May 15, 2021
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग २)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग २)

    अभीज्ञा विचार करत होती. 

             अगम्य खरच त्याच्या नावा प्रमाणे अगम्य आहे.मी याला ओळते असे म्हणे पर्यंत हा नवीन रुपात माझा समोर उभा असतो. दोन वर्षे झाली आम्हाला वेगळं होऊन! खरं तर चूक माझीच होती म्हणा पण त्याची माफी मी खूप वेळा त्याच्याकडे मागितली. हा मला माफ करेना मग मीच पुण्याला जायचा निर्णय घेतला मला वाटले होते की हा मला आडवेल मला जाऊ नको म्हणेल तर यानेच चक्क मला पुण्यात हाय सोसायटीमध्ये फोर.बीच. के. प्रशस्त फ्लॅट घेऊन दिला आणि आई-बाबा, माझ्या बरोबर यायला तयार नव्हते तरी त्यांना आणि  आऊला,  ही तो माझ्या सोबत पाठवत होता. मीच आऊला इथे राहा अस सांगितले कारण अगम्यची काळजी कोण घेणार होत. तो एकटा कसा राहिला असता.अज्ञांक तर माझ्या बरोबरच असणार हे तर त्याने गृहीत धरले होते. तो अस का वागला? याचे मात्र मला कोडे अजून उलगडले नाही. त्याच माझ्यावर प्रेम तर आहे आणि तो माझ्या चुकीकडे सहज दुर्लक्ष करू शकला असता तरी त्याने तसं नाही केलं. पण मला काही झाले की त्याला सहन होत नाही त्याला मला कायम आनंदात पाहायचं असत. माझी फॅक्टरी, शुगसर फॅक्टरी, ऑफिस या सगळ्यात होणारी ओढाताण पाहून त्याने नोकरी ही सोडली आणि सगळ्या फॅक्टरीजचा भार स्वतः उचलला. माझा अपघात झालेलं कळलं की रात्रीच आला आणि रात्रभर माझ्या जवळ बसून होता त्याच्या काळजीत! त्याच्या डोळ्यात मला प्रेम दिसत पण  तरी तो माझ्या पासून दूर राहतो.पण का? का वागतोय अगम्य असा?

       कधी कधी वाटत तो माझ्या पासून काही तरी लपवतो आहे. तो माझ्या पासून दूर राहण्यामागे नक्कीच काही तरी कारण आहे. मीच मूर्ख त्याच्या जवळ राहून मला ते कारण शोधता आलं असत पण मी आताताईपणे विभक्त होण्याचा निर्णय घेतला.त्याचाच पश्चात्ताप मला होत आहे.  आता काही उपयोग नाही. कारण हा मला काही घरी चल म्हणत नाही आणि मला दोन वर्षात घरी जाण्याचा चान्स मिळाला नाही. मला एकदा जरी चान्स मिळाला ना पुन्हा वाड्यावर जायचा तर मी पुन्हा अगम्य पासून दूर नाही जाणार! त्याच्या शिवाय मी दोन वर्षे कशी काढली मला माहित! वरून किती जरी मी त्याला भांडत असले आणि मी इथे निवांत आहे वाटत असले तरी माझं मला माहित की मी त्याच्या पासून दूर कशी राहत आहे. पण देव ही माझी परीक्षाच घेतोय जणू आणि अगम्य ही याला दोन वर्षांत एकदा ही मला घरी चल अस म्हणावं वाटलं नाही. तूच मूर्ख आहेस अभीज्ञा तुझा आतातायी निर्णय तुला नडला आहे!

              हा सगळा विचार ती करत होती. तो पर्यंत अगम्य आला. आता दुपारचे  दीड वाजले होते आणि त्याने कॅन्टीनमध्ये जेवणाची ऑर्डर सकाळीच दिली होती. त्या प्रमाणे जेवण एक वॉर्डबॉय  जेवण घेऊन आला.अगम्यच्या बोलण्याने ती भानावर आली.अगम्य बोलत होता.


अगम्य,“अभी जेवण कर!” असं म्हणून त्याने तिला उठून बसायला मदत केली.


     अभीज्ञाचा डावा हात फॅक्चर होता. उजव्या हाताची ती व्यवस्थित हालचाल करू शकत होती तरी अगम्यने तिला सकाळी नाष्टा भरवलं होत आणि तिने ही काही ही न बोलता भरवून घेतल होता.आता मात्र अगम्यने तिला उठवून बसवले व तिच्या पुढ्यात ताट ठेवले होते.


अभीज्ञा,“ अरे आज डिस्चार्ज देणार होते ना मला मग अजून का दिला नाही आणि आता माझी पाठ ही दुखतेय” ती तोंड बारीक करत म्हणाली.


अगम्य,“ आज पाच वाजे पर्यंत मिळेल डिस्चार्ज! आणि तुला इतकी घाई का लागली आहे ग?झोपली ही नाहीस तू जागीच आहेस. जेवण कर आणि मेडिसीन्स घेऊन झोप आता! घरी जायला संध्याकाळ होईल.” तो आल्यापासून जरा काळजीतच दिसत होता.


अभीज्ञा,“ आई-बाबा कुठे आहेत?” तिने विचारले


अगम्य,“ बाबांचा फोन आला होता मला! येवू का असं विचारत होते मला! मीच नको म्हणालो त्यांचे वय आहे का हॉस्पिटलचे हेलपाटे घालण्याचे? तू आरामकर गप्प नसत्या चौकशा करू नकोस?” तो चिडून म्हणाला.


अभीज्ञा,“ किती चिडतो आहेस रे! ठीक आहे! मी करते आराम!” ती म्हणाली.


           अभीज्ञा झोपली आणि अगम्य तिच्या जवळ खुर्चीवर बसून मोबाईलवर काही तरी करत राहिला.अभीज्ञाला जाग आली तेव्हा तिला अगम्य कुठेच दिसला नाही. पण आता तिची पाठ ही खूप दुखत असल्याचे तिला जाणवत होते. अगम्यला सांगून डॉक्टरला बोलावून त्यांना पाठ दुखते हे सांगून काही तरी औषध घ्यावे असा ती विचार करत होती. पण अगम्य मात्र कुठेच दिसत नव्हता.त्यामुळे ती चिडली होती.तो पर्यंत नर्स ड्रीप काढायला आली. तेव्हा तिला अभीज्ञा म्हणाली.


अभीज्ञा,“प्लिज जरा डॉक्टरांना बोलवता का!माझी पाठ खूप दुखत आहे आणि माझे मिस्टर कुठे गेले तुम्ही पाहिलं का त्यांना?” ती वेदना होत असल्याने जरा विव्हळतच म्हणाली.


नर्स,“ don't worry mam!तुमची पाठ थोड्या वेळातच दुखायची थांबेल या ड्रीप मधून त्याचसाठी पेनकिलर इंजेक्शन दिले होते तुम्हाला आणि मिस्टर देशमुख खाली आहेत आत्ता गेलेत ते! मला तुमच्याकडे लक्ष ठेवायला सांगून! डिशचार्जच्या फॉर्मेलीटी कम्प्लिट करायला! आज तुम्हाला डिशचार्ज मिळत आहे ना!” तिने  माहिती दिली.


     थोड्याच वेळात डॉक्टर आणि अगम्य आले त्यांच्या बरोबर व्हील चेअर घेऊन वॉर्ड बॉय होता. अगम्यच्या हातात कसली तरी बॅग होती त्यात औषधे आणि तिची हॉस्पिटलची फाईल होती.डॉक्टरांनी अभीज्ञाला चेक केले आणि विचारले.

डॉक्टर,“ असं वाटतंय मिसेस देशमुख आता?”


अभीज्ञा,“ तसं बरं वाटत आहे पण पाठ दुखत आहे! जरा आता कमी झाली दुखायची पण खूप वेदना होत होत्या!” ती बारीक तोंड करून म्हणाली.


डॉक्टर,“ don't worry! होईल कमी हळूहळू!तुम्हाला डिशचार्ज देत आहे मी! पण दीड महिना कम्प्लिट बेड रेस्ट करायचा बाकी मी सगळं मिस्टर देशमुखांना सांगितले.”असं म्हणून त्यांनी ड्रीपची सुई काढली. 


