बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 53

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 53 (हो का.......सुरज हो......आता निघायच का.....मानस हो चालेल निघुया........सुरज ?

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 53

(हो का.......सुरज

हो......आता निघायच का.....मानस

हो चालेल निघुया........सुरज

दोघे पार्किंगमध्ये येवुन आपाल्या बाईक घेवुन घरी जातात.....)

आता पुढे.....

श्वेता घरी येते....तिच्या डोक्यात सुरजने प्रपोज केलेल आठवत होत........ती त्या विचारात तिच्या रुममध्ये येते.....आणि बेडवर पडुन विचार करत असते.......

काय करु त्याला काय उत्तर देवु........आमच सारख भांडण होत म्हणुन त्याला नकार देण बरोबर नाही.......कारण ज्यावेळी त्याला माझ्याबद्दल फिल झाल तेव्हापासुन किती छान वागत होता......मी बोलेन ते ऐकायचा......मी भांडत असले तरी स्वत: मात्र शांत रहायचा....किती बदलला तो माझ्यासाठी......मग हयापुढे भांडेल कशावरुन.....आणि दिसायला पण हॅडसम आहेच की......अभ्यासात पण तसा हुशार आहे...त्याची फॅमिली पण छान आहे...सगळच तर छान आहे....मग नकार देण्यासारख काय आहे........आत्ता त्याच्या बद्दल फिलिंग वाटतही नसेल....पण नंतर त्याच्या सहवासात राहुन त्याच्या बद्दल प्रेम वाटु लागेल....

श्वेता बेडवरुन उठुन आरशासमोर येवुन थांबते.........आणि स्वत:ला आरशात पाहुन लाजते........

मग श्वेता मॅडम सुरजला हो बोलणार ना........श्वेता आरशात पाहुन स्वत:शी बोलत होती.....आणि आपल्याच विचारण्यावर लाजुन हो म्हणते......

उदया मी सुरजला सांगेन....श्वेता

***

मेघना सुध्दा श्वेता काय उत्तर देईल हयाच विचारात होती......तेवढयात मानसचा मेसेज येतो....

काय करतेयस...मानस

काही नाही श्वेताचा विचार करत होते.......मेघना

तिचा का विचार करत आहेस......मानस

अरे तेच की......सुरजला हो बोलेल का हयाचा.....मेघना

अग तु विचार करुन काय श्वेता हो बोलणार आहे का....मानस

तस नाही रे....पण सुरजसाठी काळजी वाटतेय.....मेघना

नको टेन्शन घेवुस......बघु उदया काय होत......मानस

उदया लगेच काय सांगणार आहे होय ती.......मेघना

ते पण बरोबर आहे......मानस

बर बघु उदया काय होत.....मेघना

हो चालेल....बर झोप आता उदया भेटु......मानस

ओके बाय.......मेघना

***

आज कधी नव्हते ते सुरज लवकर क्लासमध्ये येवुन बसला होता.....

मानस व मेघना क्लासमध्ये येतात......सुरजला समोर बघुन दोघांनाही आश्चर्य वाटत.....

सुरज तु आणि क्लासमध्ये.........मानस

झाल का तुझ सुरु..........सुरज

अरे एवढया लवकर क्लासमध्ये दिसलास म्हणुन म्हणालो.....मानस

हो मग यायच नाही का.......सुरज

अरे........मस्करी करतोय यार..मानस

सुरज तुमच्या मॅडम आल्या नाहीत का अजुन......मेघना

काय माहित मॅडम कुठे आहेत.......आज बोलतात की नाही काय माहीत.....सुरज एवढस तोंड करुन बोलतो......

अरे कशाला सॅड चेहरा करतोस.......येईल की...आणि बोलेल तुझ्याशी........मेघना

पाहु की आता......कालच पाहिलस ना......मुद्दाम लवकर घरी गेली......सुरज

अरे काम असेल तिच काही तरी.......मेघना

हम......सुरज

हाय गाईज.......श्वेता

श्वेताचा आवाज ऐकल्यावर सगळे मागे पाहतात.....

100 वर्ष आयुष्य आहे बग तुला....मेघना

अरे बापरे एवढे.......श्वेता

अग हा...आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही...........मेघना

माझ्याबद्दल म्हणजे......श्वेता सुरजकडे पाहत बोलते....

अग अजुन आली नव्हतीस ना मग अजुन आली का नाहीस अस बोलत होतो........मेघना

अस होय.....श्वेता

हो........बर निर्णय झाला की नाही अजुन......मेघना श्वेताकडुन अंदाज काढत विचारते.....

श्वेता बोलणार इतक्यात तिच लक्ष सुरजकडे जात...सुरज मेघनाच्या प्रश्नावर आतुरतेने श्वेताकडे पाहत होता..आता ही काय उत्तर देते.....मग श्वेताच्या मनात काही तरी येत.....एवढी काय गडबड आहे....जरा त्रास देवुया ना सुरजला......एवढया सहज कस हो बोलु.....श्वेता मनातल्या मनात बोलत होती.....

अग काय कुठे हरवलीस.....सांग ना.....मेघना

मेघना ते........म्हणजे...मी अजुन एवढा विचार केले नाही ग........मला अजुन वेळ हवा आहे.....श्वेता एवढस तोंड करुन बोलते....

अग इट्स ओके.......साहजिकच आहे वेळ लागणार.....मी फक्त विचारल ग तुला....मेघना

हम......सुरज थोडा वेळ लागेल........श्वेता सुरजकडे पाहत बोलते..

अग इट्स ओके......तुला जेव्हा सांगाव वाटत तेव्हा सांग....सुरज

थॅक्स सुरज........श्वेता

अग थॅक्स काय हयात......सुरज

सुरज श्वेता आज बोलते की नाही अस वाटत होत.....पण श्वेता नेहमीसारख बोलत होती.....त्यामुळे सुरज त्यातच खुश होता......

थोडयावेळात लेक्चर सुरु होत......एकएक लेक्चर होत व सगळे कॅन्टीनमध्ये जातात.....

मानस व सुरज पुढे गेले होते....व मेघना व श्वेता मागुन येत होत्या.......

मेघना ऐक ना.......श्वेता

हा बोल ना.......मेघना

मी काय विचार केला.....मी सुरजला हो म्हणायच ठरवल होत......म्हणजे माझ्या मनात अशा फिलिंग्स नाहीत पण त्याच्यासोबत राहुन त्याच्या बद्दल फिलिंग्स वाटु लागतील मग त्याला हो बोलुया अस ठरवल होत......श्वेता

मग त्याला सांगितली का नाहीस.....मेघना

अग थोडा त्रास देवुया की त्याला....लगेच हो बोलले तर.......मग काय मज्जा ना...श्वेता

श्वेता तु वेडी आहेस का.......अस करतात का ग......तो बिचारा तुझ्या उत्तराची वाट पाहतोय आणि तु अस करत आहेस.......मेघना

अग थोडी मस्करी चालते ना......श्वेता

श्वेता मला तर हे आवडल नाहीये हा.......मेघना

अग तु नको टेन्शन घेवुस.....मी करेन मॅनेज..........श्वेता

बर.....तुला हव ते कर......मेघना

मेघनाला श्वेताच वागण आवडल नव्हत....पण तिला हयाची जाणीव करुन देण गरजेच होत......मेघनाला काही तरी सुचत व ती श्वेता गेल्यावर मानस व सुरजशी बोलायच ठरवते.....विचार करत ती कॅन्टीमध्ये येते......

किती वेळ लावता तुम्ही.....केव्हाची वाट पाहतोय आम्ही......मानस

अरे थोड बोलत होतो आम्ही त्यामुळे वेळ लागला.........श्वेता

मग सांगायच ना तस......किती वाट पहायची..........मानस

बर बाबा इथुन पुढे सांगेन मी.........श्वेता

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all