प्रेमाचा अंकुर ( भाग ७, अंतिम भाग )

About Love
प्रेमाचा अंकुर ( अंतिम भाग)


"मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील
न संपणारी साठवण "


मैत्रीबद्दल असे छान छान शब्द लिहिले तरी मैत्री काय असते ? हे शब्दांत मांडणे शक्य नसते. त्यासाठी मैत्री ही अनुभवावी लागते. मैत्रीचे नाते हे असतेचं असे..
आणि असाच मैत्रीचा अनुभव संध्याला, अमितला आणि सर्व मित्रमैत्रीणींना येत होता.

शाळा सोडल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन मित्रमैत्रीणी आले होते. अनेक नवीन नाती तयार झाली होती. पण शाळेतील मित्रमैत्रीणी भेटल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळाचं आनंद झाला होता. संध्या आणि अमितला तर विशेष आनंद झाला होता. आणि आनंदाचे कारण ही तसेचं होते.

\"आयुष्यात परत कधी भेटू? \" हा प्रश्न मनात ठेवून दोघांनी ही खुप वर्षांपूर्वी शाळा सोडताना मनातूनचं एकमेकांचा निरोप घेतला होता.

तेव्हाच्या प्रश्नाचे उत्तर दोघांनाही आता मिळाले होते. पण दोघांच्याही मनात काही नवीन प्रश्न तयार होते ...

आयुष्य म्हणजे न संपणारा प्रश्नसंच च ...


अमित इतक्या वर्षांनी भेटल्यामुळे संध्याला आनंद तर खुप झाला होता. पण त्या गोष्टीचा तिने आपल्या संसारावर परिणाम होऊ दिला नाही. नेहमीप्रमाणे आनंदाने संसार करीत होती.

\"भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी आणि आता वर्तमानकाळातील जीवन यांत खुप फरक आहे. आपले जीवन हे फक्त आता आपल्या एकटीचे नसून आपल्या जीवनावर इतरांचेही जीवन अवलंबून आहे .\" मनात हे विचार आणि त्यामुळे जे सत्य तेचं स्विकारून जीवन जगले पाहिजे असे तिला वाटत होते.

\" अमित आपल्याला भेटल्याचा आनंद आहे ,त्याच्या बद्दल विशेष प्रेम ही वाटते. पण
आता ते आहे फक्त मैत्रीचे प्रेम .. या प्रेमात कोणतीही दुसरी भावना नाही.

शाळेत असताना अमित आवडायचा पण ते प्रेम कधी व्यक्त झाले नाही आणि पुढे तो कधीही भेटला नाही त्यामुळे पुढेही तशी संधी मिळाली नाही. आईबाबांच्या सुखासाठी लग्न करून संसाराला लागली.

लग्नाअगोदर मुलगी म्हणून आणि लग्नानंतर सून,पत्नी आर्याची आई म्हणून जबाबदारी वाढतचं गेली.

या सर्वांचा आपल्यावरील विश्वास, आपल्याकडून असलेल्या अपेक्षा ..
या सर्व गोष्टींनी आपल्यातील त्या भावनांची जागा कधी घेतली ते कधी कळलेचं नाही.

स्वतः चा विचार करायला तेव्हाही जमले नाही आणि आता तर शक्यचं नाही.

जे आहे ते छान आहे आणि मी त्यात सुखी आहे.

अमितचाही छान संसार आहे . आता आपल्या मनातील त्याच्या बद्दल ची भावना त्याला सांगून
काय उपयोग ?
त्यापेक्षा तो आणि मी एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण म्हणून बोलू शकतो, मैत्रीचा आनंद घेऊ शकतो. हे चं खुप झाले माझ्यासाठी.\"


हे चं विचार मनात सुरू असताना , तिला मोबाईल वर अमितचा आलेला मेसेज दिसला.

" मला तुझ्याशी बोलायचे आहे , तुला आता फोन करू का ? "

संध्याला तो मेसेज पाहून आश्चर्य ही वाटले आणि आनंद ही झाला. म्हणून तिने लगेचं हो सांगितले.


थोड्याचं वेळात अमितचा फोन येतो.

अमित - " हॅलो संध्या ,कशी आहेस ? "

संध्या - " हॅलो अमित , मी मजेत आहे आणि तू कसा आहेस ? "

अमित - " मी पण मजेत आहे आणि तू भेटली त्यामुळे अजून छान वाटत आहे."

संध्या - " काहीही सांगतोस. माझ्या भेटण्याचा आणि तुला अजून छान वाटण्याचा काय संबंध ? "

अमित - " संबंध आहे म्हणून तर सांगतो आहे ना ? खरचं खुप छान वाटते आहे. आणि तुला त्याचे कारण सांगण्यासाठीचं फोन केला आहे. पण माझ्या सांगण्याचा चुकीचा अर्थ काढू नको, गैरसमज नको करून घेऊ .
तुला हे सांगू की नको ? हा विचार तु भेटल्यापासून सारखा मनात येत होता. एकदा वाटायचे तुला हे सांगितल्यावर काय वाटेल ? तुला माझा राग येईल वगैरे ..
आणि एकदा वाटायचे सांगून तर बघावे मगं जे होईल ते ..म्हणजे मन तरी शांत होईल थोडेसे..
शेवटी आज थोडी हिंमत करून तुझ्याशी बोलत आहे.
काही चुकीचे बोलले गेले तर अगोदरचं माफी मागतो. "

संध्या - " अरे बापरे ! काय आहे हे ? चुक काय ? माफी काय ? किती मोठे मोठे शब्द ?
बोल ना , तुला जे बोलायचे ते बोल ना ."

अमित - " सांगायचे तर खुप काही आहे पण कसे सांगू? हे चं समजत नाही .

संध्या आपण जेव्हा शाळेत होतो ना तेव्हापासून तू मला आवडायची . तुझं दिसणं ,तुझं वागणं, बोलणं सर्व काही आवडत असे.
पण मी माझ्या अव्यक्त प्रेमाला शब्दरुपात तुझ्या समोर नाही व्यक्त करू शकलो. माझ्यात तेवढी हिंमतच नव्हती.
शाळा सोडल्यानंतर ही तुला शोधण्याचा खुप प्रयत्न केला. पण तु कधी कॉलेजमध्ये ही दिसली नाही आणि गावात ही कधी आली नाही. तुझा फोन नंबर ही नाही मिळाला.
पण तुझी आठवण नेहमी येत राहिली.
माझ्या आयुष्यात खुप मुलींनी येण्याचा प्रयत्न केला पण तुझी जागा मी कोणालाचं दिली नाही.
मी लग्नही करणार नव्हतो. घरातील सर्व लग्न करण्यासाठी माझ्या पाठी लागले होते आणि मला लग्न करावे लागले.
लग्नानंतर मी बायकोशी मनमोकळे बोलत नव्हतो.
तुझीचं आठवण येत होती.

बायकोशी असे वागूनही ती माझ्यावर खुप प्रेम करते, घरातील सर्वांशी आदराने,प्रेमाने वागते.
त्या सर्वांना ही ती खुप आवडते. आमच्या आयुष्यात ओम आला आणि मगं मी ही अगदी मनापासून नवऱ्याचे ,वडिलांचे कर्तव्य पार पाडू लागलो.
आता मी माझ्या संसारात समाधानी आहे.

पण तू इतक्या वर्षांनी भेटली आणि मनात चलबिचल झाली.

तुला मी कधीच विसरू शकलो नाही . पण आयुष्यात जे घडत गेले ते स्विकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
आता ही तुझ्यावर प्रेम आहे पण एक मित्र व एक मैत्रीण अशा नात्याचे हे प्रेम आहे.

संध्याला हे सर्व ऐकून खुप मोठा धक्काचं बसला.

काय बोलावे हे चं सुचत नव्हते.

\"त्याला ही आपल्या मनातले सांगावे का ? \"

या विचाराने ती बोलली

" तुझे बोलणे ऐकून काय बोलू हे चं सुचत नाही , तुझ्या प्रमाणे माझे ही आयुष्य तसेचं आहे.

मी तुला आवडत होती . हे तू मला जसे बोलला नाही तसेचं तू मला आवडत होता हे ही मी कधी तुला बोलले नाही आणि आपल्या सुखापेक्षा इतरांचा विचार केला आणि आयुष्य जगत गेले.

मलाही तुझी आठवण येत होती. मी पण तुला शोधण्याचा प्रयत्न केला .
पण नाही भेटला तू.

म्हणतात \"जे होते ते चांगल्यासाठीच होते.\"

समजा, आपण आपले प्रेम व्यक्त ही केले असते ,
पण आपण पुढे यशस्वी झालो असतो किंवा नाही ? आपण सुखात राहिलो असतो का ? आपल्या मुळे तुझ्या घरातील , माझ्या घरातील सुखी झाले असते का ?

सर्व चांगले झाले असते तर खरचं बरे झाले असते पण जर काही वाईट झाले असते तर ...

आणि आज आपण जसे सुखात आहोत तसे राहिलो नसतो तर..

म्हणून जे झाले ते आपले नशीब ,आपली नियती ."


तिचे हे बोलणे ऐकून अमितला ही शॉकच बसतो.

आणि देवाला म्हणतो ," देवा , काय हे ? दोघांच्या ही मनात प्रेमाचा अंकुर तर निर्माण केला पण पुढे काही मार्ग दाखविलाचा नाही, दोघांनाही भावना व्यक्त करण्याचे धाडस दिले नाही आणि पुन्हा कधी भेट घडवून आणली नाही.
आता भेट झाली तेव्हा दोघांनाही आपआपल्या संसाराची जबाबदारी ."


इतका वेळ शांत म्हणून संध्या त्याला काय झाले म्हणून विचारते.

अमित - " काही नाही जे खुप वर्षांपूर्वी बोलायला हवे होते, ते आता बोलत आहोत तू ही आणि मी ही .
पण तू कधी तुझ्या वागण्यातून जाणवू दिले नाही की मी तुला आवडतो वगैरे असे."

संध्या - "मगं तू तरी कोठे काही वागलासं तसे ."

अमित - " ते ही बरोबरचं आहे म्हणा . चुक तुझी ही नाही आणि माझी ही नाही. अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात तसेचं आपल्या बाबतीत झाले म्हणायचे.

आणि आपण पुन्हा भेटलो नसतो तर हे सुद्धा समजले नसते आपल्याला एकमेकांबद्दल."

संध्या - " हो,ना आपल्याला पुन्हा भेटवून देवाला सांगायचे असेल की ज्या व्यक्ती वर तुम्ही मनापासून प्रेम केले त्या व्यक्तीने ही तितकेचं प्रेम केले आणि दोघेही सुखात आहेत.
अजून काय हवे ? ज्यांच्या वर आपण खरे प्रेम करतो ते कोठेही असले तरी सुखात राहो असेचं वाटते ना..
तु सुखात आहे हे बघून मला चांगले वाटते आहे .."


अमित - " हो,तु बोलते आहे ते अगदी बरोबर आहे. तु सुखात आहे हे पाहून मलाही खुप चांगले वाटत आहे.
आणि आपल्या वरील चांगल्या संस्कांरामुळे आपण भावनेच्या आहारी जाऊन कोणाची फसवणूक करणारे नाही. तु आणि मी आपआपल्या लाइफ पार्टनर बरोबर प्रामाणिक आहोत . त्यांना दुखावून आपण सुखी नाही होऊ शकत. "

संध्या - " अगदी बरोबर ,
माझे ही हे चं म्हणणे आहे.
आता आपण दोघांनीही इतक्या वर्षाचे मनात साठवून ठेवलेले बोलून मन हलके केले. खुप बरे वाटले. शाळेत असताना आपल्या दोघांच्याही मनात निर्माण झालेल्या प्रेमाच्या अंकुराला आता आपण यापुढे मैत्रीचे झाड म्हणून वाढवू या आणि एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स बनू या.

जे होऊन गेले तो भूतकाळ ,तो विसरून छान अशा भविष्यासाठी आपण वर्तमानकाळ चांगला जगू या. "

अमित - " नक्कीचं ,वुई आर् बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर"

🎭 Series Post

View all