गाडी पोलिस स्टेशनच्या बाहेर थांबताच ओजस, साळवी आणि तो हवालदार गाडीतून उतरले. पोलिस स्टेशन मध्ये आल्यावर तिथले सब इन्स्पेक्टर जय ने त्यांचे स्वागत केले.
"या सर , जय म्हणाला."
"धन्यवाद. जय आपली परत एकदा भेट झाली. यावेळेस मात्र केस खूप रहस्यमयी आहे आणि या केसचा मागोवा घेत आम्ही इथे आलो ओजस म्हणाला."
"धन्यवाद. जय आपली परत एकदा भेट झाली. यावेळेस मात्र केस खूप रहस्यमयी आहे आणि या केसचा मागोवा घेत आम्ही इथे आलो ओजस म्हणाला."
"हो, थोडी कल्पना आहे मला सर पण ती एक आत्महत्या होती आणि त्यांचे कोणी नातेवाईक ही भेटले नाही एवढी चौकशी करून जय म्हणाला."
"पण हा खून आहे जय हे बॉडी चे पोस्टमार्टम केल्यानंतर कळाले आणि त्या व्यक्तीला उजव्या हाताने सुरा त्यांच्या गळ्यावर इतक्या सफाईने फिरवला की त्या व्यक्तीच्या गळ्यातून रक्ताचा प्रवाह जलद गतीने बाहेर पडला आणि तत्काळ त्याला मृत्यू आला. झटपटीच्या खुणा कोणत्याच आढळून आल्या नाही
जसं काही त्या व्यक्तीने शांतपणे आपली हत्या होऊन दिली किंवा त्याला संमोहित केल असण्याची शक्यता आहे.... ओजस म्हणाला."
जसं काही त्या व्यक्तीने शांतपणे आपली हत्या होऊन दिली किंवा त्याला संमोहित केल असण्याची शक्यता आहे.... ओजस म्हणाला."
"हे,तर खूप धक्का दायक आहे सर पण या अशा हत्येमागे हेतू समजून येत नाही जर धनेश ने स्वतः हून आपला आत्मघात होऊन दिला असेल तर जय म्हणाला."
"धनेश... त्या मृत व्यक्तीच नाव धनेश आहे तर... साळवी म्हणाले."
"पण यांच्या कुटुंबीयांचा पत्ता नाही ही अशक्य गोष्ट आहे नक्कीच त्यांच्या सोबत ही काहीतरी घडलं असणार यांचा शोध घ्यायला हवा आपल्याला तरच पुढे काही कळेल ओजस म्हणाला."
"सर आम्ही शोध घेत आहोत जर काही कळालं तर नक्कीच कळवू पण जर धनेश चा खून केला असेल तर गुन्हेगार हा नक्कीच आसपासच्या भागात असणार आणि जिथे गुन्हा घडला तीच जागा असेल जय म्हणाला."
"शक्य आहे आम्ही शोध घेवूच पण जय या भागातील फॉरेस्ट ऑफिसर कुठे गायब झाले आम्ही तिथे गेलो तर सर्व भाग निर्मनुष्य वाटत होता. नक्की काय झाले आहे तिथे? ओजस म्हणाला."
"त्या भागात धनेश ने तीन फॉरेस्ट चा खून केला तो ही खूप भयानक पद्धतीने. त्याला आम्ही पकडणार होतो की तो गायब झाला आणि शेवटी तो मेला हे आम्हाला कळाले पण त्याचं एवढं खुनशी प्रकारचं वागणं एक रहस्यमय आहे. खूप शांत असणारा धनेश एकाएकी क्रूर बनून हत्या करतो यावर विश्वास बसत नव्हता पण त्याने हे स्वतः च मान्य केले आणि तो काही तरी असंबद्ध बडबड करत होता जोकर, मंदिर, बळी आम्हाला काही च कळलं नाही आणि त्याला आम्ही तिथल्याच ऑफिस मध्ये कैद करून एक हवालदार देखरेखीखाली ठेवला दुसऱ्या दिवशी त्या हवालदार च फक्त विना मुंडक्याच धड दिसून आले. अजून एक सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करून धनेश घनदाट जंगलात गायब झाला आणि मी हताश झालो व त्या हवालदार चे अंतिम क्रियाकर्म करून आशा सोडली पण सुटकाच झाली आता जय एकदम बोलत म्हणाला" आणि त्यामुळे त्याला धाप लागली. पाण्याचा एक घोट पिऊन झाल्यावर तो शांत झाला.
"जय रिलॅक्स सगळं काही संपलं आहे बस धनेश च्या कुटुंबाची काही बातमी कळाली की आपण लगेच ती बॉडी सुपूर्द करताच समस्या संपलं आणि त्या गुन्हेगार ला मी शोधून काढेलच ओजस म्हणाला."
"जय रिलॅक्स सगळं काही संपलं आहे बस धनेश च्या कुटुंबाची काही बातमी कळाली की आपण लगेच ती बॉडी सुपूर्द करताच समस्या संपलं आणि त्या गुन्हेगार ला मी शोधून काढेलच ओजस म्हणाला."
"तुमच्या यशस्वी केस बद्दल मी खूप ऐकलं आहे सर आणि ही केस ही यशस्वी होईलच यात माझी टीम ही तुम्हाला सहाय्य करेल तुमच्या सोबत काम करायला भेटणं बहुमान आहे माझा जय सॅल्युट करत म्हणाला ."
"नक्कीच जय त्यांच्या सॅल्युटचा स्वीकार करत ओजस म्हणाला."
ओजस, साळवी व तो हवालदार तिघेही गाडीत बसले आणि गाडी कालबरीआ च्या दिशेने धावू लागली.राजकांग येथे आज भव्यदिव्य सर्कस गावात त्या झगमगत होती भव्य रोषणाई ने. लहान मुलांसाठी सर्कस म्हणजे आनंदाची पर्वणी च. वेगवेगळ्या प्राण्यांचा कसरती, जोकरचा हसवणारा खेळ, रिंगमास्टर च्या वेगवेगळ्या कसरती यांचं अप्रूप त्या लहान जीवांना होतंच पण या भव्य रोषणाई ने सजलेल्या रोषणाई ने मोठयांना ही आकर्षित केले होते.
सर्कस सुरू झाली आणि जोकरचा खेळ सुरू झाला.छोटे मोठे जोकर यांनी आपल्या कर्तबाने लहान मुलांना हसवायला सुरूवात केली. जोकरांचा खेळ संपल्यावर एक वयोवृद्ध जोकर ने आत प्रवेश केला. हसणार ते सभागृह त्या वयोवृद्ध जोकर ला पाहून भयभीत झाले. चेहऱ्यावर त्यांच्या भयंकर हास्य आणत तो सर्वांकडे पाहत होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये भयंकर असा संताप होता. प्रतिशोधाची अग्नीच जणू काही आज या सर्व आनंदाचा, हास्याचा काळ ठरून भयंकर किंकाळ्या, रडणं याने भरणार होते.
त्या जोकरने आपल्या भयंकर आवाजात बाकी सर्वांना बाकी जोकर ना बोलावल. बघता बघता सर्कस मधील सर्व टीम जमा झाली. जोकर ने त्या सर्व टीम ला सर्कस मधील जमलेल्या सर्व लोकांना घेराव बंदी करायला सांगितली. या अश्या गोष्टी मुळे त्या तंबूतील सर्व लोकांच्या चेहऱ्यावर भय दिसू लागले.
पण ते सर्वजण भितीने तिथेच थिजून गेले. त्या जोकरने त्या सर्वांना संसर्गित करण्यासाठी बघता बघता त्यांच्या टीममधील काही सांगताच सर्वजण त्या तिथल्या लोकांवर तुटून पडायला सांगितले. आजन्म भूक असल्या सारखे ते सर्व रक्तपिपासू सारखे तिथल्या एक एक लोकांच्या दिसेल त्या उघड्या अवयवावर चावे घेत ओरबडायला सुरूवात केली. ते सर्व लोक भितीने किंचाळत या सर्वांपासून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण यशस्वी न होता ते भराभर मृत्यु पावत होते.त्या सर्वांनी लहान निष्पाप मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत कोणालाच सोडलं नाही. शेवटी तिथला प्रत्येक माणसाच्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्या संपल्या आणि पूर्ण रक्ताने भरलेला तो सर्कशीचा तंबू अनेक मृतदेहानी भरून गेला.
तो वयोवृद्ध असलेला जोकर मानवी मांसावर तुटून पडणाऱ्या आपल्या अनुयायांना क्रूरपणे हसत पाहत होता. त्या जोकरने काही मंत्र पुटपटयला सुरूवात केली आणि त्यांचे सर्व अनुयायी वेदनेने विव्हळत होते. त्यांच्या वेदनाचा तो कर्कश ध्वनी नुसता बहिरेपणा आणणारा नव्हता तर सहन न होऊन मेंदूची नस फाटून मृत्यू आणणारा होता.ते सर्वजण त्या जोकर पाशी जमा झाले. आणि त्या सर्वांनी त्या मृत पावलेल्या सर्व लोकांची आत्मा त्या जोकरला बहाल केली. त्या सर्व आत्माच्या शक्ती ग्रहण करून बघता बघता तो जोकर ताकदवान दिसू लागला पण त्या जोकरच रूप अजून ही वयोवृद्ध च दिसत होतं. आपल्या रूपात कोणताच फरक पडत नाही हे पाहून तो जोकर संतापला आणि त्याने त्या सर्व त्यांच्या टीमला त्या सर्व मृतदेहांची विटंबना करायला सांगितली.
आपली राहिलेली भूक भागविण्यासाठी ते सर्व त्या मृतदेहावर तुटून पडले.
भूषण, हर्षित आणि देवज त्या बंगल्यात पोहचले. जी फक्त शासकीय अधिकारी करता होती.तो ड्रायव्हर त्यांना तिथे सोडून निघून गेला. जायच्या आधी बंगल्याची चावी त्यांना देऊन निघुन गेला. बंगल्याच्या आत ते तिघेजण आले. हर्षित ने दिवे लावताच बंगल्याचा पूर्ण हॉल उजळून निघाला. उच्च प्रतीच्या लाकडाचे सुंदर फर्निचर तिथे दिसून येत होते.वर असलेले सुंदर काचेचं झुंबर तिथल्या इलेक्ट्रिक दिव्याच्या प्रकाशात त्या हॉलच्या सुंदरतेत भर टाकत होते. हॉलच्या भिंतीवर विविध पेंटींग्ज लावल्या होत्या. त्या पेंटींग मधील काही खूप विचित्र दिसत होत्या. पाहताच मनात भिती वाटली पाहिजे अश्या पेंटींग त्या चित्रकाराने रंगवलेल्या होत्या.
"हर्षित आपण सर्व तुझं आणि काकांचं सामान उद्या लावू पण त्या आधी आपण जेवण करून घेवू. मी जाऊन जेवण पार्सल घेऊन येतो इथल्या हॉटेल मधून देवज म्हणाला."
"चल, मी पण येतो तेवढंच गावांची थोडी ओळख होईल , भूषण काका तुम्ही आराम करा आम्ही दोघे जाऊन आलोच हर्षित म्हणाला."
"हो, बाळ या प्रवासाने खूपच थकायला झाले आहे मी आराम करेन आणि जेवण ही थोडच घेईल तर जास्त काही आणू नका भूषण काका म्हणाले."
"हो, काका ठीक आहे! हर्षित म्हणाला."
"हो, काका ठीक आहे! हर्षित म्हणाला."
"चल, लवकर निघू या आपण देवज म्हणाला."
दोघे बंगल्यातून बाहेर पडले. रस्त्यावरील दोन तीन जणांकडे चौकशी केल्यावर त्यांना एकाने खाणवळीच्या दिशेने जाणारा रस्ता दाखवला. या भागात अनेक हॉटेल होते पण दुसऱ्या भागात. या भागात एकच खाणवळ होती ती पण इथला रस्ता संपून या परिसराच्या दुसऱ्या भागास जोडणाऱ्या रस्त्यावर असे त्या व्यक्तीने त्यांना माहिती दिली या भागात फक्त एकच खाणवळ आहे ती पण लांब हे ऐकून दोघांना आश्चर्य वाटले आणि त्या व्यक्तीला विचारल्यावर त्याने माहिती दिली. यामुळे त्या दोघांच्या मनात एक जिज्ञासा व शंका निर्माण झाली. पोटात भूकेमुळे निर्माण अशांतता दोघांना असह्य झाली त्यामुळे ही जिज्ञासा त्यांनी मनातून हटवली. खूप वेळ चालल्यावर त्यांना खाणावळ दिसली. तिथून येणारा खाण्याचा सुगंध त्यामुळे दोघांच्या पोटात तीव्र भूक लागली.
दोघांना येताना पाहून त्या खाणवळीच्या मालकाने त्यांचे स्वागत केले. हर्षित आणि देवज ने तिथले मेनू कार्ड पाहून त्यांना हवं असणार मागवल. या परिसरात राहणारे हे दोन नवीन युवक पाहून त्या मालकाला आश्चर्य वाटले. त्यानें त्या दोघांना विचारले तुम्ही कुठे राहता तेव्हा हर्षित ने त्या बंगल्याच नाव सांगताच त्या मालकाच्या चेहऱ्यावरील पूर्ण हावभाव बदलून गेले.
क्रमशः
क्रमशः