        अगम्यने स्वतः आणि वॉर्डबॉय मदतीने तिला व्हीलचेअरवर बसवले आणि लिफ्टने ते खाली आले अगम्यने पार्किंग मधून गाडी काढली आणि अभीज्ञाला गाडीत मागच्या सीटवर बसवले आणि व्हीलचेअर फोल्ड करून गाडीच्या बूट मध्ये ठेवली. अगम्यने गाडी सुरू केली थोड्यावेळाने गाडी  तिच्या फ्लॅटकडे न जाता पुण्याच्या बाहेर श्रीरंगपूरकडे वळताना पाहून इतक्या वेळ शांत असलेली  अभीज्ञा अगम्यला म्हणाली.


अभीज्ञा,“ अगम्य गाडी श्रीरंगपूरकडे का वळवलीस? मी येणार नाही वाड्यावर मला फ्लॅटवर सोड आई-बाबा वाट पाहत असतील!” ती जरा चिडूनच म्हणाली.


अगम्य,“ आई-बाबा पुण्यात नाहीत ते आज दुपारीच वाड्यावर गेले आहेत. हे बघ अभीज्ञा तुझी तब्बेत ठीक नाही. तर थोडे दिवस तिथे राहा मग जा तुला कुठे जायचे तिथे!” तो तिला समजावत म्हणाला.


अभीज्ञा,“ नाही मला फ्लॅटवर सोड आणि मी कुठे राहायचे हे तू का ठरणार?” ती मुद्दाम त्याला छेडत म्हणाली.


अगम्य,“ तुझा हात फॅक्चर आहे अभी आणि तुझ्या मणक्याला अपघातात झटका बसला आहे त्यामुळे तुला कम्प्लिट बेडरेस्ट सांगितला आहे. तुला बेडवरून हलायची ही परवानगी नाही; पुढचे दीड महिने! आईंचे आता वय झाले आहे. त्यांना तुझी सेवा करणे झेपणार नाही. नसता हट्ट करू नकोस गप्प वाड्यावर चालायचं एक तर तू नसता डोक्याला ताप करून ठेवला आहेस. कोण सांगत ग तुला नसते उपद्याप करायला! एक तर किती दुखापत झालीय तुला आणि वरून ही नाटक! पुढचा दीड महिना तोंड एकमेव बंद ठेवायचे!” तो काळजी आणि रागाने बोलत होता.


    अभीज्ञाला गाडीतील मिरर मधून त्याच्या चेहऱ्यावरची तिच्या बद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती. तिला ही खरं तर वाड्यावर जायचेच होते कारण तिला आता अगम्यचा विरह सहन होत नव्हता आणि तिला आता या अपघाताच्या निमित्ताने आयती संधी चालून आली होती वाड्यावर परत जाण्याची म्हणून ती मनोमन सुखावली होती. पण अगम्यला तसे न जाणवू देता. ती मुद्दाम त्याला तिला वाड्यावर जायचे नाही असे दर्शवत पुन्हा बोलू लागली.


अभीज्ञा,“ हे बघ ते काय करायचे ते माझे मी पाहून घेईन! तू मला फ्लॅटवर सोड! आई-बाबा मला न विचारता न सांगता गेलेत ना वाड्यावर त्यांना राहू दे तिथेच माझं माझं मी पाहून घेईल मला पुण्यात सोड!” ती मुद्दाम बोलली.


अगम्य,“ अभी उगीच माझं डोकं फिरवू नको!  गप्प घरी चलायचं! एक तर तुझ्यामुळे सगळे टेन्शनमध्ये आहेत.सगळे निघाले होते हॉस्पिटलमध्ये मी कसं बस थांबले आहे त्यांना! तुझी नाटक ना बंद कर! एकटी कशी राहणार आहेस ग तू अशा अवस्थेत? उगीच तोंडाला येईल ते बोलायच!” तो रागाने पण काळजी पोटी तणतणत होता आणि अभीज्ञा मात्र त्याची मजा घेत होती. 


अभीज्ञा,“ तुला कशाला रे माझी काळजी? मी पाहीन काय ते!” ती पुन्हा म्हणाली.


अगम्य,“ तुझं तोंड बंद कर आता! इतकं लागलं आहे तरी तोंड बंद होत नाही! मला नाही तर कोणाला असणार ग तुझी काळजी? घ्या आला वाडा!” असं म्हणुन त्याने गाडी थांबवली आणि काराच्या बूट मधून व्हील चेअर काढली आणि अभीज्ञाला धरून त्यात बसवले.

