Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रुएल स्टार #१.०

Read Later
दि क्रुएल स्टार #१.०


प्लिज नोट: सदर कथा ही काल्पनिक असून तिचा कोणत्याही सत्य घटनेशी काहीही संबंध नाही ह्याची नोंद घ्यावी. संपूर्ण हक्क राखीव)धाड...! धाड.....! धाबाक...!
पीटर खुर्चीत बसून बांधलेल्या व्यक्तीला अगदी बेताल पणे मारत होता. त्याच्या तोंडातुन रक्ताची धार वाहत होती. अर्धवट डोळे मिटलेल्या अवस्थेत खुर्चीत मान वाकडी करून निपचित पडला होता. त्याचा श्वास मंद झाला होता. त्याला बघून पीटर अगदी रागाने लाल निळा झाला होता.

इतका टॉर्चर करून ही तो काहीच बोलत नाही हे बघून पीटर ने त्याचा घाम पुसला आणि कसून त्या खुर्चीला लाथ मारली की तो व्यक्ती खुर्चीसह धाडकन तीन फूट लांब गेला. तो व्यक्ती वेदनेने अक्षरशः कळवळला.
हे बघून पीटर आणि त्याचे  सोबती त्याच्यावर मिश्किल पणे हसू लागले.

तेवढ्यात धाडकन दरवाजा उघडला आणि दरवाजातून एक व्यक्ती आत आली आणि सगळे चिडीचूप झाले. त्यांच्या बॉस चा दुसरा मुलगा विराट सिंह अगदी एखाद्या घायाळ वाघाने बघावं तस तो सगळ्यांकडे नजरेने तोडत होता...

काही वेळा पूर्वी हसणारे सगळ्यांची ती नजर बघून तारांबळ उडाली होती आणि सगळे घाबरून खाली मान घालून उभे होते.
इतकी भयाण शांतता पसरली होती की फक्त विराटच चालताना बुटांचा आवाज तेवढा येत होता. त्याने सगळ्यांकडे एकदा नजर फिरवली.

" एनी प्रोग्रेस...?"  विराट चा दमदार आणि जरबी , विजेसारखा कडाडणारा आवाज ऐकून पीटर ला घामच फुटला. त्याने आवंढा गिळला. अर्थात उत्तर काय द्यावं ह्यानेच त्याची चांगलीच तंतरली होती.

"न... नो.... नो .. नो बॉस..!"

" हम्मम.... " हनुवतीवरून हात फिरवत त्याने एक कटाक्ष त्या खुर्चीत पडलेल्या माणसावर टाकला.

" गेले दोन दिवसात एक शब्द ही नाही बोलला ..." पीटर कडे मान वळवत प्रश्न केला.

" नो बॉस..." पीटर उत्तरला.

" किल हिम ..."

विराट चे हे शब्द ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले आणि चमकून त्याच्याकडे बघू लागले.

गेले दोन महिने दिवस रात्र एक करून विराट ने जे डी चा शोध घेत होता आणि तेव्हा कुठे त्याची दोन माणसं हाती लागली होती. आणि त्यातला एक तर हातून निसटला. आणि जो हाती लागला तो मात्र तोंडातून एक अक्षर काढत नव्हता. सगळ्या पद्धतीने टॉर्चर करून झालं होतं.

त्याला जीवंत ठेवण गरजेचं आहे हे विराटला ही माहिती होत . आणि तेव्हड्यात विराट ने जॅकेट मधून त्याची पिस्तूल काढली आणि ट्रीगर दाबला... त्या भयाण शांततेत ट्रिगर चा आवाज ही खूप मोठा वाटू लागला होता. आणि तो आवाज ऐकून खुर्चीत अर्धमेला पडलेला व्यक्ती जोरात ओरडून विराट कडे घाबऱ्या नजरेने बघून प्राणांती व्याकुळ होऊन भीक मागू लागला .
" प्लिज... प्लिज... डोन्ट किल मी...! "

केविलवाणा नजरेने विराट कडे पाहून बोलला , "मुझे कूछ नहीं पता ...!"

तितक्यात विराट चा फोन खणानंला...
विराट त्या व्यक्ती वरून पापणी न हलवता कानाला लावला आणि त्याचे डोळे चमकले.
" नाऊ ... बेसमेंट...!" इतकं बोलून फोन ठेऊन दिला.

विराट ने जरा वेळ त्या माणसाला पाहिलं
आणि थोडाच वेळात दरवाजा पुन्हा उघडला. राज एका व्यक्तिला डोक्याला पिस्तुल लावून आता ढकलतच घेऊन आला.

विराट ने एक नजर त्या माणसाकडे बघून त्याचा पिस्तूल चा हात फिरवून खुर्चीवरच्या माणसाकडे फिरवून धाड धाड... तीन गोळ्या त्या व्यक्तीच्या छाताडत ठोकल्या.
सगळेच गारद झाले होते.

राज सोबत आलेला व्यक्ती थरथरत झाला प्रकार बघत होता.  राज थक्क होऊन विराट कडे बघू लागला आणि बेसमेंट मध्ये सगळेच अवाक झाले होते पण कुणीही विराट ला प्रतिप्रश्न करण्याची हिम्मत नव्हती. अगदी राज ची सुद्धा...

विराट कडे प्रश्नार्थक नजरेने पाहणाऱ्या राज काही बोलणार तोच त्याला हातानेच थांबवून अंगार बरसवणार्या नजेरेने राज च्या सोबत च्या व्यक्तीवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि धाडकन दरवाजा आदळून खाड खडा बूट वाजवत निघून गेला...


राज ला नक्की काय करायचं हे समजलं... आणि का नाही कळणार... दोघे ही लहानपणी पासून सोबत जे वाढले होते. विराट ला त्याच्या फॅमिली पेक्षा जवळ राज होता. त्याला काय हवं नको ते सगळ फक्त राज ला कळायचं. त्याला सर्वतोपरी ओळखणारा फक्त राज होता. अगदी त्याला सल्ला देण्याची हिम्मत फक्त राज मध्ये होती.

" चला आता तुमचा पाहुणचार करू...!"  राज ने त्या हातात पकडलेल्या व्यक्तीला पीटर कडे ढकलला आणि तो मेलेला व्यक्ती कडे बघत डोक्याला बोटांनी चोळत ओरडला...
" कमोन... क्लीन अप यार..!"

तसे दोघे जण पुढे आले आणि डेड बॉडी उचलून घेऊन गेले.

पीटर ने त्या व्यक्तीला एक खांबाला उभा केला.
" इसे आप देखेंगे या मे देखू..." पीटर एकदा राज कडे आणि एकदा त्या व्यक्तीकडे बघत म्हणाला.

" आधा काम तो हो चूका है... बाकी याला मी पाहतो...." आणि राज ने पीटर ला नजरेनेच इशारा केला. तसा पीटर आणि टीम बाहेर पडली. 

दोन मिनिटं त्याला चांगलाच न्याहाळत पायानेच खुर्ची सरळ केली आणि तिची मागची बाजू पुढे करून त्यावर आरामात बसला.

" सो ... शाल वी स्टार्ट...!"

बेसमेंट मधून आल्यावर विराट सरळ जिम मध्ये गेला.
त्याचा सगळा राग तो पंचिंग बॅग वर काढत होता. म्हणता म्हणता दोन तास होत आले होते. नेहमीचीच सवय..!
त्याच मन भूतकाळात हरवलं...

सहा महिन्यांपूर्वी सगळ कसं  व्यवस्थित होत..! किती सॉरटेड होत आपलं लाईफ... गेली पंधरा वर्षे तो आजोबांसोबत इंदापूर ला राहायचा. त्याची आई त्याच्या लहानपणीच गेली.

वडील छोटे मोठे ड्रग माफिया असल्याने त्याच्या आईच त्यांच्यासोबत कधी पटल नाही आणि ते वेगळे झाले. मोठा मुलगा आर्यन वडिलांसोबत वाढला आणि विराट आजोळी. आणि आई गेल्यानंतर त्यांचं सूत बिलसोन म्हणजे रशियन माफियांच्या मुलीसोबत जुळलं आणि त्या साम्राज्याचे बिग बॉस झाला.

बिलसोन ने सगळे अधिकार प्रताप सिंग म्हणजे विराट च्या वडिलांना दिले. नेटवर्क  वर्ल्ड वाईड असले तरीही मुक्काम पोस्ट मात्र इंडियात मलकापूर मध्ये होता. रुबी पासून त्यांना फक्त एक मुलगी होती. तीच नाव ग्रेस. पण ती ह्या सगळ्या गोष्टी पासून अनभिज्ञ होती. कदाचित त्यामुळेच ती विराट ची लाडकी बहीण होती.विराट जन्मजात हुशार असल्याने त्याला शिकण्यास जास्त त्रास झाला नाही. पण त्याचा रागीट स्वभाव आणि निष्काळजी वृत्ती मात्र ह्या सगळ्यात अडथळा आणत होती.

कुणाचेही फुकटचे सल्ले कधीही ऐकून घेत नसायचा आणि राग अनावर झाला तर तोड फोड फिक्स असायची. त्यामुळं कुणीही त्याच्या आजूबाजूला ही फिरकायच नाही.

सहा महिने पूर्वी विराट आजोबांसोबत त्याच्या भावाच्या म्हणजे आर्यन च्या एंगेजमेंट साठी मलकापूर मध्ये आला होता. नेहमी तो वर्षभरात एक-दोनदा सुट्टीच्या दिवसांत यायचा पण ह्यावेळी आर्यन च्या जबरदस्ती मुळे आर्यन च्या लग्नासाठी बरेच दिवस राहणार होता.

सगळे खूप खुश होते. आर्यन ची एंगेजमेंट प्रताप सिंग च्या पार्टनर ची मुलीसोबत म्हणजेच एलिस सोबत होणार होती. ती आणि आर्यन गेले चार पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते.

त्याच दिवशी आर्यन ची बॉस म्हणून अनौनसमेंट करायची होती. त्यात विराट ही येणार म्हणून प्रताप सिंग जरा जास्तच खुश होता विराट मुळे त्याची जरब अजून च वाढणार होती. एकंदरीत सगळेच खूप खुश होते. पण ह्या सगळ्या आनंदावर विरजन पडलं आणि आर्यन ला सकाळपासून च कुणीतरी किडण्याप केला होता.

पूर्ण दिवस त्याचा काहीच पत्ता नव्हता. सगळं वातावरण तापलं होत..! मध्यरात्री झुडुपात त्याला कुणीतरी फेकून दिलेलं आढळलं. त्वरित डॉक्टर बोलवून उपचार सुरू केले पण त्यावर ड्रग्स चा भयानक मारा करु न त्याला परालाईझ केला आहे असं निष्पन्न झाल....!

संपूर्ण घर शोकात बुडाल. आर्यन ना बॉस बनवून स्वतःचा दबदबा बनवण्याचं स्वप्न प्रताप सिंग च अगदी धुळीस मिळालं..!
रुबी सावत्र असली तरी लहानपणी पासून तिनेच आर्यन चा सांभाळ केला होता आणि आर्यन चा आईवर विशेष जीव होता. त्याची ही अवस्था बघून ती तर अगदी सुन्न झाली होती.ग्रेस ची तर हालत अगदी पंख छाटलेल्या पाखरंगत झाली होती.

विराटच्या आजोबांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांना परलिसिस चा अटॅक आला. सगळ्या घराला जशी पनोती लागली होती.

जेव्हा विराट पहिल्यांदा आर्यन ला वाघासारख्या मोठ्या भावाला ह्या अवस्थेत बघून हतबल झाला होता. तो त्याचा हात हातात घेऊन बसला होता. आणि हातावर ब्लॅक मार्कर ने ठळक "जे डी " हे दोन शब्द लिहिलेली होते.

ते बघून खाडकन तो सदम्यातून बाहेर आला आणि सुडाला पेटला.
त्याने काहीही करून ह्या जे डी चा शोध घ्यायचं ठरवलं.


क्रमशः


( कोण असेल हा जेडी ...?  विराट त्याला शोधू शकेल का... ? आर्यन च्या ह्या अवस्थेला कोण जबाबदार असेल...? विराट ह्याचा शोध घेउ शकेलं काय...? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टे ट्यून विथ मी...) 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing