Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रुएल स्टार #११.०

Read Later
दि क्रुएल स्टार #११.०
श्रावणातले दिवस होते, फुले उमललेली असल्यामुळे भरपूर फुलपाखरं फुलांवर ती बागडत होती. ऋचा आणि अंतरा सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करण्यासाठी आपले आपले कॅमेरे घेऊन जंगलाच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. पण सुट्टीच्या दिवशी जंगलाचा रस्त्याला भरपुर गर्दी होती त्याच्यामुळे त्या दोघींनी आता सप्ताहाच्या एखाद्या दिवशी जाण्याचे ठरवले. पण त्या दिवशी अघटित घडले. भरपूर फोटो काढून झाल्यावर जेव्हा सुट्टी गाडी सुरू करण्यासाठी आली, तेव्हा त्यांची गाडी काही सुरू होईना. ऋचाने धक्का मारुन बघितले, बॉनेट उघडून बघितले, कुठे काही वायर सुटल्याचे दिसत नव्हते. बरं पेट्रोल टाकी मध्ये पेट्रोल पण होते. मग काय झाले? दोघींनाही प्रश्न पडला. दुपार टळून गेली होती, ज्या बाजूला त्या होत्या तिकडे अगदी शुकशुकाट होता. फोनची रेंज पण जात नव्हती. शेवटी गाडी लॉक करून, दोघींनी चालायला सुरुवात केली. अचानक झाडांच्या मागून काही माणसांचा बोलायचा आवाज आला. मदतीसाठी म्हणून हाक मारावी असे ठरवून ऋचा पुढे गेली तर तिला अंतराने हाताला धरून खसकन मागे ओढले. तिच्या तोंडावर हात ठेवून तिने गप्प बसण्याची खूण केली. कोण कुठली माणसं, आपल्या कसा गैरफायदा घेतील अशी चिंता अंतराला वाटत होती.

नीट निरखून बघून ऋचाने आपल्या कॅमेराने झूम करून तिथे उभ्या असणाऱ्या माणसांचा फोटो काढला. निरखून बघत असताना ऋचा आणि अंतरा आपली चाहूल त्या लोकांना लागली की काय ह्या भीतीने त्या गर्द झाडीत लपून बसल्या.

तरीपण ऋचा आणि ती लपत छपत झाडाच्या मागून त्या माणसांच्या जवळ गेल्या.

"लडकी को पटाया या नही? कर क्या रहे हो अभी तक?" कोणीतरी रागवून दुसऱ्या माणसाला विचारत होत.

"मै तो बहुत प्रयास कर रहा हू, मेरी मा बाप हर हप्ता फोन करके रहे है लेकिन ऐसा है की लडकी जवाब नही दे रही."

कोणाबद्दल बोलतो आहे? ऋचा ने अंतराकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. या चौघांपैकी दाढीवाले आणि राकट दिसत होते, त्यांच्या बोलण्याच्या लहेजावरून ते हिंदू वाटत नव्हते.

"देख बेटा, अभी तो मैने उसकी गाडी बंद की है, हमने गाडी मे समान भी रखा है, ऐसा कर गाडी ठीक करने के बहाने दोस्ती बना ले. तेरे पास सिर्फ आठ दिन का वक्त है." त्यापैकी एक दाढीवाला माणूस अतिशय उर्मट आवाजात बोलत होता.

"काम हो जाना चाहिए," परत परत त्याला कोणीतरी धमकी देत होता. एव्हाना अंधार होत आला होता. ती माणस तिथून निघून गेली.

पावसानं चांगलाच जोर धरला होता, रस्ते सुनासान पडले होते, अशातच एक पांढऱ्या रुंगाची मारुती डिझायर हायवेवर करवीरकडे जाणाऱ्या दिशेनं दाखल झाली, तिच्या लखलखणाऱ्‍या दोन हेडलाईटामुळे वातावरणास आणखीच भयाण स्वरुप आलेलं होतं. पावसामुळे गाडीचे वायफर चालू होते, ड्रायव्हींग सिटवर बसलेल्या व्यक्तीनं ओव्हरकोट घातलेला होता. डोक्यावर हॅट होती, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पावसामुळे रस्ता बरोबर दिसत नव्हता त्यामुळे ती व्यक्ती हळुवार कार चालवत होती. मध्येच एखादं वाहन अंधाराचं साम्राज्य उडवत, रोडवरुन भरकन निघून जायचं, कार मेनरोडवरुन रस्त्याच्या कडेला डाव्या साईडला असलेल्या कच्च्या रस्त्यावर उतरली, त्या कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यावर कार एका ठिकाणी थांबली, पाऊस अजुनही सुरुच होता.

जरावेळानं त्या कारचा पुढचा दरवाजा उघडला आणि ती ओव्हरकोट घातलेली व्यक्ती कारमधून बाहेर निघाली, त्या व्यक्तीच्या पायात कॅनव्हॉसचे बुट होते, हातात हॅण्डग्लोव्हज होते, डोक्यावरील हॅटने त्या व्यक्तीचा चेहरा अर्ध्यापेक्षा जास्त झाकलेला होता.

त्या व्यक्तीने आपल्या ओव्हरकोटच्या खिशातून सिगारेटचं पॉकिट काढलं, आणि एक सिगारेट हातात घेवून पॉकिट परत‍ खिशात ठेवले, आणि दुसऱ्या बाजुच्या खिशातून लायटर काढलं‍. सिगारेट ओठात दाबली, आणि लायटरने सिगारेट पेटवली. व ती व्यक्ती हळूहळू सिगारेटचे झुरके घ्यायला लागली.

सिगारेट संपली, त्या व्यक्तीनं कारची डीकी उघडली, आणि विजेच्या लख्ख प्रकाशात डिकीच्या आतील भाग उजेडानं न्हावुन निघाला, त्या डिकीत एक मोठं पोतं कोंबलेलं होतं, पोत्याचं तोंड बांधलेल्या अवस्थेत होतं, कदाचित त्यात डेड बॉडी होती, त्या ओव्हरकोट घातलेल्या व्यक्तीनं डिकीतलंते पोतं कसंबसं बाहेर काढलं आणि थोड्या दूरपर्यंत त्याला ओढत नेऊन समोर असलेल्या एका तळ्यात ढकलून दिलं. आणि डिकीजवळ परत येऊन त्या व्यक्तीनं डीकी चेक केली, व समाधान झाल्यानंतर परत डीकी बंद केली. आणि ती व्यक्ती लगबगीने कारच्या ड्रायव्हींग सिटवर बसली, सिटबेल्ट बांधले‍. ओव्हरकोटच्या आत हात घालून एक रिव्हॉल्वर बाहेर काढलं, त्या रिव्हॉल्वरचं चेंबर उघडून बघितलं त्यात पाच गोळ्या‍ शिल्लक होत्या, त्या व्यक्तीनं ते रिव्हॉल्वर कारच्या डॅश बोर्डमध्ये ठेवून दिलं, आणि कार वळवली,‍ आणि ती कार आली त्या रस्त्याने हायवेवर परत प्रविष्‍ठ झाली आणि इंदापुरी शहराच्या दिशेला भरधाव निघाली.

ते लोक निघताना त्यांना ह्यांची चाहूल लागली. पण अंतरा बरीच पुढे धावत असल्याने त्यांना फक्त ऋचा ओझरती दृष्टीस पडली. आता मात्र दोघीजणी घाबरल्या, गाडी तिथेच सोडून, जंगलाच्या रस्त्याने त्या धावत सुटल्या. जाणून बुजून त्यांनी पायवाट पकडली. पाच मिनिटे धावल्यानंतर अचानक त्यांना समोर असलेल्या गाडीतून एक व्यक्ती उतरताना दिसला. आणि नंतर त्याने गाडीच्या डिकीतून एक पोत काढून ओढत नेऊन तळ्यात टाकलं.

ह्या दोघींनि त्याला जाऊ दिले आणि त्यानंतर ऋचा तळ्यात उतरून ते पोत बाहेर काढून  खोलल तर त्यात एक मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तोंडाला पट्टी आणि हात पाय बांधलेल्या अवस्थेत होती. तिला बघून दोघीही शॉक झाल्या. त्यांनी लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हणून तिथून निघण्याच मार्ग बघत होते. त्यात हे लोक ही त्यांच्या मागावर होते. अंतरा मोठ्या दगडाचा आडोश्याने जाऊन काही अंतरावर एक ट्रक होता तिकडे जाऊ लागली. लांबूनच हातवारे करून ट्रकवाल्याकडे मदत मागितली. आणि ऋचा आणि ती पोत्यातील मुलगी दोघेच तिथं थांबल्या. त्यापैकी एकाने शेवटी अंदाधुंदी गोळीबार केला आणि ऋचाला आणि त्या मुलीला गोळी झाडून पसार झाले. दोघीही पडल्या. अंतरा आणि तो ट्रकवाला तिथे आला. ऋचा च्या छातीच्या जवळ गोळी लागली होती. अंतरा जोरात ऋचाला कवटाळून रडत होती. त्या ट्रकवाला  आणि  त्याची साथीदार दोघांनी ऋचा आणि त्या मुलीला ट्रक मध्ये बसवलं आणि हॉस्पिटल च्या दिशेने भरधाव वेगाने सुटले.

हॉस्पिटल बाहेर त्यांनी लगेच स्ट्रेचर वर दोघींना घेऊन जाऊ लागले. ऋचा च श्वास सुरू होता पण छातीत गोळी लागल्याने ती अचेतन अवस्थेत होती.
त्या मुलीच्या मानेत गोळी लागली होती. खूप रक्तस्राव झाल्याने तिचा कन्ट्रोल सुटत होता. अंतरा तिला धीर देत होती. आणि शेवटी त्या मुलीने ऑर्गन डोनेट करायचेत अंतरा आणि डॉक्टर ना सांगून अंतराच्या हातात हात घेऊन प्राण सोडला. अंतरा तिला पकडून रडत होती.

ऋचा ला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले पण छातीत खोलवर गोळी लागल्याने तिला हृदयाची गरज होती. आणि सरतेशेवटी त्या मुलीच हृदय ऋचाच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing