तिचा वाढदिवस भाग दोन

Birthday Of A Common Housewife



मुलगी - " मम्मा मम्मा चहा उकळतोय, पटकन गॅस बंद कर नाहीतर उतू जाईल."

लेकीच्या आवाजांनं तिची विचारमालिका भंगली. आणि तिने चहा नवऱ्याला नेऊन दिला. अंदाजाप्रमाणे तो वर्तमानपत्रात नाक खुपसून बसला होता. तिच्या मुलीची मात्र बडबड सुरू होती.

मुलगी - मम्मा मला आज ढोकळा खायचा आहे आणि रात्री मी नेहा कडेच उशिरापर्यंत थांबणार आहे. प्लीज लवकर नाश्ता बनवा आणि हो आज मला भेंडीची भाजी खायची आहे एवढं बोलून ती आवरायला बाथरूम मध्ये पळाली सुद्धा.

चहापाणी झाल्यावर तिकडे नवऱ्याची पण ऑफिसमध्ये जाण्याकरता घाई सुरू झाली.

नवरा - "आज ऑफिस मध्ये नवीन प्रोजेक्ट प्रेझेन्टेशन आहे आणि जेवण मी बाहेरच बाहेरच करणार आहे."

ती - " आणि घरी यायला वेळ होईल ." तीनं
पुष्टी सोडली.

नवरा मंद हसला तिच्या समजदारी त्याला कौतुक वाटलं ! पण तिच्या मनात काय तुटलं हे त्याला कळलं सुद्धा नाही.

मुलगी आणि नवरा नाश्ता करून हॉलमध्ये काहीतरी बोलत बसले होते. हिला मात्र वेडी आशा - नाही सकाळी पण कदाचित संध्याकाळी - एखादं अनपेक्षित सरप्राईज आपल्यासाठी प्लान करत असतील.

टीना पटकन आंघोळ आटपून साधा वरण भात भाजी चा स्वयंपाक केला. दहाच्या ठोक्याला बापरे ताटावर बसले आणि साडेदहाला आपापल्या दिशेला निघून सुद्धा गेले.


सगळे आवरून आपल्या लहान याला नाव धुमाकूळ घालून त्याच्यासोबत तिने आज खूप दिवसांनंतर देवाची साग्रसंगीत पूजा केली. तिच्या लेकरांना विचारलं -

मुलगा - "मामा आज काय आहे बाप्पाचा बर्थ डे ?"

ती - " नाही आज आहे मम्माचा वाढदिवस."

मुलगा - " हॅपी बर्थडे मम्मा." (त्यांनं एक गोड पापा घेतला तिचा आणि दोन टपोरे थेंब ओघळले तिच्या गालावर.)

दुपारी आपला छकुला झोपवून ती परत आठवणींच्या राज्यात गेली. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस तिला आठवला.

नवऱ्याने न सांगता आम्रखंड खव्याची करंजी आणि आणखी एक-दोन मिठाया आणल्या होत्या. पण लगेच सासुबाई बोलल्या-

सासुबाई - " सुनबाई ते सगळं फ्रिजमध्ये तसंच ठेव . डबे नको उघडू, उद्या गुढीपाडवा आहे ना ! नैवेद्याला होईल. उष्ट करू नको करू देवाला चालत नाही."

तीनं इच्छा नसूनही होकाराची मान हलवली आणि मिठाईचे डबे फ्रीजमध्ये ठेवून , ती रूमकडे वळली. नवरा नेहमी सारखाच अबोल होता. नवऱ्याच्या अबोल शुभेच्छा तिनं मनोमन समजून घेतल्या .


©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all