Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रूएल स्टार #२.०

Read Later
दि क्रूएल स्टार #२.०


जेडी... जेडी... जेडी...!

टेबलावर सगळ्या वस्तू सारून खाली पाडून तोडफोड केली. अगदी अस्ताव्यस्त होऊन दोन्ही हातानी विराट ने चेहऱ्यावर हात फिरवून केस मागे सारले.

आणि धाडकन आराम खुर्चीत बसला. भूतकाळात अडकून पडलेल्या विराट चे विचार त्याच्या हातातल्या स्टोन पेक्षा जोरदार फिरत होते. गेल्या सहा महिन्यात एक ही क्षण शांततेत गेला नाही की व्यवस्थित झोप लागली नाही..

एकच प्रश्न सतावत होता... कोण आहे हा जेडी आनि कुठं असेल... अगदी आकाश पाताळ एक केलं होतं त्याला शोधण्यासाठी...! त्याच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं होतं. ज्या साठी त्याच्या आजोबांनी त्याच्या वडिलांन पासून त्याला दूर ठेवले होते तीच गोष्ट आजोबा आणि भावामुळे त्या गर्तेत त्याला ओढवून आणलं होतं. सगळं काही अगदी भकास वाटत होतं.

त्याची चेअर जोरात मागे पुढे होत होती. आणि दरवाजा उघडण्याच्या आवाजाने तिचा वेग मंदावला.

आणि समोर एलिस ला बघून तो जरा वैतागलाच.
" ओह... नॉट नाऊ..!"
एलिस दरवाजातून शांतपणे आत आली.

" हेय ... विराट..!"
तिचा आवाज ऐकून त्याने रागाने डोळे बंद केले. इंफॅक्ट त्याला ना तिचा आवाज ऐकायचा होता ना तिचा चेहरा बघायचा होता.

मुळात ती विराट सोबत ह्यासाठी लगट करी की ती जाणून होती की आर्यन कधीही बरा हाऊ शकत नाही आणि माफियांन मध्ये आपली जरब कायम ठेवायची असेल तर विराट ला बॉस बनवावं हे एलिस च्या वडिलांनी म्हणजे मायकल ने प्रताप सिंग ला सजेस्ट केलं होत. आणि एलिस ही एक पायावर विराट सोबत एंगेजमेंट ला तयार होती.

खरतर ती त्या बॉस ह्या किताबासोबत लग्न करायचं होतं. बॉस ची वाईफ म्हणजे काय ती जाणून होती. आणि ती त्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते ही विराट ला खात्री होती.
तीच सौंदर्य, तिची सावरण्याची कला, बोलण्याचं चातुर्य, तिची हुशारी ह्या सगळ्या गुणांनी आर्यन च्या फॅमिली ला तिने भुरळ घातलीहोती.

पण तिचा कोतेपणा मात्र विराट च्या चाणाक्ष नजरेतून सुटला नव्हता. एक महिना ओढत ताणत अति दुःखच नाटक तिने केलं आणि सगळ्याच्या भल्यासाठी आर्यन च्या प्रेमाचं त्याग करून तिने विराट सोबत लग्न करायचं प्रस्ताव मांडून खोटा आव आणला.  

आर्यन च्या कठीण प्रसंगी त्याची साथ सोडून विराटच्या पाठी लागली. ती तिच्या वडिलांन प्रमाणेच धूर्त होती. विराट ने कित्येकदा तिला झिडकारून दूर केलं पण तिने त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही.

तो तिला अगदी वैतगला होता.

तो डोळे बंद करुनच खुर्चीत मागे पुढे होत होता.
" तू का आलीस इथे..!"
तो वरवर शांत वाटत असला तरीही त्याच्या आत आगीच्या ज्वाला धगधगत होत्या.

" आय वॉन्ट टू टॉक टू यू ऑन इंपोर्टनंट टॉपिक..!" ती धीर एकवटून बोलली. आज विराट शांत वाटत असला तरीही ही वादळपूर्वीची शांतता आहे ते ती जाणून होती.

" कशाबद्दल...!"
बंद डोळे असलेल्या चेहऱ्याकडे अगदी कुतूहुलने पाहत होती. त्याचा तो रेखीव चेहरा, निळे डोळे, टोकदार नाक, डोळ्यांतील जरब, रुबाबदार चेहरा, पिळदार शरीर ह्यावर ती त्याला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हाच भाळली होती.

" अबाऊट अस..." तिच्या तोंडून कसाबसा आवाज निघाला.

" काय... देर इज नो सच थिंग लाईक अस एलिस...!" तो डोळे उघडून जरा रागातच बोलला.

त्याच्या आवाजातील धार ओळखून तिने डोळ्यांत आसव दाटून त्याकडे जरा चमकून पाहिलं . " व्हाय...?"

तिने त्याच्यातला राक्षस जागा केला होता आणि त्या राक्षसाने हिला हिची जागा दाखवुनच देतो अगदी प्रणच केला होता. तो ताडकन उठला आणि त्याची खुर्ची मागे कोलमडून पडली. ती दचकली पण तसं तिने चेहऱ्यावर न दाखवता डोळे भरून त्याकडे पाहू लागली.

तो उठून तिच्या कडे चालू लागला तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिचे हावभाव पाहू लागला पण एलिस अत्यंत हुशार की तिने एक लकेर ही चेहऱ्यावरून ढळू दिली नाही.

" तुज्या ह्या इनोसं ट चेहऱ्याने तू बाकीचना वेड्यात काढशील... मला नाही..! तुज्या डोक्यात काय सुरू आहे हे मला कळत नाही असं वाटतं का तुला...?" तिच्याकडे रागाने बघत म्हणाला.

" आपण दोघे ही आतून तुटलो आहोत... प्रताप अंकल ने इतक्या मेहनतीने मिळावलेलं सगळं तुज्या वागण्याने धुळीत मिळेल.. बी प्रॅक्टिकल...! आपण दोघे मिळून आर्यन वर जी बितलीय त्याचा बदला घेऊ..."
ती निर्लल्ज पणे अजून जवळ येऊन विराट चा चेहरा दोन्ही हातात घेऊन बोलली तसा तो मागे सरकला.

" भाईच्या नावाखाली स्वतःचे इंटेशन लपवण्याचा प्रयत्न करतोय तू... तुज्यासारखी सेल्फीश मुलगी मी आजवर पहिली नाही... !" लालबुंद डोळ्यांनी तो तिच्याकडे एकटक पाहत होता.

" हो आहे मी सेल्फीश...! एक अर्धमेल्या व्यक्तीबरोबर असुरक्षित आयुष्य घालवायच नाहीये मला...! " ती ओरडली.

सटक..!

विराट ने तिच्या कानाखाली ठेवून दिली . आणि स्वतःचा हात झटकून वळून भिंतीवर बुक्क्यांनी मारू लागला. " निघ इथून..! आताच्या आता..!" जवळजवळ खेक्सला तो तिच्यावर.

वेदनेने तिचा हात नकळत तिच्या गालावर गेला. तिचे शब्द घशातच अडजून पडले. तिने कसंबसं विराट कडे बघितलं. आणि जाऊ लागली.

तोच पुन्हा थांबली.
"डिड यू जस्ट स्लाप मी...?"
तिच्या बोलण्यावर हसावं की रडावं हेच त्याला कळेना... हातातील स्टोन कपाळाला रगडत तो तिच्यासमोर गेला आणि खाडकन उलट्या हाताची ठेवून दिली. आता त्याचे पेशन्स संपले होते.

" तुला माझ्या रूम मध्ये नको येऊ कितीदा सांगून ही इथे येऊन इरिटेट करते...! माझ्यावर डोळा ठेवून वर तोंड वर करून सांगते की तू भाई वर प्रेम करते...! आय वूड नेव्हर मरी टू स्लट लाईक यू...! आणि राहिला भाईच्या प्रश्न तर त्याचा बदला घ्यायला मी अजून जिवंत आहे...गेट द हेल आऊट ऑफ हिअर. !" विराट तिच्यावर जोरात ओरडला.

" यू विल पे फॉर दिस..."  ती घाबरतच थरथरत्या ओठांनी अस्पष्टस म्हणून तिथून रागाने निघून गेली. आणि समोरून येणाऱ्या राज ला धडकली.

तिला फणकाऱ्यात बाहेर जाताना तिचा लाल झालेला गाल बघून राज ने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं आणि डिवचल... तशी ती अजूनच जास्त चिडली आणि बडबड करत रागाने निघून गेली.

तितक्यात दरवाजा च आवाज आला...

" आय सेड .. गेट लॉस्ट...!" विराट शक्य तेव्हढा जोरात ओरडला.

" ओह भाई... कूल विरु... ! "
विराटच्या फुत्कारलेल्या नाकपुड्या आणि लालबुंद डोळे आणि आवळल्या मुठी बघून राज ने अंदाज केला की फायनली एलिस ने ऑफिशिअली विराट चा मूड आज ही खराब केला...!

राज ला बघू विराट जरा शांत झाला.
"ग्रेट जॉब यार..! योग्यच केलंस...! तिला कुणीतरी तिची जागा दाखवून द्यायलाच हवी होती. "

तसा विराट राज कडे वळला, " शी इज लकी... नाहीतर ती आज ढगात असती.." आणि त्याच्या आराम खुर्चीत बसला. झोपेचा अभाव आणि इतक्या दिवसांचा तणाव मुळे त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता. त्याला झोपेची नितांत गरज होती.

राज त्याच्या बाजूच्या काऊच वर बसला आणि त्याला प्रेमाने थोपटल... विराट ने डोळे मिटून मान मागे झोकून दिली.

" विरु... गुड न्यूज आहे..."
तसा विराट अलर्ट झाला.

" सी ...! आय डोन्ट नो अँड आय डोन्ट अंडर् स्टँड हा जेडी काय चीज आहे आणि कसा दिसतो...कुठे राहतो...पण दोन तीन महिन्यात तो करवीरला येणार आहे अशी खबर मिळाली आहे. " राज ने शांतपणे विराट कडे बघ त त्याला मिळालेली माहिती सांगितली.

" हम्मम...!" विराट च्या डोक्यातले चक्र फिरू लागले.

" हा जेडी जो कुणी आहे तो खूप हुशार आहे आणि मला खात्री आहे तो त्याच्या प्रत्येक प्लॅन ची खूप गुप्तता पाळून आहे...त्याच्या स्वतःच्या माणसांना माहिती नाही की तो नक्की कोण आहे आणि काय आहे..!"

" राज आपण करवीरला जातो आहोत..!आज रात्री लगेच..." विराट त्याचा डिसीजन सांगून मोकळा झाला.

" लुक अट यू ब्रो...! काय हालत झाली आहे तुझी इतका दिवसात...आपण फक्त एक क्लू ची वाट बघत होते आणि तो आपल्याला मिळाला... लेट मी सी फर्स्ट...मी जातो आणि बघतो ...खात्री करून येतो...त्यानंतर तू ये..." राज ने त्याला अगदी प्रेमाने समजावलं. त्याच्या डोळ्यात विराट विषयी काळजी दिसत होती.

" बट राज ...!"

" प्लिज ट्राय टू अंडर स्टँड... इथे कुणीतरी असण जास्त गरजेचं आहे..!"

वडिलांनी वाढवून ठेवलेला पसारा आणि सगळ्यांच्या सेक्युरिटी ची जबाबदारी त्याला घेणंच होती. निदान भाई बरा होत नाही तोपर्यंत तरी.

विराट ला ही त्याच म्हणणं पटलं आणि तो ही आता हलकं फील करत होता.

" येतो भाई... टेक केअर...!" गोडशी स्माईल देऊन राज निघून गेला.

विराटने त्याचे जड झालेले डोळे मिटून घेतले... कदाचित आज इतक्या दिवसांनी त्याला निवांत झोप लागणार होती.


क्रमशः

(अजून ही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत... कोण असेल हा जेडी ...?  विराट त्याला शोधू शकेल का... ? आर्यन च्या ह्या अवस्थेला कोण जबाबदार असेल...? यामागे एलिस तर नाही... तिचा पुढचा प्लॅन काय असेल...? विराट ह्याचा शोध घेउ शकेलं काय...? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टे ट्यून विथ मी...) 

टीप : ह्या सिरीज ला चांगला प्रतिसाद मिळाला तरच सुरू राहील.


प्लिज नोट: सदर कथा ही काल्पनिक असून तिचा कोणत्याही सत्य घटनेशी काहीही संबंध नाही ह्याची नोंद घ्यावी. संपूर्ण हक्क राखीव.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing