जाऊ शकत नव्हते म्हणून ते संतापून गेले आणि महंताच म्हणणं खरं झाले त्यांनी एक आभास निर्माण केला की ते सर्व इथल्या रहिवाशांना यमसदनी धाडत आहे पण महंतानी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तिकडे लक्ष न देता मंत्र पठण सुरू केले.
बघता बघता त्या जोकरची पूर्ण मूर्ती एखाद्या पदार्थ ज्वालाग्राही मध्ये जाऊन नष्ट होत असताना पूर्ण वितळला जावा तशी ती मूर्ती हळूहळू वितळू लागली, त्या मूर्ती मधून अग्नीलाव्हा बाहेर पडू लागली आणि एक प्रचंड स्फोट होऊन त्या मूर्तीचे अवशेष हवेत विरून जावू लागले.
यामुळे त्या जोकरला समजून आले की आपल्या शक्तीला हरवणारा कोणी आला आणि त्याने आपल्या शक्तीला आव्हान देऊन आपल संपूर्ण अस्तित्व च मिटवल आणि यामुळे तो प्रचंड संतापला. त्याने भयानक ओरडायला सुरुवात केली पण त्याने त्या निर्मनुष्य जागेवर प्रभाव पडला नाही शेवटी हनुमान चालीसा चे पठण पूर्ण होताच त्या सर्वांनी एकसाथ ओम नमः शिवाय चा जप केला आणि त्यातून दिव्य वलय निर्माण झाले आणि त्यामुळे त्या जोकरची शैतानी शक्ती विस्तृत अश्या ब्रम्हांडात तिला अज्ञात स्थळी कैद केले आणि त्यासोबत त्या सर्व मृत आत्म्यांना मुक्ती मिळाली.
महंताचा अंश ही हर्षित मधून बाहेर पडून तो पवित्र अश्या ठिकाणी कायमचा स्थिरावला. आपण त्या सर्वांना मुक्त करू शकलो याचे हर्षित, देवज, भूषण, ओजस आणि साळवी यांना समाधान वाटले की मानवतेचे रक्षण केले एका शैतानी शक्तींपासून. या सर्वांच्या जीवनात एक नवीन सुखद क्षणांचा प्रवास सुरू झाला आणि ती जागा शापमुक्त होऊन सोनेरी किरणांच्या प्रकाशात पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट ओसाड पडलेल्या त्या जागेत कानांना प्रत्येकाच्या तृप्त करू लागला.
समाप्त.
समाप्त.