तनिषाचे डोळे थकले होते, शरीर थकलं होतं पण तिची इच्छाशक्ती शारीरिक मर्यादांनाही आव्हान देत होती. सगळ्यात आधी तनिषाने त्या वीर भोसलेची कुंडली काढायची ठरवली. तोही इतका चाणाक्ष होता की सोशल मीडियावर आपली काहीही माहिती त्याने टाकली नव्हती. त्याची जन्मतारीख तेवढी तिला दिसली. नुकत्याच एका tech वेबसाईटवर त्याच्या स्टार्टअप ची दखल घेण्यात आली होती. त्यात त्याने IIT बॉम्बे मधून शिक्षण केलेलं सांगितलं होतं. त्याची जन्मतारीख वरून तिने passout वर्ष काढलं..IIT बॉम्बे मध्ये तिच्या मावसबहिणीचा मुलगा होता. पण तो अजून शिकत होता, त्याला या वीर भोसलेची माहिती काढायला लावली.
____
दुसरीकडे भैरवला इंटरनेट वर नुकतीच एक माहिती मिळाली होती, पब्लिशिंग इंडस्ट्री मध्ये असलेल्या कंपनीसाठी भारत सरकारने influencer award जाहीर केला होता. त्यासाठी बऱ्याच मोठमोठ्या कंपनीज च्या एंट्रीज येत होत्या. भैरवने तनिषाला न सांगता आपल्या कंपनीचं application सबमिट केलं. तो आता शालाकालाही मदत करत होता, तनिषाचं आयुष्य उलगडून दाखवत होता. तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल तर तो सगळं सांगू शकत होता पण शलाकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणारं कुणीतरी हवं होतं. शलाका त्यावरही उपाय काढणारच होती..
___
तनिषाला बहिणीचा मेसेज आला, तिच्या मुलाने माहिती काढली ती अशी..
"वीर नावाचा हुशार मुलगा IIT मध्ये होता..हुशार असला तरी खूप वाममार्गी गेला होता, होस्टेलमध्ये कॉलेजची वेबसाईट hack केल्याने त्याला शिक्षाही झाली होती.."
थोडक्यात हा माणूस वाईट आहे एवढं तर तिला समजलं होतं..
थोडक्यात हा माणूस वाईट आहे एवढं तर तिला समजलं होतं..
_____
तनिषाने matrix बद्दल वेबसाईटवर आलेला लेख वाचला. त्यात वीर भोसलेची वाहवा केली गेली होती. इतक्या कमी वेळात इतकं यश मिळवलं म्हणून त्याचा आदर्श घ्या असं ते सांगत होते. त्या लेखात उल्लेख होता की मॅट्रिक्स चं उत्पन्न किती, त्याची पोहोच किती आणि इन्व्हेस्टर्स कोण कोण..!!!
बस्स, याव्यतिरिक्त काहीही माहिती तिला मिळत नव्हती. सर्वात महत्वाची माहिती तिला ही हवी होती की कुठल्याही जाहिराती न दाखवता, मासिकाचं शुल्क न आकारता ही कंपनी उत्पन्न कसं मिळवते?
रात्रीचे 2 वाजले, तनिषा डोक्याला जोर देत होती. कुठलाही धागा सापडत नव्हता. तिचे डोळे आपोआप लागले आणि टेबलवर तिने डोकं टेकवलं. अश्या बिकट प्रसंगी देव मदतीचा हात देतोच..!!! तिला झोप लागली आणि स्वप्न पडलं.. स्वप्नात सारखं चंदू काका, कांता दिसत होते. तनिषा जेव्हा घरी परतत होती तेव्हा चंदू काका आणि कांता यांची भेट तिने पाहिली होती आणि तिला सतत ते स्वप्नात दिसत होतं. दैवी संकेतच होता तो..!!! सारखं सारखं तेच डोळ्यासमोर येत होतं आणि तनिषाचं डोकं भणभणायला लागलं. ती उठली...चंदू काका, कांता... काय कनेक्शन असेल? वैशाली सांगत होती की ही कांता, प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून दोनदा तरी चक्कर मारतेच..आणि चंदू काका घरात कुणाला काय हवंय ती वस्तू बरोबर न सांगता आणून देत..आणि चंदू काका कांताला पैसे देताना तिने पाहिलं होतं.. काय कनेक्शन असेल? अचानक तिला सगळा उलगडा झाला, कांता घरात कामाला जाई, येणं जाणं करी..प्रत्येक घरात काय चाललंय, काय वस्तू लागू शकते याची माहिती ती ठेवी आणि चंदू काकांना सांगे. ग्राहक बाजारात जाऊन ती वस्तू आणायच्या आत चंदू काका आपल्या रिक्षात ती आणून ठेवत, पाच रुपये किंमत जास्त लावत पण बाजारातील चक्कर वाचेल म्हणून लोकही पटकन घेऊन टाकायची. चंदू काकांनी डायरेक्ट ग्राहकांना विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं नसतं, म्हणून कांता त्यांची मध्यस्थी होती, माहिती पुरवण्याचं कमिशन तिला मिळत होतं.. हे सगळं आत्ताच आठवलं.. लग्नघरातला प्रसंग तिला आठवला, घरात मेहेंदीचे कोन नव्हते म्हणून बायका तक्रार करत होत्या, कांता तेव्हा तिथेच घुटमळत होती. बायकांनी बाजारात जाऊन आणायच्या आधी चंदू काका संध्याकाळी ते कोन घेऊन आलेले. This is business..!!! वीर भोसलेही तेच तर करतोय, माहिती गोळा करतोय, लोकांचा डेटा जमा करतोय..फुकट मॅगेझिन देण्याच्या नावाखाली. निदान चंदू काका तरी सरळमार्गी व्यवसाय करताय पण हा? काय करतो या डेटा चं? कांता म्हणजे matrix हे समजलं पण matrix चे चंदू काका कोण?
बस्स, तो एक महत्वाचा धागा तिला सापडला. तिने पुन्हा एकदा वीर भोसलेच्या कामावर प्रकाशित झालेला लेख वाचला...वेबसाईटने इन्व्हेस्टर्सचं नाव सांगून मोठी चूक केली होती जी वीर भोसलेच्या सुद्धा लक्षात आली नाही. Kiluxu media म्हणून एक चायनीज कंपनी matrix ची इन्व्हेस्टर होती. आता या कंपनीची माहिती तनिषाने काढायला घेतली. आणि समोर जे आलं ते धक्कादायक होतं..!!! ही कंपनी डेटा प्रोसेसिंग मध्ये काम करत होती. जास्तीत जास्त लोकांचा डेटा गोळा करायचा आणि त्याचा दुरुपयोग करायचा. लोकांच्या मोबाईल मधले फोटो, contact नंबर, मेसेजेस सगळं काही ही कंपनी जमा करायची..आणि त्यांच्या फोटोज, मेसेजेस ला फिल्टर करून ती माहिती चायनीज आर्मी कडे सुपूर्द करायची. कोरोंना नंतर चायना आता डिजिटल हल्ला करणार याची चुणूक तिला दिसली..वीर भोसले पैशाच्या हव्यासापोटी चायनीज इन्व्हेस्टर्स ला विकला गेला होता, पण त्याला हे कळत नव्हतं की चायना याचा उपयोग उद्याच्या डिजिटल हल्ल्यासाठी करेल..IIT मधून शिकलेला इतका हुशार मुलगा, याला ही गोष्ट लक्षात येऊ नये??matrix कंपनी फक्त शब्दांतरला साठीच नाही, तर देशासाठी विघातक होती..ह्या चायनीज इन्व्हेस्टर्स ला सरकारकडून प्रचंड पैसा मिळत होता, चायना आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अश्या कामांसाठी भरपूर पैसा ओतत होती..आणि बळी ठरला तो वीर भोसले...!!!
_____
सकाळी आठ वाजताच भैरव ऑफिसमध्ये आला, तनिषा मॅडम चा फोन बंद येत होता आणि मानवचेही भैरवला फोन येऊन गेलेले...भैरव जेव्हा ऑफिसमध्ये आला तेव्हा तनिषा टेबलवर डोकं ठेऊन झोपली होती..
"मॅम..मॅम.."
भैरवने तिला उठवलं, इन मिन 2 तास झोपली होती ती फक्त..
"मॅम, मानव सरांचे फोन येऊन गेले.. घरी कधी जाताय तुम्ही?"
तनिषा उठली, तिने घड्याळात पाहिलं.. सव्वा आठ वाजले होते..ती पटकन उठली, घरी जायला निघाली..
"मॅम काय झालं? मॅट्रिक्स चं काय करायचं?"
"एक घाव दोन तुकडे.."
एवढं बोलून तनिषा निघून गेली. आता काहीतरी धमाका होणार हे भैरव जाणून होता... कारण तनिषा मॅडमला एखाद्या गोष्टीचा संताप झाला तर मॅम त्याचं नामोनिशाण कसं मिटवतात हे त्याने आत्तापर्यंत पाहिलं होतं.
तनिषा घरी गेली, प्रचंड झोप येत होती..मागच्या दराने ती आत गेली..माईंच्या हाका सुरूच होत्या..
"सकाळी उशिरा उठणं शोभतं का, माझा चहा नाही आला अजून.."
तनिषाने चहा करून दिला, मुलींना आवरून शाळेत पाठवलं, मानव चिडला होता, रात्रभर तनिषा घरी नाही म्हणून तो बोलत नव्हता.. तनिषाला त्याला समजवण्या इतपत ताकद नव्हती..तिने घरातली कामं आटोपली, स्वयंपाक केला..माईंना वाढलं, स्वतः जेवली आणि दुपारी समाधानाने झोपी गेली.
भैरवला मेल आला..
"तुमची कंपनी influencer अवॉर्ड साठी नॉमिनी म्हणून सिलेक्ट झाली आहे, उद्या दिल्लीला आपल्या टीम सोबत उपस्थित रहावे, तिथेच विजेते घोषित करण्यात येतील..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा