याचक अंतीम भाग

Story Of A Unfortunate Lover Boy


यथावकाश वैशालीला मुलगा झाला तीने त्याचं नाव \"प्रणय\" ठेवले.

मधल्या काळात विराजने आपल्या दुसर्‍या एका मैत्रिणीशी-विशाखाशी लग्न केले.

सुरुवातीचे काही महिने सगळं अगदी छान छान होत, पण थोड्याच दिवसात विराज सतत \"वैशाली आणि विशाखाची - त्याच्या बायकोची\" सुरुवातीला मनात आणि नंतर उघड-उघड तुलना करायला लागला. विराज वैशालीला विसरू शकत नव्हता, आणि आपल्या पत्नीला स्वीकारूही शकत नव्हता. विशाखाशी तो तुसडेपणाने, तुटल्यासारखे वागत होता. त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की त्याला काय झालं ते !

असेच एकदा एका घरगुती कार्यक्रमावरुन विराज कडची सगळी मंडळी घरी परतत असताना, वीराजच्या गाडीला अपघात झाला, तो आणि त्याची पत्नी या अपघातात जबर जखमी झाले.


ह्या अपघातात वीराजच्या गुप्तांगाला जबर मार लागला, आणि विशाखाचं गर्भाशय आडवंतिडवं फाटलं. त्या दोघांचा जीव तर वाचतला,पण अपघातामुळे,ते दोघे आता कधीच आई-वडील होऊ शकणार नाही, हे डॉक्टरने त्यांना सांगितले. डॉक्टरचे म्हणने ऐकून विशाखाला जबर मानसिक धक्का बसला.


विशाखा वेड्या सारखीच करायला लागली! दिवस-रात्र फक्त आपण आई होणार आहोत! आणि आपल्याला दिवस गेले आहेत, त्याप्रमाणे ती वागत होती, बोलत होती. जेवणाच्या ताटावर उलट्या, मळमळणे, डोके गरगरणे ,स्त्री रोग तज्ञाची अपॉइंटमेंट घेऊन चेक करायला जाणे ,असा सगळा तिचा पोर खेळ सुरू होता.

तिची ही दयनीय अवस्था बघून सारेच हादरले, पण ते तिला परतही पाठवू शकत नव्हते. वीराजही अगदी हतबल झाला.

विशाखाचा अपत्यासाठीचा वेडेपणा पाहुन वीराजचे काळीज ही द्रवले! आणि आपण दोन निष्पाप मुलींचा बळी घेतला याची त्याला टोचणी लागली!!


"वैशाली तर नाही, पण कमीत कमी विषाखाला तरी आपण माणसात परत आणू या !" असा विचार करून विराज, वैशाली - हेमंतच्या शहरात पोहोचला. आधी हेमंतशी त्याच्या ऑफिसमध्ये भेटून त्याला आपली सगळी राम कथा सांगितली, आणि वैशालीशी भेटवण्याची विनंती केली. हेमंतने सुरुवातीला ना-नुकर केली पण शेवटी भावाच्या प्रेमापुढे हतबल होऊन हेमंत विराज ला घरी घेऊन गेला.


वैशाली नुकतीच ऑफिसमधून आलेली होती आणि \"प्रणय\" सोबत खेळत होती.

सुरुवातीला वैशालीने विराजला ओळखलच नाही, विमनस्क, रोडावलेला, रडवेला,खंतावलेला विराज बघून तिला मनात कसंनुसं झाल. पण तरीही मागचा तिचा सगळा राग पुन्हा उफाळून वर आला.


वैशालीने त्याला खूप खूप बोलून घेतले, त्याच्या बेताल वागण्यामुळे तिला आणि तिच्या परिवाराला किती मानहानी सहन करावी लागली याची त्याला जाणीव करून दिली, आणि त्याला परत जाण्यासाठी सांगितले.

पण तरीही विराजने तिच्याकडे त्याच्या पितृत्वाची याचना केली!

तेव्हा वैशाली म्हणाली -"तो अधिकार आता तुला नाही".


विराज आणि वैशाली मध्ये खूप वाद-प्रतिवाद,आरोप-प्रत्यारोप झाले, शेवटी हेमंतनेच मध्ये हस्तक्षेप केला.


हेमंत -"वैशाली, अग ! तुला सावरायला, सांभाळायला मी होतो, पण विशाखाच काय? तिचा काय गुन्हा? तु विराजच्या गुन्ह्याची शिक्षा विशाखाला देऊ नकोस! निदान माणुसकीच्या नात्याने तरी तू विराजला माफ कर."



हेमंतने अनेक उदाहरणं ,आणि दाखले देऊन, अनेक प्रकारे वैशालीला समजावून सांगितले, आणि केवळ हेमंतच्या म्हणण्या खातर वैशाली, हेमंत आणि प्रणय, विराज सोबत आपल्या दुरावलेल्या कुटुंबाजवळ राहायला, परतीच्या प्रवासाल निघाले.

लहानग्या प्रणयला बघून विशाखाची मनस्थिती झपाट्याने सुधारू लागली आहे.

वैशाली आणि हेमंतच्या संसारावर एक नवीन फूल उमलणार आहे. वैशाली पुन्हा आई होणार आहे.


पूर्णविराम.


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.



🎭 Series Post

View all