द बॉस..!!(The Boss) - भाग-14

Story Of A Female Entrepreneur


भैरवला तो मेल मिळताच त्याने मॅम ला कळवलं..

"भैरव तुला कुणी सांगितला अर्ज पाठवायला? तुला माहितीये ना की.."

"हो मॅडम, माहितीये..माईंपर्यन्त हे पोचता कामा नये..पण माई हे बघणार नाही याची काळजी घेऊ आम्ही.."

"मी काही जाणार नाही अवॉर्ड फंक्शन ला...तू जा representative म्हणून.."

"मॅडम आपल्याला जर अवॉर्ड मिळाला तर तो तुम्ही घ्यायला हवा.."

"उद्या वकीलासोबत मिटिंग आहे माझी..महत्वाची आहे..तू जा अवॉर्ड साठी..मिटिंग जर लवकर आटोपली तर येईन मी.."

"ठीक आहे मॅडम.."

______

Matrix च्या ऑफिसमधल्या केबिन मधून राक्षसी हसण्याचा आवाज येत होता. वीर भोसले त्याच्या स्वतःच्या हुशारीवर भलताच खुश होता..त्याच्या अकाउंट मध्ये चायनाचे इन्व्हेस्टर्स पाण्यासारखा पैसा ओतत होते आणि हा आपल्या userची एकेक माहिती त्यांना देत होता.

"वीर... वीर भोसले नाव आहे माझं...माझ्यासोबत स्पर्धा करायची असेल तर हरण्याची तयारी ठेवायची... "

समोर शब्दांतरचं मासिक ठेऊन त्याच्याकडे बघून तो बोलत होता. मॅगेझिन इंडस्ट्री मध्ये टॉप नाव काय, आता पण असेल ना, पण खालून....हा हा हा हा हा...कोण कुठली ती बाई, बॉस आहे म्हणे, अरे बायकांनी घरात बसावं, नटून थटून नवऱ्याची सेवा करावी..असली डोक्याची कामं घ्यावीच कशाला? मग हे असं होतं, तनिषा सारखं.. नो वीर नो, तुला काही स्त्रीदाक्षिन्य आहे की नाही? नाजूक, हळवी बाई ती..नवऱ्याच्या कुशीत जाऊन रडत बसली असेल..अरे रे रे...तिला म्हणा आपलं गाठोडं गुंडाळ आणि हद्दपार हो या पब्लिशिंग सेक्टर मधून...आता वीर भोसले आलाय....उद्या दिल्लीला जेव्हा अवॉर्ड जाहीर होईल मला तेव्हा बघशीलच तू..

वीर भोसले ला शब्दांतरच्या अव्वल असण्यापेक्षा त्याची सर्वेसर्वा एक स्त्री आहे याचं जास्त दुखणं होतं. शब्दांतरचं झालेलं नाव, त्याचं उत्त्पन्न, त्याची लोकप्रियता एका स्त्री ने मिळवली आहे ही गोष्ट त्याच्या पचनी पडतच नव्हती. त्यामुळे तिला नामोहरम करण्यात त्याला मनस्वी आनंद वाटत होता.

____

तिकडे भैरव दिल्लीसाठी जायला निघाला..सकाळी लवकरच दिल्लीला तो पोहोचला आणि मॅडमला कळवलं..

"मॅडम, मला अजूनही वाटतंय तुम्ही हव्या होता.."

तनिषा आपल्या तुपकट हातांकडे बघते आणि म्हणते..

"दिल्ली सोड, मला आज ऑफिसमध्येही जाता येतंय की नाही शंकाच आहे.."

"का मॅडम?"

"माईंनी सकाळी सकाळी फ्रिजमधून सायीचं भरलेलं पातेलं बाहेर काढलं आणि हट्ट धरला, मला एवढ्याचं तूप करूनच हवं..आजच्या आज..तेच कढवतेय, ते झालं की ही तुपकट भांडी गरम पाण्यात टाकून घासा, तूप जळू नये म्हणून लक्ष ठेवा...खूप काही असतं भैरव काय सांगू तुला.."

भैरव हसायला लागतो, हे काही त्याच्यासाठी नवीन नव्हतं. ऑफिसमध्ये एम्प्लॉयी चे valid कारणंही तो ऐकून घेत नसायचा पण तनिषा मॅमची एकेक कारणं ऐकून मात्र त्याला हसू यायचं..

शलाका तनिषा मॅडमचे एकेक पैलू जमा करत होती, तिला आता शब्दांतरची पूर्ण माहिती हवी होती, कधी स्थापना झाली, कसं सगळं होत गेलं..पण भैरव ऑफिसमध्ये नव्हता,

"हॅलो भैरव, मी ऑफिसमध्ये आलेली आहे..तू कुठेस?"

"मी दिल्लीला.."

"दिल्ली?"

"नंतर सांगतो, तू काय काम काढलंस?"

"मला कंपनीची माहिती हवीय..पूर्ण .."

"एक काम कर, मॅम च्या डेस्क वर काही फाईल्स आहेत, त्यातच कंपनीचं एक ब्रोचर आहे त्यात सगळी माहिती आहे.."

"पण..मी..मॅम च्या डेस्कवरून.."

"घाबरु नकोस, मी परवानगी देतोय ना? घे बिनधास्त.."

शलाका घाबरतच मॅम च्या डेस्कवर जाते, तिथे बऱ्याच फाईल्स असतात, ब्रोचर शोधण्याच्या नादात एक फाईल खाली पडते आणि तिच्यातील सगळी कागदपत्र बाहेर येतात, ती घाईघाईने ते आवरते...पण फाईल वरचं नाव वाचून तिला कुतूहल वाटतं.. त्यावर नाव असतं..

"Future threats.."

याचा उपयोग मी लिहत असलेल्या पुस्तकासाठी होऊ शकतो का? त्या उद्देशाने ती फाईल बघते..कागदं काहीशी जुनी झालेली असतात..सहा वर्षांपूर्वीची तारीख त्यावर असते..त्यात लिहिलेलं असतं..

"भविष्यात डिजिटल गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल, डिजिटल माध्यमातून माहिती देणारी मासिकं लोकप्रिय होत जातील, 2021 च्या डिसेंबर पर्यन्त शब्दांतर आपलं e-magazine लाँच करेल..काही स्पर्धक शब्दांतर सोबत स्पर्धा करत पुढे जाण्यासाठी
कुठल्याही थराला जातील... आपण आपल्या वाचकांना खिळवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी रिवॉर्ड सिस्टीम लाँच करू."

वाचत असतानाच केबिनजवळ कुणीतरी आलं आणि शलाकाने पटकन फाईल ठेऊन दिली. तनिषाची दृष्टी फक्त चालू गोष्टींवर नव्हती, खूप पुढचा विचार तिने केलेला..भविष्यात काय होऊ शकतं याचा अचूक अंदाज तिने त्या फाईल मध्ये वर्तवला होता आजी त्यावर उपाययोजना काय असेल हेही सहा वर्षांपूर्वीच ठरवून टाकलं होतं..कुणीतरी वीर भोसले येणार हे तिला जणू माहीतच होतं..

________

भैरव दुपारी दिल्लीला पोचला आणि एका हॉटेलवर थांबला. काही वेळ आराम करून संध्याकाळच्या पाचच्या सुमारास तयारीला लागला. सहा वाजता फंक्शन सुरू होणार होतं. तो कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला. तिथे पब्लिशिंग इंडस्ट्री मधले सर्व नॉमिनी आलेले होते. महिलांसाठी गाजलेलं मासिक femina, देशभरात चर्चेत असलेलं tech मॅगेझिन technora, लहान लहान पुस्तकं छापून त्यांची अवाढव्य लायब्ररी बनवणारं bookmap, हे सर्व दिग्गज इथे आलेले होते. भैरवने सगळीकडे एक नजर फिरवली, तिथे एकही स्त्री दिसत नव्हती. सर्व माणसंच माणसं..

"इथे जर तनिषा मॅम असत्या तर? या पुरुषी साम्राज्यात अढळपद प्राप्त करणारी एक स्त्री आहे हे लोकांना पहायला मिळालं असतं.. " भैरवला तनिषा मॅमची कमी खूप जाणवत होती.

कार्यक्रम सुरू झाला..सुरवातीला काही स्पीच होते, भैरव ते ऐकत असतानाच एकजण त्याच्याजवळ आला..

"हॅलो मिस्टर भैरव..."

"हॅलो.."

"मला ओळखलं नाही? मीच तो..शब्दांतर चे दिवस संपले आता..आता वीर भोसलेचा जमाना सुरू झालाय.."

भैरवने लगेच ओळखलं..

"वीर भोसले??"

"दुसरं कोण?"

भैरव त्याला बघून जाम संतापतो, कार्यक्रम सुरू नसता तर त्याला तिथेच भैरवने झोडपून काढलं असतं. वीर भोसले मुद्दाम भैरवला चिडवायला त्याच्याजवळ बसला..भैरवने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण त्याची बडबड सुरूच होती..

"तुमच्या मॅम नाही आल्या का? ओहह.. सॉरी, डिप्रेशन मध्ये असतील ना त्या? शेवटी लेडीज ती लेडीज..धक्का सहन होत नसतो बायकांना, लगेच रडतात त्या. त्यांना म्हणा नाजूक कोवळा जीव तुमचा, घराकडेच लक्ष द्या आता..बाहेरचं काम बघून शेवटी पदरी आली ना निराशा.."

भैरव स्वतःवर खूप कंट्रोल ठेवत होता. कार्यक्रमात काही उलटसुलट करून शब्दांतरचं नाव त्याला खराब करायचं नव्हतं..अवॉर्डस जाहीर व्हायला सुरुवात झाली. सुरवातीचे काही अवॉर्डस पुकारले गेले..अवॉर्डस घ्यायला जात असताना शो मॅनेजरने bollywood मधली motivational गाणी वाजवायला सुरवात केलेली जेणेकरून एक वातावरणनिर्मिती होईल...एकीकडे गाणी आणि दुसरीकडे अवॉर्डस घ्यायला entrepreneurs जात होती.. आता सर्वात महत्वाच्या अवॉर्ड ची घोषणा होणार होती..वीर भोसले भैरवला म्हणाला..

"आता माझं नाव येईल बघ.."

असं म्हणत त्याने आपल्या टीम ला जवळ बोलावलं आणि तो उभा राहून त्याचा सूट नीट करू लागला..

"And the most prestigious award, entrepreneur of the year...Goes to...."

वीर आणि टीम जवळजवळ पुढे जायला तयारच झाली..

"Mrs. Tanisha, from Shabdantar...!!!"

आणि मागे गाणं सुरू झालं...


तेरे पीछे मैं
मेरे आगे तू रन रन
कभी आगे तू
कभी पीछे मैं फ़न फ़न
देखेगा जलवा अब तो तू
विथ माय गन गन
एक ही तो बच के निकलेगा
ये तो डन डन

नॉक नॉक
तेरा बाप आया
ले तेरा बाप आया
तेरे पापों का हिसाब आया
लाजवाब आया बेहिसाब आया
लाईलाज़ आया
तेरा श्राप आया

तू भागेगा मैं दौडूंगा
तू दौड़ेगा मैं फोड़ूंगा
मैं फोड़ूंगा तू रो देगा
जब रो देगा मैं हंस दूंगा

तेरा साया तेरे पीछे है
क्या पाया है जो खोयेगा
तेरी ही काली करनी का है फल
जो तू ही भोगेगा


भैरवने हसून वीर भोसले कडे पाहिलं, तो लालेलाल झाला होता, त्याच्या टीम समोरच त्याची प्रचंड बेज्जती झाली..वीर आणि टीम अजूनही उभीच होती, तोच मागून आवाज आला..

"Excuse me.."

आणि तनिषा आपला सूट नीट करत त्या माणसांना बाजूला करत अवॉर्ड घ्यायला पुढे निघून गेली...तेव्हा गाण्याचं एक वाक्य रिपीट होत होतं..
नॉक नॉक
तेरा बाप आया
ले तेरा बाप आया
तेरे पापों का हिसाब आया
लाजवाब आया बेहिसाब आया
लाईलाज़ आया
तेरा श्राप आया

क्रमशः

🎭 Series Post

View all