Feb 25, 2024
नारीवादी

आधुनिक सावित्री अंतिम भाग

Read Later
आधुनिक सावित्री अंतिम भाग

जलद कथामलीका लेखन आधुनिक सावित्री अंतीम भाग     मागच्या भागात आपण पाहिलं की रमा आणि समर दोघेजण इजिप्तला फिरायला गेले होते. नाईल नदीमध्ये नौका विहार केल्यानंतर तिथल्या नदी किनाऱ्याच्या वाळूमध्ये दोघजण बोलत बसले असताना अचानकच समरच्या पोटात दुखायला लागले आता बघूया पुढे काय होते ते…..समरच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने रमा एक क्षण कावरी बावरी झाली. तिला काहीच कळेना की, समरला काय होते आहे? आणि समर मात्र वेदनांनी तडफडत होता, खूपच जोरात ओरडत होता आणि म्हणत होता..समर -"रमा माझं पोट खूप दुखतय प्लीज काहीतरी कर! प्लीज मला वाचव!! प्लीज!!!"रमा -"समर धीर धर. नक्कीच तू यातून बाहेर येशील."रमाने समरला लगेच इजिप्त मधल्या प्रख्यात डॉक्टरांकडे हलवल. त्या डॉक्टरांनी पण प्रयत्नांची पराकाष्टा केली पण शेवटी त्यांनी हात टेकले.डॉक्टर -"हे बघ रमा आम्ही आमच्याकडून शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले आहेत पण समर आम्हाला कुठलाच रिस्पॉन्स देत नाही आहे. तुझा नवरा या पोटदुखीतून वाचण शक्यच नाही."पण हार म्हणेल ती रमा कुठली? रमाने समरला इजिप्तहून जर्मनीला हलवलं. तिथंल्या जगप्रसिद्ध डॉक्टर्सना ती भेटली. त्यांनीही आपले सारं कौशल्य पणाला लावलं, इतर डॉक्टरांची ही मदत घेतली. पण समर कोणत्याही उपचारांना काहीही प्रतिसाद देत नव्हता. जर्मनीच्या या डॉक्टरांनीही आपली असमर्थता प्रकट केली. पण रमाला समरची साथ सहजासहजी सोडायची नव्हती. शेवटी ती समरसाठी एकटीच उभी राहिली.खरंतर समरला एका सुपर बगने गलीतगात्र करून सोडलं होतं आणि तो आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता. म्हणूनच रमाने हा सुपर बग असा आहे तरी काय, याचा अभ्यास, संशोधन आणि निरीक्षण करायला सुरुवात केली.समरच्या शरीरात घुसलेल्या सुपर बगला मारलं तर समर जगू शकेल याची तिला खात्री होती. पण हा सुपर बग जणूकाही अमरच होता, आहे. जो निदान त्या क्षणी तरी जगातल्या कुठल्याच औषधांना दाद देत नव्हता. त्यासाठी रमाने काय केलं? तर तिने एक नॅचरल व्हायरस तयार केला. त्यासाठी रमान अक्षरशः गटारी, दलदल, तलाव, सडलेली लाकडं, रानटी गवत, डबकी, ज्या ज्या गलिच्छ ठिकाणी वेगवेगळे जिवाणू वाढतात, तिथले जिवाणू रमाने एकत्र केले आणि त्यांचे कॉकटेल तयार करून ते कॉकटेल तिने आपल्या नवऱ्याला -समरला पाजलं! आणि काय आश्चर्य थोड्याच दिवसात समरची तब्येत सुधारली आणि तो एकदम ठणठणीत बरा झाला.**************************************************

वाचक हो पुराणात सावित्रीन सत्यवानाला यमाच्या पाशातून, आपल्या बुद्धी कौशल्याने आणि चातुर्यांना परत आणलं होतं. तर आजच्या या कलियुगात "स्टेफनी स्ट्रेथडी" या "रोगपरिस्थितीविज्ञान" डॉक्टरने आपला पती "पीटरसन" याची या सुपरबग पासून सुटका केली आणि संपूर्ण जगावरच जणूकाही उपकार केले तिचीच ही गोष्ट.

समरला ज्या सुपर बगने आपल्या बाहू पाशात घेतलं होतं तो सुपर बग मध्यपूर्वेच्या रेतीत आढळतो. इराक युद्धात बहुसंख्य अमेरिकी सैनिकांच्या जखमांमध्ये हा सुपर बग आढळून आला होता. त्यामुळे त्याचं नाव इराकी बॅक्टर असं ठेवण्यात आलं. दिवसेंदिवस या सुपरबगचा धोका वाढत असून 2050 पर्यंत सुमारे एक कोटी लोकांचा म्हणजे दर तीन सेकंदांना एका व्यक्तीचा तो जीव घेईल असं तज्ञांचे म्हणणे आहे. दरवर्षी या सुपर बगने 70 लाख लोक मरतात. पण या सुपर बग वर औषध शोधणारी स्टेफनी स्ट्रेथडी च्या संशोधनामुळे कोट्यावधी लोकांचे प्राण वाचण आता शक्य झालेले आहे.

वाचक हो कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका. तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.©® राखी भावसार भांडेकर.

14/10/22


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//