       तो पर्यंत अहिल्याबाई लगबगीने आल्या आणि त्यांनी अभीज्ञा वरून भाकरी उतरवून टाकली. अभीज्ञाला अगम्य हॉलमध्ये घेऊन गेला.अहिल्याबाई आणि तिच्या आई-बाबांच्या तिला पाहून डोळ्यात पाणी आले. त्यांनी तिची विचारपूस केली. सहा वर्षांचा अज्ञांक तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला.


अज्ञांक,“ खूप दुखत का आई तुला?”


अभीज्ञा,“नाही रे अदू मी बरी आहे बच्चा!” ती उसणे हसू आणून म्हणाली.


अहिल्याबाई,“ तुझी आई लवकर बरी होईल बच्चा तू जा रामू  बरोबर खेळ जा बाहेर!”  त्या रामू नोकराला इशारा करत अज्ञांकला प्रेमाने समजावत म्हणाल्या.रामू अज्ञांकला कडेवर घेऊन निघून गेला.


अगम्य,“ आऊ अभीची राहायची व्यवस्था खाली कोणत्या रूममध्ये केली सांग मी तिला तिथे नेतो तिला आरामाची खूप गरज आहे!” तो काळजीने म्हणाला.


अहिल्याबाई,“तुमची रूमवर असताना ती खाली का राहील? हे बघ अमू मला गावात अजून चर्चा होऊ द्यायची नाही. एक तर गेल्या दोन वर्षांपासून मी लोकांना उत्तर देऊन कंटाळले आहे की अभी पुण्यात का राहते?मी अज्ञांकचे शिक्षण आणि ऑफिसचे कारण सांगून मोकळी होते पण आता एकाच घरात राहून वेगवेगळ्या रूममध्ये तुम्ही राहणार मग मी लोकांना काय उत्तर देऊ? रोज आपल्या घरात लोकांचा राबता असतो कसं दिसत ते? तुमच्या दोघात काय असेल ते तुमच्या दोघात ठेवा ते या घराच्या बाहेर जाता कामा नये?” त्या रागानेच बोलत होत्या.


अगम्य,“ अग पण आऊ हिला पायऱ्या चढायला डॉक्टरांनी मनाई केली आहे!”  तो अजून एक कारण पुढे करून मोकळा झाला.


अहिल्याबाई,“ मग उचलून घेऊन जा तिला बायको आहे ना तुझी? मला कोणतेच कारण ऐकायचे नाही तुझे!” त्या अगम्यवर एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाल्या.


      आता मात्र अगम्यचा नाईलाज झाला त्याने अभीज्ञाला अलगद दोन्ही हातात उचलून घेतले अभीज्ञा फक्त त्याला पाहत होती. त्याने तिला यावर बेडरूममध्ये नेऊन बेडवर अलगद झोपवले.अभीज्ञा मनातून खुश  होती पण तिने तसे दाखवले नाही. खाली अहिल्याबाई आणि अभीज्ञाचे आई- बाबा मात्र खुश होती. ते तिघे अहिल्याबाईच्या रूममध्ये गेले. अभीज्ञाची आई म्हणजे सरिताताई म्हणाल्या.


सरीताताई,“ एका अर्थी बरच झालं अभीचा अपघात झाला.दोघे आता एकत्र राहतील देवानेच गाराने ऐकले आपले!” ती हात जोडत म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ काय सरिताताई अहो अभीला किती लागले आहे आणि तुम्ही म्हणता बरं झालं!हा पण देवच पावला म्हणायचे दोघे आता एकत्र राहतील! दोघांचे ही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे पण दोघे ही महा हट्टी आहेत.” त्या म्हणाल्या.


अभीज्ञाचे बाबा,“ हो! काल अगम्य खूप घाबरला होता.अभीला असे बेशुद्ध पाहून! त्याचे खूप प्रेम आहे तिच्यावर! पण आता दोघे एकत्र आहेत ना असेच राहू देत हीच प्रार्थना!” ते म्हणाले.


            अभीज्ञाच्या अपघातमुळे अगम्य आणि अभीज्ञा एकत्र आले होते.पण त्यांच्यात असे काय घडले होते की ते दोघे वेगळे झाले होते?या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule

Circle Image

Swamini Chaughule

आमची टीम मारवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे इरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने जादुई शब्दांची मेजवानी तर आमच्या कथा वाचा आणि लाईक ,कमेंट नक्की करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे