Login

सर्कस भितीची क्रूरता. भाग - ७.

सर्कस असते लहान मुलांच्या आनंदासाठी पण तीच सर्कस अतर्क्य अशा घटनांमुळे भयावह ठरली की त्या नंतर हत्याच प्रमाण वाढले पण रहस्यमयरित्या ते थंडावल काही वर्षांसाठी... वर्तमानकाळात परत त्याच घटना घडू लागल्या पण यावेळी मात्र या घटना सामान्य होत्या तरीही काहीतरी वेगळं होतं आणि तेच शोधण्याच आव्हान ओजस पुढे होत.‌ गुन्हयाच हे वेगळंच आव्हान त्यांच्यासमोर समोर आहे जरी त्यांचा विश्वास नसला तरी.

ओजस त्या व्यक्तीच्या पुढे गेला आणि त्याला विचारले," हे इथे काय नेमकं सुरू आहे आणि तुमची ही अशी अवस्था."

तो जोकर मंद हास्य करत म्हणाला,"साहेब इथे सर्कस सुरू आहे इन्स्पेक्टर साहेब तर त्यांचीच गर्दी आहे आमचे रिंगमास्टर मानव यांची. आमच्या सर्कशीचा खेळ जास्त करुन विदेशात च असतो पण भारतीय वंशाचे असलेले आमचे रिंगमास्टर मानव यांनी ठरवले की बाकीचे सर्कस चे सर्व शो इथे भारतात च करायचे आणि ही इथली भूमी त्यांची जन्मभूमी आहे तर पहिला शो इथेच होणार आहे आणि राहील माझी ही अवस्था तर मी आता वयोवृद्ध झालो आहे तर मी फक्त सर्कस सोबत असतो निवृत्त झालो तरी आमच्या दयाळू मालकाने माझा संभाळ केला म्हणून तर असा अजून धडधाकट दिसत आहे."

"अच्छा, ठीक आहे! पण तुमच्या या सर्कस चा शो आहे कुठे ? ओजस म्हणाला."

"समोर मोठा तंबू दिसत आहे निळ्या , काळ्या रंगाने च्या कापडाने सजलेला तोच बरं मी येतो असे बोलून तो जोकर लंगडत लंगडत त्या गर्दीत मिसळून दिसेनासा झाला."

आपण ज्यांच्याशी तुलना केली तो हा मूर्तीशी साम्य दर्शवणारा जोकर नाही यांच एक क्षणिक समाधान ओजस च्या मनाला मिळाले. अज्ञात असलेले त्यांचे मन या दिखाव्याच्या आभासात अडकले होते. या आभासी विश्वात कित्येक अशी निष्पाप मने अडकली आणि शेवट त्यांचा ज्यांची कोणालाही कल्पना ही न करावी असा झाला. दुसऱ्या विश्वातील वाईट शक्तींचा जीवन या अश्याच निष्पाप मने असलेल्या जीवावर च पोषण होतं होते म्हणूनच कोणत्या न कोणत्या दृष्ट व्यक्तीच्या लोभ अथवा वाईट प्रवृत्ती मुळेच कोणत्या ना कोणत्या रूपात यांचं आगमन होताच विनाशाचा खेळ सुरु होऊन त्यात रक्तपात, हवस ची पूर्तता करण्यासाठी अनेक निष्पाप आत्मे कैद झाले आणि त्या शैतानी शक्तीची ताकद वाढली. ओजस च्या पुढे असाच अनुभव काळाच्या पडद्याआड प्रतीक्षा करत होता.

ओजस ने गाडी जंगलाच्या दिशेने वळवायला सांगितली , जिथे फॉरेस्ट ऑफिस होत.घनदाट जंगलाचा अनुभव काहीसा ठीक नसल्यामुळे साळवी आणि ओजस च मन अश्या ठिकाणची शांतता पाहून आत जायला कचरत होत पण कर्तव्यापुढे दोघांना भितीवर मात करावी लागणार होती. समोर एक केबीन दिसणारी एक मध्यम आकाराची , दगडी बांधकाम असलेली वास्तू दिसून येत होती. बिना रंगकाम केलेली ती वास्तू भकास वाटत होती. काही आठवड्यांपूर्वी च जणू या जागेचा त्याग केला असावा असं वाटतं होतं.गाडी थांबताच ओजस , साळवी आणि ड्रायव्हर आणि दुसरा हवालदार गाडीतून खाली उतरले.

"सर ही जागा तर पूर्णपणे निर्मनुष्य आहे जसं काही इथून सर्वजण निघून गेले असावेत पण इथे तर त्या फॉरेस्ट ऑफिसरच्या हाताखालील कोणीच नाही किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी ही नाही मग हे सर्व गेले कुठे साळवी म्हणाले."

"आपण इथल्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन विचारू कदाचित तिथूनच काही कळेल धनेश गाडी इथल्या पोलीस स्टेशन ला नेऊ इथल्या स्थानिकांना विचारून असे बोलून ओजस गाडीत बसला"

मागोमाग धनेश, साळवी आणि तिसरा हवालदार गाडीत बसला.

गाडी जंगलाच्या बाहेर जाणाऱ्या दिशेने बाहेर पडली आणि मग मेन शहरात आल्यावर तिथल्या स्थानिकांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन ते पोहचले.

हर्षित, देवज आणि भूषण काका वेळेवर एअरपोर्टवर पोहचले. बॅगा चेकिंग साठी पाठवून व कलेक्ट करायला त्यात एक तास गेला आणि तो फ्लाईट च्या अनाउन्समेंट ची वाट पाहत बसले.

हर्षित मात्र कसल्यातरी विचारात हरवला होता. देवज हा भूषण काका सोबत गप्पा मारत बसला होता. तेवढ्यात फ्लाईट ची अनाउन्समेंट झाली. हर्षित च मात्र लक्ष नव्हते. देवज ने त्याच्या खांद्याला थपथपवल तेव्हा तो विचारातून बाहेर आला.

"हर्षित अरे कश्यात हरवला तु , कामाचा आत्ताच विचार करायला लागला का तु पण आपण अजून तिथे पोहोचलो पण नाही आणि तुला एवढी घाई, थोडं ऍन्जॉय करू , फिरू तिथे मग कामाला सुरुवात करू एवढा विचार केल्याने तुझ लगेच असं प्रमोशन होणार नाही मित्रा मस्करी करत देवज म्हणाला."

"नाही रे असं काही नाही चल आपण आपल्या फ्लाईट च्या दिशेने जाऊ मी तिथेच बोलेल तुझ्याशी असे बोलून आपल्या बॅगा उचलून तो विमानाच्या दिशेने जाऊ लागला."

त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून देवज ही थोडा चिंतेत पडला. याला नक्कीच चिंता कामाची नाही तर वेगळीच आहे पण हा कसली व्यर्थ चिंता करतो सतत.‌ काका काकू सोबत जे झाले त्यांचं कधीच त्याला पटलं नाही कदाचित हाच शोध घेण्यासाठी त्याला परत त्रिपुरा ला जाऊन शोध घ्यायचा नसेल तर मला त्याला परावृत्त करावे लागेल देवज स्वतःशीच म्हणाला.

सर्व सामान विमानात लावून झाल्यावर भूषण आणि हर्षित एका सीटवर तर पलीकडच्या सीटवर देवज बसला. हर्षित चा अजून चिंतामग्न चेहरा पाहून देवज हा असमंजस मध्ये पडला पण यावर त्याला आता बोलण्याची आवश्यकता वाटली नाही सावकाश पणे आणि हर्षित चे विचार शांत झाले की त्याला विचारुच की एवढी कसली चिंता त्याला सतावत आहे?

तेवढ्यात विमानाच्या कॅप्टन कडून सूचना आली विमान टेक ऑफ होणार आहे तर सीटबेल्ट बांधून घ्या. या सूचनेने हर्षित विचारातून बाहेर आला. काही क्षणातच विमान हवेत झेपावले.
सोळा तासांच्या प्रवासानंतर विमान त्रिपुरा च्या विमानतळावर लॅण्ड झाले. सर्व प्रवाशांची उतरण्यासाठी गडबड सुरू झाली.

हर्षित, देवज आणि भूषण काका सर्वजण आपले सामान घेऊन उभे होते. गर्दी कमी होताच ते विमानातून बाहेर पडले .
एअरपोर्टच्या बाहेर येताच त्यांना न्यायला दोन शासकीय ड्रायव्हर त्यांच्या नावाचा बोर्ड घेऊन उभे होते. देवज मात्र त्या ड्रायव्हरला सांगितले की तीन दिवस तो कालबरीआ इथे राहणार आहे तर तुम्ही चौथ्या दिवशी या मला घ्यायला. यावर त्या ड्रायव्हरने मान नुसती हलवली आणि तो एअरपोर्टच्या बाहेर पडला. मग हे तिघे त्या पहिल्या ड्रायव्हर सोबत एअरपोर्ट मधून बाहेर पडले आणि त्यांचा प्रवास कालबरीआ इथे सुरू झाला.

गाडीतून दिसणार घनदाट जंगल, पक्ष्यांचा मंजुळ आवाज, मध्येच घनदाट वृक्षातून थोडी दिसणारी दाट पर्वतराजी, काही आभाळास भिडणारे उंच तर काही आपले लहान अस्तित्व लपविण्यासाठी जंगलाच्या आड लपून बसलेले पर्वतराज दिसून येत होते‌. पण हे दृश्य पाहून तिघांच्याही मनावर मात्र मळभ दाटून आले होते आल्हाददायक वाटण्या ऐवजी. हा प्रवास मात्र संपतच नव्हता. कालबरीआ इथले रस्ते तसे सुस्थितीत होते पण त्याचं अरूंदीकरण केले होते. त्यामुळे इथल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना सावधपणे जावं लागतं होते. अवजड वाहनांना दुसऱ्या रस्त्याने पर्याय उपलब्ध करून दिला होता.

"हा परिसर एवढा घनदाट जंगलात आहे. इथे राहण अशक्य आहे कारण अश्या घनदाट जंगलात भयंकर जानवर किती आहेत माहिती नाही. हर्ष बाळा मी इथे येण्यात चूक केली आणि या भागातील कटू आठवणी नी परत मला आठवतील तर मी इथे दोन दिवस राहून परत जाईन भूषण म्हणाले."

"पण काका त्या आठवणी तुम्ही विसरत नसाल मान्य आहे पण तुम्ही परत जर कानपूर ला गेलात तर तुम्हाला करमणार ही नाही व तुमची काळजी घेणार ही कोण नाही काका तर तुम्हाला इथेच राहायचं आहे हर्षित म्हणाला."

"ठीक आहे, ठीक आहे मी राहीन पण आपण जिथे राहणार आहोत तो भाग घनदाट जंगलात नसावा म्हणजे झाले भूषण म्हणाले."

"नाही सरजी तो भाग वस्तीत आहे पण आजकाल त्या भागात दंगलीच प्रमाण थोडे वाढलं तर शक्यतो जपून रहा ड्रायव्हर म्हणाला."

"दंगलीच प्रमाण का वाढल आहे? देवज काळजीच्या स्वरात म्हणाला."

"बाळा परत तीच घटना उद्भवू शकणार आहे असे आमच्या इथले महंत बोलले आहेत आणि त्यानंतर विनाश म्हणूनच सर्व जणांना त्यांनी सावध राहण्यास सांगितले आहे पण जुन्या पिढीतील लोक सोडली तर यावर कोणाचाही विश्वास नाही पण या घटनेची सुरुवात त्या मंदिरातील बळी पासून झाली आहे ड्रायव्हर म्हणाला."

हे ऐकून भूषण काका मनातुन हादरले.‌ज्या गोष्टी मुळे त्यांच्या भावाचा आणि वहिनीचा जीवाचा बळी गेला, ज्यामुळे हर्षित पोरका झाला त्याच घटनेची पुनरावृत्ती होणार म्हणजे हर्षित आणि देवज च्या जीवाला धोका आहे आणि त्याच इथे येण हा सहजासहजी योगायोग असू शकत नाही. यांना ही नोकरी सोडण्यासाठी मला या दोघांना समजाव लागेल भूषण मनात विचार म्हणाले.
क्रमशः