Login

सर्कस भितीची क्रूरता भाग - ४

सर्कस असते लहान मुलांच्या आनंदासाठी पण तीच सर्कस अतर्क्य अशा घटनांमुळे भयावह ठरली की त्या नंतर हत्याच प्रमाण वाढले पण रहस्यमयरित्या ते थंडावल काही वर्षांसाठी... वर्तमानकाळात परत त्याच घटना घडू लागल्या पण यावेळी मात्र या घटना सामान्य होत्या तरीही काहीतरी वेगळं होतं आणि तेच शोधण्याच आव्हान ओजस पुढे होत.‌ गुन्हयाच हे वेगळंच आव्हान त्यांच्यासमोर समोर आहे जरी त्यांचा विश्वास नसला तरी.
काही दिवसा नंतर हर्षित ला जॉइनिंग च कन्फर्मशेन पत्र आले. अभिनंदन करणारा त्यात छोटा उल्लेख, कामाचे स्वरूप आणि त्याला त्रिपुरा येथे कालबरीआ इथे जॉईन होण्यास पाच दिवसांनी सांगितले. कानपूर ते त्रिपुरा हा प्रदेश जास्त लांबचा नव्हता. घराची डोअर बेल वाजली आणि हर्षित दरवाजा उघडायला गेला. दारात देवज उभा होता. चेहरा थोडा त्यांचा गंभीर वाटत होता. हर्षित ने त्याला आत घेतले.‌

"काय झाले देवज, एवढा गंभीर चेहरा, कधी ड्रामा प्ले मध्ये ही नाही दिसला शाळेच्या जेव्हा आपण त्यात भाग घ्यायचो हर्षित हसून म्हणाला."

"नाही मी गंभीर नाही पण माझ पोस्टिंग लेट झाले आहे किमान २ महिने तरी मी कानपूर लाच असणार आहे आणि मग मी राजकांग, त्रिपुरा येथे येणार आहे देवज म्हणाला."
"दोन महिने, एवढ्या उशीरा, नेमकं काय कारण आहे की तुझ पोस्टिंग इतक्या लेट होणार काही प्रॉब्लेम? हर्षित म्हटला."

"नाही, एवढं काही नाही पण ज्यांची बदली होणार आहे तो धनेश दोन महिने तरी तिथून जाणार नाही कदाचित त्यांची इच्छा नसावी... खूप विक्षिप्त आहे तो मुलगा असे सर्व म्हणतात त्यामुळेच त्यांची बदली होणार आहे वाटत आणि मी त्यांच्या जागी यावं असे त्याला वाटत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला समजावले पण त्यांचा क्रोध आणि आक्रमक वृत्ती यामुळेच ते अधिकारी घाबरले म्हणूनच दोन महिने मला थांबायला सांगितले आहे देवज म्हणाला."

"हे, खूप विचित्र आहे देवज तरीही दोन महिन्यात त्यांची बदली कशी होईल जर त्यांचा नकार आहे. तुला दुसऱ्या राज्यात पाठवतील जर त्यांने ऐकलंच नाही तर... हर्षित चिंतेच्या सुरात म्हणाला."
"नाही... अशी शक्यता नाहीच होणार. त्याला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली ची ऑर्डर निघणार आहे किंवा त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल देवज म्हणाला."

हर्षित ला माहित होत की एकतर या मागे त्यांच्या चुलत काकांचा नक्की हात असणार. देवजच्या आई वडीलांच्या मृत्यू नंतर किती तरी वर्षांनी परदेशातुन आल्यावर देवज ला त्यांनी शोधल आणि घेऊन गेले. देवज चे काका देशाच्या एका महत्वाच्या पदावर राजदूत म्हणून काम करत होते आणि परत त्यांची भारतात येण्याची इच्छा पाहून भारत सरकारने त्यांना परवानगी दिली असावी कदाचित... ते आता संसदेत कामाला होते. 
"ही गोष्ट चांगली आहे देवज. मी पाच दिवसांत निघणार आहे, दोन महिन्यात आपण भेटूच त्रिपुरा ला. माझं पोस्टिंग कालबरीआ इथे झाले आहे आणि तेथून राजकांग ६४ किमी आहे म्हणजे एक तासात बाईकने पोहचू शकतो आपण... हर्षित गुगल मॅपवर पाहत म्हणाला."

"भूषण काका तुम्ही आता माझ्या सोबत चला तसंही मी इथे नसणार, तुमची काळजी घेणार पण कोणी नाही तर मी तुम्हाला इथे राहू देऊ शकत नाही हर्षित ठामपणे म्हणाला."

खरंतर हे घर सोडून जाण्याची भूषणची अजिबात इच्छा नव्हती कारण काही भावनिक, सुंदर आठवणी जोडलेल्या होत्या पण हर्षित नंतर त्याचे जोडले गेलेले भावनिक नाते आणि कुठेतरी वाटणारी एकाकीपणाची भिती मुळेच त्याला या एकट राहण्याची इच्छा नव्हती म्हणूनच त्याने हर्षित ने जेव्हा आपल्या सोबत यावे अशी इच्छा बोलून दाखवली तेव्हा तो तय्यार झाला. 

"काका आपण तिथे लागणाऱ्या सामानाची जमवाजमव करावी लागेल तर मी आणि देवज जातो आहे तोवर तुम्ही आराम करा.... हर्षित म्हणाला."

"ठीक आहे, पण तिकीट काढले का? एकतर आधीच वेटींग लिस्ट असायची भूषणने शंका विचारली."

"काका आजच बुकींग केले आहे मी दोघांचं चिंता नका करू आणि तुमचा प्रवास खूप आरामात होणार आहे तर कितीही झोपू शकता तुम्ही आणि कंटाळा आला तर मोबाईल वर मुव्ही बघत बसा देवज म्हणाला."

"नाही याची गरज नाही मी आपला मस्त पुस्तक वाचत बसेन कंटाळा आलाच तर गाणी ऐकन पण झोप आणि चित्रपट मला आवडत नाही भूषण काका त्याला म्हणाले आणि ते पुढे म्हणाले, लवकर जावा आता दोघे नाहीतर पाऊस पडला आणि ट्रॅफिक जाम झाले तर उशीर होईल यायला"
"ठीक आहे, आम्ही आलो जाऊन हर्षित म्हणाला."

एक तासात हर्षित परत आला. काकांशी काही गोष्टीवर बोलायला हवे असे त्याने ठरवलेच होते. 
"काका मला तुम्हाला काही विचारायचे आहे, आई बाबांचा मृत्यू अपघातात झाला की हा बनाव होता जे मृतदेह कारमध्ये सापडले काकू व्यक्तीरिक्त नव्हते असे मला कळाले आहे मग आई बाबाच नेमके काय झाले? त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? हर्षित म्हणाला."

"हर्षित ती घटना घडली ती मला आता आठवत नाही आणि ते तुझे खरे आई बाबा होते की नाही हे पण माहित नाही कदाचित ते त्यांच्या बॉडीज खऱ्या असतील व या जुन्या प्रकरणात तुला एवढा इंटरेस्ट का. याबद्दल तुला माहिती देणारे कोणी नाही कारण ती जागा निर्मनुष्य होती मग तिथे काय घडले आणि तो दुर्दैवी पण रहस्याने भरलेला अपघात याच गूढ जरी असलं तरी अजून उकलले नाही पोलीस पण या फंदयात पडले नाही त्यांनी अपघात अशी नोंद करून केस बंद केली आणि त्यात कोणतेच पुरावे नाहीत की त्या घटनेबाबत पुरावे तुला मिळतील भूषण म्हणाला."

यावर काय प्रतिक्रिया द्यावी हर्षित ला सुचले नाही कारण शंकेचा अथवा संशयाचा प्रश्न विचारायचा मार्ग च भूषणने बंद केला होता पण त्यांचे मन मात्र अस्वस्थ झाले होते. त्रिपुराच्या घनदाट जंगलात घडलेला अपघात आणि आई बाबांचा चेहरा त्याला अजूनही अनोळखी च वाटत होता. १२ वर्षांचा हर्षित असताना घडलेला तो अपघात आणि नंतर देवजच्या आई वडिलांचा मृत्यू की आत्महत्या ही एक रहस्यमय गोष्ट दोघांना सतावत होती. दोन वर्षांत दोघांनी आपल्या आई वडिलांना गमावलं होतं. देवजच्या आई वडिलांनी आत्महत्या का केली याचे कारण कळाले नव्हते आणि कोणती सुसाईड नोट ही नव्हती. 

त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव शांत होते, कोणती दहशत अथवा भितीचे भाव नव्हते त्यामुळे पोलिसांनी ही पण केस एक सुसाईड म्हणून बंद केली. या घटना घडून गेल्यावर सुद्धा या मागचे गूढ हर्षित आणि देवज ला अस्वस्थ करत होते. 

जोवर तुमच्या हातात एखादी पॉवर किंवा मोठ्या ओळखी असत नाही तोवर कुठल्याही केसचा निकाल लागत नाही, दोघांना माहिती होते आणि ही केस तर क्लोज झाली होती आणि म्हणूनच सरकारी नोकरी मिळवण हा पण एक दोघांचा त्यासाठी प्रयत्न होता आणि सुदैवाने त्यांची पोस्टिंग त्याच भागात झाल्यामुळे हर्षित आणि देवज आनंदी होते पण हर्षित ला एकट्यालाच शोध घ्यावा लागणार होता आणि भूषण काकांना तिथे गेल्यावर कल्पना दयायची त्याने ठरवलं होतं.

काकांची मदत नक्कीच होईल असा हर्षित ला ठाम विश्वास होता कारण यात धोका आहे काही असे त्याला तरी वाटत नव्हते फक्त गूढ आहे की नैसर्गिक मृत्यू एवढंच त्याला माहित करून घ्यायचं होतं. काही गोष्टी गूढ असतात आणि त्याच रहस्य उलगडण्यात अर्थ नाही नाहीतर जीवघेण्या संकटात सापडू असे भूषण काकांना वाटते त्यामुळेच हर्षित ला संशय होता की काकांना काही कल्पना असावी पण त्यांचं ठाम उत्तर पाहून त्यांच्या शंका दूर झाल्या असल्या त्या गूढ मागच आकर्षण हर्षित ला खुणावत होतं.
खूप थकल्यामुळे ओजस घरी निघून आला आणि कमिशनर यांनी पण त्याला घरी जाऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. एका बॉडीच सापडणं आणि ती ही आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ही गोष्ट नेहमी प्रमाणे सामान्य असली ती मंदिरातील जोकरची मूर्ती त्याने पाहिले आणि तेव्हापासून त्यांचे मन थाऱ्यावर राहिले नाही. तो खूप अस्वस्थ झाला जी घटना त्याने अस्पष्टशी ऐकली ती खरी असल्यानेच त्याच्या मनावर दडपण आले होते. तो व्यक्ती कोण होता आणि त्याने काय म्हणून बळी दिला की ही परत तीच पुनरावृत्ती होणार होती असे त्याला वाटले.‌ त्या केसचा त्याने कुतुहलपायी अभ्यास केला होता पण त्या घटनेतील बऱ्याच गोष्टींचा उल्लेख नाही ही त्याला विसंगती वाटली पण ही निव्वळ आपली कल्पना आहे असे त्याला वाटले उद्या या बाबतीत कमिशनर यांच्याशी बोलायचं त्याने ठरवलं.
पल्लवी चहा घेऊन आली आणि ओजसचा चिंतेत पडलेला चेहरा पाहून तिला जाणवल नक्कीच काहीतरी घटना घडली असावी.
क्रमशः