द बॉस..!! (The Boss) - भाग 44 अंतिम

Story Of A Female Entrepreneur


माईंनीं हे सगळं पाहिलं, त्यांच्या डोळ्यासमोर सर्व जुन्या गोष्टी येऊन उभ्या राहिल्या..
प्रेरणाच्या लग्नात तनिषा पाहुण्यांसमोर काहीतरी बोलत होती आणि एक बॅग भरून त्यांच्याकडे घेऊन गेलेली...

इनाया घरी आली तेव्हा शब्दांतर ची मालकीण असा उल्लेख करत होती..

माईंची मैत्रीण..तिच्याशी तर पैज लावली होती..

माईंना हा धक्का सहन झाला नाही, त्या उलट तिलाच बोलू लागल्या..

"मग हे सगळं माझ्यापासून लपवायचं काय कारण? मी तुझ्या संपत्तीवर डोळा नसता ठेवला...माझ्याशी खोटं बोलत आलात तुम्ही आजपर्यंत, मला अंधारात ठेवलं.."

घ्या..!! म्हणजे इथेही तिचीच चूक माईंनी काढली. पण तनिषा आता शांत बसणाऱ्यातली नव्हती..

"माई, हे सगळे तुमच्या मुलाचे पराक्रम...त्यांनी मला सांगितलं की माईंना हे सगळं सांगू नकोस, त्यांना सहन होणार नाही म्हणून..मानसिक धक्का बसेल, जीवावर बेतेल..खोटं मी नाही तुमचा मुलगा बोलत आलाय...आणि मी तुमच्या काळजीने तारेवरची कसरत करत राहिले..एकीकडे घरातलं एकूण एक काम आणि वर ऑफिसचा सर्व भार...कितीदा उपाशीपोटी काम करत राहिले..का? तुम्ही नाराज व्हायला नको...कित्येक मुलाखती, अवॉर्डस ला गेले नाही, का? तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहावं म्हणून...स्वतःला घरात राबणारी गृहिणी दाखवत गेले, का? तुमच्या जीवावर बेतू नये म्हणून...पण हे सगळं खोटं निघालं..पण आता नाही..."

परत येत असताना माई शांत होत्या, आपलंच नाणं खोटं निघालं म्हटल्यावर काय बोलणार होत्या त्या..!!!

तनिषा माईंना घरी घेऊन गेली, गेल्यावर दारात 4-5 माणसं उभी..माईंनी विचारलं, कोण तुम्ही?

"मी बोलावलं आहे...राजेश भाऊ, आता फक्त ऑफिसच्या कार चं ड्रायव्हिंग नाही तर घरूनच ड्रायव्हिंग करायची..तुम्ही, बाहेरचं सगळं काम बघायचं, किराणा, भाजीपाला आणि घरात हवं नको ते सगळं...शितल मावशी तुम्ही, 2 वेळा नाष्टा, जेवण आणि चहा पाण्याचं बघायचं..."

तनिषाने घरातल्या जबाबदाऱ्यांपासून पूर्णपणे मुक्तता मिळवली..जी खूप आधी मिळवायला हवी होती...ती त्याला लायक पण होती आणि गाठीशी पैसा तर होताच..!!!

माईंसाठी हे सगळं अनपेक्षित होतं, पण नाही म्हणण्याची हिम्मत आता त्यांच्यात नव्हती..आता हे आहे तेच स्वीकारायची तयारी कशी करायची हेच मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं..

सर्वांना कामाला लावून तनिषा ऑफिसला जाते. आज पहिल्यांदा ती आपलं यश अनुभवत होती. ना घराची काळजी ना माईंसमोर काही उघड पडायची भीती..तिच्या खऱ्या रुपात ती आता वावरणार होती, कुणाचीही भीती न बाळगता.. आजचा सूर्यप्रकाश तिला जास्तच तेजस्वी जाणवत होता, कित्येक वर्षे कारागृहात खितपत पडलेला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मोकळ्या प्रकाशाचं त्याला भयाण कौतुक वाटतं.. तसंच काहीसं तनिषा बाबतीत झालेलं..

ऑफीसला गेल्यावर नव्या उमेदीने ती कामाला लागली. तिच्यातला बदल सर्वांच्या लक्षात येत होता. मॅम चा चेहरा आज जास्तच तेजस्वी दिसत होता आणि कसलीही तगमग, काळजी, धावपळ चेहऱ्यावर दिसत नव्हती. भैरव आज half डे घेऊन शलाकाला बघायला जाणार होता..तनिषाला त्याने सांगितलं तसं तीही त्याच्यासोबत शलाकाच्या घरी गेली..

शलाकाच्या घरी यांचं येणं हे अनपेक्षित होतं.. शलाकाचे आई वडील धास्तावले..तनिषाने मात्र मोठ्या बहिणीप्रमाणे सांभाळून घेतलं..

"आम्हाला माहितीये की तुम्ही आम्हाला असं अचानक पाहून गोंधळला असाल..पण या दोघांचं म्हणणं ऐकून घ्या, मग पुढचा निर्णय तुमचा असेल.."

शलाका आणि भैरव त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगतात. लग्न करण्याची परवानगी मागतात..शलाकाचे वडील अजूनही द्विधा मनस्थितीत असतात..

"हे बघा, आम्ही गरिबीतून वर आलोय..पैशाने सुख मिळत नाही असं म्हणतात पण आमचं सुख याच पैशाने हिरावलं होतं.. खूप वाईट दिवस पाहिलेत आम्ही..आमच्या मुलीला जी स्थळं आली आहेत त्या मुलांना दीड दोन लाख महिना पगार आहे..माझ्यासारखं बापाचं मन मुलीचं सुखच बघेन...हे बघा मॅडम, प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण प्रेम चिरकाल टिकतंच असं नाही..उद्या संसारात अडचणी आल्या तर मुलीला तिच्या निर्णयाचा पाश्चात्ताप नको व्हायला...आता ती पोटतिडकीने म्हणतेय सगळं पण आम्हीही चार पावसाळे जास्त पाहिलेत.."

शलाका खूप समजावण्याचा प्रयत्न करते...दोघांचं बोलणं सुरू असतांना तनिषा मधेच बोलते.

"उद्या जो मुलगा येणारे त्याला किती आहे पगार?"

"दीड लाख...आत्तापर्यंत जेवढी मुलं आली त्यात सर्वात जास्त.."

"भैरवला तीन लाख पगार आहे..काय म्हणणं आहे?"

भैरव चकितच होतो..तनिषा त्याला डोळे मिटून इशारा करते..

पगार ऐकून वडील तर गारच पडतात आणि लग्नाला आनंदाने होकार देतात.

___

"मॅडम माझा पगार मला पुरेसा होता, केवळ लग्नासाठी तुम्ही हे सगळं का केलं?"

"बहीण म्हणतोस ना मला? मग एवढं तर करायलाच हवं..तुला प्रमोशन तर देऊ शकत नाही...कारण माझ्या नंतर तुझंच पद सर्वात मोठं..."

भैरव हसायला लागतो, शलाका आणि भैरव दोघांचे हात आपसूकच मॅमचे पाय पडायला वाकतात..

____

"बॉस, सगळी तयारी झाली आहे...उद्या सकाळी जेव्हा शब्दांतर मध्ये ती बाई जाईल तेव्हा सगळं बेचिराख झालेलं असेल.."

"Good... मला हेच हवं होतं.."

______

तनिषा तिच्या केबिनमध्ये कामाला लागते..भैरव आणि शलाका भैरवच्या केबिनमध्ये जातात..

"मॅम ने जे केलं त्यांचे उपकार आयुष्यात मी विसरू शकणार नाही.."

"खरंच... मॅम ने मला भावाप्रमाणे कायम सांभाळलं..जीव द्यायला गेलेलो तेव्हा नवीन आयुष्य दिलं..आणि आताही..."

"भैरव...एक गुड न्यूज आहे, माझं पुस्तक फायनल झालंय आणि आजच त्याच्या प्रिंट्स निलातिष मध्ये निघायला सुरवात होतील...काल्पनिक म्हणून ते प्रकाशित होतंय, पण मॅमच्या नावाने ते प्रसिद्ध झालं असतं तर खूप आनंद झाला असता मला.."

"कोणतं पुस्तक?"

तनिषा मागून येते, तिने सगळं ऐकलेलं असतं. शलाका आणि भैरव दोघेही कावरेबावरे होतात..

"सांगाल का कसलं पुस्तक?"

भैरव सगळं खरं खरं सांगून टाकतो..तनिषाला हे ऐकून धक्का बसतो..

"चला माझ्यासोबत.."

"कुठे?"

तनिषा काहीही बोलत नाही, दोघेही गपगुमान तिच्या मागे जातात..गाडीतही ती काही बोलत नाही पाहुन दोघेही घाबरतात..ती गाडी सरळ निलातिष मध्ये घेते..आणि जिथे प्रिंटिंग सुरू असतं तिथे जाते..पुस्तकाच्या प्रिंट्स निघत असतात..ती पटकन मेन स्विच बंद करते आणि मशीन बंद होतं...

"कोण आहे रे तिकडे?" तिथली माणसं ओरडतात..

"शलाका, एडिटर ऑफीस कुठेय? चल मला घेऊन.."

शलाका मॅमला घेऊन जाते...

"बस इथे..आणि रिप्लेस कर. "

"काय रिप्लेस?"

"जिथे तू कंपनीचं नाव, माझं नाव काल्पनिक वापरलं आहे तिथे माझं टाक.. शब्दांतर चं टाक आणि मग प्रिंट्स घे.."

भैरव आणि शलाकाला प्रचंड आनंद होतो..

"मॅम? पण .."

"सगळं सत्य समोर आलंय, आता कुणालाही घाबरायचं काहीही कारण नाही..जे सत्य आहे तेच आता समोर असेल.."

शलाका एडिटिंग चं काम सुरू करते आणि तिसऱ्या दिवशीपासून प्रिंट्स का सुरवात होणार असते..

____

पुस्तकाचं draft तनिषा घरी घेऊन येते आणि रात्री निवांत वाचत बसते, त्यात तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी अगदी तंतोतंत दाखवलेल्या असतात..याची माहिती शलाकाला कुणी दिली हा तिला प्रश्न पडतो...शलाकाला लगेच फोन करून विचारावं असं तिला वाटतं पण खूप उशीर झालेला असल्याने फोन करणं ती उचित समजत नाही.

मानव खोलीत येतो तशी ती झोपायला लागते..

"तनिषा...मला माहितीये की मला माफ करणं तुला जमणार नाही..पण फक्त माझं ऐकून घे, तू आज जे काही आहेस त्याचा मला प्रचंड अभिमान आहे..माझा पुरुषी अहंकार मध्ये आला आणि हे सगळं घडलं, खूप वाईट वाटतंय मला..मला माहित नाही पुन्हा तू कधी माझ्याशी आधीसारखी वागशील ते, पण मी मात्र कायम तुझ्यावर प्रेम करत राहणार.."

तनिषाने डोळे मिटलेले असले तरी मानव जे बोलला ते ती ऐकत असते..मानवने चूक केलेली असली तरी त्याचं प्रेमही तिला आठवू लागलं.. कित्येक पुरुषांसोबत मिटिंग असायच्या, त्यांना पर्सनली भेटायला जावं लागायचं.. पण मानवने एका शब्दाने कधी अविश्वास दाखवला नाही...कित्येकदा मला बाहेर जास्तवेळ थांबावं लागायचं, पण मानव घरातलं सांभाळून घ्यायचा..मी आजारी असले तर त्याचं चित्त थाऱ्यावर रहात नसायचं...माझ्या आडून लोकांकडे माझं कौतुक करत फिरायचा...माई चुकीच्या आहेत म्हटल्यावर बायकोची बाजू घ्यायला मागेपुढे पाहायचा नाही.."

वाईटातही चांगलं बघायचा तनिषाचा स्वभाव. मानवला माफ करायची तिची आता तयारी होती..

___

बॉस, माझी माणसं पाठवली आहेत...रात्री 12 वाजता बरोबर 6 माणसं शब्दांतर मध्ये घुसतील आणि सगळं पेटवून देतील..ती सहा माणसं ऑफिसबाहेर जातात..हातात रॉकेलच्या कॅन आणि लायटर...

___

तनिषा शांत झोपलेली असते, पण तिच्या साम्राज्यावर कुणीतरी हल्ला केलाय हे तिच्या ध्यानीमनीही नसतं... तिकडे वीर भोसले त्याचं काम फत्ते करतो आणि बॉस बसल्या बसल्या खुश होतो...

____
(दुसऱ्या दिवशी)

"मावशी, माईंना जास्त तिखट, तेलकट नाही चालत... त्यांची पथ्य तुम्हाला सांगितलेलीच आहेत.."

माई मागून ऐकत असतात, इतकं सगळं होऊनही तनी माझा विचार करतेय ऐकून त्यांना थोडा का होईना तिच्याबद्दल अभिमान वाटला...

तनिषा तिचं आवरून शब्दांतर मध्ये निघते...गाडीतून उतरून एकदा ऑफिसकडे बघते आणि तिला धक्काच बसतो...कितीतरी वेळ ती ऑफिसकडे बघत असते..गाडीचं दार आपटून पटकन ऑफीसकडे धावतच जाते..

ऑफिसबाहेर खूप माणसं जमलेली असतात, खूप गर्दी दिसुन येते..पोलीस उभे असतात..
तनिषा जाते तसं सर्वजण तिला जागा करून देतात..
"काय झालं?"

शेजारी झोपडपट्टीत असलेली माणसं पुढे येतात. सोबत सहा माणसं घेऊन येतात..

"मॅडम ही लोकं बघा...काल रात्री 12 वाजता आम्ही माणसं बाहेरून येत होतो तेव्हा ही लोकं काहीतरी गडबड करताना दिसली, त्यांच्या हातात रॉकेलच्या कॅन होत्या, आम्हाला गडबड वाटली आणि आम्ही त्यांच्या पाठलाग केला...ही लोकं ऑफिसला आग लावायला आलेली...आम्ही एकेकाला धरलं आणि ते करण्यापासून रोखलं..तडक पोलिसांना बोलावलं आणि त्यांच्या हवाली केलं..आज पुन्हा पंचनामा करायला पोलीस त्यांना घेऊन आले.."

तनिषाला धक्का बसतो, इतक्या मेहनतीने, जीवाचं रान करून उभ्या केलेल्या साम्राज्याला कुणीतरी पेटवायला आलंय म्हटल्यावर तिचा संताप झाला...पुढे येउन एकेकाला तिने कानफटात मारली...आज तिने महिषासुर मर्दिनीचं रूप घेतलं होतं..शब्दांतरला आग लावणं म्हणजे तिच्या अस्तित्वालाच बेचिराख करण्यासारखं होतं..

"कुणी करायला सांगितलं हे काम? बोला पटकन.."

पोलीस पुढे येतात..

"मॅडम कॅनडा मध्ये कुणी वीर नावाच्या व्यक्तिने हे केलेलं आहे..लवकरच आम्ही त्यालाही बेड्या ठोकू.."

"बेड्या नाही फाशीवरच लटकवून टाका त्याला, आमच्या ताईसाहेबांच्या ऑफिसला आग लावताय म्हणजे काय, या माउलीने आमचं जीवन रुळावर आणलं..आमच्या बायकांना काम दिलं, आम्हाला काम दिलं.. आमच्या घरात दोन वेळा जेवणाचे वांदे होते, या बाईमुळे 2 वेळचं पोटभर जेवून चार पैसे बाजूला काढू शकतोय, आमची मुलं फी नाही म्हणून आता शाळेबाहेर बसत नाहीत, आमच्या बायकांना आणि आम्हाला आता मेहनतीचं व्यसन लावलं या माउलीने, आणि तिच्यावर आम्ही संकट कसं येऊ देऊ??"

भरल्या डोळ्यांनी तनिषाने त्यांना हात जोडून धन्यवाद केले..

संकटं आली की प्रत्येकवेळी माणसालाच पुढे व्हावे लागते असं नाही, कधी कधी माणसाची चांगली कर्म सुद्धा माणसाला त्याच्या नकळत वाचवत असतात..!!!

____

पुस्तक प्रकाशित झालं...देसाई बाई एकेक अक्षर वाचत वाचत रडत होती..आपण हिला काय समजत होतो अन ही काय निघाली... इतकं मोठं साम्राज्य असूनही कायम जमिनीवर पाय..
माईंनी ते पुस्तक वाचायला घेतलं, पण त्या गपचूप वाचत होत्या..एकेक शब्द वाचताना त्यांनाही आता कुठेतरी टोचायला लागलेलं..आपण किती वाईट वागलो याची जाणीव होत गेली..पुस्तकाची विक्री जोरात सुरू झाली..

"Best seller book.....तनिषा...एक झंझावाती वादळ.."नावाने ते प्रकाशित झालं..

"शलाका, पुस्तकात अगदी बारीकसारीक गोष्टी तू मेंशन केल्या, पण इतकी माहिती तुला कुणी दिली?"

"नाव नाही सांगू शकत मॅम मी, तसं वचन दिलंय मी.."

"कुणाला?"

"मानव सरांना.."

"काय????"

शलाका जोरात जीभ चावते,

"म्हणजे तो अनामिक व्यक्ती म्हणजे मानव सर?" भैरव विचारतो..

"होय मॅम, त्यांनी जेव्हा भैरव आणि मला ऑफीसला सोडलं तेव्हा गाडीत ते तुमचेच गोडवे गात होते, मला वाटलं की हीच व्यक्ती आपल्याला चांगली मदत करू शकेल...त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला.."

तनिषा पटकन गाडी काढत घरी येते आणि मानवला जाऊन आधी भेटते..

"तनिषा? आता घरी कशी आलीस?"

तनिषा काहीही न बोलता त्याच्या गळ्यात पडते, मानवला समजेना काय झालंय..

"मानव, माझ्याबद्दल तू इतकं सारं पुस्तकात सांगितलंस? माझा संघर्ष, माझी मेहनत, माझी जिद्द...किती अचूकपणे सांगितलं तू...हे सगळं अनपेक्षित आहे माझ्यासाठी.."

"मला तुझा अभिमान कायम होता आणि यापुढेही राहील...जसजसं मी शलाकाला तुझ्या जिद्दीबद्दल सांगत गेलो तसतसं मला स्वतःलाच तुझ्या संघर्षाची जाणीव होत गेली..आणि मी नव्याने तुझ्या प्रेमात पडत गेलो..."

"अच्छा, म्हणून साहेबात गेल्या काही महिन्यांपासून इतका बदल झालेला तर..!!!"

तनिषा आणि मानव मधली दरी सम्पली आणि पुन्हा आनंदाने त्यांनी आपल्या संसाराला नव्या अर्थाने सुरवात केली..

___

आज तनिषा तिच्या केबिनमध्ये न जाता कंपनीच्या सर्वात वरच्या टेरेसवर गेली...तिथून सगळं जग अगदी पायाशी आल्यासारखं दिसत होतं.. अथांग पसरलेली जमीन, त्यावरची घरं.. पण त्या प्रत्येक घरात शब्दांतरचा अंश पोहोचला होता..मासिकातून कित्येकांची जीवन नं बदलली होती, कित्येकांना सकारात्मक ऊर्जा मिळाली होती, कित्येकांची घरं चालत होती..तिने आपल्या हातांकडे पाहिलं.. नाजूकसे हात, याच हातांनी उभं राहिलं होतं संपूर्ण साम्राज्य, ते प्रतिनिधित्व करत होते अखिल स्त्री जातीचे...
याच नाजूक हातात जर प्रत्येक स्त्रीने कर्तृत्वाची दोरी हातात घेतली तर अखिल जगाचं सारथ्य ती करू शकते..पण दुर्दैव हे आहे की हा निर्णय आपण दुसऱ्याच्या हातात देतो..

"मी करू का? मला करू देतील का? मला परवानगी मिळेल का?"

तुम्हाला जर स्वतःवर विश्वास असेल तर कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही..ज्यांना ईच्छा असते ते मार्ग काढतात आणि ज्यांचात धमक नसते ते कारणं सांगतात...

तनिषा केवळ काल्पनिक पात्र नसून प्रत्येक स्त्री चे एक प्रातिनिधिक रूप आहे. फरक इतकाच की तनिषाने आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला मेहनतीने आकार दिला...प्रत्येक स्त्री मध्ये कर्तृत्वक्षमता असतेच..अहो जी स्त्री एखाद्या हाडा मासाच्या बाळाला शून्यापासून सगळं शिकवू शजते, गुंतागुंतीच्या त्याच्या मेंदूवर संस्कार करू शकते तिला काय अवघड आहे? किराण्याच्या चार वस्तू माणसं लिस्ट देऊनही आणायला विसरतात तिथे तिच्या डोक्यात पानभर लिस्ट तयार असते...तिला काय अवघड आहे?

तनिषा श्वास रोखून आकाशाकडे बघत होती, आज आकाशही तिच्या कर्तृत्वापुढे जणू झुकलं होतं.. आणि वातावरणात जणू एकच गाणं गुंजत होतं...

सुन ले खुदा गौर से ज़रा
आसमा मेरा अब्ब आसमा मेरा
नींद तोड़के खाब उड गए

बादल बींच के होंट कर किये
आसमा मेरा अब्ब आसमा मेरा

हो मैं तोह अकेले चल दिया
हाथों में लेके पतवार
माझी पे मुझको नहीं
हाँ थोड़ सा भी ऐतबार
जश्न है जीत का जीत का जीत का
जश्न है जीत का जीत का जीत का

हो मैं तोह अकेले चल दिया
हाथों में लेके पतवार
माझी पे मुझको नहीं
हाँ थोड़ सा भी ऐतबार
जश्न है जीत का जीत का जीत का
जश्न है जीत का जीत का जीत का



छाले कहीं तलवों में
चुभें भाले कहीं
जलती हुयी कहीं थी जमीन
ताले कई दर्द या
फिर सम्भाले कई
फासलों में नहीं थी कमी
हम अभी अड़ गए
आँधियों से लड़ गए
मैंने धकेलके अँधेरे
छीन के ले ली रोशनी
मेरे ही हिस्से के सबेरे
मेरे हिस्से की ज़िन्दगी
जश्न है जीत का जीत का जीत का
जश्न है जीत का जीत का जीत का.

समाप्त

____
समाप्त शब्द ऐकायला जसं तुम्हाला जड जातंय तसंच मलाही खूप अवघड झालं आहे तनिषा चा हा प्रवास इथेच थांबवायला...कथेतून मला जो संदेश द्यायचा होता तो पूर्ण देऊन झालाय. कथा घाईघाईने संपवली असं कदाचित वाटू शकेल पण हाच याचा शेवट आहे..माझ्या ब्लॉग साठी सबस्क्रिप्शन घेतलेल्या आणि कमेन्ट करणाऱ्या प्रत्येक वाचकाची मी खूप ऋणी आहे, प्रत्येकाला रिप्लाय देणं खरंच शक्य झालं नाही याचं खुप वाईट वाटतं पण प्रत्येक वाचकाची कमेन्ट मी दोनदा वाचते, आणि तुम्हा सर्वांची नावं सुद्धा लक्षात आहेत मला...ईरा च्या व्याप सांभाळत असताना दुसरीकडे कथा सुरू होती त्यामुळे जरा धावपळ झाली पण न चुकता रोज एक भाग कुठल्याही परिस्थितीत पूर्ण केला..तनिषा हे पात्र फक्त वाचून सोडून द्यायचं नाहीये, तर ते पात्र जगायचं आहे..मला आणि तुम्हाला...कुठलंही संकट आलं,अवघड परिस्थिती निर्माण झाली, अपमान झाला की या पात्राला आठवायचं आहे...या कथेतून प्रेरणा घेऊन कुणी एखादं काम हाती घेतलं तेच मी या कथेचं यश समजेल..

ईरा आणि लेखकांवर तुम्हा वाचकांचं प्रेम असल्यानेच ईरा नवनवीन उपक्रम घेऊ शकतेय, ईरा चं हे वटवृक्ष केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमाच्या आधाराने उभं आहे...हे प्रेम असंच कायम राहिलं तर याहून मोठा आनंद आम्हाला नाही.

बॉस प्रमाणेच ईरा वर इतर कथा सुरू आहेत, शितल माने यांची निशिगंधा, प्रियांका पाटील यांची आत्मसन्मान, निशा थोरे यांची स्पर्श, स्वामिनी चौगुले यांची माझिया प्रियाला प्रीत कळेना या कथाही तितक्याच सुंदर आहेत...त्यांचा आनंद नक्की घ्या..सबस्क्रिप्शन सुरू ठेवा...आपल्या अश्याच कर्तृत्ववान आणि काहीतरी करण्याची धडपड असलेल्या मित्र मैत्रिणींना ही कथा वाचायला द्या..आणि सबस्क्रिप्शन सुरू ठेवा...सबस्क्रिप्शन घेऊन वाचणाऱ्या वाचकांनी आमच्या लेखनाला सन्मान देऊन आमचा गौरव केलाय याहून मोठी गोष्ट नाही...

आणि हो, बॉस इथेच संपत नाही... पर्व दोन सुद्धा येईलच...आणि त्या आधी घेऊन येतेय एक नवीन कथा..अत्यंत वेगळ्या आणि नाजूक विषयावर... आणि मला थोडासा राग पण आलाय बरं का ..!!! माझे 1000 वाचक असूनही कमेन्ट मध्ये फक्त 30-50 कमेन्ट ??

आज शेवटच्या भागाला त्या प्रत्येक वाचकाने कमेन्ट करा अशी विनंती करते, तुमचा फक्त "chan" एवढा शब्दही काय आनंद देऊन जातो म्हणून सांगू...!!!

आणि हो, तनिषा इथे संपत नाही, ती पुन्हा येईल...लवकरच.. कारण..

"पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..."


🎭 Series Post

View all