Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रुएल स्टार #९.०

Read Later
दि क्रुएल स्टार #९.०


"पीटर..! लेट्स गो..!" विराट गाडीत फ्रंट सीट वर पीटर च्या बाजूला बसला.

" बॉस..! फाईल.." विराटच्या हातात मागच्या सीट वर ठेवलेली फाईल हातात देत पीटर म्हणाला. गाडी वाऱ्याच्या वेगात निघाली. 

विराट फाईल मधील पेपर्स चेक करण्यात बिझी झाला. त्यात काही नंबर्स आणि चार्ट्स होते मागील सहा महिन्याचे बिझनेस मध्ये झालेल्या लॉस बद्दल होते. सगळे पेपर काळजीपूर्वक वाचल्यानंतर साइन करत होता. संपुर्ण आराखडा बघता गेल्या दहा पंधरा वर्षात एवढा लॉस कधीच झाला नव्हता. जितका ह्या सहा महिन्यात झाला होता. बरेचसे महत्त्वाचे बिझनेस पार्टनर्स ने भविष्यात होणाऱ्या धोक्यामुळे इन्व्हेस्टमेंट काढून घेतले होते. काँट्रॅक्ट तोडले होते. सगळीकडे गोंधळ वाटत होता. जे अजून ही त्यांच्या सोबत होते त्यांना जेडी च्या धमक्या येत होत्या. अशावेळी कुणाला तरी स्टँड घेणं गरजेचं होतं.

प्रताप सिंग ने त्याच्या हाय रँक आणि बिझनेस पार्टनर स ची मीटिंग बोलवली होती. आणि आर्यन ठीक होई पर्यंत सगळं विराट ने सांभाळावे अस प्रताप सिंग ना वाटत होतं. थोड्याच वेळात एक मोठया बिल्डिंग समोर येऊन कार थांबली.

विराट आत आला. आत येताच तो कॉन्फरन्स रूमच्या दिशेने निघालो. दरवाजा उघडताच सगळ्याच्या नजरा विराट कडे वळल्या.

दमदार पावलं टाकत विराट आत आला. त्याची चाल.. त्याचा रुबाब त्याचा राग आणि पावर दाखवत होता. सगळ्यांच्या माना खाली झुकल्या आणि पाय ताडकन उभे राहिले. विराट ने मानेनेच सगळ्याना बसण्याच इशारा केला. त्याची नजर एलिस च्या वडिलांवर पडली. आणि त्याने रागाने डोळे बारीक करून त्यांच्याकडे बघितले.

अल्बर्ट डिसुझा ... एलिस चे वडील... लांडग्यासारखी हुशारी आणि चलाखी एलिस ने तिच्या वडिलांकडूनच घेतली होती. अल्बर्ट ने सगळ्यांना विराट ची ओळख करून दिली. विराट शांतपणे चेहऱ्यावर हावभाव दिसू न देता सगळं ऐकून घेत होता. त्यानंतर मीटिंग ला सुरुवात झाली.

विराट सगळं लक्षपूर्वक ऐकत होता. एकंदर संपूर्ण मीटिंग मध्ये फक्त जेडी ची दहशत जाणवत होती. आणि विराट ला ती मोडून काढायची होती. प्रताप सिंग मीटिंग मध्ये नसल्याने जणू विराट ला ग्रांटेड समजत होते की ह्या नवख्या मुलाला काय माहीत असणार..

शहरातील बडे व्यापारी त्यांचं म्हणणं मांडलं की त्यांना काँट्रॅक्ट ब्रेक करायच आहे.

अल्बर्ट ने लिस्ट नोट केली.

" बॉस हे मिस्टर मेहरा.. " अल्बर्ट म्हणाला.

" हं.." विराट गुढपणे हुंकरला.

मिस्टर मेहरा घाबरतच कपाळावरील घाम पुसत उठून उभे राहिले.

" त्यांना आपली सेक्युरिटी नको म्हणताय.." अल्बर्ट पुढे बोलू  लागला.

" हं ! ओके..कधीपासून..?" विराट उत्तरला.

" आजपासून.." अल्बर्ट उत्तरला.

विराट ने एक नजर पीटर कडे बघितलं. पीटरने त्याची पिस्तूल काढून मेहराच्या कपाळाच्या मधोमध शूट केली.
भेदरलेल्या डोळ्यांच्या देह धाडकन टेबलावर कोसळला. सगळे अगदी डोळे फाडुन बघत होते. त्यांचं काळीज अगदी धडधड इंच इंच उडत होत. विराट डोळे बंद करून ती भीती अनुभवत होता. अल्बर्ट तर शॉक झाला होता.

फक्त एक व्यक्ती नॉर्मल वाटत होती. आणि तिला विराट ओळखत नव्हता. विराट ने डोळे उघडले आणि त्या व्यक्तीच्या दिशेने पाहू लागला. तो एक ओठ कोपऱ्यात खेचून हलकेच हसत होता.

अल्बर्ट कडे बघत पीटर नजरेनेच त्या व्यक्तीबद्दल इश्चर्यानेच विचारलं.

पीटर कानात काही बाही कुजबुजला.

" मिस्टर गुप्ता..! मीट मी इन माय परसोनल लॉबी..! विराट बोलला.

" ओके बॉस..!" गुप्ता ने मान हलवत संमती दर्शीविली.

अल्बर्ट ला समजेना नक्की विराट च्या मनात काय सुरू आहे.

" आणखी कुणी..? ज्यांना सोबत बिजनेस नको आहे..!" विराटने त्याच्या भरजरी आवाजात दरडावून विचारलं

" सगळे मान खाली करून बसले..

"ग्रेट ..!" तोच सूर राखत...
" मीटिंग डिसमिस.." म्हणत आणि त्याच्या खुर्चीतून उठून निघाला. मागोमाग त्याची फाईल घेऊन पीटर देखील निघाला.

अल्बर्ट हताश होऊन टेबलावर फाईल आदळत उभा राहिला. जाणाऱ्या विराट ला बघून त्याला अगदी खाऊ की गिळू होत होतं...

क्षणार्धात कुजबुज सुरू झाली.  बाहेरून दोन गार्डस येऊन ती टेबलवरील बॉडी उचलून घेऊन गेले. गुप्ता मात्र जणू काही घडलंच नाही ह्या अविर्भावात उभा राहून त्याच्या सूट ठीक करत दरवाजाच्या दिशेने निघाला.क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing