याचक भाग एक

Story Of A Unfortunate Lover Boy

   "अरे माझं ऐकून तरी घे"-वैशाली!

    "काय ऐकायचं आता? सगळं संपलं"- विराज

     "विराज, मी खूप खूप प्रेम करते तुझ्यावर"

    "त्याचा आता काय उपयोग?" - विराज

       "  म्हणजे?"- वैशाली

   "अग तू वेडी- बिडी आहेस का? डोकं फिरलय का तुझं?"- विराज

   "विराज ! विराज माझं ऐकून तरी घे!!"-वैशाली

  "हे बघ, आता मला तुला ओळख दाखवायला ही लाज वाटते!"-विराज "मला माझ्या वाटेनं जाऊ दे"

"असं काय करतो विराज?" "अरे तुझा माझ्यावर जराही विश्वास नाही का?"-वैशाली

"विश्वास ! छ्या !! तुझ्यावर प्रेम केलं तीच चूक झाली"-विराज

"हे बघ तू ही मान्य करतोस की ,तुझं माझ्यावर प्रेम आहे, हो ना?"-वैशाली

"प्रेम होतं ! पण शीः मला लाज वाटते तुझी!"

"मी असं काय केलं ?, की तुला माझी लाज वाटावी!"-वैशाली

"ऐ बाई! मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही!!" आणि रागारागात विराज निघून जातो.

          वैशाली एकटीच खूप वेळ तिथे रडत बसते, पण संध्याकाळ झाल्याने ती घरी परतते. तिचा रडवेला चेहरा बघून तिच्या आईच्या मनात धस्स होते. आई तिला विचारते की, "काय झालं?"

             वैशाली परत स्फुंदते आणि विराज काय म्हणाला ते सांगते. विराज ची प्रतिक्रिया ऐकून वैशाली ची आई पण विचारात पडते. परंतु त्याच वेळी वैशाली आपला निर्धार पक्का झाल्याप्रमाणे आईला सांगते की \"तिच्या होणाऱ्या बाळाला ती नक्कीच जन्म देईल\".

             वैशाली आणि विराज आर्किटेक्ट कॉलेज मधले सगळ्यात फेमस लव्ह बर्ड्स. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच दोघांचं प्रेम जडलं, फुललं आणि यथावकाश बहरलही.

             आर्किटेक्ट चा कोर्स पूर्ण होताच \"हे दोघे लग्न करणार \" आहे हे सगळ्यांना अगदी माहीत होतं, दोघांच्या घरच्यांची ही या लग्नास संमती होती.

              वैशाली मध्यमवर्गीय सधन घरातली थोरली! देखणी, हुशार, बिनधास्त, धाकटी पण अभ्यासात हुशार!! वडील नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक आणि आई सामाजिक कार्यकरती.

      तर विराज गर्भश्रीमंत घरातलं शेंडेफळ! लाडाकोडात वाढलेला!! हट्टि, हुशार , आणि हॅंडसम हंक ,मोस्ट एलिजिबल बॅचलर.

          विराज चे वडील बांधकाम व्यवसायिक, शिवाय जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, आणि ग्रामीण बँकेचे मानद सदस्य , याशिवाय इतरही अनेक पदे त्यांच्याकडे होती. वीराज ची आई शांत , सुस्वभावी आणि प्रगल्भ ,शिवाय घरात एक बहीण, जुळा भाऊ हेमंत आणि वीराजची आजी असा सगळा परिवार.

                  विराज ची निवड घरी सगळ्यांनाच आवडली ! पण इथेच गोंधळ झाला, लग्न एका महिन्यावर असल्याने सारेच उत्साहात आणि आनंदात होते. घरात खरेदीची लगबग सुरू होती. विराज च्या वडिलांचे \"निळकंठराव यांचे\" काही विरोधक आणि काही हितशत्रू यांनी कट रचला -विराज च्या जुळ्या भावाला म्हणजेच \"हेमंत\" ला निळकंठराव यांच्या एका जवळच्या आणि विश्वासातल्या सहकाऱ्याने  एक बॅग दिली निळकंठरावांना द्यायला, आणि दुसरीकडे \"लाचलुचपत प्रतिबंधक ऑफिस\" मध्ये तक्रार दिली कि निळकंठराव काही हजार रुपयांची लाच मागत आहेत. 

         तो सहकारी हेमंतला सांगतो की, \"घरी लग्नकार्य असल्याने तुझ्या वडिलांनी मला काही रोख रक्कम मागितली होती , म्हणून खरेदी करिता ही रोख रक्कम मी माझ्याकडून त्यांना देत आहे."


   

            







  




🎭 Series Post

View all