Oct 24, 2021
कथामालिका

वधू संहिता भाग 8

Read Later
वधू संहिता भाग 8

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

नाशिक शहर पोलीस स्टेशन 

दिनांक : 2 जानेवारी 1980

वेळ सकाळी दहाच्या सुमारास ची.

"जय हिंद सर !" ड्युटीवर आलेल्या अजयला सब इन्स्पेक्टर दयाने सॅल्यूट ठोकला. 

"जय हिंद दया जी. खबरीं मार्फत काही खबर मिळाली का?"

"अजून तरी नाही."

"नमस्ते साब." नऊ दहा वर्षाचा, मळकट शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला एक मुलगा अजयला म्हणाला. त्याच्या हातात चहाचे ग्लास होते. त्यानं चहाचा एक ग्लास अजयला दिला. 

"शाळेत जातोस?" अजयने त्याला विचारलं. 

"हो." तो उत्तरला. 

"मग आज का नाही गेला?"

"कारण मी शाळेत गेलो असतो तर तुम्हाला हे पत्र कोणी दिलं असतं साब?" तो शर्ट मधून एक दोन तीन घड्या मारलेला कागद काढून म्हणाला. 

"दे इकडे. " सब इन्स्पेक्टर दयाने त्याला पत्र मागितलं. 

"इतकी काय घाई साब. आधी पाच रुपये द्या."

"काय? कशाला?" दयाने रागावून त्याला विचारलं. अजय फक्त त्यांना बघत होता. तो मुलगा त्याला खूप चंट वाटला. त्याने खिशातलं पाकीट काढून सहा रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले. 

"ये साब हुशार हाईत. घ्या पत्र." त्या मुलाने पत्र अजयला दिलं अन तो चहाचे रिकामे ग्लास जमा करून जाऊ लागला. 

"अरे पण कोणी दिलं तुला ते तर सांग ?" दया पांडे नी त्याला विचारलं.

"देणाऱ्याने नाव नाही सांगितलं. फक्त पत्र पोचतं केलं की पाच रुपये मिळतील म्हणून माझ्या खिशातून चार रुपये घेतले. म्हणून मी तुम्हाला पाच मागितले."

"अरे पण..." 

"असू द्या पांडेजी." दयाचे समाधान झाले नव्हते.
 पण अजयने त्याला मधेच थांबवून मुलाला सरळ शाळेत जायला सांगितलं.

"वधू संहिता आणि व्यक्तीमत्व विकास संस्था, जुहू, मुंबई. "  पत्रात फक्त इतकंच लिहिलं होतं.  

"मुंबई?" सब इन्स्पेक्टर आश्चर्यानं उद्गारले, "सर बबनच्या खिशातही नाशिक वरून मुंबईला जायचं तिकीट मिळालं ना."

"हो, आपण त्याला पकडलं नसतं तर तो इथे काहीतरी कारभार करून उद्या मुंबईला रवाना झाला असता." अजय विचार करून म्हणाला, "26 जानेवारी, गणतंत्र दिवस. आपल्या भारत देशाला स्वतंत्र गणराज्य बनून या वर्षी तिस वर्ष पूर्ण होतील. म्हणून काही कट तर रचला जात नाही ना आतंकवाद्यांकडून?"

"काही सांगता येत नाही सर." दयालाही तीच शंका आली. 

"असं दिसतंय मलाही मुंबईला जाऊन व्यक्तिमत्व विकास वर्गात दाखला घ्यावा लागेल." अजय स्वतःशीच बोलला. मग सब इन्स्पेक्टर दयाला म्हणाला, "मला जरा कमिशनर सरांना ट्राम कॉल लावून द्या बरं."

"हो."

अजयने कमिशनर सोबत काही महत्वाचं बोलणं केलं आणि फोन ठेवला. अर्ध्या तासाने परत फोन वाजला. 

"ओके सर, मी आजच निघतो." इतकं म्हणून अजयने फोन ठेवला. टेबलच्या ड्रॉवर मधून दोन पत्र काढून लिहिली व पांडेजी ला दिली. 

"म्हणजे तुम्ही मुंबईला जाणार तर?" 

"हो पांडेजी. पण ही बातमी इथून बाहेर जायला नको. इथे सर्वांना मी पाय घसरून पडलो आणि  माझ्या पायात फॅक्चर झालंय म्हणून मी घरून काम करतोय, माझ्या घरच्यांना चिंता नको म्हणून तिकडे कोणालाच कळवलं नाही, कळवायलाही नको असं सांगा. ही दोन पत्र माझ्या घरच्यांसाठी लिहून देतोय. एक आज पोस्ट करा आणि दुसरं आठ दहा दिवसांनी. म्हणजे त्यांना वाटेल की मी इथेच आहे."

"पण त्यांनी फोन करून तुमच्याशी बोलायचं म्हटलं तर?" दयाच्या मनात शंका उत्पन्न झाली. 

"तर काहीही कारण सांगा. सांगा की साहेबांनी मौन व्रत ठेवलं आहे, कामात आहे किंवा बोलायचं नाही म्हणतात. ते काही जिद्द करणार नाहीत. त्यांना माहित आहे की अजय सनकी आहे. तो कधीही काहीही करू शकतो. म्हणून ते माझ्याशी बोलायचा जास्त आग्रह करणार नाहीत." अजय पत्र लिहीत सहज बोलला. 

इन्स्पेक्टर दया मात्र त्याला न्याहाळून बघू लागला. 

"स्वतः बद्दल सर्व ज्ञान असायला हवं माणसाला." अजय त्यांना पत्र देत म्हणाला, "मला माहितेय लोकांना मी विक्षिप्त वाटतो. पण त्यातही एक मज्जा आहे."

"म्हणजे तुम्हाला लोकं तुमच्या बद्दल काही बाही बोलतात, तुम्हाला खडूस म्हणतात. त्याचं काहीच वाटत नाही?" दया पांडेने विचारलं. 

"वाटून काही उपयोग आहे का?" अजय त्यांच्या खांद्याला थोपटून म्हणाला, "जेव्हा मला माहितेय मी माझ्या जागी योग्य आहे, तेव्हा कोण काय म्हणतं किंवा माझ्या बद्दल विचार करतं, यात काहीच ठेवलेलं नाही."

"बरोबर सर."

"चला निघतो मी. आठ दिवसांनी तुम्हाला फोन करेल. तेव्हा पर्यंत सगळं तुमच्या हाती. लक्ष ठेवा."

"ओके सर."

.........................

वधू संहिता आणि व्यक्तीमत्व विकास संस्था, जुहू, मुंबई 

"अंजली !" आसू पुसत असलेल्या कविताकडे अंजलीचे लक्ष आहे हे बघून नेहाने अंजली ला आवाज दिला, "Be focused in class. Otherwise after 2-3 days you will also cry like her."

अंजलीला नेहाने तिच्या शिकवण्या कडे लक्ष द्यायला सांगितलं आहे. इतकंच समजलं. तिने कविता वरून नेहावर नजर खिळवली, "Yes mam!"

"Ok, who can give me flawless introduction in english ?"

फक्त किंजलने हात वर केला. शारदा आणि जयाचीही कविताला रडतांना पाहून फाटली होती.

"Start !"

"Good morning all my dear elegant ladies. I am Kinjal Sundarlal Gadha from Surat. I am a 2nd year student of bachelor's of Art. English  honors is my subject. Singing, painting, stitching, reading, writing & reciting poems are my hobbies. My father Sundarlal Gadha has Diamond export / import business  in Surat. My mother, Mrs Harsha Gadhal is a home maker. There are eleven members in my family, me, my parents, elder brother, uncle auntie, three cousins & grand parents. My fiancé Mr Bhavesh Jetha is a restaurant owner in Canada. After marriage I am going to accompany him in his business. I am very grateful to be with you all.  Thank you !"

"Well done Kinjal ! एकदम बरोबर  आणि योग्य आवाजात |" नेहाने किंजल साठी टाळ्या वाजवल्या. तिचं बघून इतर मुलींनीही टाळ्या वाजवल्या. किंजल आणखी मान वर करून गर्वाने हसली. 

"असं टाळ्या वाजवून काही होणार नाही. तुम्ही सर्व मुलींनी किंजल कडून अभ्यास कसा करायचा ते शिकायला हवं." नेहाने तिच्या मनगटी घड्याळात बघितलं. साडे दहा झाले होते.

"ओके गर्ल्स, CU in tomorrow's class. Do your home work."

"Cu you Madam!"

नेहा गेली | दस मिनिटच्या के ब्रेक नंतर पुढला 'व्यक्तीमत्व विकास ' चा वर्ग सुरु होणार होता. कोणी पाणी पिऊ लागलं, कोणी बाथरूम मध्ये गेलं, कोणी इंग्रजी विषय डोक्यात घुसत नाही म्हणून डोकं पकडून बसलं, कोणी नेहाला शिव्या देऊ लागलं तर कोणी इथे कशाला पाठवलं म्हणून आई बाबांचा उद्धार करू लागलं. 

अंजलीला किंजलचं असं फाड फाड इंग्रजी बोलणं पार भावलं. तिने किंजल जवळ जाऊन तिची प्रशंसा केली.

"तुम्ही खूपच छान इंग्रजी बोलता. मी तर बघतच बसले. आमच्या गावात काय, मी तर परीक्षा द्यायला सोलापूरला गेली तिथेही इतकं छान इंग्रजी बोलतांना कोणाला बघितलं नाही. इतकं छान बोलायला तुम्हाला कोणी शिकवलं? मला शिकवणार का असं मस्त बोलायला? माझ्या बाबांना खूप आवडणार मला असं बोलतांना पाहून." 

"वेट वेट.." किंजलने अंजलीला थांबवलं , " यु गाव की गोरी, इतकी फडफड का करतेय ? मी लहानपणापासून  मिशनरी स्कुल मधे शिकली आहे, तूझ्या सारखी सरकारी शाळेत नाही. तर ऑबव्हियस माझं लेव्हलही हाई राहणार."

"हे तर खूपच छान होय. मी तर चौथी नंतर घरीच शिकली. शाळेत फक्त परीक्षा द्यायला गेली. म्हणून म्हटलं मला शिकवा ना थोडं." अंजली निरागसतेने किंजलला म्हणाली. 

"काहीही, मला दिवसभर खूप कामं असतात. पूर्ण बॉडी मेंटेन करायची असते."

"बॉडी मेंटेन...." अंजलीने प्रश्नांकित चेहऱ्याने किंजलला बघितलं. 

"ओह माय गॉड ! मला खात्री आहे तु तर कधीच ब्युटी पार्लरची पायरी चढली नसेल. हा तूझ्या जाड भुवयांवरून दिसुनच येतंय म्हणा. मी माझा किमती वेळ तूझ्या सारख्या गावंढळ मुलीला शिकवण्यात का घालवू? परत प्लीज तुझा हा सडू, गवार चेहरा मला दाखवू नको. 

"....... " अंजली मान खाली घालून तिच्या जागेवर बसली. तिला किंजलचं बोलणं खूपच टूचलं. पण सांगणार कोणाला? अंजलीला वाटलं ती 'वधू संहिता' संस्थेत नवीन आलेली. तिने तर इतक्या चांगल्याने संभाषण केलं किंजल सोबत. किंजल आणखीही काही बोलू शकली असती. ती  गावातून आली म्हणून असं पदोपदी अपमान करणे तर बरोबर नाही ना. 


क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you