Feb 23, 2024
प्रेम

प्रायश्चित्त भाग सहा अंतिम

Read Later
प्रायश्चित्त भाग सहा अंतिम


प्रायश्चित्त. भाग-सहा (अंतिम)

सदर कथा ही 2002 सालच्या दशकातली आहे आणि वाचकांनी कथा वाचताना त्या अनुषंगाने विचार करावाही विनंती.

ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.


*********************************************

पात्र

देवदत्त - कथेचा नायक.

आसावरी - नायिका.

अंगद - कथेचा सहनायक आणि देवदत्तचा वर्गमित्र.

निनाद - देवदत्त च्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.

विशाखा - अंगदची बहिण आणि निनादची बायको.

स्वीटी - देवदत्तची मैत्रीण.

***************************************************************


मागच्या भागात आपण पाहिलं की निनाद देवदत्त विशाखा आसावरी रात्री देवदत्तच्या बंगल्यावर थांबतात आता पुढे……


दुसऱ्या दिवशी सकाळी निनाद, विशाखा आणि आसावरी भावे सरांकडे गेले.विशाखा -"काकू? काकू आहात का घरी?"

काकू -"कोण? अग बाई विशाखा? किती दिवसानंतर!"

विशाखा -"काकू सर कुठे आहेत?"

काकू -"अभ्यासिकेत वर्तमानपत्र वाचत बसले आहेत."

विशाखा -"काकू आसावरी पण माझ्याबरोबर आली आहे."

काकू -"काय? कुठे आहे ती? मला तिला भेटायचं आहे."

विशाखा -"काकू सरांना हा धक्का सहन होणार नाही म्हणून, आसावरी माझी मैत्रीण स्वराली या नावाने सरांसमोर जाणार आहे."

काकू -"बर बर. आत तरी ये. हे? (निनादकडे बघून) जावईबापू वाटतं!

निनादने नमस्कार केला.

विशाखा -"हो. निनाद विशाखाला घेऊन या ना."

निनाद -"हो येतो घेऊन."

आसावरीला बघून काकूंना अश्रु अनावर झाले. दोघी मायलेकींनी एकमेकींच्या मिठीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.


विशाखा -"काकू आता सरांना बाहेर बोलवा. त्यांची आणि आसावरीची सॉरी स्वरालीची भेट होणे आवश्यक आहे."


काकू सरांना बोलावून घेऊन आल्या.

विशाखा -"नमस्कार सर. मला ओळखलं का? मी विशाखा अंगदची बहिण."

सर -"अच्छा आणि ही मुलगी कोण तुझ्यासोबत आली आहे?"

विशाखा -"ही माझी मैत्रीण स्वराली. नागपूरला असते. रेडिओवर गाणं म्हणते. कविता, चारोळ्या करते."

सर -"हो का! बाळा एखादी कविता किंवा गाणं ऐकवतेस?"

(आसावरी कडे बघून सरांनी तिला विचारल. खरंतर आसावरीला खूप रडायला येत होतं. तिच्या बाबांची ढासळलेली प्रकृती, उतरलेला चेहरा आणि नजरेतली खंत तिला लगेच जाणवली. पण तरीही तिने एक कविता म्हटली)

गाई पाण्यावर काय म्हणून आल्या
का ग गंगा यमुनाही त्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्त चोरटीला
कोण बोलले माझ्या गोरटीला

कविता पूर्ण झाल्यावर सरांनी आसावरीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आतल्या खोलीत निघून गेले. त्यानंतर जवळपास सहा महिने आसावरी स्वराली बनून सरांना गाणी, कविता ऐकवत होती. सरांच्या तब्येतीत फारच सुधारणा झाली होती आणि सरांनी तिला स्वतःच्या घरीच थांबवून घेतलं होतं. पण सगळं सुरळीत होईल ते आयुष्य कसलं? एकदा दुपारी आसावरी आणि काकू गप्पा मारत होत्या.

काकू -"इतके दिवस आमची आठवण नाही आली का ग?"

आसावरी -"आली ग! मन तर सारखं तुझ्या कुशीत धावत होतं, पण बाबांची शिस्त, त्यांचा गैरसमज. मला तर जगावेसेच वाटेना! पण त्यादिवशी रात्री एक गुरुजी मला बस स्टँडवर भेटले. त्यांना खूप धाप लागली होती, म्हणून मी पाण्याची बाटली आणायला गेले. तर एका भामट्याने माझी पर्स हिसकली. मी त्या गुरुजींना पाणी दिलं आणि ते मला त्यांच्यासोबत नागपूरला घेऊन गेले. मी त्यांच्याकडे जाऊन गाणं शिकली. तिथल्या रेडिओ स्टेशनवर ऑडिशन दिल्यावर निनादजीशी ओळख झाली आणि मग विशाखाची भेट."

मायलेकींच्या गप्पा अचानक भावे सरांच्या कानावर पडल्या आणि त्यांना परत एक भोवळ आली. अंगद,आसावरी आणि देवदत्त सरांना डॉक्टरकडे घेऊन गेले. एक आठवड्यानंतर भावे सरांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आणि एका महिन्यानंतर ते सुखरूप घरी परतले. त्यादरम्यान त्यांची स्मृतीही परत आली होती. घरी परतल्यावर एक दिवस भावेसरांनी आसावरीकडे अंगदचा विषय काढला.

सर -"आसावरी तुझं अंगद विषय काय मत आहे?"

आसावरी -"म्हणजे कशाबद्दल बाबा."

सर -"तो एक व्यक्ती म्हणून तुझं काय मत आहे त्याच्याविषयी?"

आसावरी -"बाबा तो मेहनती आहे, इमानदार आहे, स्वतःवरच्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे त्याला. कर्तव्यपरायण आहे."

सर -"आणखी काही?"

आसावरी-"आणखी काय?"

सर -"तुला आवडतो का? मला आवडलाय तो तुझ्या साठी!"

आसावरी-"बाबा मी आता कधीच विवाहाचा विचार करणार नाही. माझ्या हातून जी चूक झाली आहे तिचं प्रायश्चित्त करायला माझं आयुष्यही कमी पडेल."


आसावरीच्या उत्तराने सर अवाक झाले.


 आपल्या बाबांच्या या प्रश्नांन खरंतर असावरी मनातल्या मनात खूप दुखावल्या गेली होती. हॉटेलच्या त्या प्रसंगात आपल्या वडिलांनी आपली भूमिका जराही समजून घेतली नाही. आपलं म्हणणंही ऐकलं नाही. अंगदने हेतुपुरस्सर आपल्या वडिलांना त्या हॉटेलवर आणलं याचा राग तिच्या मनात होताच. याशिवाय ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला,त्या वडिलांनाच आपल्यावर विश्वास नाही या गोष्टींमुळे ती प्रचंड दुखावल्या गेली होती म्हणूनच, तिने विवाह न करण्याचा निर्णय घेतला होता.

काकूंनी हा विषय विशाखाकडे काढला.

विशाखा -"काकू आसावरीवर झाल्या प्रसंगाचा खूपच खोल परिणाम झाला आहे, त्यामुळे आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा."

काकू -"अगं 26 वर्षाची झाली ती. अजून किती वेळ द्यायचा? तु जरा बोलशील का अंगदशी? सरांना अंगद त्यांचा भावी जावई म्हणून आसावरीसाठी पसंत आहे."

विशाखा -"त्यापेक्षा मी आसावरीशीच बोलेन."

काकू -"ठीक आहे."


विशाखा -"हॅलो विशाखा बोलते आहे."

आसावरी -"हा बोल विशाखा."

विशाखा -"अंगद दादाकरिता एक मुलगी सांगून आली आहे."

आसावरी -"बरं मग?"

विशाखा -"तुझा काय विचार आहे?"


आसावरी -"कशाबद्दल?"

विशाखा -"अंगद दादाशी लग्नाबद्दल."

आसावरी -"कधी तुला देवदत्तबद्दल आपुलकी वाटते तर, कधी अंगदविषयी. प्रत्येकवेळी तु मला का विचारतेस? हे माझे वैयक्तिक प्रश्न आहेत. तू मधे न बोललीस तर अधिक बरं होईल."

विशाखा -"ठीक आहे बाई. नाही तुला त्रास देणार."


विशाखा आणि निनादने आपापसात काहीतरी ठरवलं…..

निनाद -"हॅलो आसावरी देवदत्तला अपघात झाला आहे."


आसावरी -"काय?कुठे आहेत ते?"

निनाद -"तू नागपूरच्या इस्पितळात ऍडमिट आहे. त्याला व्हेंटिलेटर लागलाय."


आसावरी -"मला पत्ता द्या. मी आत्ताच निघते."

निनादने पत्ता दिला. आसावरी त्या इस्पितळात पोहोचली तर, तिथे आय.सी.यु.मध्ये तिला जाऊ दिल नाही. ती हताशपणे तिथेच बेंचवर बसली होती. निनाद आणि विशाखा तिथे आले आणि तिला एका रूममध्ये घेऊन गेले. तिथे देवदत्तच्या हाताला सलाईन आणि पायाला फ्रॅक्चर असा झोपलेला होता. आसावरी धावत गेली आणि तिने देवदत्तचा हात धरला,तिच्या अश्रूंचा बांध फुटला. अव्यक्त प्रेम परत एकदा बहरलं. कथेचा शेवट झाला हे काही वेगळं सांगायला हवं का?

*********************************************

आता देवदत्तची मैत्रीण स्वीटी विषयी-

त्यादिवशी देवदत्त आसावरीला शोधण्यासाठी निघाला होता, पण रस्त्यात त्याचा अपघात झाला. त्याला खांद्याला आणि गुडघ्याला लागलं होतं. स्वीटी तिथेच रस्त्यावर असल्याने ती देवदत्तला घरी घेऊन गेली आणि त्याच्या जखमांवर औषध लावलं. तेवढाच स्वीटीचा आणि देवदत्तचा संबंध. ती त्याची कॉलेजची मैत्रीण होती म्हणूनच तिने देवदत्तला त्यादिवशी मदत केली.

*********************************************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//