द बॉस..!!(The Boss) - भाग 32

Story Of A Female Entreprenuer
तनिषा झाडू हातात घेऊन अजूनही उभीच असते. मागून मानव येतो आणि तनिषाचे एकंदरीत हावभाव बघतो..तो म्हणतो..

"काय मग, जाऊन आलीस ना माईंच्या माहेरी? तिथल्या मंजुळा अक्कानेच आग्रह केला असेल तुला रहायचा...फार मदत केलीस म्हणे तू त्यांना कामात...सांगत होत्या मला फोनवर.."

मानवने फार मोठी थाप मारली होती माईंजवळ, तनिषा समोर डोळे मिचकावत तो सांगत होता. तनिषा जे समजायचं ते समजली..

"हो..हो...मंजुळा अक्कानीच आग्रह केला मुक्काम करायचा.."

माई म्हणाल्या- "तने अगं मला सांगितलं असतं तर मीही आले असते तुझ्यासोबत.."

मानव- "अगं आई तुझी तब्येत पाहता तुला प्रवास पेलवला नसता..म्हणून "

"पण मग सांगायचं तरी, जातेय म्हणून.."

"मंजुळा अक्कानेच बोलावून घेतलं आणि तनिषा तातडीने निघाली ऑफिस मधून परस्पर.. तिने मला सांगितलं पण मीच तुला संध्याकाळी उशिरा सांगितलं.."

मानव ने फार मोठी थाप मारली पण ती लपवण्यासाठी माईंचा फोनही बंद करून ठेवला जेणेकरून माईंचं त्यांच्या माहेरी बोलणं होणार नाही.

"माई तुझा फोन बिघडलाय, फोन लावायचा असेल तर मला किंवा तनिषाला सांगत जा.."

एक थाप लपवायला मानव थापावर थापा मारत सुटला..तनिषा हे बघून एकदम चकितच झाली. मानव खूपच बदलला होता, तिला सपोर्ट करण्यासाठी त्याने खूप काही केलं.

माहेर म्हणजे कुठल्याही बाईचा weak point. आपली सून आपल्या माहेरी जाऊन भेटून येतेय म्हटल्यावर माईंचा सॉफ्ट कॉर्नर जागा झाला होता..त्यामुळेच आज तनिषावर इतकं प्रेम उतू चाललं होतं...

____

माफिया बॉस त्याच्या कामाची गती वाढवत होता. जॅक त्याच्या मदतीला होताच.

"बॉस..almost सगळा प्लॅन रेडी आहे, attack कधी करायचा आहे?"

"15 ऑगस्ट, इंडियन्स चं देशप्रेम त्या दिवशी उफाळून आलेलं असतं..त्याच दिवशी त्यांच्यावर असा BPSM attack करायचा की स्वातंत्र्यदिन विसरून ते पराभव दिन साजरा करतील...हा हा हा.."

बॉस चं राक्षसी हसणं बघून जॅकला सुद्धा या attack च्या गंभीर्याची कल्पना येते..

_____

तनिषा आणि इनायाची आज शोभना तिवारी सोबत मिटिंग असते. शोभना तिवारी दुपारी 1 वाजता सभा घेऊन 4 वाजता हॉटेलवर परतणार होत्या. तिथेच तनिषा आणि इनायाला त्यांना भेटायची परमिशन होती. तनिषा आणि इनाया ऑफिसमध्ये असतात. तनिषा इनायाला रिमाईंडर द्यायला येते,

"इनाया, दुपारी 3 ला आपल्याला निघावं लागेल..त्या हॉटेलवर चार वाजता येतील, आपल्याला तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल. अर्धा तास अगोदरच जाऊ आपण.."

"चालेल..."

"तुझं काय काम चाललंय आता?"

"BPSM war, त्याचाच विचार करतेय...काय असेल हे? काहीतरी अघटित होणार आहे असं माझं मन सारखं सांगतंय.."

"आपण आपल्या परिने जेवढं होईल तेवढं केलंय, आता सरकार कडे मोठी यंत्रणा असल्याने सरकार पटकन शोध लावेल याचा.. फक्त शोभना तिवारीला ते नीट समजलं तर ठीक.."

"खरंच, त्यांच्याशी आपण डायरेक्ट मिटिंग घेतोय ते बरं आहे...लोकल पोलिसात गेलो असतो तर आपल्याला उभं तरी केलं असतं का?"

"इथेच तर मागे पडतो आपण...खून, दरोडा, बॉम्बहल्ला याला पोलीस गांभीर्याने बघतात खरं पण सायबर गुन्हे नागरिक आजकाल नोंदवत सुदधा नाही. पण चीन आपल्यापेक्षा दहा वर्षे पुढे चालतोय...जर चीनने पुढचं आक्रमण केलं तर आजवर झालेल्यापैकी सर्वात मोठा हल्ला तो असेल..युद्धात लोकं मरतात, पण लोकांच्या प्रायव्हेट गोष्टी पब्लिक झाल्या तर शरमेने लोकं असंही स्वतःहून जीव देतील...चीनचा उद्देश साध्य होईल.."

"आपण शोभना तिवारी कडे जातोय खरं.. पण कुणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही..आपल्याला सावधगिरी बाळगून रहायला हवं.."

_____

"अहो सांगा तरी काय झालंय? चार दिवस झाले नीट बोलत नाही आहात..सांगतही नाहीये काय झालं.."

"प्रेरणा प्लिज मला काहीही प्रश्न विचारू नकोस, कामाचा स्ट्रेस आहे मला बाकी काही नाही...जा तू, मला बसू दे जरा एकटं.."

प्रेरणा तिच्या नवऱ्याच्या वागण्याने त्रस्त झाली होती. शांत सुस्वभावी अश्या मुकेशला अचानक काय झालं? तो इतक्या टेन्शन मध्ये का वाटतोय? प्रेरणाला कळायला मार्ग नव्हता. तीही काळजीत होती. कुणाला सांगूही शकत नव्हती. प्रेरणा गेली आहे बघताच मुकेशने दार लावून घेतलं आणि त्याच्या सहकाऱ्याला फोन लावला..

"ती लोकं आली होती का पुन्हा?"

"हो...पुन्हा येऊन धमकी देऊन गेली.."

"आपण पोलिसात तक्रार करावी याबद्दल.."

"अरे ती लोकं किती पोहोचलेली आहेत पाहिलं ना? आपण पोलिसात गेलो तर तिथल्या तिथे आपल्याला संपवतील.."

"तीच भीती आहे रे..मी चार दिवसांपासून जात नाहीये ऑफिसला त्यांच्या भीतीने.."

"आता दोनच पर्याय आहेत..एक तर त्यांना हो म्हणावं, किंवा सरळ नोकरी सोडावी..मी त्यांना हो म्हणतोय.."

"मी नोकरी सोडेन... पैशाच्या हव्यासापोटी सुरक्षेशी बेईमानी नाही..."

______

इनाया आणि तनिषा 3 वाजता ऑफिसमधून निघतात. साडेतीन वाजता त्या हॉटेलवर पोहोचतात आणि शोभना तिवारी येण्याची वाट पाहू लागतात. काही वेळाने सरकारी गाड्यांचा ताफा येतो, हॉटेलमध्ये सगळी सुरक्षा तपासली जाते, तनिषा आणि इनायाला भेटीचा पास दिला असल्याने त्यांना आत यायची परवानगी दिली जाते. शोभना तिवारी हॉटेलच्या दारापाशी येताच इनाया पुढे होते आणि त्यांच्या हातात पुष्पगुच्छ देते. हे स्वागत हॉटेलनेच केलंय असा त्यांचा समज होतो.

त्यांच्या PA ला समजतं की या दोघी मिटिंग साठी आलेल्या आहेत. शोभना तिवारी आणि अंगरक्षक आत जातात. बाकीच्यांची चेकिंग केली जाते आणि मग त्यांना आत पाठवलं जातं. बराच वेळ त्या वाट बघतात, मॅडमचा PA लगबगीने बाहेर येतो तेव्हा तनिषा त्यांना गाठते आणि pass दाखवून भेटी बद्दल विचारते. तो म्हणतो,

"माफ करा आजची भेट होऊ शकणार नाही, मॅम ला दिल्लीत अर्जंट बोलावलं आहे आम्हाला लगेच निघायचं आहे.."

"अहो पण.."

तो काहीही न ऐकता निघून गेला. त्या दोघी तिथेच बसल्या, काहीही करून त्यांना शोभना तिवारी सोबत बोलायचं होतं. त्या जातील तेव्हा काहीही करून त्यांना गाठून सगळं सांगू म्हणून त्या तिथेच बसल्या. पण शोभना तिवारी आणि सहकारी बाहेर जाताना दिसलेच नाहीत. त्यांना कळून चुकलं की शोभना तिवारी यांनी आपल्याला भेटायचंच नाहीये..त्यामुळे PA कडून खोटं सांगितलं गेलं. तनिषा चिडली..

"आपण इतकं महत्वाचं काम सांगायला आलोय आणि सरळ भेटायला नकार देताय?"

"तनिषा, मला माहित होतं हे असंच होणार..शेवटी राजकारणी लोकं आहेत ही...आणि माझी शंका खरी ठरली.."

"कुठली शंका?"

"चल माझ्यासोबत.."

इनाया तनिषाला गाडीत घेऊन जाते आणि तिथे तिचा लॅपटॉप, मोबाईल आणि काही डिव्हाईस काढून कनेक्ट करते..

"इनाया काय करतेय हे?"

"ऐक..."

लॅपटॉप मधून एक ऑडिओ फाईल रन होते..इनाया घड्याळाकडे बघते आणि एका विशिष्ट वेळेपासून ती फाईल प्ले करते..स्पीकर मधून आवाज येतो..

"काहीही करून त्यांच्याशी होणारी मिटिंग कॅन्सल करा"

"पण मॅडम त्यांना पेगेसिस बद्दल काहितरी महत्वाचं सांगायचं आहे असं म्हटल्या त्या.."

"धीरज, तुला माहितीये चांगलं...निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आपल्या शत्रू पक्षाच्या मोबाईल मध्ये आपण पेगेसिस चा वापर करून त्यांचा सगळा डेटा आपण ट्रॅक करतोय...याने त्यांच्या अंतर्गत खबरी आपल्याला समजणार आहेत. या दोघींनी अँटी पेगेसिस सिक्युरिटी समोर आणली तर आपल्यालाच नुकसान होईल...त्यांना काहीही करून इथून घालवा.."

तनिषा ते ऐकून गारच पडते. ज्या पेगेसिस चा धोका पूर्ण देशाला आहे त्याचा वापर आपलेच राजकारणी देशाच्या सुरक्षेसाठी नाही तर वैयक्तिक फायद्यासाठी करून घेताय. पेगेसिस फक्त सरकारला विकत घेता येते, आणि त्याचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी दहशतवादयांच्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करण्यासाठी दिलेला असतांना त्याचा असा वापर होतोय? म्हणूनच पेगेसिस वापरा बद्दल सरकार कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. शोभना तिवारीला शत्रू पक्षात काय काय घडामोडी होताय हे जाणून घेण्यासाठी त्याचा वापर करायचा होता..

"इनाया? काय आहे हे? ही लोकं असं कसं करू शकतात? आणि त्यांचं रेकॉर्डिंग तुला कसं मिळालं?"

"तनिषा मला माहित होतं हे असलं काहीतरी होईल, म्हणून मी हॉटेलच्या दारापाशी त्यांना जो पुष्पगुच्छ दिला त्यात मायक्रोचिप लपवली जेणेकरून त्यांचं बोलणं आपल्याला ऐकता येईल..हॉटेल मध्ये शोभना सोडून सर्वांची चेकिंग केली जाणार हे मला माहित होतं, त्या पुष्पगुच्छ हातात घेऊन आत गेल्या आणि त्यांच्या खोलीत ठेवला..आणि आपल्याला त्यांचं बोलणं समजलं.."

"इनाया काय डोकं चालवलं तू...जबरदस्त... मानलं तुला.."

"बॉस सोबत राहून काहीतरी शिकायला हवं ना?"

"बरं आता पुढे काय? काय करायचं?"

"आपण शब्दांतरच्या वाचकांना ही सिक्युरिटी देऊया..किमान ते तरी सायबर अटॅक पासून वाचतील.."

"नाही इनाया, अजून हार मानून चालणार नाही..आपण पोलिसात जाऊ..तक्रार करू.."

दोघीही पोलीस स्टेशन मध्ये जातात..

"बोला, काय तक्रार आहे तुमची? नवरा त्रास देतो की सासू?"

"त्रास तर सगळेच देतात...पण त्यांच्याबद्दल तक्रार नाही.."

"मग नणंद छळ करते का?"

"नणंद नाही आम्हाला.."

"मग कुणी छेड काढली का?"

"आमचं वय बघून तुम्हाला वाटतं आमची कुणी छेड काढेल?"

"अरे मग तक्रार तरी काय? की असेच आलात चक्कर मारायला?"

"साहेब नीट ऐकून घ्या...आम्हाला असे काही पुरावे मिळाले आहेत ज्यातून असं समजतंय की देशावर मोठा सायबर हल्ला होणार आहे...तो रोखता यावा यासाठी आम्ही एक एप्लिकेशन बनवलं आहे जे आम्हाला वाटतं की प्रत्येक भारतीयाकडे असावं.. जे पेगेसिस आणि इतर attack रोखू शकेल..त्यासाठी आम्हाला पोलिसांची गरज आहे.."

त्या पोलिसाला अर्ध्या गोष्टी तर समजतच नाहीत, वर तो हसायला लागतो..

"अरे इथे आम्ही हल्ला करणाऱ्याला आणून लॉकअप मध्ये टाकतोय आणि तुम्ही या कोणत्या हल्ल्याची गोष्ट सांगताय? तो जो कोणी असेल त्याची माहिती द्या आम्हाला, मी शोधून काढतो त्याला.."

दोघींना समजत नाही की या पोलिसाला कसं समजवावं. पुढचा हल्ला फक्त माणसावर नाही तर त्याच्या सगळ्याच गोष्टींवर होणार होता..सायबर हल्ला, ज्यात घातपात नाही, जखम नाही तरीही माणसं मरतील...आपली मनशांती गमावल्याने...!!!

त्या निराश होऊन परतत असतांना एक हवालदार बाहेर येतो..

"तुम्ही तनिषा मॅम ना?"

"हो.."

"मी ओळखतो तुम्हाला, त्या झोपडपट्टीतला मुद्दा तुम्ही कसा सोडवला हे पाहायला मी होतो तिथे...मी मानतो तुम्हाला खुप, मला विश्वास आहे की तुम्ही काहीतरी महत्वाची माहिती देऊ इच्छिता.. एक काम करा, सायबर सेल च्या मुख्य ऑफिसमध्ये जा...तिथे माहिती द्या..सरकार किंवा लोकल पोलिसांना सांगून काही उपयोग नाही.."

____

"काय करावं मुकेशच्या वागण्याचं? किती दिवस तो असा टेन्शन मध्ये राहणार आहे..नोकरी सोडली त्याने, का सोडली याचं कारणही सांगत नाहीये..काय करावं? काकू ला सांगावं का? हो, हेच योग्य राहील.."

"हॅलो काकू.." प्रेरणा बोलताच रडायला लागते..

"हॅलो प्रेरणा? अगं काय झालं? का रडते आहेस? शांत हो बघू आधी.."

"काकू, तू मला भेटायला ये, नंतर सांगेन सगळं.."

"ठीक आहे मी लगेच येते, तू आधी शांत हो.."

तनिषा ड्रायव्हरला गाडी वळवायला सांगते आणि इनायाला घेऊन प्रेरणाच्या घरी जाते...

क्रमशः

🎭 Series Post

View all