उंदराची टोपी

Story of a naughty mouse who wants to wear a cap

       एक असतो उंदीर, खोडकर, उचापती, चुलबुला. एकदा खेळत असताना , त्याला सापडतो एक कपडा. तो कपडा बघून त्या उंदराला असं वाटतं की आपण या कपड्याची टोपी शिवून घातली तर? पण आपल्याला टोपी कोण शिवून देणार? थोड्या वेळ डोकं खाजवून त्यांना सुचते एक "आयडिया". सापडलेला हा तो मळकट कपडा घेऊन तो उंदीर जातो धोब्याकडे.

उंदीर- धोबी वाले भैया , धोबी वाले भैया,  मेरा कपडा धुला दो.

धोबी- नही धुला देता !  भाग...

उंदीर- चावडी पे जाऊंगा, 4सिपाहि लाऊंगा, मार बिठआऊंगा , तमाशा देखुंगा......

धोबी- ला भाई ला!

   मग तो उंदीर धुतलेला कपडा घेऊन जातो रंगाऱ्या कडे,

उंदीर- रंगरेज भैय्या, रंगरेज भैय्या, मेरे कपडे को रंग लगा दो!

रंगारी- नही रंगा देता, भाग.

उंदीर- चावडी पे जाऊंगा ,चार सिपाही लाऊंगा, मार बिठाऊंगा, तमाशा देखुंगा....

रंगारी-ला भाई ला!

     उंदीर आता तो कपडा घेऊन जातो शिंप्याकडे

उंदीर-दर्जी वाले भैय्या, दर्जी वाले भैय्या ,मेरे कपडे कि टोपी बना दो!

दर्जी- नही बना देता ! भाग.

उंदीर-चावडी पे जाऊंगा, चार सिपाही लावूनगा, मार बिठआऊंगा , तमाशा देखुंगा.......

दर्जी- ला भाई ला!

     आपली शिवलेली टोपी घेऊन तो उंदीर जातो गोंडे वाल्याकडे

उंदीर-गोंडे वाले भैया , गोंडे वाले भैया , मेरी टोपी को गोंडे लगा दो!

गोंडेवाला-नही लगा देता , भाग!

उंदीर-चावडी पे जाऊंगा , चार सिपाही लावूनगा, मार  बिठाऊंगा , तमाशा देखुंगा........

गोंडे वाला- ला भाई ला!

     उंदीर ती आपली छान अशी टोपी घालून रस्त्याने चाललेला असतो, त्याचवेळी त्याला असं वाटतं की आपण आपल्या राजाकडे जाऊन आपली टोपी त्याला दाखवावी. उंदीर मग निघतो उंदरांच्या राजाला त्याची , गोंडे लावलेली टोपी दाखवायला.

         एक तर उंदीर त्यातच खोडकर,  उंदरांच्या राजाच्या दरबारात गेल्यावर , उंदीर राजाची टोपी बघून हा चुलबुल उंदीर स्वतःचीच शेखी मिरवायला लागतो आणि म्हणतो, " राजा कि टोपी कपडे कि , मेरी टोपी सोने कि". उंदराचे हे बोल ऐकून उंदरांच्या राजाला फार राग येतो, राजा त्याच्या सिपाही उंदरांना आदेश देतो की ह्या उंदराची टोपी हिसकावून घ्या. खोडकर उंदराची टोपी  हिसकाऊन घेतल्याने उंदीर राजाला चिडवायला लागतो "राजा को भीक लगी मेरी टोपी छीनली, राजा भिकारी, राजा भिकारी"

 उंदराचे हे उद्गार ऐकून उंदरांच्या राजाला राग येतो , आणि राजा उंदराची टोपी खाली भिरकावून देतो. त्यावर ही हा खोडकर उंदीर गप्प बसत नाही आणि म्हणतो, "राजा , राजा डर गया मेरी टोपी डाल दिया" एवढं म्हणून त्या उंदरांच्या राजाच्या दरबारातून हा उंदीर धूम पळत सुटतो.

छोट्या दोस्तांनो !दिवाळी आता सुरू झालेली आहे त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्त मजा करा ,फराळ खा आणि फटाके उडवा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

(सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)

(छोट्या बाल मित्रांनो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर तुमचे अभिप्राय नक्की कळवा आणि मला फॉलो करा)

🎭 Series Post

View all