Feb 24, 2024
बालकथा

निळा घोडा

Read Later
निळा घोडा
निळा घोडा


अकबर बादशहा हा जेवढा दिलदार, मनाने उदार आणि कलासक्त होता तेवढाच त्याला समोरच्याला पेचात टाकण्याचा आणि बुद्धीचा कस लागेल असे प्रश्न आणि गोष्टी करण्याचा छंद होता.


एके दिवशी अकबर बादशहा घोड्यावर बसून शाही बागेत फिरायला गेला. त्याच्याबरोबर बिरबल सुद्धा होता. वसंत ऋतूतील बहर बागेतील सर्व झाडांवर दिसत होता. शाही बागेतील प्रत्येक झाड पानाफुलांनी अगदी भरून आलं होतं. बागेतील झाडांची ही रंगांची आणि गंधांची उधळण बघून बादशहा अतिशय प्रसन्न झाला. बागेमध्ये चारही बाजूला हिरवीगार झाडे आणि हिरवे हिरवे गवत पाहून बादशहाला फार आनंद झाला. त्याला वाटले की बागेत फिरण्यासाठी तर घोडाही रंगीतच हवा. बादशहाला वाटले, 'जर बाग रंगबिरंगी असू शकते तर माझ्याकडेही बागेत फिरण्यासाठी निळा रंगाचा घोडा का नसावा?'

दुसऱ्या दिवशी शाही दरबारात बादशहाने हुकूम सोडला की, "महालाच्या शाही बागेत अनेक सुंदर सुंदर फुले उगवली आहेत. ती फुलं जितकी रंगीत आहेत तसाच रंगीत घोडा ही आम्हाला हवा आहे. जो कोणी आम्हाला निळ्या रंगाचा घोडा आणून देईल त्याला मी मोठे बक्षीस देईन."

बादशहाच्या दरबारातील सर्व मंत्र्यांना हे चांगल्याने माहीत होते की मी या रंगाचा घोडा नसतो पण बादशहाच्या अशा विचित्र वागण्याला केवळ बिरबलच करून उडू शकतो हेही त्यांना पुरेपूर ठाऊक होते.

दरबारातील एका मंत्र्याने थोडीशी हिंमत करून बादशहाला विनंती केली की, "जहांपना आपल्या दरबारात तर जगापेक्षा वेगळ्या गोष्टी करण्यात बिरबलजीत माहीर आहेत, तर हे महत्त्वाचे काम आहे तुम्ही त्यांनाच सोपवावे."

बादशहा लगेच बिरबलाला म्हणाला, "तु मला सात दिवसांमध्ये निळ्या रंगाचा घोडा आणून दे, जर तुला निळा रंगाचा घोडा मिळाला नाही, तर तुझं तोंडही मला दाखवू नकोस."

निळा रंगाचा घोडा तर कोठेच नसतो हे अकबर आणि बिरबल या दोघांनाही ठाऊक होते, पण अकबराला बिरबलाची परीक्षा घ्यायची होती.

निळा रंगाचा घोडा शोधण्याचे निमित्त करून बिरबल सात दिवस इकडे तिकडे भटकत राहिला. मग तो बादशहाकडे परत आला.

तो बादशहाला म्हणाला, "महाराज मला निळ्या रंगाचा घोडा मिळाला आहे."

बादशहाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "लवकर सांग मला, तो निळा रंगाचा घोडा कुठे आहे?"

बिरबल म्हणाला, "महाराज हे काम थोडं कठीण आहे. त्या घोड्याच्या मालकाने दोन अटी घातल्या आहेत."

भाच्याने विचारले, "कोणत्या आहेत त्या दोन अटी?"

बिरबल म्हणाला, "घोडा आणायला तुम्हाला स्वतःच जावं लागेल."

बादशहा म्हणाला, "हे तर सरळच आहे. मी स्वतःच तो घोडा आणायला जाणार. त्याची दुसरी अट कोणती आहे?"

बिरबल म्हणाला, "घोडा खास रंगाचा आहे म्हणून त्याला आणायचा दिवसही खास असतो. त्याचा मालक म्हणतो की, आठवड्याच्या सात दिवसांशिवाय इतर कोणत्याही दिवशी येऊन त्या घोड्याला घेऊन जा."

अकबर बादशहा बिरबलाच्या तोंडाकडे पाहतच राहिला. बिरबल हसत हसत म्हणाला, "महाराज निळ्या रंगाचा घोडा आणायचा असेल तर त्याच्या अटी सुद्धा मान्य कराव्याच लागतील ना?"

अकबर खळखळून हसला बिरबलाच्या चातुर्यावर तो खुश झाला. बिरबलाला पैसा पडणे सोपे नाही हे तो समजून चुकला.

लोककथांवर आधारित.

©® राखी भावसार भांडेकर, नागपूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//