दुर निर्जनस्थळी असलेल्या त्या मंदिरातील पहाटे एक व्यक्ती तिथे बसून आपल्या कपड्यांना व्यवस्थित करत होता. पाच फूट उंच असलेल्या त्या व्यक्तीने काळा कोट परिधान केला होता. कोटाच्या आत पांढरा शर्ट, वेगवेगळ्या रंगांच्या पट्याची कमरेवर असणारी पॅन्ट, पायात लालभडक मोजे, बूट ब्राऊन कलरचे. केसांची रंग त्यांचा काळा असून मध्येच लाल रंग लावलेले तीन चार केस त्यात उठून दिसत होते. त्या व्यक्तीने आपली हॅट डोक्यावरची काढून त्या मंदिराच्या आत ठेवली आणि तो त्या मंदिरातील मूर्ती कडे निरखून पाहत होता जसे काही स्वतःचीच ती प्रतिमा आहे.
जोकरच्या त्या मूर्ती भोवती काही क्षणांसाठी एक तीव्र रोशनी चा प्रकाश पडला थेट त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर. काळ्या रंगाने रंगवलेले त्यांचे ओठ त्या प्रकाशात हसताना ज्याने पाहिले त्याला त्या व्यक्तीच्या क्रूरतेचा अंदाज नक्कीच आला असता.... ते खुनशी पणाचे झळकणार त्या व्यक्तीचे काळकुट्ट हास्य बीभत्स होत.... ज्याने ते हास्य पाहिले पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीच्या जीवनाचा धागा तुटून मृत्यूच्या काळ दाढेत हरवला असता. तो प्रकाश नाहीसा झाला आणि त्या व्यक्तीचं हास्य ही. उठून त्या मंदिरातून तो बाहेर आला आणि त्या मंदिराकडे एकदा त्याने तिरस्काराने पाहिले. डोळ्यात प्रचंड क्रोध आणि चेहऱ्यावर घृणा त्यांच्या दिसून येत होती. त्याने त्या मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सहज प्रहार करायला तिथेच पडलेल्या एका दगडाने सुरूवात केली. प्रचंड कातळ दगडाने बांधलेले ते मंदिर क्षणार्धात कोसळायला सुरुवात झाली आणि एक प्रचंड धक्का बसून त्यातली मूर्ती तर छिन्नविछिन्न झाली असेलच पण त्या मंदिराच अस्तित्व ही काळाच्या उदरात कायमचंच गडप झाल.
आकाशात काळ्या ढगांच मळभ दाटून आले होते. प्रचंड पाणी साठवलेल्या त्या ढगातून पाणी सर्व बाजूंनी आभाळातून जमिनीवर धारा कोसळत होत्या मात्र त्या मंदिराच्या भोवतालीची जमीनच पूर्ण कोरडी होती जस काही इथल्या नैसर्गिक क्रिया अथवा शक्तींना प्रवेश निषिद्ध होता किंवा कुठल्यातरी अनैसर्गिक शक्तीने नैसर्गिक शक्तींना आव्हान देत त्यांचा प्रवेश होऊन देण्यापासून विरोध केला होता तरीही इथली झाडे हिरवीगार होती, पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसतानाही ती टवटवीत, हिरवगार पानांनी बहरलेली दिसून येत होती. हे फसवणूक करणारे दृश्य होते की खरोखरच हे सामान्य माणसाला नक्कीच कळाले नसते त्यांचा या मायाजाळात पाय पडला तरी आपण संकटात आहोत यांने तो अनभिज्ञ च असता आणि त्याचे अस्तित्व क्षणात संपुष्टात आले असते.
आकाशात हदयाचा थरकाप उडवणारी क्षणात लकाकली आणि त्याच परिसरातील एका वृक्षांवर जाऊन कोसळली पण त्या वृक्षांवर काहीच विपरीत परिणाम झाला नसला तरी त्याने आपली प्रतिक्रिया मात्र दिली. तिथल्या परिसरात वाऱ्याचा वेग वाढला की धुळीच्या त्या वादळात काहीही दिसून येण अशक्य होते. त्या वाऱ्याची वेगवान तीव्र संतापाने फिरणारी गती निर्सगाच्या हस्तक्षेपाने संतापली होती आणि त्यांचाच तीव्र विरोध ती वादळाच्या रूपात करत होती पण त्या शक्तीला ही मर्यादा असल्याने ती तिचे क्षेत्र सोडून जाऊ शकत नव्हती. काही क्षणातच तो संघर्ष संपुष्टात आला आणि तो व्यक्ती त्या परिसरातून बाहेर पडला.
ओजस आपल्या केबिनमध्ये बसून होता.ती घडलेली घटना तो विसरून गेला होता पण पल्लवी चे वागणे थोडं त्याला विचित्रच वाटलं. साळवी आत आले आणि त्यांनी ओजस ला सॅल्युट केला.
"सर, त्या व्यक्तीचा पोस्टमार्टम रिपोर्ट भेटला पण त्या व्यक्तीची ओळख मात्र अजून पटली नाही फक्त त्यांच्या नावा व्यक्तीरिक्त. तो वेडसर होता असे तिथल्या त्यांच्या बॉसच म्हणणं आहे आणि त्याला कामावरून काढून टाकणार होते पण तो राजीनामा द्यायला तय्यारच नव्हता त्याला खूप धमक्या दिल्या तरी तो बधला नाही पण सर्वांच्या मनात त्यांच्या बद्दल भिती होती. जो नवीन मुलगा त्याच्या जागेवर लवकरच रूजू होणार आहे त्यांच्या कुटुंबीयांनी पण वरून प्रेशर आणलं होतं या माणसाला काढून टाकण्यासाठी आणि विशेष या व्यक्तींचे कोणीच नातेवाईक नाही किंवा यांचे सख्ख नातं सांगणारं कोणत कुटुंब आहे साळवी म्हणाले."
"खूप च धक्कादायक आहे साळवी हे कदाचित त्या व्यक्तीला कोणीतरी मारलं ही असावं कारण हा तो ही नोकरी सोडून द्यायला तयार नव्हता मग त्याला या अश्या निर्जनस्थळी आणून मारलं असणार मग ते ठिकाण कितीही लांब का असेना जर यांचा मृतदेह सापडला जरी तरी ओळख पटवून द्यायला आणि बाकी सर्व गोष्टींना वेळ लागला असता आणि तोपर्यंत यांच्या जागी त्या नवीन व्यक्तींची निवड झाली असती मग हे प्रकरण दाबून टाकले असते ओजस म्हणाला."
"नाही सर, हा खून नव्हता असं डॉक्टरच म्हणणं आहे त्यांच्या गळ्यावर फक्त एकदमच सरळ वाराची खूण आहे आणि रक्ताचा प्रवाह खूप जलद गतीने झाला की त्याला लगेच मृत्यू आला. या व्यक्तीला सुरा वापरण्याची सवय होती आणि तो डाव्या हाताने सुरा चालवत होता असं या रिपोर्ट मध्ये आहे साळवी म्हणाले."
"हे आश्चर्य कारक च आहे आणि हा व्यक्ती कुठे काम करत होता, कोणत्या पोस्टवर होता व कधीपासून गायब होता व त्यांचे नाव कळाले का? तीन चार प्रश्न एकदमच विचारत ओजस म्हणाला."
"खरंतर नाही सर, पण मला त्या व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात एका व्यक्तीचा नंबर सापडला तर त्या व्यक्तीला फोन केला असता त्यानें सांगितले की तो आणि मृत व्यक्ती राजकांग येथे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करत होता आणि दोन दिवसांत तो अचानक गायब झाला संध्याकाळ पासून साळवी म्हणाले."
"ठीक आहे, गाडी काढा आपण आत्ताच राजकांग ला निघत आहोत ओजस म्हणाला."
"सर, पण आत्ताचं आपण निघालो तरी एक - दीड तास नक्कीच तिथे पोहचायला लागू शकतो त्यापेक्षा आपण उदया सकाळी च जाऊ आणि मध्येच गाडी बंद पडली तर जवळपास मैकानिक पण नसेल.... साळवी म्हणाले."
"साळवी कोणतीही गोष्ट अर्धवट सोडून चालणार नाही या व्यक्तींचे नाव आणि यांचा खून की आत्महत्या या संदर्भातील सर्व गोष्टी च रहस्य उलगडायाच्या आतच जर नष्ट झाले पुरावे तर आपल्याला शोध घ्यायला अजून अवघड होईल म्हणून आत्ताच निघूया ओजस म्हणाला."
"ठीक आहे सर, निघूया आपण साळवी म्हणाले."
"हो, मी तोवर घरी जाऊन पल्लवी ला सांगून येतो कदाचित आज आपण तिथेच थांबणार आहोत कारण त्या व्यक्तीच्या मृत्यूमागे काही रहस्य नक्कीच असेल ओजस ठामपणे म्हणाला."
"हो, सर एवढंच बोलून साळवी नी सॅल्युट केला आणि ते लगेच ओजसच्या केबिनच्या बाहेर पडले."
आपण आत्ता बाहेर पडतो आहोत या गोष्टींचा साळवी ना एवढी का चिंता वाटावी, खरंतर त्या मंदिराच्या भोवतालच सावट किंवा त्या कथेमागची सत्यता प्रत्यक्षात खरी होत आहे यांची त्यांना भिती तर वाटत नसेल तर त्याची ही भिती घालवायला हवी ओजस स्वतःच्या मनाशी संवाद साधत म्हणाला.
ही विचारांची योग्य वेळ नसावी असे त्याला वाटले आणि तो पोलिस स्टेशन मधून बाहेर पडला आणि घरी निघाला. पल्लवी ला फार काही न सांगता फक्त साध्या चौकशी साठी जातोय आणि उद्याच परत येईल एवढे सांगून तो साळवी ना घ्यायला गेला.
साळवी, अजून एक हवालदार आणि ओजस असे तिघे जण प्रवास करत होते. ओजस ने या आधी कधीच असा जंगलातून ते ही घनदाट जिथे अंधार किंवा एकांत पेक्षा जंगलात वावरणारी हिंस्र श्वापदे ची भिती होती जी संधी मिळताच तुम्हाला मृत्यू चे दर्शन घडवू शकत होती. अशा भयाण जंगलातून त्याचा प्रवास सुरू होता.पण हे जंगल निदान निर्मनुष्य तरी नव्हते अधूनमधून येणारा पक्ष्यांचा आवाज ओजस आणि साळवींना त्यांनी ज्या जंगलात ती रात्र काढली त्या पेक्षा हे वातावरण सुसह्य वाटत होते. जंगलांची वाट संपून ते शेवटी राजकांग ला पोहचले दीड तासांच्या भयाण जंगलाचा प्रवास करून.
राजकांगच्या भागात प्रवेश करताच त्यांना निरनिराळी वादये, प्राण्यांचे आवाज, लोकांचा हल्ला कल्लोळ, हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. रस्त्यावर दुतर्फा गर्दी दिसून येत होती.त्यांना समजेना की नेमकी एवढी गर्दी कशाची असावी. तेवढ्यात समोरून एक व्यक्ती लंगडत जाताना त्यांना दिसला. ओजस गाडीतून खाली उतरला आणि त्याने त्या व्यक्तीला आवाज दिला. त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले आणि तिथल्या दिव्याच्या झगमगाटात त्या व्यक्तीची शरीरयष्टी दिसून आली .
शरीराने मजबूत,पण थोडा पाठीतून बाक आलेला, एक पाय अधू असलेला, अंगावर कोट चढवलेला आणि पायात रंगीबेरंगी पट्ट्याची पॅण्ट घातलेली, चेहरा पूर्ण रंगवलेला, डोळ्यात एक प्रकारची वेदना आणि दाहक अंगार दिसून येत होती. नाक उभट आणि ओठ गडद लाल रंगानी रंगवलेले, केसांचा रंग लाल असे त्या व्यक्तीचे मनात भय उत्पन्न करणारे जोकरच रूप पाहून क्षणभर ओजस ही नखशिखांत हादरला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा