द बॉस..!! (The Boss) - भाग 37

Story Of A Female Entrepreneur
रात्री 12 वाजता सर्वत्र फटाक्यांचा आवाज येत होता. स्वातंत्र्यदिनाची सर्वांनी जय्यत तयारी केली होती. पण देशाला माहीत नव्हतं की उद्या देशात काय गोंधळ उडणार आहे ते..!!!

"मला भेटायचं होतं? कधी?"

तनिषाला काही उमजेना..

"मी मिस रुपाली खैरनार, हेड ऑफ नॅशनल सायबर क्राईम ब्रँच.."

तनिषाच्या अंगावर काटाच उभा राहतो, संकटाच्या वेळी देव कसा धावून येतो हे तिने आज प्रत्यक्ष पाहिलं..

"रुपाली...अगं इतकी मोठी झालीस तू? ऐकून किती छान वाटलं...आणि हो, मला याक्षणी तुझी सगळ्यात जास्त गरज आहे.."

"मी आज या पदावर आहे ते केवळ तुझ्यामुळे, माझ्या शिक्षणाची पर्वा ना माझ्या घरच्यांना होती ना कॉलेजला..तू पुढे झालीस आणि माझं शिक्षण होऊ शकलं..आज त्याच उपकाराची परतफेड करायला आलीये.."

"उपकार म्हणू नकोस गं, पण देशाला वाचवायचं असेल तर तुझी आज सर्वात जास्त गरज आहे.."

"होय, ऑफीसमध्ये काय प्रकार घडला नितीनने सगळं सांगितलं मला...त्या मॅनेजरला तर मी बघून घेईनच..पण तू जे सांगितलं त्यात तथ्य जाणवतंय मला.."

"रुपाली पुढील काही तासात इनायाने बनवलेला अँटी स्पायवेयर जर भारतीयांच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाला नाही तर अनर्थ होईल.."

"मी तोच विचार करतेय की हे पुढील काही तासात हे कसं शक्य करावं...सगळे ऑफिसेस आता बंद झालेत..आणि उद्या आपण काही करेपर्यंत सगळं उध्वस्त झालेलं असेल.."

"रुपाली कर काहीतरी... देशाचं रक्षण आता आपल्याच हातात आहे असं समज.."

"यावर एकच पर्याय...TRAI कडे जायचं..Telecom Regulatory Authority of India..."

"ते काय करतील?"

"मोबाईल मध्ये exchange होणारे मेसेजेस, otp, मार्केटिंग मेसेजेस, transaction sms हे सगळं त्यांच्याकडून व्हेरिफाय होऊन मगच पाठवले जातात...त्यांच्याकडे सर्व भारतीयांचे फोन नंबर आहेत...प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक sms पाठवायचं काम ते करू शकतील.."

"मग घाई करायला हवी.."

रुपाली trai ला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते पण रात्र असल्याने ऑफिसमध्ये जास्त स्टाफ नव्हता. या ना त्या प्रकारे ती ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करत असते. प्रयत्न करत करत त्यांना 2 वाजून जातात.
____

माफिया बॉस ऑफिसमध्ये बसलेला असतो, उद्याच्या हल्ल्याची स्वप्न रंगवत त्याला झोप येत नसते...

"सकाळचे 7 वाजतील, सर्व भारतीय आपापलं आवरून झेंडावंदन साठी बाहेर पडतील..साडे सात ला झेंडा फडकवला जाईल पण त्या आधीच...बूम....मोबाईल मध्ये असे एकेक बॉम्ब फुटतील की झेंड्याकडे पाठ फिरवून लोकं सैरावैरा पोलीस स्टेशन, सायबर क्राईम ला रांगा लावतील...पण सगळं व्यर्थ...हा हा हा..ठीक साडे सात वाजता मी हा प्रोग्राम रन करेन आणि पुढील काही मिनिटात लोकांचे पैसे कट...एकमेकांचे पर्सनल फोटो फ्लॅश होतील...धमक्यांचे मेसेज जातील...आणि लगेच संध्याकाळी माझ्या डिव्हाईस च्या जाहिराती झळकतील.. लोकं म्हणतील..."अरे अरे...हा मोबाईल घ्यायला हवा ताबडतोब, यातून डेटा लिक होत नाही...अरे अरे, हे सोशल मीडिया वापरायला हवं, इथून काही बाहेर जात नाही..हा हा हा..."

____

चीन मध्ये सकाळचे साडेसहा वाजलेले असतात, आणि भारतात पहाटेचे चार. रुपाली आणि तनिषा अथक प्रयत्न करत असतात की trai सोबत काहीही करून संपर्क व्हावा आणि एक मेसेज त्यांना सर्व भारतीयांना पाठवायला लावावा..रुपाली आणि तनिषा ऑफिसला फोन लावून लावून थकून जातात, शेवटी रुपाली म्हणते..

"चल..TRAI चं ऑफिस इथून 2 तासाच्या अंतरावर आहे. गाडी काढून जाऊया पटकन...आता आपल्यापुढे काही पर्याय नाहीये.."

तनिषा तिला थांबवते,

"रुपाली, मी तर जोखीम घेतेच आहे पण तू ही जोखीम घेतलीस तर तुझी नोकरी संकटात येऊ शकते. एका महत्त्वाच्या सरकारी खात्यात तू अधिकारी आहेस, उद्या लोकांना जर समजलं की तू trai ऑफिसमध्ये बळजबरीने घुसून गोंधळ घातला तर मीडियात बदनामी होईल. आपल्या दोघींना चांगलं माहीत आहे की हे जे काही आपण करतोय ते बेकायदेशीर आहे..आयुष्यभर तू संघर्ष केलास, खस्ता खाल्ल्यास ते हा दिवस बघण्यासाठी नाही...तुझ्या आई वडिलांना आज तुझा अभिमान वाटतोय, उद्या त्यांनी पुन्हा असं नको म्हणायला की मुलीला शिकायला मनाई करत होतो तेच बरोबर होतं.."

"अगं तनिषा पण याक्षणी हे जरुरी आहे..याक्षणी देश महत्वाचा आहे.."

"रुपाली आपण प्रयत्न करतोय पण त्याला यश येईलच याची काही कल्पना नाही..जर नाही जमलं तर देश धोक्यात येईलच पण तुझं आयुष्य विस्कटून जाईल..आपण जे करतोय ते बरोबर आहे हे देशाला समजेपर्यंत उशीर झालेला असेल...आता जे काही करायचं ते मी करेन...तू काळजी करु नकोस..."

"माझ्या आयुष्याचा विचार करतेय पण तुझं काय?"

"मी प्रायव्हेट मध्ये काम करतेय..माझ्यावर उद्या केस होईल, फार तर जेल होईल..पण आयुष्यात माझं सगळं मिळवून झालंय, पैसा, प्रसिद्धी...सगळं मिळवलं आहे मी..आता काही मिळवायचं उरलेलं नाहीये...समाजाने आजवर खूप काही दिलंय मला..आज त्याची परतफेड करणार आहे...मला जाऊदे TRAI मध्ये...बाजूला हो..!!"

तनिषा वेळ न दवडता तिथून निघते, स्वतःच गाडी काढते आणि मॅप नुसार चालवायला घेते. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करते, गाडी चालवताना मन स्थिर राहावं यासाठी गाडीतला रेडिओ सुरू करते...ए. आर. रेहमान चं गाणं सुरू असतं...

जय हो, जय हो
जय हो, जय हो, जय हो, जय हो
चख ले, हां चख ले, ये रात शहद है, चख ले
रख ले, हां दिल है, दिल आखरी हद है, रख ले
काला काला काजल तेरा कोई काला जादू है ना
काला काला काजल तेरा कोई काला जादू है ना
आजा आजा जींद शामियाने के तले

आजा ज़री वाले नीले आसमान के तले
कब से हां कब से, जो लब पे रुकी है

केह दे केह दे, हां केह दे
अब आंख झुकी है, केह दे
ऐसी ऐसी रोशन आंखें
रोशन दोनों हीरे हैं क्या ?
आजा आजा जींद शामियाने के तले
आजा ज़री वाले नीले आसमां के तले
जय हो, जय हो, जय हो, जय हो...

कुठेतरी हे गाणं तिच्याशी मिळतं जुळतं होतं..वेळ खूप कमी होता..तनिषाने गाडीचा स्पीड वाढवला..डोक्यात एकच..trai ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या एकाला तरी पकडून अँटी स्पायवेयर ची लिंक आणि संभाव्य हल्ला याबद्दल सर्व भारतीयांच्या मोबाईल वर मेसेज पाठवायचा..ऑफिसमध्ये कुणी असेल का, असलं तर ते आपलं ऐकेल का, सर्व भारतीयांना मेसेज पाठवणं शक्य होईल का, उद्या नेमका किती वाजता हा attack होईल...नाना प्रशांनी मनात खळबळ माजली होती...जर हल्ला झाला तर? वैशाली सारखी माझी जाऊ...आयुष्य काटकसर करण्यात गेलं...लग्नाचं कर्ज...त्यात बँकेतील पैसे गेले तर...काय राहील तिच्याकडे??

काळजीपोटी तनिषा स्पीड वाढवते... स्पीड 60 वर....

प्रेरणा अन मुकेश सारखं जोडपं...त्यांचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर आले तर?? त्यांची chat पब्लिक झाली तर?

स्पीड...80...

देसाई बाई, तिच्या मुलीचं अपहरण होईल असा तिला मेसेज आला तर?

स्पीड ...100..!!!

माई...एखाद्या असाध्य आजाराने पछाडलं तर? मानव, टॉनिक बद्दल त्यालाच दोषी ठरवलं तर? आर्या अन स्वरा..त्यांना ट्रॅक केलं गेलं तर? भैरवचं आयुष्य समोर पडलंय, त्याने घरासाठी घेतलेल्या कर्जाचे पैसेच गायब झाले तर?

स्पीड 120...!!!
स्पीडही वाढत होता आणि तिचं ब्लड प्रेशर सुद्धा...


160..!!
180...!!
200...!!!

समोरून जोरात एक ट्रक आली...तनिषाच्या डोळ्यावर प्रकाश आला अन तिने डोळे गच्च मिटले...काहीही दिसेना...!!!

आणि पुढच्याच क्षणी कानठळ्या बसवणारा आवाज आला...!!!

क्रमशः

🎭 Series Post

View all