काही वेळाने पल्लवी आत गेली त्यांच्या खोलीत ओजस शांतपणे बसला होता. त्याला एवढ शांत तिने कधीच पाहिले नव्हते.
"ओजस काय झाले आहे, गेले दोन दिवस तु घराबाहेर होता. काही च सांगितले नाही आणि आज तु अचानक आला तर प्रचंड अस्वस्थ वापरास मला आणि आता एकदम शांत आहेस. हे असं कधीच वागलास नाही तु. सर्व मला काही सांगतोस व आजच तु लपवून ठेवले आहेस पल्लवी म्हणाली."
"नाही पल्लवी असं काही नाही ग मला काही च लपवायचे नाही पण घटनाच अशी घडली की माझ्या मनाला प्रचंड उलथापालथ करून गेली. त्या घटनेची भयावहता सांगायची म्हणजे तुला उगीच नसत्या शंकांनी तुला चिंतेत टाकणं म्हणूनच माझी इच्छा नाही तुला हे कळाव कारण मला तुझी काळजी आहे.... ओजस म्हणाला."
आपल्या नवऱ्याच आपल्या वरील प्रेम व काळजी पाहून ती भारावून गेली होती पल्लवी पण तिच्या मनात निर्माण झालेले कुतुहल अस सहजासहजी शमणार नव्हते तिच मन भय या एकाच शब्दांनी थरारून, रोमांचून गेले होते. या निष्पाप मनावर भय, अनैसर्गिक घटना च अनपेक्षित वलय निर्माण होण इतकं साहजिक की नकार चा मिळणारा संकेत ही जाणवत नसावा.... पल्लवी ची जिज्ञासा म्हणजे त्या शक्तीला अनाहूतपणे मिळणारी ऊर्जा , बळ पुरवत असेल यांची तिला कल्पना ही नव्हती.
ओजस ची खरंतर इच्छा नव्हती ती घटना, तो मृतदेह, ते मंदिर सगळ्या नसलेल्या आठवणी पुसून टाकण्याऐवजी पुन्हा तीच अप्रिय अशी घटना सांगण पण पल्लवी चा हट्ट, तिची जिज्ञासा जोपर्यंत संतुष्ट होत नाही ती एकतर रूसणार नाही तर अबोला धरणार हे त्याला माहीत होत.
"मी माझ्या साथीदार संजीत बरोबर जंगलात गेलो रात्रीचा कारण मला अशी खात्री वाटली की जर आज शहरात दंगल होणार असेल तर... ती टोळी अथवा समूह जंगलात च राहत असणार... हा एक कयास होता फक्त मी आणि संजीत त्या जंगलात थांबलो होतो. त्या घनदाट जंगलात एकाही जीवंत प्राण्यांची, पक्ष्यांची चाहूलच नाही किंवा साधा आवाज नाही इतकी निरव शांतता तिथे पसरली होती. मनाला कुठेतरी जाणवत होते की सर्व सामान्य नाही पण मनाची इच्छा अव्हेर करून मी तिथेच थांबलो. जंगलात अचानक एक किंकाळी घुमली आणि त्यामुळे मी व संजीत दचकलो. आम्ही मोबाईल मधल्या बॅटरीच्या उजेडात पुढे कसेबसे गेलो तर काही अंतरावरील ते घनदाट जंगलातील गवत तुडवत आम्ही पुढे गेलो तर समोर एक मंदिर दिसले ओबडधोबड आकाराचे , काळया दगडात बांधलेले तो रंगच तसा होता की रंग दिला होता समजून येत नव्हते असं विचित्र मंदिर मी या आधी कधीच पाहिले नाही ना कळस ना काही पताका आणि त्यात ज्याला मी अफवा समजतं होतो ती जोकर ची मूर्ती मला दिसली त्या व्यक्तीच्या रंगाने लालभडक झालेली...."
हे ऐकून पल्लवी ला भिती वाटली किंवा तिच्या मनात कसली खळबळ उडाली असावी या दृष्टीने ओजस ने तिच्या कडे पाहिले पण ती शांत होती. पल्लवी ओजस ने आवाज देऊन पाहिले पण ती शांत च होती. तिला जागवण्यासाठी त्याने तिच्या हातावर हात ठेवला तर हात पूर्ण थंड, भिजलेला त्याला वाटला.
पल्लवीला दरदरून घाम फुटला यांची त्याला जाणीव झाली पण पल्लवी मात्र कसलीही जाणीव न जाणवण्याच्या अवस्थेत होती.
विचारांच्या शृंखलेत ती भान हरपून गेली होती स्वतःचे. व्यक्तीचे मन भूतकाळाच्या गर्तेत सापडले किंवा आठवणीत रमले मग चांगली असो वा वाईट त्यांची चेतन अवस्था जागृत असते पण मन हे सर्व पार करून एका वेगळ्याच आयामात पोहचले तर जे अज्ञात आहे, जिथे न जाणवणार संकट किंवा अज्ञात शक्तीचा प्रभाव शक्तीशाली रूपात असेल तर ही जाणीव च भयंकर आहे.
'पल्लवी' जोरात ओजस ओरडला त्यामुळे पल्लवीच्या विचारांची साखळी काही क्षणांसाठी वेगळी झाली व ती भानावर आली. ओजस ओरडला तरी तिच्यावर काही प्रभाव जाणवला नाही ती शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती.
"पल्लवी काय झाले तुला, भान कुठे आहे तुझं? " 'पल्लवी' ओजस म्हणाला.
"नाही ओजस असं काहीच नाही पण तु सांगितलेला अनुभव रोमांच उभे करणारा मात्र नक्कीच होता पण जोकर ची मूर्ती आहे याचा अर्थ हा नाही ओजस की तुला जे वाटत आहे ते खरंच आलेस आणि त्या व्यक्तीला कोणी आधीच मारल असण्याची शक्यता असेल हा विचार तु करायला हवास पण तुझ मन मात्र त्याच गोष्टी भोवती घुटमळत राहिल पल्लवी हसून म्हणाली."
"अरे वाह, माझी बायको आता माझी जागा घेणार तर ठीक आहे मी निवृत्त होतो आणि माझ्या जागेवर तु काम करावे ओजस पल्लवी च्या गळ्यात हात टाकून म्हणाला."
"गरज नाही ती ड्युटी तुच संभाळ खरंतर माझ म्हणण आहे तु हे काम सोडून वेगळ काही काम करावं मला आणि शुभला तुझ्या सहवासाची आवश्यकता आहे हे तुला माहित आहे तरीही तु हे काम का करतोस, नसत्या संकटात तु उडी घेतोस, शंकांनी मन मात्र माझे व्याकूळ होऊन जाते का कळत नाही तुला पल्लवी म्हणाली."
"हे बघ, हा विचार तु सोडून दे कारण मी याला ड्युटी नाही तर देशा बद्दल माझं कर्तव्य मानतो... आपल्या कुटुंबा इतकंच मला देश महत्वाचा वाटतो आणि विचार कर मी बॉर्डर वर नाही तर तुमच्या सोबत आहे त्या कुटुंबाचा विचार कर जे आपल्या कुटुंबासमवेत नसतात पण त्यांना अभिमान वाटतो आपल्या मुलांचा , पतीचा , वडिलांचा तसाच तुलाही वाटायला हवा ओजस तिला समजावून म्हणाला."
"हो ठीक आहे, तरी तुझी काळजी घे आणि..... पल्लवी ला काही सांगायचं होतं पण त्या शब्दां मागील सूचना, सावध करणारे शब्द मात्र यांना जणू प्रतिरोध केल्याप्रमाणे ते तिथेच थांबले."
"अं हो! ठीक आहे आज आपण तिघेही बाहेर जेवायला जातोय, मूड ही फ्रेश होईल आणि मी तुमच्या सोबत वेळ घालवू शकेल एक ही पेनल्टी असेल जी मी आता भरतोय ओजस हसत म्हणाला."
"म्हणजे तुला गिल्टी वाटतय म्हणून तु घेऊन जाणार आहेस पल्लवी त्याला खिजवत म्हणाली."
"हार मानली मी पण आता निघूया का?ओजस म्हणाला."
हर्षित आपली सर्व बॅग पॅकिंग करत होता व नंतर त्यांच्या काकांची करणार होता. दरवाजा वरील बेल वाजताच हर्षित ने जाऊन दरवाजा उघडला. दरवाज्यात देवज उभा होता. देवज सरळ घराच्या आत घुसला.
"या बॅगा, तु कुठे ट्रीप ला आमच्या सोबत येणार आहे का ? हर्षित प्रश्नार्थक चेहऱ्याने म्हणाला."
"माझी पोस्टिंग कन्फर्म झाली आजच सकाळी मेल आला त्या ऑफिस कडून देवज उत्साहित चेहऱ्याने म्हणाला."
"हे असं कसं झाले भावा? नाही म्हणजे तो वेडा ऑफिसर.... हर्षित ने विचारले."
"तो मिसिंग आहे असा मला मेल आला, काही असो माझं काम झाले आहे आता आपण सोबत जातो आहोत देवज म्हणाला."
"पण भावा तरीही हे आश्चर्य नाही वाटत का जो ते काम सोडायला तय्यार च नव्हता तो हे काम सोडून गायब होऊन जातो कदाचित या मागे रहस्य किंवा तो कसली वाट पाहत तर नव्हता. एखादा गुन्हा होण्याची ज्यातून त्यांचा लाभ होणार असेल.... तोच लाभ झाला म्हणून निघून गेला असेल हर्षित म्हणाला."
"शक्यता आहे तशीही पण पोलिस ते पाहतील मित्रा मला लवकरात लवकर जॉइनिंग व्हायचं आहे म्हणून आजच मी तुझ्या कडे घरच्यांची परवानगी घेऊन रहायला आलो म्हणजे उद्या सकाळी आपल्याला पटकन निघता येईल देवज म्हणाला."
"हो ठीक आहे आता आपण झोपूया कारण उद्या सकाळी सहाची ट्रेन आहे पण तुझ टिकीट बुक केले का हर्षित म्हणाला."
"त्यांची चिंता सोड तो मेल येताच काकांनी लगेच करून दिल त्यामुळे कसली चिंता नाही आता फक्त तिथे लवकर पोहचावे असं वाटत आहे हर्षित म्हणाला."
"एवढी कसली रे घाई तुला , कोण वाट पाहत आहे का तुझी मस्करी च्या स्वरात हर्षित म्हणाला."
"अस काहीच नाही भावा मी वाट पाहतो तिथल्या सुंदर प्रदेशात राहण्याची, तिथल्या स्वच्छ, सुंदर वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे, ती शांतता अनुभवायची आहे या शहरातील जीवनाचा कंटाळा आला आहे रे मला देवज म्हणाला."
"हो कळाले, तु फॉरेस्ट ऑफिसर कमी एक कवी म्हणून नक्कीच नावारूपाला येशील असं वाटतंय असो चल आता मला खरंच झोप येत आहे ट्रेन मिस झाली तर तिकीट आणि वेळ दोन्ही वाया जाईल हर्षित म्हणाला."
ओके सर गुड नाईट म्हणून देवज झोपायला वेगळ्या रूममध्ये आपली बॅग्या घेऊन गेला.
क्रमशः