द बॉस..!! (The Boss) - भाग 31

Story Of A Female Entrepreneur


"faltcart.com"?

"हो...बिन्नी सारखा वेंधळा माणूस याला flatcart म्हणूनच वाचेल आणि मेल ला रिस्पॉन्स देईल.."

"म्हणजे?"

"याला फिशिंग ऍटॅक म्हणतात...एखाद्याला भुलवणारा मेल पाठवला जातो आणि त्यात एक मलवेयर अँप्लिकेशन असतं. जेव्हा यूजर ते download करतो तेव्हा ते run होण्यासाठी कॉम्प्युटर एक मेसेज दाखवतो की हे अँप्लिकेशन आपल्या सिस्टीम मध्ये काही changes करू इच्छितो...आपण सवयीप्रमाणे ते accept करतो आणि तिथून शिरकाव होतो त्या मलवेयर चा. ते असं एक सॉफ्टवेअर आहे जो सिस्टीम मधला सगळा डेटा कॉपी करतो आणि cloud ने आपल्या सिस्टीम मध्ये अपलोड होत जातो.."

"म्हणजे बिन्नीच्या सिस्टीम मध्ये काय काय आहे हे आपल्याला समजेल.."

"बरोबर, एकदा का त्याच्या सिस्टीम मध्ये काही आक्षेपार्ह दिसलं तर आपण लगेच उद्या शोभना तिवारी ला ते कळवू, म्हणजे सरकारची सायबर यंत्रणा कामाला लागेल. आपल्या नुसत्या स्टेटमेंट ला सरकार accept करणार नाही, काहीतरी पुरावा तर लागेलच ना.."

बिन्नीला विडिओ गेम्स चं वेड असतं एवढी माहिती एव्हाना समजली होती. इनाया सकाळपासून कामाला लागते, काही dvd आणून त्यात ती गेम्स install करते आणि सोबतच तिने बनवलेला मलवेयर.. बिन्नी ला faltcart.com वरून एक प्रोफेशनल मेल पाठवला जातो. त्याच्या documents वरून त्याचा मेल आयडी दोघींना मिळलेलाच असतो. आणि दोघींचा अंदाज बरोबर निघतो, बिन्नी तो मेल उघडतो.. त्यात लिहिलेलं असतं की..

तुम्ही flatcart च्या लकी ड्रॉ मध्ये विजेते झाले आहात. तुम्हाला आमच्या कंपनी कडून फ्री dvd गेम्स बक्षीस देण्यात येत आहे. आपला पत्ता आम्हाला रिप्लाय करावा, आजच तुमचे बक्षिस तुमच्या घरी येईल..त्वरा करा..!!!

बिन्नी त्या मेलला रिप्लाय देतो. बिन्नीच्या सर्व activities माफिया बॉस ट्रॅक करत असतो, बिन्नीला तो warn करण्यासाठी फोन लावत असतो. बिन्नीला माहीत असतं की boss मला हे घेऊ देणार नाही, आधीच तो घरी बसून वैतागलेला असतो त्यामुळे तो फोन उचलत नाही.

"बिन्नी फोन उचलत नाहीये, हा माणूस नक्की आपल्याला गोत्यात आणणार..." बॉस आपल्या सहकाऱ्याला सांगतो..

"आजच्या आज बिन्नीचा खात्मा करावा लागेल.."

____

बिन्नी ऑर्डर देतो आणि इकडे इनाया दुकानातून खऱ्या गेम्स च्या dvd विकत आणते. त्यातल्या dvd काढून त्यात तिने बनवलेल्या dvd टाकते आणि त्याला पॅकिंग करते..संध्याकाळी इनाया वेष बदलून बिन्नीचं दार ठोठावते..

"पार्सल.."

बिन्नी बिचकत दार उघडतो, पार्सल घेऊन पटकन दार लावून घेतो. पटापट ते पार्सल फोडतो आणि dvd आपल्या pc मध्ये install करतो. यासाठी इंटरनेट चालू करावं लागतं, तो चालू करतो..

पुन्हा एकदा दार वाजतं. बिन्नी हळूच दार उघडतो आणि बघतो तर काय..माफिया boss दारात..बिन्नी घाबरतो, boss दार जोरात आपटून आत येतो.

"तुझ्या मुर्खपणामुळे माझी इतक्या वर्षांनी मेहनत वाया जाऊ शकते, फोन का उचलत नव्हता.."

दुसऱ्या बाजूला सिस्टीम वरून डेटा ट्रान्सफर होत असतो..

30%...37%...

"Boss... सॉरी, मला माफ करा...मला सोडून द्या.."

"तुला सोडला तर मी गोत्यात येईन.."

40%...45%..

"बॉस मी कुणालाही काहीही माहिती दिली नाहीये..माझ्यावर विश्वास ठेवा.."

"तू माहिती दिली नाहीस तरी तू इतके डिजिटल पुरावे मागे सोडले आहेत की ज्यांच्या द्वारे भारत कधीही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो..."

60%...69%...

"नाही बॉस...मी असं काहीही केलं नाही.."

"तुला पर्सनल लॅपटॉप साठी पैसे दिले होते, तो न घेता तू दारूत पैसे उधळले, आणि हॉस्पिटलच्या सिस्टीम चा वापर करत गेलास...किती मूर्ख आहेस तू कळतंय का तुला??"

"सर तिथे कुठलीही सिस्टीम एकमेकांशी आणि सर्व्हरशी कनेक्ट नाही...म्हणून.."

80%...89%...

"तू वॉश रुम मध्ये एकदा गेलेला तेव्हा एक बुरखाधारी महिला तुझ्या डेस्कटॉपकडे बघत होती.."

"सर गरीब लोकांना असतं आकर्षण अश्या गोष्टींचं... त्यात ती एक बाई...काय कळलं असेल तिला.."

"इतका हलगर्जीपणा? म्हणूनच, म्हणूनच तुझा जगून उपयोग नाही.."

असं म्हणत boss बिन्नीच्या डोक्यावर बंदूक रोखतो आणि...

दुसऱ्या क्षणी बिन्नीच्या डोक्याच्या ठिकऱ्या उडालेल्या असतात, खोलीत रक्तच रक्त ..boss ची नजर चालू असलेल्या सिस्टीम कडे जाते...

"या सिस्टीम ला सुद्धा संपवावं लागेल.."

"93%...95%..."

Boss सिस्टीम कडे चालायला लागतो तोच त्याचा पाय अडखळतो, शिव्या देत तो वाटेतली वस्तू लाथ मारून दूर फेकतो..तो सिस्टीम जवळ येताच..

"99%...100%...data transferred successfully"
त्यानंतर स्क्रीन वर काहीही दिसत नाही.

Boss नेमका त्यावेळी ते बघतो आणि त्याला फक्त डेस्कटॉप वॉलपेपर दिसतं. Boss सिस्टीम उचलतो आणि एकेक करून सगळे पार्ट्स डिस्ट्रॉय करतो. खरं तर फक्त CPU उचलून नेला असता तरी चाललं असतं पण माथेफिरू boss, तोडफोड त्याच्या रक्तातच...!!!

बिन्नील मारलं खरं, पण तिथे त्याचा काहीही पुरावा मागे सोडणं योग्य नव्हतं..boss आपल्या सहकाऱ्यांना बोलावून त्याची बॉडी कार मध्ये न्यायला लावतो. खोलीतील सगळं साफ करून सहकारी बॉडी कार मध्ये नेतात. कार मध्ये boss चा राईट हॅन्ड जॅक आधीच बसलेला असतो..चायनीज मध्ये ते संभाषण करत असतात.

"बॉस, एवढ्याश्या कामासाठी तुम्ही इथे का आलात? मी होतो ना इथे?"

"फक्त बिन्नीला मारायला भारतात यायला मी काही बिन्नी सारखा मूर्ख नाही...अजून एक काम आहे, ते फत्ते करायचं आहे... "

"कसलं?"

"Social attack..."

"तो तर तुम्ही करतच आहात, सोशल मिडिया account hack करणं...बनावट प्रोफाइल बनवून लोकांना बनवणं..."

"No no no जॅक...ते सगळं जुनं झालं आता...लोकांच्या अगांशी आलं तर लोकं मोबाईल फेकून देतील...मग काय करायचं आपण?"

"प्रत्येकाला track करायचं...एखादा माणूस रस्त्यावर चालायला लागला की तो कुठे जातोय, काय करतोय हे सगळं ट्रॅक.."

"जुन्या गोष्टी काय सांगताय बॉस, मोबाईल लोकेशन वरुन ते track होतंच की.."

"हा हा हा...जॅक...नो मोबाईल, नो डिव्हाईस, नो चिप...माणूस रिकाम्या हाताने फिरला तरी त्याला ट्रॅक करता येणार आहे आता..मग त्यांच्या फॅमिलीच्या लोकांना घाबरवायचं... तुमचा माणूस इथे इथे आहे, उडवू का त्याला? तुमचा मुलगा रेस्टॉरंट मध्ये आहे, घालू का गोळी?..एकेक इंडियन कुलूप लावून घरात बसेल...सर्वांच्या मोबाईल मधून रक्कम डेबिट होत जाईल, कशी? कुठे? हे समजणार नाही...आपापल्या सोशल मीडिया account मधले मेसेज पब्लिक होतील, प्रत्येकाच्या प्रायव्हेट गोष्टी पब्लिक होतील.. लोकं एकमेकांचे पर्सनल chat वाचू शकतील...सर्वजण आपला मोबाईल, लॅपटॉप घाबरून फेकून देतील...."

"लोकांनी मोबाईल, लॅपटॉप फेकले तर आपला रस्ताच बंद होईल.."

"नाही..तिथेच आपला मूळ उद्देश साध्य होईल...सरकार आपल्या पाया पडेल.."

"कुठला उद्देश.."

"Surprise... समजेल लवकरच..just wait and watch.."

जॅक आणि boss बिन्नीच्या बॉडीची विल्हेवाट लावतात आणि दोघेही एका ऑफिसमध्ये प्रवेश करतात.
______

तनिषा आणि इनाया रात्री उशिरा घरी परततात. इनायाला खूप टेन्शन आलं होतं, 2 दिवस घरी नाही म्हटल्यावर मोहम्मद काय बोलेल, काय काय प्रश्न विचारेल... पण मोहम्मदने काहीही विचारलं नाही, इनाया आली तोवर तो जेवण करून झोपी गेला होता. इनाया अम्मीजींना भेटली..

"अम्मीजी...सब ठीक है ना?"

"चिंता मत कर, मैने उसको बोल दिया था की तेरे मायके मे एक दादी मर गयी है, वहा गयी है.."

"अच्छा अम्मीजी...मतलब आपने मेरे मायके वालो को युही मार दिया?" इनाया कमरेवर हात ठेऊन विचारू लागली. अम्मीजी थोड्या घाबरल्या..

"नहि बेटा बुरा मत मान, यही एक बात मेरे दिमाग मे आयी ऐन मोके पे."

अम्मीजींच्या चेहऱ्यावरची भीती पाहून इनाया हसायला लागली..

"अम्मीजी मजाक कर रही हू...आपको पता नहि आपने मेरे लिये क्या क्या किया..मेरे खुद की माँ नहि कर सकी वो आपने मेरे लिये किया.." नंतर डोळ्यात पाणी आणून इनाया सांगू लागते..

________

2 दिवस तनिषा घरी नव्हती तर घराची पार वाईट अवस्था होऊन जाते. तनिषा आल्या आल्या आधी स्वयंपाकाला लागते आणि नंतर बाकीचं आवरायला घेते.

"आलीस गं? जरा आराम केला असता..आल्या आल्या लगेच कामाला लागलीस.."

तनिषा हातातला झाडू एकदम थांबवते आणि श्वास रोखून माईंकडे बघते. मी स्वप्न तर बघत नाहीये ना? माईच बोलल्या का नक्की? हे काय ऐकतेय मी?

"तने..राहुदेत ते काम..जा आराम कर जा.."

तनिषाला चक्कर यायचीच बाकी होती... माई असं कसं बोलू लागल्या अचानक?

क्रमशः

🎭 Series Post

View all