Login

सर्कस - भितीची क्रूरता

सर्कस असते लहान मुलांच्या आनंदासाठी पण तीच सर्कस अतर्क्य अशा घटनांमुळे भयावह ठरली की त्या नंतर हत्याच प्रमाण वाढले पण रहस्यमयरित्या ते थंडावल काही वर्षांसाठी... वर्तमानकाळात परत त्याच घटना घडू लागल्या पण यावेळी मात्र या घटना सामान्य होत्या तरीही काहीतरी वेगळं होतं आणि तेच शोधण्याच आव्हान ओजस पुढे होत.‌ गुन्हयाच हे वेगळंच आव्हान त्यांच्यासमोर समोर आहे जरी त्यांचा विश्वास नसला तरी.

हेमाप्रभा बंगल्यात दोघे जण लॅपटॉप वर कसली तरी प्रतिक्षा करत होते. तेवढ्यात एक व्यक्ती आत आला.

"हर्षित रिझल्ट आला का रे त्या व्यक्तीने विचारलं."


"नाही भूषण काका अजून तरी तोच पाहत आहोत आम्ही दोघं हर्षित म्हणाला."


"कधी लागणार होता? तशी काही वेळ सांगितली होती का? ते म्हणाले."


"हो एक वाजता पण साईट ला प्रॉब्लेम येत आहे म्हणून आम्ही प्रतीक्षा करत आहोत... देवज म्हणाला."


तेवढ्यात साईट ओपन झाल्याचं हर्षित ला दिसले आणि त्याने पाहिले तिथे मोठी लिस्ट दिसत होती. दोघे आपल नाव चेक करत होते. तेव्हा त्यांना आप आपली नावे दिसली. दोघेही फर्स्ट क्लास ने पास होऊन दोघांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक संपूर्ण राज्यात मिळावला होता.‌ फॉरेस्ट ऑफिसर मध्ये त्यांच्या नोकरीच जॉइनिंग लेटर लवकरच त्यांना मिळणार होते. दोघे एकाच ठिकाणी काम करणार की नाही हे ही लवकरच कळणार होतं.


तो रिझल्ट बघून दोघेही खूप आनंद झाले खरं पण एकमेकांचा होणारा मैत्रीचा विरह आणि काकांची अनुपस्थिती त्या दोघांना ही जाणवणार होती म्हणूनच ते थोडे उदास होते. भूषण काका ही त्यांचा तो रिझल्ट बघून आनंदी झाले. दोघांच्या आई वडीलांच्या अकाली मृत्यूमुळे भूषणने दोघांचा संभाळ केला. भूषणच्या पत्नीचा ही अंत हर्षित आणि देवज च्या आई वडिलांसोबत अंत झाला. तो प्रसंग त्या घडून गेलेल्या घटनेनंतर त्यांनी कधीच आठवला नाही पण आज या दोघांच्या यशात मात्र ती नकोशी आठवण मनात तरळून गेलीच... 


काकांना असं उदास पाहून दोघेही समजले त्यांच्या समोर पुन्हा तोच प्रसंग आठवला असणार.‌ काकूंच्या आठवणीने ते व्याकूळ झाले असणार... जेव्हा काही आनंदी वातावरण असायचं त्यांना आठवण येत असे. 


"पोरांनो तुमच्या या यशाबद्दल आज काही तरी सेलिब्रेशन करा. परत तुम्ही इथे असताल, नसताल. तुम्हाला हे ठिकाण सोडून जावं लागेल... मी मात्र येथेच राहणार हे ठिकाण सोडायची इच्छा नसती तर मी ही आलो असतो भूषण काका शांत स्वरात म्हणाले."

त्या शांत स्वरातील उदासिनता दोघांना जाणवली.


"काका भले ही आम्ही दोघे कुठे ही असू पण तुम्हाला भेटायला इथे नक्कीच येणार हर्षित म्हणाला."


"होय काका तेवढंच मिळणाऱ्या सूचना आणि रागाचा खुराक वर्षभर आम्हाला तिथे नेता येईल गंमतीत देवज म्हणाला."


"काय रे मी काय फक्त सूचना देणारा किंवा रागाचा खुराक देणारा खविष्ट काका वाटलो का तुला? डोळे मोठे करत रागवल्याच्या आर्विभावात भूषण म्हणाला."

"नाही, नाही काका तुमची मस्करी करायला गेलो‌ आणि...


तुझीच मस्करी तुझ्यावर परत उलटली हर्षित देवज च वाक्य पूर्ण करत हसत म्हणाला."

यावर देवज ही हसला. 


"चला आता गप्पा कमी करा आणि सेलिब्रेशन साठी तय्यार व्हा.‌ आपण बाहेर जातोय भूषण काका दोघांना दटावत म्हणाले."

त्रिपुरा राज्य

धर्मान नगर

सब इन्स्पेक्टर ओजस ड्युटीवर निघायाच्या तयारीत होते, त्यांची पत्नी पल्लवी येत म्हणाली, "तुम्ही नेहमी प्रमाणे उशीरा येऊन लवकर जातात. धैर्य मात्र तुमची वाट पाहून कंटाळतो नेहमी, मला नाही समजावयाला आता."


"बरं ,ठीक आहे! मी बघतो आता निघतो मी खूप महत्त्वाची कामे आहेत, शक्यतो लवकरच येईल मी... असे बोलून ओजस बाहेर पडला" 


 पोलिस व्हॅन मध्ये बसून निघाला पोलिस स्टेशन कडे. ओजस आपल्या केबिनमध्ये आला, समोरच्या केस फाईल बघून त्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. गावात दररोज काही न काही गुन्हे घडत होती.‌ खुनाचे प्रकार जास्त वाढले होते आणि गुन्हेगार पटकन समोर येऊन गुन्हा मान्य करत होते हीच गोष्ट ओजस ला खटकायची. पण त्यामुळे गुन्हेचा निकाल लागला तरी गुन्हा च्या केसेस वाढतच होत्या त्यामुळे तो खूप वैतागून जात होता अगदी उशीरापर्यंत त्याला काम कराव लागत होत पण तो हे घरच्यांना सांगू शकत नव्हता तेच तेच कारण...

ओजस टेबलावरील सर्व फाईल्स चेक करत बसल्या होत्या. 


तेवढ्यात हवालदार साळवी आले आणि ओजस ला सॅल्युट करून फाईल टेबलावर ठेवून म्हणाले, "सर एक महत्त्वाची फाइल आहे आणि तिच्यावर काम परत चालू करावे अशी कमिशनर साहेबांनी आजच ऑर्डर केली."


"फाईल..?? अजून एक नवीन केस? त्रिपुरा हे गुन्हेगारी च क्षेत्र होणार अस वाटतंय मला साळवी वैतागून ओजस म्हणाला."

"नाही सर, ही केस नवीन नाही तर जुनीच आहे "द सर्कस फाईल" आणि ती परत रिओपन करायला सांगितली आहे साळवी म्हणाले."


"द सर्कस फाईल... पण त्या घटना.... त्याचा आत्ता काय संबंध साळवी?? त्या घटना आणि आत्ताचे घडणारे गुन्हे तर सामान्य आहेत व गुन्हेगार ही आपला गुन्हा मान्य करत आहेत मग असं असताना कमिशनर साहेबांनी ही केस का ओपन करायला सांगितली परत...? ओजस म्हणाला."


"सर, कारण कमिशनर साहेबांनी ही केस क्लोज च केली नव्हती... त्यांच्या काळात या केसचा ना पुरावा होता, ना कोणता गुन्हेगार सापडला. त्याला सर्व एक जोकर ची मानसिक विकृती किंवा त्यांची अमानवीय शक्ती असावी ही खात्री पटली होती. त्याने घडवलेल्या हत्याकांड ने संपूर्ण त्रिपुरा हादरून गेले होते. त्याला पकडण्यासाठी आर्मी ऑफिसर ही आले पण काही उपयोग झाला नाही तो इथून निसटला असे वाटले पण इथल्या रहिवाशांना वाटत त्यांचा आत्मा इथेच आहे त्यांच्या मंदिरात... साळवी म्हणाले."


"ही कल्पनाच असावी साळवी आणि एका जोकरच मंदिर ही हास्यास्पद कल्पना आहे... त्यांचे मंदिर उभारणारे लोक नक्कीच सामान्य नसणार मला वाटत ते वेडे असावेत, पण या गोष्टीचा अजूनही संबंध मला कळाला नाही ओजस म्हणाला."

"यांची कल्पना मला ही नाही सर मी या घटनेनंतर एक वर्षांनी इथे मी रुजू झालो असल्याने यांची कल्पना नसावी साळवी म्हणाला."


"मी कमिशनर साहेबांना भेटायला चाललो आहे तुम्ही पण सोबत चला साळवी म्हणजे गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि सरांनी ही केस परत का ओपन करायला सांगितली हे ही कळेल आणि तुम्हाला ही उत्सुकता दिसून येत आहे ओजस म्हणाला."

यावर साळवी कसनुस हसले. 


"नाही सर खरंतर असे काही नाही साळवी म्हणाले."


"ठीक आहे, ठीक आहे चला निघूया" असे बोलून ओजस पोलिस स्टेशनच्या बाहेर पडला आणि त्या मागोमाग साळवी. ड्रायव्हर ला सांगून गाडी कमिशनर यांच्या घराकडे न्यायला सांगितलं. 

काही तासांच्या अंतरावरच कमिशनर यांचा बंगला होता.तिथे पोहचल्यावर ते बंगल्याच्या आत गेले.

 कमिशनर सिंघा बाहेर पडत होते तेवढ्यात ओजस आणि साळवी येताना त्यांना दिसले. केस रिओपन बद्दल ते आले असणार यांची खात्री त्यांना पटली आणि ते परत माघारी आत गेले. बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचा पाहून ते आत गेले.कमिशनर साहेबांना समोर पाहून दोघांनी त्यांना सॅल्युट केला. कमिशनर यांनी दोघांना बसण्याची खूण केली.


कमिशनर सिंघा जवळ जवळ पन्नास वर्षांचे झाले होते. चेहऱ्यावर त्यांच्या खुणा दिसत होत्या.‌ २५ वर्षांपेक्षा जास्त पोलिस खात्यात काढून कमिशनर असलेले सिंघा निवृत्ती कडे वाटचाल करत होते. अनेक ठिकाणी पोस्टिंग झाल्यामुळे भारतातील बहुतांश भाषा त्यांना येत होत्या. त्यांचा स्वभाव कडक, शिस्तीचा असूनही ते सर्वांशी आपुलकीने वागत त्यामुळे सर्वजण त्यांचा आदर करत.


"सब इन्स्पेक्टर ओजस तुम्ही येणार हे वाटलच होत मला केस ती रिओपन केली म्हणून आणि सर्व प्रश्न घेऊन कमिशनर हसून म्हणाले."


"हो सर ! पण या केसचा आणि आत्ताच्या गुन्ह्याचा काय संबंध असावा असे मला वाटत नाही त्यामुळे ही केस परत का ओपन करायची आहे सर. अशी कोणती घटना घडली की तुम्हाला असं वाटल? ओजस सुरूवात करत म्हणाला."


"हे बघ ओजस, या घडणाऱ्या गुन्ह्याचा ॲगल आणि त्या वेळी घडलेली घटना प्रत्यक्षदर्शी जरी दिसत नसली तरीही.... त्या वेळेस गुन्हेगार गुन्हा करून संपवून टाकत स्वतःला पण गुन्ह्याची संख्या वाढत होती आणि आता हे पण तसच घडत आहे. अजून तरी मिडिया ला या गोष्टींची माहिती नाही पण लवकरच कळेल तेव्हा तु या ॲगल ने सुरूवात करावी असं मला वाटत अगदीच तश्या गोष्टींचा पुरावा नाहीच मिळाला तर... आपल्याला वेगळी कोणती पावले उचलायची ह्यांचा विचार करायला हवा नाहीतर निरपराध नागरिकांच्या होणाऱ्या हत्यांना अप्रत्यक्ष आपणच जबाबदार असू आणि या केसचा निकाल कायमचा लागायला हवा मिडिया ला कळायच्या आत सिंघा गंभीर पणे म्हणाले."


खरंतर एवढ्या गोष्टींमुळे या केसचा संबंध जोडलेला ओजस ला पटला पण कमिशनर साहेबांची आज्ञा अमान्य करण शक्य असल तरी त्याला विचार करायला भाग पडल होत.

क्रमशः

🎭 Series Post

View all