याचक भाग दोन

Story Of A Unfortunate Lover Boy


त्यामुळे हेमंत ही फारसा विचार न करता ती बॅग घेऊन , त्याच्या वडिलांच्या ऑफिस कडे जायला निघाला, पण रस्त्यात त्याला वैशाली दिसली. तिची गाडी खराब झाल्याने तिथे बसची वाट पाहत ती उभी होती, त्यामुळे हेमंतने पण अनायसेच वैशालीला लिफ्ट दिली.


जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक ऑफिसमधले अधिकारी निळकंठरावांना पैशाच्या पिशवी सकट अटक करायचं म्हणत होते ,तेव्हा वैशाली मध्ये पडली आणि म्हणाली की,

वैशाली -"ही बॅग आणि हे पैसे माझे आहेत आणि आज मी आणि हेमंत काही दागिने खरेदी करायला जाणार होतो, पण निळकंठराव यांचा फोन आल्याने आम्ही ईकडे परतलो".

निळकंठराव यांच्या ऑफिसमध्ये वैशाली जे काही बोलली ते सगळं तिने पोलीस स्टेशनला स्टेटमेंट म्हणून दिले, आणि सर्व बालंट स्वत: वर घेतले.


हेमंत आणि निळकंठरावांनी यथावकाश खरा गुन्हेगार शोधला.


पण या सगळ्या गोंधळात वैशाली आणि विराजच्या नात्यावर खूप ताण आला. आपला भाऊ आणि आपल्या वडीलांना वाचवण्यासाठी वैशालीने हे सर्व बालंट स्वतःवर घेतलं आहे, या गोष्टीवर प्रथमतः विराजला विश्वास होता आणि त्याच्या मनाला ते पटलही. पण नंतर, जेव्हा हेमंत वैशाली च्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करत होता, तिला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेटत होता, तिला मानसिक आधार दिला आणि तिच्या साठी जामीन म्हणून ही राहिला, तेव्हा हेमंतची वैशाली साठीची धावपळ बघून विराटच्या मनात संशयाचा राक्षस शिरला आणि तो वैशालीला दुर्लक्षित करु लागला.


वैशालीने विराजला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ ! शेवटी अखेरचा उपाय म्हणून वैशाली विराजला हे ही सांगितले की ,

वैशाली -"मी दोन महिन्यांची गर्भवती आहे". पण विराज काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. हे मूल त्याच आहे हेही त्याने अमान्य केले. आणि वैशालीला रागात म्हणाला की ,

विराज -"ज्याचं मूल आहे त्याच्याकडे परत जा".


वैशालीची आई म्हणजे सुधाताई - साधनाताई- वीराजच्या आईकडे गेल्या आणि त्यानी वीराजचा निर्णय काय आहे हे विचारल. साधनाताई सुधाताईंना समजावण्याचा प्रयत्न केला…

साधनताई -"आज ना उद्या वीराज शांत होईल आणि त्यांचं नातं पुन्हा सुरळीत होईल.तुम्ही नका काळजी करु".

पण जेव्हा सुधाताईने -वैशालीच्या प्रेग्नेंसी विषयी, साधना ताईंना सांगितले, तेव्हा साधना ताईंना धक्काच बसला ! आणि हा तिढा कसा सुटणार याची काळजी त्यांना वाटू लागली, याशिवाय वैशालीचं असं बेबंद वागणं साधना ताईंना, वीराजच्या आजीला , आणि निळकंठरावांनाही अजिबात आवडल नाही. अगदी अनपेक्षित निर्माण झालेला हा सगळा गुंता, आता कसा सोडवावा? हे कुणालाच कळत नव्हत. ते सगळेजण वैशालीलाच दोष देत होते.


या सगळ्या गोंधळात - रागात - हटवादीपणात आणि दोषारोपण करण्यात महिना - दीड महिना निघून गेला! या संपूर्ण काळात वैशालीला हे कळून चुकले की , आता विराज तिच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही.

दरम्यानच्या काळात तीने एका मोठ्या कंपनीत अर्ज केला आणि नशिबानेच त्या मोठ्या कंपनीत तिला नोकरीही मिळाली .

ते शहर , त्या आठवणी आणि झीडकारलेलं प्रेम या सगळ्यांमुळे वैशाली ते शहर सोडायला मनोमन तयार झाली होती. या दीड दोन महिन्यातली वैशालीची मनोअवस्था हेमंत अगदी जवळून बघत होता. विराजच असं अमानवी वागणं त्याला अजिबात रुचल नाही, म्हणून वैशालीने ते शहर सोडण्याआधी हेमंतने तिची मनधरणी केली, आणि ते दोघं \"रजिस्टर्ड मॅरेज\" करून वैशालीच्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन दुसऱ्या शहरात स्थायिक झाले.

**********************************************

पुढच्या भागात बघूया विराजच्या आयुष्यात कुठलं नव संकट येते ते.


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.



🎭 Series Post

View all