Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रूएल स्टार #४.०

Read Later
दि क्रूएल स्टार #४.०
" गुड मॉर्निंग प्रिन्स चार्मिंग.." राज एकदम स्टाईल मध्ये विराट टाळी देत (हाय फाय करत )म्हणाला.

" गुड मॉर्निंग भाई..व्हाट्स अप..!" विराट उत्तरला.

" करवीर ला निघतोय..! तुला भेटून जावं वाटलं..!" राज म्हणाला.

" मी पण तुलाच कॉल करणार होतो, तोच तू आलास. तुला कस कळतं मला नेमकं काय हवं असत.." विराट आश्चर्यने विचारले.

"तू तो मेरी जान हे भाई.." राज म्हणाला.

दोघांनी ही एकमेकांना कडकडून मिठी मारली.

" लिसन, स्वरा च्या घरी सगळं ठीक आहे ना..?" विराट ने काळजीने विचारलं.

" हो, एकदम... आई पण तुझी आठवण काढत होती आणि सगळी व्यवस्था चोख आहे त्यांची. " राज उत्तरला.

" मग सांगायचं ना मला... की मी विचारल्याशिवाय बोलायचं नाही असं काही ठरवलंय का..." विराट कुत्सितपणे म्हणाला.

" तस नाहीये विराट पण तुझे व्याप पण वाढलेत मग काही गोष्टी माझ्या परीने हँडल करतो मी." राज ने विराट ला समजावलं.

" काही व्याप वाढले नाहीत... इथे मी फक्त आणि फक्त भाई बरं होईपर्यंत आहे. त्यानंतर आजोबांना घेऊन मी इंदापूर ला जाणार आहे. तू काही वेगळं समजू नकोस. " विराट म्हणाला.

" पण तुझ्या बाबांच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. " राज ने त्याला समजावलं.

" मी सांगितलं होतं का, की माझ्याकडून अपेक्षा करा. मला इथे एक मिनिटं ही थांबावं वाटत नाही. त्यात ती एलिस , इतका अपमान करून ही सतत मागे गोंडा घोळवते. एक मॉम, भाई आणि ग्रेस सोडले तर सगळे स्वार्थी आहेत इथे. तुला नाही वाटत का की इथून निघून जावं.." विराट मात्र त्याच्या मतावर ठाम होता.

" वाटत ना, पण जिथं तू तिथं मी..." राज हसतच म्हणाला.

दोघेही मोकळं खळखळून हसून तंग वातावरण हलकं करतात.

" बरं ऐक, मी निघतोय आज..दुपारी दोन वाजता ची फ्लाईट आहे." राज म्हणाला.

" गेलास तरी स्वराच्या घरी थांबू नकोस.. फक्त एकवार भेटून घे त्यांना आणि आजोबांच्या घरी नको जाऊ... डायरेक्ट करवीर मधेच मुक्काम बघ. तो जो कुणी जेडी टेडी आहे ना त्याला जर ही शंका यायला नको. नाहीतर तो त्यांना त्रास देईल आणि आता माझ्यामुळे तिच्या घरच्यांना त्रास व्हावं अस अजिबात वाटत नाही मला. " विराट काळजीने म्हणाला.

" मी काळजी घेईन, डोन्ट वरी.." राज म्हणाला.

" आय विल मिस यू.. " विराट भावुक होत बोलला.

" मी टू.. काळजी घे आणि आततायी पणे काहीही डिसीजन घेऊ नकोस." राज ने प्रेमाने त्याच्या खांद्यावर थोपटले.

" नाही.. मला डॅड च्या बिजनेस मध्ये जरा ही इंटरेस्ट नाहीये. पण ते उगाच ग्रांटेड समजतात." विराट महणाला.

" अरे प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर आणि ते अपेक्षा करणारच.." राजने विराट ला अतिशय प्रेमाने सांगितले.

" यू नो व्हॉट, स्वार्थी अपेक्षा आहेत ह्या.." विराट शून्यात बघत म्हणाला.

" तू चुकीचं समजतोय, दुनियेत एकटा बापच असतो ज्याला वाटत की माझ्या मुलाने माझ्यापेक्षा मोठं व्हावं.. एकवेळ आई एक्सपेक्ट करेल की मी ह्याला लहानाचा मोठा केला तर माझा मुलगा माझी म्हातारपणीची काठी बनेल... पण वडील... कधीच नाही." राज त्याच्या परीने त्याला समजावू बघत होता.

" तू लेक्चर देऊ नकोस जास्त... निघ रेडी हो...   मी फक्त भाई ठीक होण्याची वाट बघतोय... एकदा तो बरा झाला की मी उडन छु होणार इथून... पण त्या आधी मला जेडी ला संपवायचा आहे." विराट मात्र अजून च रागीट स्वरात बोलला.

" सगळे गाणे वाजतील ब्रो... मे हु ना..!" राज तंग वातावरण काहीसं हलक् करत म्हणाला.

" एक तूच आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो.. बाकी सगळं मुखवटे चढवून बसलेत." विराट बोलला.

" एक विचारू.." राज च्या चेहऱ्यावर प्रश्न तितकीच उत्सुकता होती.

" हे काय नवीन स्टाईल तुझी.. तुला नाही म्हणालो तर तू विचारणार नाही का..?" विराट हसतच म्हणाला.

" तू ना यार..! " " बर ते जाऊ दे .. आज स्वरा आली होती ना स्वप्नात...?" राज ने विचारलं. त्याचे डोळे भरून आले होते.

" हम्मम..." विराट चे ही डोळे पाणावले पण तसं न दाखवता तो शांतच बसला.

" तू विसर तिला, अस नाही म्हणणार तुला... पण टेक केअर..!" राज प्रेमाने पाठीवर थोपटत सांत्वन करत म्हणाला.

" आय एम ओके यार... !" विराट कसनुस खोट खोट हसत म्हणाला.

विराटला त्याचे लपवलेले हावभाव लगेच समजले.
" आय डोन्ट थिंक सो.. !"

" तू खूप वाईल्ड होत जातोय दिवसेंदिवस.." राज म्हणाला.

" इथल्या हवेचा असर आहे हा.." विराट हसतच प्रश्न टाळण्यासाठी हसतच उत्तरला.

"  ह्या हवेत मी पण राहतो. " राज म्हणाला.

" पण तुझ्या रक्तात नाही तो वाइल्ड नेस... जो माझ्या आहे.." विराट म्हणाला.

" तुला कोण हरवणार बोलण्यात... " राज त्याची प्रशंसा करत म्हणाला.

"डोन्ट इव्हन ट्राय..!" विराट त्याच्या ह्या बोलण्यावर हसतच उत्तरला.

" नो बॉस.. विल नेव्हर..!" राज ने ही त्याच बोलणं हसण्यात घेतलं.

राज बोलून रेडी व्हायला त्याच्या रूम मध्ये गेला आणि विराट ने त्याला एअरपोर्ट ला सोडवलं. अगदी विमान टेक ऑफ होई पर्यंत तो तिथेच होता.

घरी येऊन दोन मिनिटं पडणार तोच त्याचा फोन खनानला.

राज ला जरा ही करमत नाही माझ्याशिवाय, त्याला वाटलं की राज चा कॉल असणार पण मोबाईल वर मात्र ग्रेस च नाव झळकल.
विराट ने कॉल रिसिव्ह केला.
" बोल डिअर.."

पण ग्रेस ऐवजी दुसरच कुणी बोलत होत. विराट कानात तेल ओतून ऐकत होता.

" सर...इज दिस विरु ब्रो... माय सेल्फ क्रिश, अँड आई गॉट दिस मोबाइल इन कॅफे.. शी इज किडण्याप इन फ्रंट ऑफ मी... अँड वेई कान्ट एबल टू हेल्प हर.. " तो घाबरतच म्हणाला.

" ओह शीट.. यू मिन टू से ... ग्रेस किडण्यापड.. दिस इज हर सेलफोन.. " विराट ने विचारलं.

"येस सर.." क्रिश म्हणाला.

"विच कॅफे.." विराट ने विचारलं.

" वेस्टर्न.... अलास्का.." क्रिश उत्तरला.

" ओके... आय विल बी रेअचिंग देर इन टेन मिनिट्स..डोन्ट मोव.." विराट घाबरतच म्हणाला.

" ओके सर.." क्रिश उत्तरला. तो पुढे काही बोलणार तोच विराट ने कॉल कट केला.

विराट अगदी वाऱ्याच्या वेगाने कॅफेच्या दिशेने निघाला.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing