Jan 29, 2022
कथामालिका

दी क्रुएल स्टार #१०.०

Read Later
दी क्रुएल स्टार #१०.०


विराट आणि पीटर त्याच्या पर्सनल लॉबी मध्ये लॅपटॉप घेऊन बसला.. काही वेळ विचार करून पीटर सोबत बोलून लॉबी च्या बॅक साईड ला निघून गेला आणि पीटर ला तिथेच थांबवलं.

गुप्ता लॉबी च्या डोअर ला नॉक केलं. पीटर च्या सांगण्यावरून आत आला.

" बॉस..!" मिस्टर गुप्ता.

" वेट..!"  पीटर उत्तरला. आणि त्याने स्वतःची गन टेबलवर काढून ठेवली आणि गुप्ता ची  झडती घेतली.

" ओह कमोन पीटर.. मीटिंग ला आत येताना तुझी सोडून सगळ्यांची चेकिंग करतात.." गुप्ता  मिश्किल हसत म्हणाला.

दोघे ही हसले.

मिस्टर गुप्ता बराच वेळ लॉबी मध्ये वेट करत थांबले आणि लॉबी मध्ये स्पीकर मध्ये व्हॉइस मेसेज आला.

" मिस्टर गुप्ता प्लिज कम इन साईड द रूम नंबर 4..."

मिस्टर गुप्ता त्याच टाय वगैरे ठीक करत अगदी  तोऱ्यात रूम चा दरवाजा नॉक केला आणि आत आले.

एक प्रशस्त रूम मात्र पूर्ण रिकामी. त्यात खूप सारे लाईट्स होते. एक मोठा काऊच रूम च्या मधोमध ठेवलेला होता. आणि तो आत येताच दरवाजा ऑटो लॉक झाला.

आणि समोर एक मोठ्या स्क्रीन वर प्रोजेक्टर सुरू झाल. आणि एक एक चित्र डोळ्यासमोर दिसू लागले. त्याचे लहानपणीचे.. कॉलेज चे... फोर्स मधील ट्रेनिंग चे... आणि वेगवेगळ्या मिशन मध्ये असताना चे.. वेगवेगळ्या वेशभूषेत... पण मिस्टर गुप्ता चे हावभाव जरा ही बदलले नाहीत.

समोरून उंच बाल्कनीत विराट उभा होता.

" वाह विराट प्रतापसिंग राठोड, पहिल्याच बॉल मध्ये सिक्सर..! "
विराट काहीच बोलला नाही.

"तुला इथं यायचं नाहीये तरीही तू इथे आहेस... फॉर भाई.. सुज्ञ आहेस. पण एक गोष्ट तर माहीतच असेल माफिया मध्ये भाव भावनांना काहीही किंमत नसते. तू एक प्रेमी आहे. आहे कसला..? होतास... तुझं प्रेम तर केव्हाच"

आता मात्र विराट चे डोळे रागानं लालबुंद झाले. " गौतम... इनफ.." त्याच्याकडे बोट करून जणू रागाने शांत राहण्याचा इशारा करत होता.

गुप्ता हसू लागले.
"गौतम.. गौतम तर केव्हाच मेलाय..."

" का , तुला आश्चर्य नाही वाटलं की आवडलं नाही की मी तुझी इत्यंभूत माहिती काढली .." विराट मिश्किल हसत म्हणाला.

" अजिबात नाही... एज एक्सपेक्टड तू चार पाऊल पुढे आहेस सगळ्यांच्या... पण तुझ्या वडिलांना वाटत की तू कुक्कुल बाळ आहेस.."

विराट काहीही न बोलता त्याच्या कणखर नजरेने त्याला पाहत होता.

तितकयात विराट च सेलफोन वाजला.

"येस डॅड.. बिझी आहे मी नंतर बोलतो.."

" तू.. मेहराला मारलाच कसं... तो आपला विश्वासू माणूस होता.."

" विल गेट बॅक टू यू सून डॅड.." आणि विराट ने कॉल कट केला.

मिस्टर गुप्ता म्हणजेच गौतम जोरजोरात हसत होता.
"मेहराला का मारलास... ..." पुन्हा खिदळू लागला.

" त्यांचं सहा महिन्यांचा लिकेज तू शोधून काढला त्याच काहीच कल्पना नाही .. आणि काय तर मेहराला मारलं.."

" कशी काम करतात ही लोक... जरा ही अक्कल नाही...डोळे झाकून त्याच लोकांवर विश्वास ठेवायचा जे नंबर वन गद्दार आहेत."


बाल्कनीत एक मोठ्या हाय बॅक चेअर वर विराट पायावर पाय टाकून बसला.

"गौतम, फोर्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट.. रॉ एजेन्ट.. थर्टी फोर केसेस सोलव्ह... अनगीनंत आतंकवादी च कर्दनकाळ... बायको मुलीला घेऊन माहेरी एक छोट्याशा शाळेत शिक्षिका... अरेबियन माफिया अलमोस्ट पाणी पाजून तिर्थयात्रा घडवली. पण... पण... पण... सरकारातून फरार एजेंत ... ज्याने स्वतःच्याच टीम ला एक मिशन मध्ये संपवलं.. असा रॉ च्या चीफ च आरोप आहे त्यामुळे इकडे तिकडे मुखवटा लपवत फिरत आहे...आणि आता रॉ पण मागावर आहे गौतमच्या... पण इथे माफिया टीम मध्ये गेल्या दीड वर्षात खूपच प्रगती केली... गोल्ड तस्करी मध्ये भरपूर कमाई आहे. डॅड ला तर खूप विश्वास आहे तुज्यावर.. तू योग्य च बोलला.. डॅड विश्वास घातकी लोकांवर खूप विश्वास दाखवतात. खरतर हा माफिया पण खतम करून देशभक्ती नाही दाखवायची तुला... जी टीम तू मारली. तीच प्रायश्चित्त म्हणून चीफ ला इम्प्रेस करायचं प्रयत्न करतोय.."

आता मात्र गौतम उर्फ मिस्टर गुप्ता चे डोळे विस्फारले होते.

दोघे ही अगदी तीक्ष्ण नजरेने एकमेकांना पाहत होते.

" नॉट अन इशू..! मी विचारणार नाही की ही माहिती तुला कुठून मिळाली आणि मला हे ही माहीत आहे की मी इथे लॉक झालोय. पण अशी कुठलीच भिंत आजपर्यंत बनली नाही जी मला कैद करून ठेवेल."
आणि गुप्ताच अगदी राक्षसी गडगडाटी हास्य संपूर्ण रूम मध्ये घुमत होत.

"चल मी पण एक टीप देतो तुला...! तूझ्या भाईला ज्याने ही अवस्था केली त्यापर्यंत मी तुला घेऊन जाऊ शकतो. " गौतम त्याचा डाव अजमावू बघत होता.

"कुणी केली...!" विराट ने विचारलं.

" मला आधी तुला सोडावं लागेल..." गौतम शिताफीने म्हणाला.

विराट नकारार्थी मान डोळवतो.

" ह्या साम्राज्यचा मी भाग नसलो तरीही माझे डॅड आणि भाई ने ह्यासाठी खूप मेहनत केलीय.. आणि मी त्यांच्या विरुद्ध नाही जाणार

"हो आणि तुला इथे आणण्यात ही.." गौतम हळूच फुसफूसला.

"पार्डेंन..!" विराट ने विचारल.

तसा गौतम मिश्किलपणे हसू लागला.

"स्वरा च काय झालं..!"

" तुला काय करायचं.." विराट उत्तरला.

"एक्सिडेंट...!" खुसफूस करत हसू लागला.

"तुला काय माहिती आहे स्पष्ट बोल...!" विराट चेतावणी स्वरात म्हणाला.

" तुझ्या प्रत्येक गोष्टीच उत्तर तेव्हाच देईन जेव्हा इथून बाहेर निघेल.." गौतम म्हणाला.

"सोडला... आता बोल..!" विराट म्हणाला.

"मी विश्वास कस ठेवायचा.." गौतम ने विचारले.

"तुझा सेलफोन अजून ही तुझ्याकडे आहे. आणि त्यात तुझं स्पेशल वेपण आहे.." विराट उत्तरला.

" इंटरेस्टिंग..बरीच धार आहे नजरेत... " गौतम कौतुकाने म्हणाला.

" ते तुझं स्वतःच इन्व्हेन्शन आहे. आणि त्यामुळे तू आरामात इथून बाहेर पडू शकतो. " विराट उत्तरला.

"आता सांग... स्वराच काय म्हणत होतास...?"
विराट ने पुन्हा विचारलं.क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing