द बॉस- The Boss (पर्व 2- भाग 5)

"झिंगाट" In New York Club


मिस्टर रॉन अमेरिकेतील एक श्रीमंत उद्योजक आणि गुंतवणूकदार होते. मोठमोठ्या कंपन्यांना त्यांनी भरमसाठ भांडवल दिले होते. त्या जोरावर त्या कंपन्या खुप मोठ्या झाल्या होत्या. इतका मोठा माणूस आपल्याला ओळखतो तरी कसा? हा प्रश्न तनिषाला पडला. रॉन इंग्रजीतून तनिषाला सांगत होता.

"तुमच्या भारतातील कंपनीबद्दल ऐकलं आहे मी, प्रकाशन क्षेत्रात तुम्ही अव्वल आहात आणि इथेही तुम्हाला तुमचं काम सुरू करायचं आहे असं समजलं आहे.."

"सॉरी पण तुम्हाला माझ्याबद्दल इतकी माहिती कशी?"

"गुंतवणूकदार म्हणून आम्हाला सर्व क्षेत्रातील सर्व व्यवसायांची माहिती ठेवावी लागते...असो, मला हे सांगायचं आहे की आपल्याकडे वेगवेगळे फंडिंग राऊंड होतात, म्हणजेच वेगवेगळे स्टार्टअप आपली आयडिया घेऊन पिच करतात इन्व्हेस्टर्स समोर, इन्व्हेस्टर ला ज्या आयडिया मध्ये भविष्य वाटत असेल त्या कंपनीला हे गुंतवणूकदार मिलियन मध्ये भांडवल देतात. अर्थात तुमच्याकडे काही कमी भांडवल नसेल, पण तरीही त्याच्या चारपट जास्त भांडवल तुम्हाला मिळालं की अत्यंत वेगाने तुम्ही प्रगती करू शकतात..सो, मी तुम्हाला आमंत्रण देत आहे लॉस एंजेलीस मध्ये होणाऱ्या इन्व्हेस्टर्स pitch deck साठी.."

तनिषा काहीच उत्तर देत नव्हती, शेवटी मेघना पुढे होऊन म्हणाली,

"Yes sir, thanks a lot..."

मिस्टर रॉन निघून गेले, इकडे मेघना तनिषाला म्हणाली,

"मॅडम, मिस्टर रॉन ने स्वतःहून तुम्हाला आमंत्रण दिलंय.. अभिनंदन"

"कसलं अभिनंदन? मी म्हटले तरी का मला इथल्या ब्रांच साठी भांडवल हवंय म्हणून? कशाला हवाय इन्व्हेस्टर? आपल्या शब्दांतर मधून जेवढं उत्पन्न मिळतंय त्यात होईल इथे मॅनेज.."

"मॅनेज..कशासाठी मॅनेज करायचं? जर तुला करोडो मध्ये भांडवल उभं करता येत असेल तर कशाला so called \"मॅनेज\" करतेस?"

"इन्व्हेस्टर्सची कटकट नकोय यार मला.."

"ऐक माझं, भारतात गोष्ट वेगळी होती. तिथे कमी भांडवलात सर्व शक्य होतं, इथे प्रचंड स्पर्धा आहे. आणि तू कुणासमोर स्पर्धा करणार आहेस माहितीये? हे बघ, new york magazine, femina ladder, cosmos book... हे सगळे मॅगेझिन इथे कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. लोकं हे सोडून दुसरं काही बघू सुदधा इच्छित नाही, अन तू म्हणतेस भांडवल नको.."

"हे बघ, मला काही कळत नाहीये...मी सविस्तर विचार करेन गडबड"

"बरं चल, थोडी ड्रिंक घेऊ.."

"नको गं बाई...आज उपास आहे माझा.."

"कसला?"

"संकष्टीचा.."

"हे बघ, संकष्टी निघून गेलीये...इथला वेळ बघ"

मेघनाने तिला बळजबरीने ड्रिंक्स साठी नेलं आणि थोडी स्ट्रॉंग मधली पाजली..मेघना पिण्यात मग्न होती.

"So hows this?"

मेघना तनिषाला विचारते, पण तनिषा तिथे नव्हतीच...

"कुठे गेली ही??"

तनिषा सापडत नव्हतीच, वर क्लब मध्ये एकदम शांतता पसरली, music सिस्टीम मध्ये काहीतरी गडबड झाली आणि आवाज बंद झाला. सर्वजण इकडेतिकडे बघू लागले, काही वेळाने पुन्हा music सुरू झालं..मेघना तनिषाला इकडेतिकडे शोधतच राहिली..पण कानावर ऐकू येणारं music काहीसं ओळखीचं वाटलं...
Enough is my baby I’am crazy and I want you.. say
Don’t leave me ever.
Enough is my baby I’am crazy and I want you.. say
Don’t leave me ever.

ढैनढेटॅक ssssढैनढेटॅकssss ढैनढेटॅक ssssढैनढेटॅक

उरात होतंय धड धड लाली गालावर आली


आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली


आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया


आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया


उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया


झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

नाचणाऱ्यांना गाणं सारप्राइजिंग होतं, पण आवडायला लागलं..एकेक पावलं थिरकू लागली, अंगात जोर आला..लोकं वेड्यासारखी नाचू लागली...काहीजण म्हणायलाही लागली..इकडे मेघना ने डोक्याला हात लावला. तनिषाला चांगलीच चढली होती आणि तिचाच हा पराक्रम होता हे सांगायला नको..

*******

निकिता जोरजोरात हसायला लागते...
"हा हा हा...मॅडम पण ना, कितीही मोठ्या असल्या तरी त्यांच्यातला खोडकरपणा दिसून येतोय तुझ्या सांगण्यातून.."


"अगं नाना तऱ्हा होत्या त्यांच्या...चांगल्याशी चांगल्या, वाईटाचा कर्दनकाळ... कधी कधी सर्वात मोठा प्रश्न चुटकीसरशी सोडवायच्या, पण पेनाची शाई कोणती वापरायची यावर निर्णय व्हायचा नाही...मोठमोठ्या प्रॉपर्टी विकत घ्यायच्या, पण पायात 150 रुपयाची चप्पल घालायच्या...कधी काय करतील काही सांगता येत नसायचं..जबरदस्त लहरी.."

दोघी बोलत असतांना आर्या मॅडम जवळ उभ्या दिसतात, अनुष्का घाबरते. दोघीही उठून उभ्या राहतात..आर्या मॅडम काही बोलायच्या आधीच अनुष्का म्हणते,

"मॅम मी ते सहजच.."

आर्या कानातले हेडफोन्स काढते आणि विचारते,

"तुम्ही काही म्हणालात का?"

मॅम ने काहीही ऐकलेलं नाही हे पाहून दोघींचा जीव भांड्यात पडतो. आर्या निघून जाते, निकिता अनुष्काला म्हणते,

"पण आर्या मॅडम किती वेगळ्या आहेत ना..तनिषा मॅम सारख्या फारश्या ऍक्टिव्ह नाहीत.."

"काय करणार..आईने सगळं आयतं हातात दिलं..आर्याला काही संघर्ष करावाच लागला नाही. सगळं कसं सुरळीत सुरू आहे, मॅम फक्त नावाला इथे बॉस.. बाकी सगळं भैरव सर आणि टीमच सांभाळते.."

"पण मग तनिषा मॅम ने त्यांच्या हातात सगळं द्यायला नको होतं.."

"खरंय.. पण मॅमचंच रक्त ते, वेळ आली की वर्चस्व सिद्ध करतीलच आर्या मॅडम.."

***

आर्या तिच्या केबिनमध्ये जाऊन खुर्चीवर बसते, दोन्ही पाय टेबलवर एकमेकांत गुंफून सुस्कारा टाकते..केबिन कुणीतरी नॉक करतं.

"कम इन.."

तिथला एक कर्मचारी फाईल्स घेऊन मॅम कडे आलेला असतो..

"मॅम हे पुढील महिन्याचे आर्टिकल्स, एकदा नजरेखालून घाला आणि अप्रुव्हल साठी सही द्या.."

"ठेवा इथे.."

आर्या नाखुषीनेच होकार देते. कर्मचारी निघून जातो. महिन्यातून एकदा फक्त फाईल्स वर सह्या करायच्या असतात पण तेही हिला जीवावर येई. काही वेळाने भैरव सर केबीनमध्ये आले. तिला असं बेफिकीरपणे बसलेलं पाहून भैरव सरांना राग येतो. त्या खुर्चीत कायम तनिषा मॅम ला पहायची त्यांना सवय होती. त्या खुर्चीचा एक मान होता, पावित्र्य होतं... पण आता बरंच काही बदललं होतं. एकेकाळी इथली टीम जीव ओतून काम करत असे, आता फक्त कामचलाऊ... आधी इथे नवनवीन कल्पना साकारल्या जायच्या, आता मात्र फक्त आहे ते पुढे रेटण्यात येतंय... आधी एक उत्साह होता, ऊर्जा होती, तनिषा मॅम चं वलय होतं.. पण आता ...

भैरव सर कायम चिंतेत असायचे, आर्या मॅम आता आमच्या भरवश्यावर टिकून आहेत, पण उद्या वीर भोसले सारखा अडथळा आला तर? कश्या सामोऱ्या जातील आर्या मॅडम? तनिषा मॅमला भैरव सर खूप मिस करत होते.

आर्या फाईल्स चाळत असतानाच तिला तिच्या मित्र मैत्रिणींचा फोन येतो..

"हॅलो आर्या... आज वाइन फेस्टिव्हल आहे आपल्या शहरात, येतेय ना?"

"हो म्हणजे काय...येणारच.."

"केव्हा, 3 वाजता सुरू होणार आहे, आता अडीच वाजलेत.."

"अरे यार...बरं चल मी निघते लगेच.."

आर्या समोरच्या फाईल्स बघते, त्यातलं काहीही न वाचता पटापट सह्या करते आणि निघून जाते. काहीवेळाने तो कर्मचारी येऊन फाईल्स बघतो, त्यावर सह्या झालेल्या असतात..तो हसतो,

"आता होणार धमाका..!!!"

क्रमशः

🎭 Series Post

View all