Login

सर्कस, भितीची क्रूरता. भाग - ९

सर्कस असते लहान मुलांच्या आनंदासाठी पण तीच सर्कस अतर्क्य अशा घटनांमुळे भयावह ठरली की त्या नंतर हत्याच प्रमाण वाढले पण रहस्यमयरित्या ते थंडावल काही वर्षांसाठी... वर्तमानकाळात परत त्याच घटना घडू लागल्या पण यावेळी मात्र या घटना सामान्य होत्या तरीही काहीतरी वेगळं होतं आणि तेच शोधण्याच आव्हान ओजस पुढे होत.‌ गुन्हयाच हे वेगळंच आव्हान त्यांच्यासमोर समोर आहे जरी त्यांचा विश्वास नसला तरी.
"तुम्ही त्या ओसाड पडलेल्या बंगल्यात राहायला गेलात.‌ तो भाग पूर्णपणे निषिद्ध आहे मुलांनो. त्या बंगल्यात त्याच त्या भयंकर जोकर च अस्तित्व होत. एक राजमहाल च होता आधी पण त्या घटनेनंतर तो गायब झाला, त्याला बंदिस्त केले पण अस्तित्व संपले तरी खूण मागे राहतेच म्हणूनच त्या भागात कोणी ही राहत नाही तुम्ही दोघे तो बंगला आजच सोडून टाका ते काका त्रोटक शब्दात म्हणाले."

"पण काका कोण जोकर? माझे इथे पोस्टिंग झाले आहे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तर हा बंगला मला सरकारी अधिकारी म्हणून मिळाला असताना तो सोडून परत नवीन जागा पाहू? हर्षित म्हणाला."

बाळा, "मी त्याच नाव घ्यायला ही घाबरतो पण माझ सांगणं काम आहे पण तुला अनुभव येईलच ते काका म्हणाले."

तिथे त्या जोकरच्या गायब होण्यानंतर तिथे सर्वजण तो परिसर सोडून निघून गेले. त्या भागात पक्ष्यांची छाया पण दिसत नाही.तुला जर तिथे राहायचे असेल तर तिथे फक्त मनात सकारात्मक विचार आणि निष्ठा ठेव त्या पवित्र शक्तीवर. त्या ठिकाणी कोणतीही मूर्ती अथवा फोटो देवी देवतांचा स्थापन होऊ शकत नाही खुद्द त्यानेच बंधन घातले आहे आणि अजून एक त्या बंगल्याच्या डाव्या दिशेने कधीच जाऊ नकोस तिथं असणाऱ्या त्या शैतानी जोकर च मंदिर आहे एवढेच सांगून त्या काकांनी त्यांच पार्सल जेवण बांधुन पिशव्या देऊन त्या दोघांना दिले. हर्षित ने पैसे दिले आणि काकांना धन्यवाद दिले व ते दोघे चालू लागले तिथून.

हर्षित, "हे काका जे बोलले ते किती घाबरवणार बोलण होत एखादा कमजोर व्यक्ती हे ऐकून या भागात थांबलाच नसता पण यात काही तरी तथ्थ असावं असं मला वाटतं देवज म्हणाला."

"मलाही तीच शंका आहे कारण आपल्याला भूषण काकांनी जे सांगितले ते या गोष्टींशी मिळत जुळत आहे पण यात काही नक्कीच मिसिंग आहे जे आपल्याला शोधावं लागेल च नक्कीच तो जोकर कसा गायब झाला आणि त्याच मंदिर कोणी बांधले हे पण हे तर काकांना ही माहिती नाही कारण ते फक्त आले इथे आपल्या आई बाबांच्या अंतिम क्रियाकर्म साठी हर्षित म्हणाला."

"खरंय मित्रा तुझ, त्यामुळे आपला प्रतिशोध ही राहिला पण जर तो जोकर जिवंत असता तर नक्कीच आपण आपल्या आई वडिलांच्या तुझ्या आणि माझ्या मृत्यूला कारणीभूत झाला म्हणून धडाच शिकवला असता देवज संतापून म्हणाला."

"नाही देव हे शक्य नाही भूषण काका म्हणाले तो जोकर स्वतः शैतान शक्तीचा स्वामी होता, आपल्या पेक्षा ताकदवान त्यासाठी एका दैवी शक्तीस च त्याचा समूळ नाश करण शक्य आहे हर्षित म्हणाला."

"हो, बरोबर आहे पण हे आता सर्व संपले आहे पण त्या मंदिराच कळाले नाही जर त्या मंदिरात त्या जोकराची मूर्ती आहे म्हणजे नक्कीच त्याच अस्तित्व आहे म्हणूनच या भागात कोणी नाही आता कळतंय देवज म्हणाला."

"तर आपल्याला उद्या त्या मंदिरात शोध घ्यायला जायला हवे त्यासाठी तुला उद्या थांबायला हवे देव हर्षित म्हणाला."

"नक्कीच मित्रा मला ही माझ्या आई वडिलांचा प्रतिशोध घ्यायचा आहे काका काकू च्या सोबत पण त्या आधी आपल्याला काका कडून त्या वेळी काय घडले ते सर्वच कळायला हवं देवज म्हणाला."

"हो, चल हीच वेळ आहे सर्व जाणून घ्यायची आणि मगच पुढे काही करता येईल हर्षित म्हणाला."

हो आणि अनुभव येईलच असे ते काका ही म्हणाले होते आणि तो आपण प्रत्यक्ष पाहिला जरी आपल्याला काही जाणवलं अथवा दिसलं नाही पण मन मात्र खूप अस्वस्थ झालं होतं. देवज म्हणाला"

"खरय, तुझें देव नक्की त्याच अस्तित्व अजूनही आहे आणि याच रहस्य शोधावं लागेलच आपल्याला हर्षित म्हणाला."

बंगल्यांच्या परिसरात असलेली निरव शांतता चालून येणाऱ्या भयाची चेतावणी देत असावी असंच वाटतं होतं. ना कोणत्या पक्ष्यांचा आवाज ना ही कसली हालचाल. वारा ही अगदी जसा चोरून आवाज ही व्हावा अश्या भितीने वाहत होता त्यामुळे त्या वाऱ्याच्या झुळूक ने जणू झाडाच्या पानांची होणारी सळसळ आभासी वाटत होती. मनुष्याच अस्तित्व नाही पण एखाद्या हिंस्त्र प्राण्यांचा अस्तित्व जरी दिसल असतं तरी एवढ भय वाटलं नसतं पण या परिसरात असलेली भयानक शांतता आणि बाकी कोणाचं अस्तित्व आढळून नाही येण यांने नक्कीच एखाद्या माणूस भीतीने जीव सोडला असता किंवा वेडा झाला असता.

या परिसरात प्रकाशाची फारच उणीव होती ना कोणते विजेच्या खांबावरील दिव्यांची सोय केली होती ना अन्य कोणतीही. जवळ तुमच्या टॉर्च किंवा कंदील असेल तरच पायाखालचा रस्ता दिसून येत असे. रस्ता मात्र व्यवस्थित असल्याने पडण्याची भिती नव्हती पण तरीही अंधारातून कधी कुठून मृत्यूच भय घालणार, भक्ष्याच्या शोधात असणारा शिकारी येईल यांची श्वाशती नव्हती. चंद्राच्या पडणाऱ्या प्रकाश ही जणू ग्रहण लागल्याप्रमाणे काळवंडून गेला होता.

दुपार असल्याने हर्षित आणि देवज ला काही वाटले नाही पण आता ही निरव शांतेतची वेगाने वाढत जाणारी रात्र आणि प्रकाशाचा असलेला अभाव यामुळे दोघांच्याही मनात भितीच मनात द्वंद्व सुरू झाले. दोघे काहीही न बोलता लवकर बंगल्यात पोहचण्यासाठी भराभर आपली पावले उचलू लागले.

बंगल्याच्या फाटकापाशी ते पोहचले. त्यांचा दरवाजा उघडून दोघे आत शिरले मग दरवाजा अनलॉक करून ते आत शिरले.

"हे दृश्य इथले खूप भयानक आहे हर्षित, भूषण काका म्हणाले.

"हो, काका आम्हाला ही येताना त्याची जाणीव झाली पण आपण या बंगल्यात सुरक्षित आहोत तर आपण आता जेवण करूया हर्षित म्हणाला."

मग त्या तिघांनी आपलं जेवण उरकले आणि सर्व खालच्या रूममध्येच झोपले तिघे एकत्र. हर्षित आणि देवज ने भूषणला सर्व काही सांगितले त्यामुळे भूषण ने ठरवलं की सर्वजण एकत्र झोपायच म्हणजे कोणतंही संकट आले तर सर्वजण सर्तक राहतील. बंगल्याच्या आत मात्र त्यांच्या मनातील श्रध्दा अथवा सकारात्मक विचारांमुळे ते सर्वजण सुरक्षित होते पण किती काळ यांची श्वाशती नव्हती.

हर्षित ची झोप मात्र सावध होती. त्याला अचानक डोळ्यासमोर दिसू लागले एक महंत तिथे उभे होते.ते त्याला खुणावत होते. हर्षित उठला आणि त्यांच्या मागे जाऊ लागला. ते मेन हॉल मध्ये आले.

ते महंत हर्षित ला म्हणाले, "बाळा मला माहित आहे तुझे येथे येणे फक्त कर्म म्हणून नाही तर तुला तुझ्या आई वडीलांना न्याय देण्यासाठी लढायचे आहे म्हणून तु प्रतिशोध पूर्ण करण्यासाठी इथे आला आहेस पण आंधळेपणाने रागात प्रतिशोध पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुला लढावं लागेल कारण ती शैतानी शक्ती परत आली आहे तर तुला यांचा गतकाळचा इतिहास जाणून, शिकून घ्यावा लागेल तरच तु ही लढाई जिंकशील आणि तुझ्या मुळेच बाकी सर्व आत्मे निष्पाप जे त्या शैतानी शक्तीचे असहाय्य मुळे गुलाम झाले आहेत ते सर्व मुक्त होतील आणि तुझा प्रतिशोध ही पूर्ण होईल तर उद्या आपल्या भेट त्या शैतानी शक्तीच्या मंदिरात होईल आणि त्याचा मार्ग तुला स्वतःहून मिळेल आणि तिथूनच दृष्ट व सुष्ट शक्तीचा एक लढाई होईल ज्यात विजय सत्याचा होईल पण तुला ते मंदिर शोधावं लागेल मगच तिथे मी येईन" एवढं बोलून ते महंत दिसेनासे झाले.

त्या परिसरातील भाग सोडला तर सर्व ठिकाणी सकाळ झाली हे सांगणारी कोवळी, मन प्रसन्न करणारी सूर्यकिरणे पसरली.पण तो बंगला आणि त्या आसपासच्या परिसरात मात्र सूर्य किरणांना जणू कुठली शक्ती विरोध करत होती म्हणूनच तिथे ती किरणे पोहचत नव्हती. सर्व बाजूंनी अंधार च पसरला होता उजाडल असूनही.

हर्षित ला लवकर उठायची सवय असल्याने त्याला लवकर जाग आली पण बंगल्याभोवताली असलेला अंधार पाहून तो समजला इथे खूप नकारात्मकता आहे. तेवढ्यात त्याला आठवलं की त्याला पहाटे पडलेल स्वप्न आणि तो सिध्द पुरूष महंत यांनी सांगितलेली गोष्ट. ते सत्य की स्वप्न होते त्याला कळाले नाही. तो हॉलमध्ये आला आणि त्याला चंदनाचा सूक्ष्म सुगंध जाणवला.
क्रमशः


🎭 Series Post

View all