Nov 30, 2021
भयपट

झोपडी भाग ४

Read Later
झोपडी भाग ४

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
प्रदीप आतमध्ये आला. निशा चुलीजवळ बसली होती. जवळ जर्मनचे तीन चार डबे आणि दोन कपबशा होत्या.

" साहेब, तुम्हाला चहा करून देते. ही चहाची वेळ नाही ; पण खाण्याचं जे काही थोडेफार केलं होतं ते मगाशीच संपल‌. "

" ठिक आहे गं. बरं पण तुला हे सगळं सामान कोण आणून देतं ? " त्यानं तिथल्या एका खाटेवर बसत विचारलं.

" आणून कशाला द्यायला हवं ? माझ घर काही अगदीच जंगलात नाही. इथून पंचवीस तीस मिनिट अंतरावर वस्ती आहे. सकाळी इथून गाड्या येत जात राहतात. त्यातल्या एखादीला थांबवून जाते."

" अच्छा.. आणि पैसै ? "

" तिथल्याच एका दुकानात काम करते मी."

बोलता बोलता ती एकीकडे चहा बनवत होती, आणि तो तिला निरखत होती. चहा तयार झाला. चहा तयार झाला. तिने दोन कपात तो ओतून घेतला. एक कपबशी घेऊन त्याच्या जवळ आली. तिच्या चालण्यात एक डौल होता.

" घ्या." कपबशी त्याच्या पुढे धरत ती म्हणाली. त्याने तिच्याकडे बघत कप घेण्याच्या बहाण्याने तिच्या हाताला होईल तितका स्पर्श केला. ती जराशी बावरली ; पण घाईने हात काढण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. त्याने कप हातात घेताच हलकस स्मित करून ती परत चुलीजवळ जाऊन बसली. तो चहा पिता पिता विचार करत होता. - आपण तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिने हात काढून घेतला नाही. वर आपल्याकडे बघून स्माईलही केलं. यावरून तिला राग आला नाही हे स्पष्टच होत ; पण म्हणजे आपण मुद्दामहून तिच्या हाताला स्पर्श केल्याचं तिला समजल नाही, की ते तिला आवडलं ?

चहा पिऊन झाल्यावर निशाने कपबशा विसळून जागेवर ठेवल्या. डबे त्यांच्या जागेवर ठेवून दिले. मग ती त्या खाटेकडे येऊ लागली. खाटेवर प्रदीपच्या मागे तिची काहीतरी वस्तू असावी. प्रदीपच्या जवळ येताच त्याच्या पायाला अडखळून तिचा तोल गेला. ती त्याच्या अंगावरच पडली. प्रदीपने हेही जाणून बुजून केल होत. दोघांची नजरानजर झाली, अन् तिने लाजून मान वळवली. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल होत. तो मनोमन सुखावला. त्याने तिची हनुवटी बोटांच्या चिमटीत पकडून तिचं मुख स्वतःकडे केलं. त्याचा हात बाजूला सारून ती उठली. घाईने खोलीकडे पळाली. जरावेळ दाराच्या चौकटीत थांबून अर्धवट मागे पाहिलं. मग ती आत गेली. प्रदीप झटकन उठून तिच्या मागोमाग खोलीत शिरला.
निशा एका कोपऱ्यात भिंतीला टेकून उभी होती. तो तिच्याजवळ आला. तिचं हृदय धडधडू लागलं. डोळ्यांत निराळीच चमक आली. तिचे दोन्ही कोपर घट्ट पकडून त्याने तोंड तिच्या चेहऱ्यावर झुकवलं. क्षणभर तो भान हरवून गेला. तोच तिनं धक्का देऊन त्याला मागे लोटलं. जवळच कोपऱ्यात एक जाडजूड दोर पडला होता. तो उचलून सरकत सरकत ती भिंतीतल्याच खिडकीपाशी गेली. तो जवळ येताच त्याला तिनं खिडकीला पाठ टेकून उभ केल. खिडकीच्या एका गजात तो दोर अडकवून दोन्ही बाजूने त्याचे हात बांधले, आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या नाजुक स्पर्शाने सुखावून त्याने डोळे बंद केले. हळूहळू तिच्या हातांची पाठीवरची पकड घट्ट होऊ लागली.

" आह.." किंचित वेदनेने तो कळवळला.

कानाजवळ तिचा मंद श्वासोच्छ्वास जाणवत होता. त्याची गतीही वाढत गेली. एखाद्या हिंस्त्र पशूने धापा टाकाव्यात तसा आवाज येऊ लागला.

" हह.. सस्स.. हं
स्सस.. हह"

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing