Login

सर्कस भितीची क्रूरता. भाग - १०

सर्कस असते लहान मुलांच्या आनंदासाठी पण तीच सर्कस अतर्क्य अशा घटनांमुळे भयावह ठरली की त्या नंतर हत्याच प्रमाण वाढले पण रहस्यमयरित्या ते थंडावल काही वर्षांसाठी... वर्तमानकाळात परत त्याच घटना घडू लागल्या पण यावेळी मात्र या घटना सामान्य होत्या तरीही काहीतरी वेगळं होतं आणि तेच शोधण्याच आव्हान ओजस पुढे होत.‌ गुन्हयाच हे वेगळंच आव्हान त्यांच्यासमोर समोर आहे जरी त्यांचा विश्वास नसला तरी.
"म्हणजे ते सर्व सत्य होते तर.... "हर्षित मनाशी विचार केला व त्याने या बाबतीत भूषण काका आणि देवज शी बोलायचं ठरवले. काही वेळाने ते दोघेही उठले. हर्षित नाश्ता पार्सल घेऊन आला कालच्या खाणवळीमधून. मग तिघांनी आपली नित्यकर्म उरकून घेतले आणि नाश्ता करायला बसले.

नाश्ता होताच देवज म्हणाला, "हर्षित आज माझी गाडी येत आहे तर मला जाणे भाग आहे उदया पासून तसंही आपलं काम चालू होणार आहे तर त्या आधी मला तिथला परिसर एकदा पाहून घ्यायचा आहे आणि त्या धनेश च काय झाले बघायचं आहे."

"मित्रा, तुला इथे जाण शक्य नाही आज तरी आपल्याला इथल्या घनदाट जंगलात जायचं आहे हर्षित म्हणाला."

"पण कशासाठी मित्रा त्या जंगलात जाण्याचा उद्देश नाही तर कश्याला जायच जिथं भयंकर जंगली जनावर ही फिरकत नाही अश्या ठिकाणी देवज म्हणाला."

"हो बाळा, तिथं जायची काही आवश्यकता नाही आणि तसंही तुमच्या जीवावर बेतले किंवा कोणता धोका झाला जीवाला तर परत आपल्या लोकांना गमावून बसाल लागेल मला आणि आता या वयात मला हे नको आहे तु फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर भूषण म्हणाला‌."

"काका , मला काही सांगायचं आहे असे म्हणून हर्षित ला स्वप्नात ते महंत काय म्हटले हे सांगितले. ते ऐकून दोघेही विस्मयचकित झाले."

हे ऐकून भूषण म्हणाले, "बाळा हे फक्त स्वप्नच असेल तर..."

"नाही काका हे स्वप्न नाही या घरात मला चंदनाचा सुगंध जाणवला जेव्हा ते महंत निघून गेले आणि आज सकाळी मी या हॉलमध्ये येताच मला तोच सुगंध जाणवला ‌आणि त्यामुळेच खात्री पटली. हर्षित म्हणाला"

"नक्कीच काहीतरी संदेश असणार आपल्याला जायलाच हवे देवज म्हणाला."

"माझंही तेच म्हणणं आहे देव पण तुला आज इथे थांबावेच लागेल हर्षित म्हणाला."

"ठीक आहे! हर्षित मी थांबेल आणि त्या ड्रायव्हरला फोन करून सांगतो मी देवज म्हणाला."

"मी पण येईल हर्ष बाळा कारण त्या जंगलांची माहिती आहे मला... भूषण काका म्हणाले."

"पण काका तुम्हाला कसं माहिती आहे? हर्षित आणि देवज एकसाथ म्हणाले."

"मला ते महंत म्हटल्याप्रमाणे ती कथा सांगावीच लागेल त्या शिवाय तुम्हाला कळणार नाही आणि यांचा उपयोग काय होणार? हे त्या मंदिरात गेल्यावर कळेल भूषण म्हणाले."

"काका आम्ही ती घडलेली घटना ऐकायला उत्सुक आहोत कारण आम्ही दोघेही लहान होतो तर काही च आठवण नाही हर्षित म्हणाला."

"हो, तुझ्या आई वडीलांची इथेच या शहरात व्यवसाय च्या वाढीसाठी इथे येण आवश्यक होते म्हणून तुझे वडील, आई आणि मी इथे आलो. तुझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांच्या ओळखीने मिठाईचा व्यवसाय सुरू केला. ही मिठाई आधी या शहरात मग पूर्ण त्रिपुरा राज्यात सप्लाय करायचे ठरवले.‌ हळूहळू व्यवसायात जम बसू लागला, लोकप्रिय होऊ लागला. एक - दोन वर्षांत तुझे वडील खूप श्रीमंत झाले.त्यांना या गावात कोणी प्रतिस्पर्धी नव्हता पण त्यांचा मित्र जो पार्टनर होता शरद त्याचा हळूहळू मत्सर आणि द्वेष जागा होऊ लागला.‌ त्यानें त्यात भ्रष्टाचार करायला सुरुवात केली.‌ व्यवसाय तरी ठीक चालू होता पण आता शरदची लोभाची महत्वकांक्षा वाढली आणि त्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि त्यानें तुझ्या वडिलांच्या बाकी पार्टी ना आपल्या कडे वळवून ती फ्रेचांईजी स्वतःकडे घेतली पण यांचा उलटा परिणाम झाला त्याला व्यवसायातील ज्ञान नसल्यामुळे त्याच नुकसान झाले आणि परत त्याच्याकडचे सर्व भागिदार तुझ्या बाबा सोबत परत सहभागी झाले. या सर्व गोष्टीने तो शरद संतापून गेला आणि त्याने काळ्या शैतानी शक्तीचा आसरा घेतला आणि त्यातून जोकर चे नवे रूप त्या शक्तीने धारण केले आणि सुरू झाला विनाशकारी खेळ" भूषण काका थोडावेळ बोलायचे थांबले.

"शरद काका च काय झाले मग काका त्याचा ही त्या भीषण घटनेत.... हर्षित म्हणाला."

"हो, त्याचाही मृत्यू झाला. ती रात्र फारच भयानक होती.‌कुठल्यातरी दृष्ट शक्तींची साधना करणाऱ्या अघोरी कडून त्याने ही पूजा केली आणि मानवाना कल्पना ही नसेल अशा जोकरच्या रूपात शैतानी शक्ती अवतरली.शरदने वैयक्तिक सूडापायी सर्व निष्पाप जीवांचा बळी घेतला आणि शेवटी तो कालबरीआ इथे आला.‌ त्यानें मोफत सर्कस चा शो ठेवला आणि तुझ्या बाबांना यासाठी स्टॉल लावायची संधी दिली त्याबदल्यात तो भरपूर पैसे देईल असं सांगितलं आणि तुझे वडील फसले.‌ शरदने तुझ्या आई वडीलांना आणि देवजच्या आई वडिलांना ही आमंत्रण दिले. तुम्हा दोघांना ते  सर्कस पाहायला गेला तेव्हा मी नव्हतो. सर्कस मधील सर्व मनोरंजन चे खेळ संपले माझे काम संपवून मी आलो आणि शेवटी सर्व जण निघणार तेवढ्यात तिथे शैतानी शक्तीचा स्वामी असलेला जोकर आला आणि त्या सर्वांना संमोहन अवस्थेत नेले. त्या संमोहन चा असा असर झाला की बघता बघता तेथील सर्व लोक एकमेकांच्या रक्ताच्या तहानेने जणू व्याकूळ झाले. सर्व एकमेकांना वेड्यागत चावू लागले, ओरबाडू लागले व पटापट मरू लागले आणि ते सर्व मृतावस्थेत पोहचून ही जिवंत परत झाले भूषण काका थांबत म्हणाले."

"काका हे सर्व इतकं भयानक आहे पण मग तर हा जोकर मधील असलेली शैतानी शक्ती परत येऊ शकत असेल तर.... कदाचित तो व्यक्ती जो माझ्या जागेवर काम करत होता तो गायब झाला तर तोच असेल तर...‌ देवज म्हणाला."

"असूही शकत बाळ.... तर पुढे न जाणे कसं तिथे एक दिव्य पुरूष आला ज्यांना तु स्वप्नात पाहिले तेच महंत होते ते. त्यांना कोणी बोलावलं कसे आले ते माहित नाही पण त्यांनीच तुमच्या आईवडिलांचा अल्पकाळ जीव वाचवला. त्यांनी आपल्या मंत्र शक्तीच्या सामर्थ्याने त्या सर्वांना थांबवून ठेवले पण ती वेळ मात्र त्यांच्या साठी योग्य नव्हती तुमचे आई वडील जाताच काही क्षणांनी घनघोर अंधार पसरला आणि त्या महंताची ताकद संपुष्टात आली. ते पूर्णपणे थकले आणि तिथल्या मृत व्यक्तीच्या घोळक्यांनी त्यांचा बळी घेतला पण तरीही आपल्या उरलेल्या काही क्षणांत त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून तो जोकर आणि ते मृत जीव यांना पूर्णपणे बंदिस्त केले  तुम्हा दोघांचे आई वडील मात्र तरीही बळी पडलेच,
त्या दोघांनी तुम्हा दोघांना वाचवताना काही जणांमुळे त्यांना संसर्ग झाला व ते भर रस्त्यात चक्कर येऊन खाली पडले व माझ्या समोरच मृत पावले. त्यांच्या देहात हळूहळू हालचाल दिसू लागली . मला त्या मृत व्यक्तीची घटना आठवली आणि मी तुम्हा दोघांना घेऊन तिथून पळत सुटलो. त्यांच्या मृतदेहाच मी अंतिम क्रियाकर्म ही करू शकलो नाही.‌ त्यांच्या मृतदेहाच काय झाले माहिती नाही. पुढे तिथेच जंगल निर्माण झाले असावं पण त्या परिसरात कोणीच वास्तव केलं नाही असे मी ऐकून होतो ज्यांनी इथे राहायाच ठरवलं त्यांना यांची धग जाणवली तर काहीच जीवन त्या शैतानी शक्तीला बळी पडल एवढं बोलून भूषण थांबले."

हे सर्व बोलताना त्यांना त्यांच्या भाऊ आणि बहीणची आठवण झाली आणि त्यांचे डोळे पाणावले. तीच परिस्थिती देवज व हर्षित ची होती. तिघांनी एकमेकांना सावरलं.

"काका पण तरीही मला त्या महंतांनी मला स्वप्नात येऊन का बोलावलं? सर्व काही संपले आहे आणि आता त्या जोकरला बोलवणार ही कोणी नाही तर मग या स्वप्नाचा अर्थ काय? हर्षित म्हणाला."

"ते तिथे गेल्यावरच कळेल हर्षित आणि आपल्याला आता निघाव लागेल. त्या खानवळवाल्याला विचारून आपण तिथे जाऊया भूषण म्हणाले."

"पण काका तो आपल्याला मार्ग का सांगेन?आधीच तो आपण या बंगल्यात राहत आहोत हे ऐकून घाबरला होता देवज म्हणाला."

"तो नक्कीच सांगेन कारण काय सांगायचं हे ठरवू आपण चल आधी हर्षित म्हणाला."

ते तिघेजण मग बंगल्याच्या बाहेर पडले आणि त्या खानवळीत पोहचले.

"बोल, मुला काय हवे आहे तुला? ते काका म्हणाला."

"काका आम्हाला त्या जोकरच मंदिर कोणत्या दिशेने आहे हे करून घ्यायचं होतं हर्षित म्हणाला."

"पण कश्याला बाळा नसत्या संकटात सापडत आहात , तुम्ही नका जाऊ तिथे ते म्हणाले."

"काका आम्ही फक्त आमच्या कामानिमित्त जात आहोत तसा आदेश आला आहे मला माझ्या बॉसकडून हर्षित म्हणाला."

"ठीक आहे बाळ! काळजी घ्या तुम्ही सर्व आणि तो रस्ता याच उजव्या हाताने सरळ गेल्यास की ते मंदिर बरोबर दोन कोसांवर तुला दिसेल ते म्हणाले."

"खूप धन्यवाद काका" असे बोलून ते तिघे त्या मंदिराच्या दिशेने निघाले.सरळ दोन कोस चालून गेल्यावर त्यांना तिथे पडझड झालेली वास्तू दिसली आणि तिथेच महंतांची शुभ्रधवल रूपातील पवित्र आत्मा त्या तिघांना दिसून आली.
क्रमशः


🎭 Series Post

View all