द बॉस..!!! (The Boss) - भाग 28

Story Of A Female Entrepreneur
मॅनेजरला मालकाचा फोन येतो,

"हॅलो साहेब, बरं झालं तुम्ही फोन केलात.. मीच करणार होतो तुम्हाला..एक बाई काहीतरी बरळतेय इथे..म्हणे माझं हॉटेल आहे हे.."

"तनिषा नाव आहे त्यांचं...जरा नीट बोला. आपलं हॉटेल आधीच तोट्यात होतं, त्यांनी भलीमोठी रक्कम दिलीये, त्यांनी विकत घेतलं आहे ते... आता त्याच मालक आहेत आता.."

मॅनेजर घाबरतो, ही साधारण बाई इतकी पोचलेली असेल हे त्याला माहित नव्हतं.

"सॉरी मॅडम.."

"आता तरी पार्टी सुरू राहील ना? माझी ऑर्डर आहे.."

"हो हो..मी थांबतो पार्टी होईपर्यंत.. चला रे कामाला लागा.."

तिथली गर्दी बघतच राहिली. त्या लेडीजचा गृप तर अजूनही धक्क्यातच होता. आपण जिला साधारण बाई समजत होतो ती नक्की आहे तरी कोण? गर्दीतल्या काहींनी तिला ओळखलं होतं.. एकजण म्हणाला..

"अरे या तर तनिषा मॅडम आहेत, शब्दांतरच्या सर्वेसर्वा...टॉप लिडिंग पब्लिशिंग इंडस्ट्री..10 करोड turn over.."

तिथलं रूपच पालटून गेलं. जी लोकं तिला ignore करत होती तीच आता पुढे येऊन तिच्याशी हातमिळवणी करू लागतात..तिच्याशी बोलू पाहतात...वाढदिवसाचा सोहळा बाजूलाच, तिच्या पराक्रमाचाच गौरव होऊ लागला. शेवटी तिने सर्वांना सांगितलं..

"या क्षणी जे योग्य वाटलं ते मी केलं..मला वाटतं आपण आता पार्टी एन्जॉय करूया...बऱ्याच लोकांची जेवणं बाकी आहेत, तुम्ही प्लिज जेवून घ्या.."

सर्वांनी गर्दी कमी केली.. मानव तिच्याजवळ येऊन म्हणाला..

"मॅडम, छान आहे हं तुमचं हॉटेल..."

"Oh... thanks... संकोच करू नका..पोटभर जेवून घ्या.."

"तनिषा..really proud of you. आज तू नसतीस तर बिचाऱ्या माझ्या मित्राचा हिरमोड झाला असता.."

दुनिया खरंच विचित्र आहे. बाहेरच्या रंगरुपावरून माणसाची पारख करते. नटून थटून आलेल्या त्या लेडीजभोवती इतर बायका घोळका करत होत्या पण तनिषाच्या अवताराकडे बघून तिला सरळ दुर्लक्षिलं.. पण जेव्हा तिची खरी ओळख समोर आली तेव्हा सर्वजण तिच्याशी ओळख करायला पुढे आले. केवळ माणूस म्हणून एकमेकांना आदर द्यायला जग एकत्र आलं तर जगणं किती सोपं होईल ना?

______

इनाया शब्दांतरच्या वेबसाईट आणि app साठी असा प्रोग्राम डेव्हलप करते की ज्यात कस्टमरचा ऑटोमॅटिक फोन मध्ये एक सिक्युरिटी प्रोग्राम लोड होईल जो मोबाईल मधून बाहेर जाणाऱ्या डेटाला ब्लॉक करेल. Microphone, कॅमेरा, messages, media files चा access सेटिंग मध्ये जाऊन ऑटोमॅटिक ऑफ करेल. तनिषाने जेव्हा हे पाहिलं तेव्हा तिने विचार केला की हे application फक्त शब्दांतर साठी नाही तर देशातल्या प्रत्येकाला द्यायला हवं, प्रत्येकाची मोबाईल मधली सुरक्षा अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भरतीयाकडे हे हवं..

"इनाया...देशातल्या प्रत्येक व्यक्तीकडे हे असावं यासाठी काय करता येईल?"

"आपण हे separate app म्हणून launch करू शकतो, पण प्रतिसाद कमी मिळेल...पण जर सरकारची काही मदत मिळाली तर प्रत्येक भारतीयाकडे हे जाईल आणि सायबर fraud पासून तो वाचेल.."

"सरकारला approach केलं तर?"

"तनिषा..तुला मानायला हवं, मी शब्दांतर साठी हे केलं पण तुला फक्त तुझ्या बिझनेस ची नाही तर नैतिकतेची आठवण झाली. फार कमी लोकं असा विचार करतात.."

"आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाला झाला नाही तर काय फायदा? आपण बघूया सरकार पर्यंत हे कसं नेता येईल ते. तोपर्यंत याची गुप्तता पाळायला हवी. नाहीतर हे सॉफ्टवेअर ब्रेक करायला दुसरे हॅकर्स तयारीला लागतील.."


भारताच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत CIS म्हणजेच cyber and information security डिपार्टमेंट असते. त्यांच्या मदतीने सरकार या सॉफ्टवेअर ला प्रमोट करू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे पेगेसिस नावाचं स्पायवेयर सुद्धा हे सॉफ्टवेअर बंद करू शकत होते.

पेगेसिस म्हणजे काय? NSO नावाच्या इस्रायली संस्थेने पेगेसिस नावाचा एक स्पायवेयर तयार केला जो ते फक्त देशांच्या सरकारला आणि अधिकृत संस्थेला विकतात. जवळ जवळ सर्व देशांच्या सरकारने हे विकत घेतले आहे. त्याचा वापर करून प्रत्येकाचा फोन कॉल, ऑडिओ, लोकांनीं फोनवर केलेलं संभाषण ऐकता येतं. या साली गृह खाते शोभना तिवारी यांच्या अखत्यारीत होतं. शोभना तिवारी म्हणजे राजकारणातील एक महत्वाचं नाव. लहानश्या गावापासून निवडणूक लढवत त्यांनी मधल्या वर्षात केंद्रात मंत्रिपद मिळवलं.त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी होता. एखाद्या स्त्री ने राजकारणासारख्या दलदलीच्या क्षेत्रात पाय ठेवावा आणि तेही क्षेत्र जिंकून घ्यावं असं फार कमी दिसून येतं. तनिषाला शोभना तिवारींबद्दल एक आदर होता. त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल हाच विचार तनिषा करत होती.

______

आज सकाळपासून मोहम्मद जरा जास्तच चिडचिड करत होता. कारण इनाया त्याला त्याच्या कामाबद्दल विचारत होती. मोहम्मद बंदुकीच्या गोळ्या बनवणाऱ्या एका अधिकृत कंपनीत कामाला होता. ह्या कंपन्यांवर गृह खात्याची अधिकृत मंजुरी आणि त्यांचं नियंत्रण असतं. इनाया त्याला गृह खात्याशी संपर्क कसा करायचा याबद्दल विचारत होती आणि तो तिच्या या अनपेक्षित प्रश्नांवर चिडला होता..

"तुझे मिनिस्टर बनना है क्या? कुछ भी पूछे जा रही है कल से.."

"कुछ नहि, ऐसें ही..लेकीन आप इतना गुस्सा क्यू हो रहे हो?"

"इतनी कोशिश के बाद भी बच्चे की खबर नही आ रही..शादी से पहले पता होता की तुझमे कुछ कमी है तो ये निकाहही नही करता.."

"मोहम्मद, कमी सिर्फ मुझमे नहि, आप मे भी हो सकती है.."

हे ऐकताच मोहम्मदचा संताप होतो..तो तिच्या अंगावर धावून जातो पण अम्मीजी मध्ये आल्या अन ती वाचली. इनायाने मोहम्मद च्या या वागण्याची तक्रार बऱ्याचदा माहेरी केलेली, पण एकेकाळी इनायाशी कुणी मोठ्या आवाजात जरी बोललं तरी पुढे येणारे अब्बाजान आता तिला आहे त्या परिस्थितीत राहण्याचा सल्ला देतात. मुलीच्या सासरच्यांना तोलून धरणं आणि त्यांच्या अक्षम्य चुकांना पोटात घालणं हे वर्षानुवर्षे सुरूच आहे.

______

दिवसभर इनाया तिच्या कामात गुंग असते, तिला काहीतरी मोठी माहिती हाती लागलेली असते. मेल, मेसेजेस मधून मोहात पाडणाऱ्या डील च्या लिंक ला लोकं क्लिक करतात आणि त्या लिंक मुळे मोबाईलच्या core प्रोग्राम मध्ये बदल होतात. मोबाईल कंपन्यांनी जे ऑप्शन बंद ठेवलेले असतात ते यामुळे सुरू होतात..24 तास आपला मायक्रोफोन सुरू राहतो, कॅमेरा मधून हवे तेव्हा छुपे फोटो निघतात, लोकेशन ची माहिती शेयर होते, सगळे मेसेजेस कॉल्स record होऊन हॅकर्स कडे जातात. संध्याकाळी उशिरा पर्यन्त इनाया काम करत असते, तिला वेळेचं भान नसतं. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं मागवून एक छोटी चिप ती बनवते. काम संपतं, तिला प्रचंड थकवा आलेला असतो, पण घरी जाऊन परत मोहम्मदला काय उत्तरं द्यावी हा नवीन प्रश्न समोर असतोच.

____

"इनाया, शोभना तिवारी आपल्या शहरात येताय पुढच्या आठवड्यात... त्यांची अँपॉइंटमेंट घेऊया.."

"मिळेल का पण?"

"आहेत आपल्या काही ओळखी, बघूया काम होतंय का."

सभेत शोभना तिवारी सोबत बसणाऱ्या पाहुण्यांमध्ये एक राजकारणी तनिषाच्या वडिलांच्या ओळखीतले असतात. त्यांच्याशी बोलून तनिषाला शोभना तिवारी सोबत 15 मिनिटांचा वेळ मिळतो. सभा संपल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये मंत्री उतरणार असतात तिथे त्यांना भेटायची परवानगी मिळते.

"शोभना तिवारींना जर हे प्रपोजल आवडलं तर त्या पुढे नेतील याला, आपल्याला मदत करतील..शेवटी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे म्हटल्यावर त्या नाही म्हणणार नाहीत.." तनिषा म्हणते.

"मॅडम, जमाना असा आहे की कुणावरही विश्वास ठेवता येणार नाही..त्यांनी मदत केली तर चांगलंच आहे..नाहीतर शब्दांतरसाठी हे उपयोगात येईलच..

_____

दुसरा दिवस, शब्दांतरची सकाळ नेहमीप्रमाणेच..मासिक प्रिंटिंग साठी द्यायचं असल्याने सर्वजण कामाच्या गडबडीत होते. प्रिंटिंग चा दिवस जवळ येताच एकच धांदल उडते..कारण एकदा प्रिंटिंग ला दिलं की त्यात काहीही बदल करता येत नसे.

तनिषा माईंच्या आग्रहाखातर त्यांना मंदिरात घेऊन गेली. तिथून माईंना परत सोडून ऑफिसला जायचं होतं. माई मंदिरात गेल्या, आत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की देवासाठी हार, फुलं घ्यायची बाकीच आहेत..त्या तिथेच थांबल्या आणि त्यांनी तनिषाला मंदिराच्या गेट जवळ हार फुलं आणायला पाठवलं. मंदिरात जायचं म्हणजे साडी, डोक्यावर पदर घेऊनच जायचं असा माईंचा नियम. तनिषा त्याच पोशाखात होती. हार फुलं घ्यायला गेली तेव्हा सवयीप्रमाणे तिने तिचं क्रेडिट कार्ड काढलं..

"ताई, कॅश लागेल...इथे कुठे कार्ड चालतं.."

"अरे देवा..कॅश तर सोबत नाही आणली..आणि माई तर कधी पैसे ठेवतच नाही सोबत..एक काम करा, मी संध्याकाळी आणून देईन तुम्हाला, आता द्या लवकर घाई आहे.."

"नाही..पैसे दिल्याशिवाय नाही.."

"अहो 30 रुपये तर आहेत फक्त.."

तनिषा वैतागून तिथेच उभी असते, तेवढ्यात एक हात पुढे येतो..

"हे घ्या 30 रुपये... यांचे.."

तनिषा वळून बघते.. एक सुटा बुटातला माणूस उभा असतो. वय 35 च्या आसपास, गोऱ्यापान अंगावर काळा सूट, डोळ्यावर काळा गॉगल आणि उंचपुरं व्यक्तिमत्त्व..हार फुलं देणारी मुलगी पैसे विसरून त्याच्याकडेच बघत राहते..

क्रमशः

🎭 Series Post

View all