प्रेमाचा अंकुर (भाग 2)

About Love


प्रेमाचा अंकुर
भाग - २

नोकरी,सांसारिक जबाबदाऱ्या आणि मौजमजेचा शाळेचा ग्रुप असे सर्व व्यवस्थित सुरू होते. मजेत दिवस जात होते.
एके दिवशी अमितला एक कॉल आला. नंबर ओळखीचा नव्हता. त्याने कॉल रिसिव्ह केला. समोरून कोणी बोलत नाही,एकदम शांतता ..
त्याने एक दोन वेळेस नाही तर तीन चार वेळा हॅलो, हॅलो केले. मगं हळूचं आवाज ऐकू आला ."हॅलो! कोण मि. अमित आहात का ? "

अमित- " हो, मी अमित चं. आपण कोण ?"

ती व्यक्ती - "मी तुझी मैत्रीण ."

अमित - "सॉरी, पण मी ओळखले नाही,कोण बोलत आहात ?"

ती व्यक्ती- "तू सांग, मी कोण ते ?"

अमित त्याच्या आठवणीतील,ओळखीतील मैत्रीणींचे नाव सांगू लागला पण त्यातील एक ही बरोबर येत नव्हते. वेगवेगळे तर्क करून अमित त्या व्यक्तीला नाव विचारत होता पण समोरची व्यक्ती ही आपले नाव सांगत नव्हती.
समोरची व्यक्ती चांगलीचं गप्पिष्ट होती. अमित ही गप्पांमध्ये रंगत चालला होता.
ती व्यक्ती अमितला त्याच्या बद्दल सर्व विचारत होती.
कुठे राहतो? काय करतो? मुले किती ? शिक्षण, नोकरी वगैरे वगैरे..
पण स्वतः कोण याचा अमितला थांगपत्ताही लागू देत नव्हती.
पण अमितला तिचा आवाज छान वाटला ,बोलण्यातून आपलेपणा जाणवत होता. आणि त्यामुळे तिच्याशी गप्पा मारण्यात त्याला ही खुप आनंद वाटत होता. ती व्यक्ती कोण हे अमितला माहित नव्हते पण बोलतांना जाणवत होते की त्या व्यक्तीशी निश्चितच काही तरी कनेक्शन आहे..
त्या व्यक्तीला त्याची गंमत करायची होती म्हणून ती आपले नाव सांगत नव्हती. एकदा त्या व्यक्तीचे नाव ही सांगितले पण नावावर ठाम नव्हता. आणि ती व्यक्ती आपल्याला फोन करणार ? असे त्याला वाटत ही नव्हते.
गप्पा संपत आल्या. आता तरी ती आपले नाव सांगणार असे त्याला वाटले पण त्याची निराशाचं झाली. शेवटी ती व्यक्ती म्हणाली, " मी तुला मेसेज करुन सांगते मी कोण ? "
आणि अशा रितीने आगळ्यावेगळ्या गप्पांचा समारोप झाला.
ती व्यक्ती खुष होती कारण अमितची गंमत बघून तिला हसू येत होते.
आणि मैत्रीत थोडी गंमत केली तर बिघडते कुठे ?
असे तिला वाटत होते.
अमित तिच्या मेसेज ची वाट बघू लागला. पण तिने काही लगेचं मेसेज केला नाही, तिला त्याची उत्सुकता वाढवायची होती.
तो दिवस संपत आला तरीही मेसेज नाही.
रात्र झाली तरी मेसेज नाही.
अमितची उत्सुकता, बैचेनी वाढतचं चालली होती. रात्री नीटशी झोप आली नाही. त्याच्या बायकोच्या ही लक्षात आले होते की अमित शरीराने उपस्थित आहे पण मनात काही तरी विचार सुरू आहे.

रात्री उशिरा झोप लागली त्यामुळे अमितला उठायला नेहमीपेक्षा थोडा उशीरचं झाला.

सकाळची रोजची कामे झाल्यानंतर रोजप्रमाणे ऑफिसला निघण्यापूर्वी त्याने फोन हातात घेतला आणि छान असा गुड मॉर्निंग चा मेसेज आणि
" फोनवर तुझ्याशी बोलून खुप छान वाटले
आणि मला शाळेतील दिवस आठवले
जे अजूनही आठवणीत राहिले..."

असा मेसेज पाहीला.
मगं अमितने ही रिप्लाय दिला,"व्हेरी गुड मॉर्निंग ,अँड व्हॉट अ सरप्राइझ?"

ती - " आवडले का सरप्राइज? "

अमित - "आवडले ना, खुपचं आवडले ? "

ती -" म्हणजे ओळख नसतानांही तू कोणाशीही इतके छान बोलू शकतोस?"

अमित - " सर्वांशीचं नाही पण समोरची व्यक्ती कशी बोलते त्यानुसार मी बोलत असतो .आणि तूचं माझ्या बद्दल इतके विचारत होती आणि मी फक्त प्रश्नांची उत्तरे देत होतो.परिचयातील व्यक्तींविषयी बोलत होतो. विषय आवडीचे असले तर मलाही बोलायला आवडते.
बाकी तू आहे तशीचं आहे ,
जशी अगोदर होती तशीचं हसमुख,गप्पिष्ट, मनमोकळी ..."

ती - "मला वाटले तुला राग आला की काय माझा, तुझी गंमत केली म्हणून.."

अमित - " नाही गं राग वगैरे काही ही नाही पण मी तुझा आवाज नाही ओळखु शकलो ना ?"

ती - " कसा ओळखशील? आपण यापूर्वी कधी बोललो का? खुप वर्षांनी आवाज ऐकतो आहे एकमेकांचा,मी पण नसता ओळखला तुझा आवाज ..."

दोघांनाही खुप बोलायचे होते पण अमितला ऑफीसला जायचे होते आणि तिला ही सकाळची कामे उरकायची होती म्हणून दोघांनीही इच्छा नसताना एकमेकांना सी यु अगेन म्हणून बाय् केले.

मेसेजेस वाचून आणि कोण आहे हे पाहून तर अमितला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काचं बसला.

आपली गंमत करण्यासाठी वेगळ्या नंबरने फोन केला आणि आता हा नंबर शाळेच्या ग्रुप वरील आहे. म्हणून आपण फसलो असे त्याला वाटले.

मी तर अनेकदा ठरवून ही फोन केला नाही आणि मला तिने स्वतः हून फोन केला म्हणजे ....
त्याला तर इतका आनंद झाला होता की काय करु?
आनंदाने नाचू की गाणे गाऊ ? की अजून काय काय करू असे झाले होते.

"आज मैं ऊपर आसमा निचे ,जमाना हैं पिछे ...."

असेचं वाटत होते.

त्याचा आनंदी चेहरा पाहून बायको ही विचारत होती,

" एवढा चेहरा का फुलला ? काही विशेष आनंदाची बातमी? "

आता बायकोच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे सुचतं नव्हते. खोटे बोलता येत नव्हते आणि खरं कारण सांगायचे धाडस होत नव्हते.

म्हणून " काही नाही गं ,चांगला मेसेज वाचून आनंद झाला ,बाकी काही विशेष नाही ,तुला तर मी सगळं सांगतचं असतो ना माझ्या आयुष्यातील गोष्टी? माझ्या वर विश्वास आहे ना तुझा?" असे बोलून अमित ने परिस्थिती सांभाळून घेतली.

त्याची बायको - " हो,आहे ना विश्वास.. पण काल थोडासा चेहरा उदास आणि आज सकाळी एकदम ताजातवाना ,आनंदी चेहरा पाहिला म्हणून विचारले,बाकी काही नाही ..."

मगं अमितने नेहमीप्रमाणे हसतं हसतं बायकोला बाय् बाय् केले आणि चांगल्या मूडमध्ये ऑफिस ला गेला.

त्याच्या बायकोने या गोष्टीचा जास्त विचार न करता आपल्या रोजच्या रुटीनला सुरुवात केली.

दुसरीकडे ती व्यक्ती ही
खुप आनंदी होती आणि रोजची कामे करता करता विचार करत होती, आपल्याला का त्याला फोन करावेसे वाटले ? एवढ्या वर्षांनंतर शाळेतील मित्रमैत्रीणी भेटले ,सर्वांना भेटून खरचं खुप आनंद झाला पण ग्रुप वर अमित भेटला,खुप वर्षांनी दिसला फोटोरूपात ..
आता तर अजून छान दिसतो अगोदर पेक्षा...
आपण स्वतः हून त्याला फोन केला ,काय वाटले असेल त्याला ? मी काही चुक तर नाही ना केली ? पण आजच्या मेसेजेस वरुन तर कळाले की त्यालाही माझ्याशी बोलून आनंद झाला.

शाळेत असताना आपण कधी जास्त बोललो नाही एकमेकांशी . फक्त अभ्यास, परीक्षा आणि पुढील शिक्षणाचा विचार.
शाळेतील वय ही काय असते म्हणा ..
अल्लड बुद्धी असते,जीवनाबद्दल जास्त विचार नसतो,चांगले काय आणि वाईट काय हे समजत नसते.घरातील सांगतात तसे वागायचे असते.आपलं स्वतः चं मत असते हे ही माहित नसतं . मगं आपली आवड आणि निवड हे तर खुप दूरची गोष्ट.
शाळेत असताना अमित मला आवडायचा म्हणजे
इतरांपेक्षा त्याच्यातं काही तरी वेगळंपण जाणवायचं,दिसायला देखणा होताचं पण फक्त दिसायला छान होता म्हणून नाही तर त्याच्या बद्दल वेगळचं काही तरी जाणवत असे.त्याला पाहिल्यावर, त्याच्याशी कामानिमित्त कधीतरी बोलणे झाले तर छान वाटायचे . का वाटायचे असे ? फक्त आवड होती की अजून काही ?

आपल्याला अनेक व्यक्ती आवडतात पण ती आवड आणि अमितबद्दल ची आवड वेगळी चं होती ना?

शाळा सोडल्यानंतर कोण कोठे गेले नंतर काही कळलेचं नाही. मला तर पुढील शिक्षणाची उत्सुकता होती त्यामुळे पुढील शिक्षणासाठी गाव सोडून शहरात गेलो राहण्यासाठी आणि शाळेतील कोणाशी संपर्क चं राहीला नाही..

क्रमशः

🎭 Series Post

View all