Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रूएल स्टार #३.०

Read Later
दि क्रूएल स्टार #३.०


" माझा फोटो मला न विचारता काढलासच का? कोणीही माझे फोटो काढलेले मला नाही आवडत. आपण अनोळखी आहोत आणि मला न विचारता तू फोटो का काढलास? ठीक आहे, आपण एका वर्गात आहोत. म्हणजे मला ते माहिती नव्हतं. आपण एका वर्गात आहोत हे मला आत्ता कळलं. पण तरी जान न पेहचान... फोटो का काढलास? " स्वरा तावातावाने अगदी भांडणाच्या स्वरात सलग विचारत होती.

"ऐकून तर घे गं..." विराट तिला विनंती करत म्हणाला.

" काय ऐकून घे... मला न सांगता.. न विचारता..." स्वरा रागातच म्हणाली.

" एकदा बोलू तर दे मला.." विराट म्हणाला.

ती मात्र काही ऐकण्याच्या स्थितीतच नव्हती. किती लोकांचे अंगार एकट्या विराट वर बरसावणार होती तीच तिलाच ठाऊक...
आणि तोच तिच्या बडबडीत सुमधुर ओळी ऐकू  आल्या तशी ती शांत झाली.  आणि लक्ष देऊन ऐकू लागली.

"मोगऱ्याला जसा गंध येतो
नवा गार वारा वनी वाहताना
मनसखा मी तुझी होत जातो
तुला सांजवेळी पुन्हा पाहताना..."

विराट च्या ह्या काव्याचे ओळी ऐकून जणू मुग्ध झाली होती. मग विराट पुढे बोलू लागला.

" आपण एकाच वर्गात ना... मी कॉलेजला येतो. तू क्वचित येतेस, पण मला आपल्या वर्गातले सगळे जण माहिती आहेत. तू छान आहेस. मी तुझ्याशी कधी स्वत:हून बोललो नाही, पण तू मला अगदीच अनोळखी नव्हतीस. मी फोटो काढायला बागेत गेलो होतो. तिथे फुलांचे फोटो काढत होतो. तेव्हा तू तिथे आलीस आणि फुलांमध्ये इतकी हरवून गेलीस आणि तुला पाहून मी तुझ्यात हरवून गेलो. मी तुझे फोटो कधी काढले मलासुद्धा कळलं नाही गं. तू इतकी सुंदर दिसत होतीस. इतकी सुंदर हसत होतीस. एकदम निरागस हसू. मी फोटोग्राफर आहे गं. काहीही सुंदर दिसलं की त्याचे फोटो काढतो. इतकी सुंदर फुलं होती, पण त्या फुलांवरून माझं लक्षं बाजूला गेलं आणि मला फक्त तू दिसत होतीस. त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहिलं होतं तुला."

शेवटी आपण काहीतरी चुकीचं बोललो हे विराटला जाणवलं आणि सारवासारव करत तो परत बोलायला लागला, "तुझ्या प्रेमात नाही म्हणजे, तुझ्या हास्याच्या प्रेमात पडलो. नंतर कोणता फोटो स्पर्धेत द्यायचा हे ठरवत असताना तुझ्या फोटोसारखा एकही फोटो मला मिळाला नाही. मग तुझाच फोटो दिला आणि बघ, त्याच फोटोला पहिलं बक्षिससुद्धा मिळालं."  इतकं बोलून विराट हसला आणि शांत झाला. स्वराला पण खरं तर तो फोटो खूप आवडला होता.

इतके सुंदर फोटो काढतो मग माणूस म्हणून पण तो चांगला असेल अशी खात्री तिला झाली होती. त्यात एकाच वर्गातला. म्हणजेच अगदीच अनोळखी नाही. विराट विश्वास ठेवण्यासारखा सुद्धा वाटला होता. स्वरा मनातून खुश झाली होती, पण काय बोलायचं ते तिला कळेना.

" तू काही बोलत नाहीस. मी सॉरी म्हणालोय गं. आणि खर सांगू का, मला तू आवडतेस. तू कधीतरी कॉलेजला आलीस की दिसशील म्हणून मी न चुकता कॉलेजला येतो. तुझा फोटो काढल्यापासून तर तुला रोज भेटायची ओढ असते मला. भेटायची नाही... पहायची! तू दिसलीस की तुलाच पाहत बसायचो. पण तुझ्याशी बोलायची हिंमत मात्र कधीच नाही झाली. जर आपण भेटलो नसतो तर तू माझ्या मनात राहिली असतीस. पण आज भेटलो म्हणून सांगितलं माझ्या मनातलं. आणि जेव्हा तू मला बागेत दिसलीस, तेव्हापासून तर फक्त तू आणि तूच आहेस माझ्या मनात..."

हे स्वरासाठी काहीतरी भारी होते. विराटने तिचा फोटो न सांगता काढला आणि त्या फोटोला बक्षिससुद्धा मिळालं होतं. याआधी प्रेम हा विषय तिच्यासाठी नव्हता, पण समोरूनच प्रेमाची कबुली येणे हे मात्र आनंददायी होतं.

"सगळयात आधी, इतक्या छान फोटोसाठी थँक्यू. मला याची एक कॉपी हवी आहे आणि तू म्हणालास तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण मी तुला पहिल्यांदा भेटले आहे. सो लगेच \"आय लव यु \" म्हणू शकत नाही. पण तू छान वाटतो आहेस. आपण भेटत राहू. जर खरंच प्रेम असेल तर ते काही दिवसात कळेलच मलासुद्धा. मला तुझा सहवास आवडला तर नक्कीच पुढे जाऊ शकू." स्वरा हसून बोलली.

झालं ते सगळं दोघांसाठी अनपेक्षित होते, पण जे झालं ते एकदम मस्त आहे. स्वराचं बोलण ऐकून विराटसुद्धा खुश झाला. दोघे ही अगदी सातव्या आसमंतात होते.

विराट चे वडील त्याच्या रूम मध्ये आले. विराट शांत झोपलेला बघून त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

विराटच्या चेहऱ्यावर झोपेत सुद्धा क्युट शी स्माईल आली होती. टेन्शन मध्ये दिसणारा रौद्ररूपी विराट झोपेत अगदी निरागस बाळासारखा दिसतो.

त्याचा चेहरा मोहरा पूर्ण वडीलांसारखं होता पण फक्त वडिलांच्या अवैध व्यवसाय मुळे आईच्या हट्टापुढे आणि आजोबांच्या प्रेमामुळे वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला होता.

वडिलांच्या स्पर्शाने विराट ला जाग आली पण तो तसाच पडून राहिला... त्याला आठवलेल्या स्वराच्या गोड आठवणी आणि वडिलांचा प्रेमळ हात यात तो सुखावून गेला होता.

इतक्या दिवसाच्या गलक्यात तो स्वराच्या आठवणी साफ विसरला होता. आणि त्यांने इतक्या दिवसात एकदा ही स्वराची आई आणि भावाची चौकशी केली नव्हती. आणि तो खडबडून जागा झाला.

" झाली झोप विराट राजे..?" प्रताप सिंग म्हणाले.

" डॅड तुम्ही कधी आलात.?" विराट ने मोठी जांभई देत विचारलं.

" आताच आलो, आज खूप दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं.  नाहीतर गेलं सहा महिन्यात आमच्यामुळे तुमच्या डोक्याचे ताप वाढलेत."

" नाही डॅड... तस काही नाही.." विराट चाचरतच म्हणाला.

" विराट राजे, तुंमचे डोळे सरिता सारखे बोलके आहेत. न बोलता सगळं काही बोलून जातात."  प्रताप सिंग पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाले.

" डॅड..!" विराट ने प्रताप सिंग च्या खांद्यावर डोकं ठेवल.

" स्वराच्या घरच्यांची काळजी घेत आहात ना..?" प्रताप सिंग ने विचारले.

" हो, पण एवढ्यात वेळच नाही मिळाला चौकशी करायला." विराट म्हणाला.

" हो , पण आठवण ठेवा मात्र...! आणि जे डी चा विषय सोडून द्या..आणि माझ्यासोबत उद्या मीटिंग साठी चला.." प्रताप सिंग म्हणाले.

" डॅड , तुम्हाला ही माहिती आहे की मी इथे फक्त भाई ठीक होई पर्यंत आहे. त्या जे डी ला तर मी सोडणारच नाही. आणि ह्यापेक्षा जास्त   अपेक्षा नका ठेवू. " विराट म्हणाला.

" म्हणजे तुम्ही मीटिंग अटेंड नाही करणार तर.." प्रताप सिंग म्हणाले.

" डॅड..!तुम्ही प्लिज नाराज नका होऊ. " विराट समजावण्याचा स्वरात म्हणाला.

" ठीक आहे राजे, मी तुम्हाला फोर्स नाही करणार.." प्रताप सिंग म्हणाले.

तेवढ्यात राज तिथे आला. आणि प्रताप सिंग दोघांसोबत जुजबी बोलुन तिथून निघून गेले.क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing