एपिसोड - गुमनाम
निकिता आणि अनुष्का शब्दांतरच्या ऑफिसमध्ये काम करत असतात. निकिता अनुष्काला कोपर टोचत सारखं म्हणत असते..
"ए सांग ना ती स्टोरी.. तनिषा मॅडम कुठे गायब आहेत? कधी येणारेत?"
"जरा गप बसतेस? भैरव सर बघताय...काम कर गपचूप.."
निकिता तोंड वाकडं करत पुन्हा तिच्या स्क्रीनकडे बघून कामाला लागते. ग्राफिक्स डिजाइनिंगचं काम निकिताकडे असतं. भैरव सर मागून येतात..
"निकिता मॅडम, झाल्या का drawings?"
"हो सर, अलमोस्ट.."
"हे काम कालच व्हायला हवं होतं मॅडम, फार वेळ लावताय तुम्ही.."
"नाही सर..ते..."
"कारणं देऊ नका, पटापट कामाला लागा..पुढच्या महिन्यातले जे आर्टिकल्स फायनल झालेत ते तुमच्याकडे दिलेत, त्याला साजेसं डिजिटल drawing हवेत मला, निदान चार ते पाच, त्यातलं एखादं निवडलं जाईल, ok?"
"येस सर.."
निकिता कामाला लागते, आर्या मॅडमला रिपोर्ट द्यायचे होते. बाकी आर्या मॅडम मात्र अगदी चिल..टेन्शन घेत नाहीत आणि देतही नाहीत. आर्या... हो हो तीच...तनिषा मॅमची मुलगी..आता CEO पदावर विराजमान झालेल्या.भैरव सर आहेत म्हणून तरी जरा शिस्त आहे, नाहीतर सगळं मंगलच..निकिता मनातल्या मनात आर्या मॅडम बद्दल विचार करत होती. पण हे सगळं ज्यांनी उभं केलं त्या तनिषा मॅम बद्दल तिला कायम कुतूहल असायचं..खूप जाणून घ्यायचा प्रयत्न केला तिने..
"अगं ड्रग्सच्या आहारी गेल्या, दुसरं काय.."
"अमेरिकेला जाऊन तिथेच एका माणसासोबत सूत जमवलं त्यांनी.."
"यशाचा माज...दुसरं काय,इथे सगळं सोडून गेल्यात long vacation ला.."
अश्या एकेक अफवा तिने ऐकल्या होत्या..पण यातलं काहीही खरं नाही हे मात्र तिला चांगलं माहीत होतं.तिला सत्य काय आहे ये जाणून घ्यायचं होतं.
लंच ब्रेक होतो. निकिता अनुष्काच्या मागे मागे जात असते, अनुष्काला समजतं, ती मागे वळते..
"म्हणजे पूर्ण स्टोरी ऐकल्याशिवाय तू शांत बसणार नाहीयेस तर.."
निकिता लहान मुलासारखी मान डोलवत हसते. अनुष्का एक दीर्घ श्वास टाकते आणि म्हणते..
"चल कँटीनमध्ये, लंच करता करता सांगते तुला.."
निकिताला आज खुप बरं वाटलं, गेले कित्येक दिवस ती सतत अनुष्काच्या मागे लागली होती तनिषा मॅम ची स्टोरी ऐकायला..आज फायनली ती तयार झालेली.
दोघीजणी कँटीनमध्ये जाऊन बसतात. अनुष्का तिचा टिफिन उघडते आणि एक घास तोंडात टाकणार तोच निकिताकडे तिचं लक्ष जातं.. हाताची घडी टेबलवर टेकवून ती अनुष्काच्या तोंडाकडे एकटक बघत असते.. अनुष्का हातातला घास परत डब्यात ठेवते आणि डोक्याला हात लावते.
"आज माझा उपवास घडवणार तू.."
"तू जेव ना, जेवता जेवता मला सांग.. माझं तर गोष्ट ऐकूनच पोट भरेल..खुप काही ऐकलं आहे तनिषा मॅमबद्दल. कॉलेजला होते तेव्हा त्यांचं सायबर अटॅक रोखण्याचं शौर्य news मध्ये बघितलं होतं. अक्षरशः अंगावर काटा आलेला. आता त्यांना प्रत्यक्ष भेटू म्हटलं तर मॅम इथे नसतात असं ऐकलं..प्रत्येकजण वेगळं सांगतात, एकेक अफवा ऐकू येते..खरं काय आहे कोणीच सांगत नाही. "
"हम्म...खरं काय आहे ते फक्त मोजक्याच लोकांना माहितीये..इथे काम करत असलेल्या जुन्या लोकांना.."
"आणि तू त्यातली एक..ए सांग ना आता..कुठे आहेत तनिषा मॅम?"
"आहेत...तिथेच, जिथे प्रत्येक यशस्वी माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर जातोच"
"म्हणजे? कुठे?"
"अज्ञातवासात."
"काय?"
"होय, तिथेच ..जिथे प्रत्येक यशस्वी माणूस जातो. आयुष्याचा आलेख कधीही एकसमान नसतो निकिता.. मॅडमने टोकाचं यश पाहिलं, टोकाचा आनंद मिळवला पण त्याच टोकाचं दुःखं, त्याच टोकाचा विश्वासघात आणि नैराश्यही अनुभवलं आहे..तो आघात इतका जबरदस्त होता की मॅडम गायब झाला त्या झाल्याच. गेली कित्येक वर्षे शब्दांतर मध्ये पाऊल ठेवलेलं नाही, कुणाशी काही संपर्क नाही...त्या पुन्हा येतील की नाही माहीत नाही.."
"पण का? काय झालेलं असं?"
"बहोत लंबी कहाणी है मेरे दोस्त...फिर कभी.."
पुन्हा एक ट्विस्ट टाकून अनुष्काने डबा संपवला, तोवर लंच ब्रेकही संपला होता. एकवेळ माहिती नसलेलं डोकं बरं, पण अर्धवट माहिती जाणून घेऊन निकिताच्या डोक्याला अजूनच भुंगे लागले.
अनुष्का पुढे चालू लागली, निकिता अजून तिथेच बसून विचार करत बसलेली.
"ओ मॅडम, चला आता.."
"उद्या...उद्या नक्की सांग पुढची स्टोरी.."
"Ok, पण फुकट नाही हा...रोज एक एपिसोड सांगेन, चालेल?"
"रोज? Wow..."
"आ हां... फुकट नाही हा, 15 रुपये द्यावे लागतील रोजचे.."
"अरे देवा...इथे पण सबस्क्रिप्शन का?"
"होय...आजचा भाग सांगतेय फ्री मध्ये, पण उद्यापासून नाही हा...कसं आहे माझीही एनर्जी जाते सांगायला..कष्ट पडतात, जेवण बाजूला ठेऊन स्टोरी पूर्ण सांगते तुला...इतना तो बनता है ना?"
क्रमशः
नमस्कार वाचकांनो, फायनली "तनिषा- THE BOSS" is back...एक नवीन कहाणी घेऊन, एक नवीन गाथा..नवीन रहस्य, नवीन ट्विस्ट, नवीन थरार....the boss पर्व 1 ला तुम्ही जो प्रतिसाद दिलाय तो पाहून खरंच भारावून गेले आहे. पुढील सर्व भाग सबस्क्रिप्शन मध्ये असतील, आधीच सांगते...त्यामुळे "आधी का नाही सांगितलं?" असं रागावू नका प्लिज..आणि ज्यांनी पर्व 1 वाचलं नसेल त्यांनी आवर्जून वाचा, तुम्हाला कथा नक्की आवडेल. आणि सबस्क्रिप्शन घेऊन टाका लवकर, एकदम सोपं आहे, अधिक माहिती ईरा पेजवर मिळेलच. काही अडचण आली की एक कॉल करा फक्त, तुमचा प्रॉब्लेम solve...बाकी ते निकिता सारखं रोज 15 रुपये भरावे नाही लागणार बरं का, महिन्यासाठी एकदाच भरायचेत...
बाकी? कसा वाटला पर्व 2 चा श्रीगणेशा नक्की कळवा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा